४ नोव्हेंबर ला भारताचे कनवाळू सरकार खिचडी प्रकाराला राष्ट्रीय अन्न म्हणून घोषित करणार आहे.
खिचडी प्रकार आसिंधु-सिंधू आणि अहद राजकोट तहद बंगाल वेगवेगळ्या प्रकाराने खाल्ला जातो. फक्त बरोबरचे तोंडीलावणे दही, चुंदा, टोमातोची चटणी, ते तळलेले मासे असे बदलत जाते, पण सगळ्याच ठिकाणे याच्याकडे कम्फर्ट फूड म्हणून पाहतात.
हेक्टिक दिवसानंतर रात्री समोर आलेली गरम गरम खिचडी , वर तुपाची धार, सोबत पापड कुरडया म्हणजे मला तरी स्वर्ग्प्रप्तीचा आनंद मिळतो.
तर असे हे अल्पमोलि, बहुगुणी अन्न राष्ट्रीय डिश होणार आहे. कुठल्याही “राष्ट्रीय” गोष्टीला असतो तसा मान या डिश ला पण मिळाला पहिलेच, त्यामुळे आपण एक “राष्ट्रीय डिश सन्मान संहिता” तयार करू. (तसेही सरकारी बाबू maayboli वाचतात हे गेल्या नोव्हेंबर मध्ये आम्हाला कळलेच आहे त्यामुळे हि सन्मान संहिता सरकारपर्यंत आज ना उद्या पोहोचेलच)
१) खिचडी हि राष्ट्रीय डिश असल्यामुळे ती सगळीकडे एकाच प्रकारची मिळावी, त्यासाठी घटक पदार्थ आणी त्यांचे प्रमाण आणि शिजवायचा वेळ यांचे प्रमाणीकरण केले जावे. राष्ट्रगीत आपण वाटेल तितका वेळ आणि चालीत म्हणतो का? नाही ना?
२) काही देशद्रोही डाळ तांदूळ एकत्र शिजवून त्यात मटन, सोडे, कडवे वाल असे प्रकार घालतात आणि त्याला त्या पदार्थाची खिचडी म्हणतात, हा प्रकार तत्काळ बंद करावा
३) सरकारी भोजन समारंभ, शाळेतील मध्यान्ह भोजने, कंपन्यातील फोर्मल जेवणे या सगळ्यांचा शेवट २ table स्पून खिचडी खावून व्हावा. हे खिचडी खाताना लोकांनी आदर दाखवायला उभे राहावे. एल्झाक्ट्ली १०७ सेकंद्स मध्ये हि खिचडी खाऊन संपली पाहिजे.
४) खिचडीचे घटक पदार्थ सगळ्यांना मिळावेत म्हणून त्यावर सबसिडी जाहीर केली जावी (खादि वर असते कि नाही? तशीच)
५) प्रत्येक हॉटेल/ खानावळी मध्ये भले ते उडुपी किंवा ५ स्टार हॉटेल असो किंवा सत्यभामा बाईंची घरगुती खानावळ असो खिचडी रोज शिजली पाहिजे आणी ती एका ठराविक किमती मध्ये विकली गेली पाहिजे. यामुळे गरीब लोकांना अन्न सुरक्षा मिळेल. कोणीही कुठेही जाऊन खिचडी मागू शकतो, त्यामुळे समाजात आपोआप समता आणी समरसता रुजेल.
६) अर्थात हि खिचडी विकतघेण्यासाठी आधार नंबर असने गरजेचे आहे.
७) खिचडी राष्ट्रीय अन्न असल्याने “ खिचडी आवडत नाही” म्हंटल्यास राष्ट्रद्रोहाचा गुन्हा लागू केला जाईल आणी रासुका खाली तत्काळ अटक करण्यात येईल.
८) खिचडी संबंधी सर्व नियम पाळले जात आहेत कि नाही हे monitor करायला राष्ट्रीय अन्न सन्मान पथक स्थापित केले जाईल.
९) कोणत्याही वेळी, कोणाच्याही घरात, कोणत्याही समारंभात प्रवेश करायची यांना अनुमती असेल.
१०) घटक पदार्थ आणि एटीकेट्स तपासण्याचे अधिकार या पथकाकडे असतील.
११) कोणत्या प्रसंगी खिचडी बरोबर काय खावे याचे नियम बनवण्यात यावे, (उदा दुपारच्या वेळी खिचडी दह्या बरोबरच खावी, jan ते मार्च काळात कैरीचा छुंदा) भारतीय हवामान आणि आयुर्वेदाचा विचार करून कधी काय खावे याची संहिता बनवण्यासाठी योग गुरूंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमावी.
१२) नाटक, सिनेम,, म्हणी यात खिचडी शब्द वापरता येणार नाही
१३)
वाढवा पुढे....
चला खूप पाचकळपणा करून झाला फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री च्या मंत्रिण बाईनि असा कोणताही विचार सरकार करत नसल्याचे स्पष्ट केले आहे
आता धाग्याचा मुख्य उद्देश....
वेगवेगळ्या प्रकारच्या खिचड्यांची नावे आणि पाककृती इकडे नोंदवू शकता.
कुणा माबो सुगरणीला इकडे वेगळ्या प्रकारच्या खिचडीची पाककृती द्यावीशी वाटली तर आवर्जून द्यावी.
आधीच लिहिली असेल तर लिंक द्यावी..
ते मुसलमानांचे आहे ना? मग
ते मुसलमानांचे आहे ना? मग कन्सिडर करत नाय आम्ही राष्ट्रभतकं >> शिर्डीचे जेवण, जगन्नाथ मंदिर, तिरुपती, स्वामीनारयण, ते सगळे पण हजारो किलो जेवण बनवतातच ना रोज? की ते पण नाही चालत?
नाय नाय नाय
नाय नाय नाय
बाबा रामदेव सगळ्यात मोठे बाबा. ओके?
जसे अय्यंगारगुरुजींसरख्यांनी आपले संपूर्ण आयुष्य योगसाधनेचा जगभर प्रचार करण्याला वाहून दिले असले तरी मोदीझींमुळेच योग जागतिक झाला. हां.... लक्क्षात ठीवायचं.
शिर्डीच्या जेवणाचे पैसे घेतात
शिर्डीच्या जेवणाचे पैसे घेतात ना?
सिद्धीविनायकाच्या प्रसादाचेही पैसे घेतात.
बाकी मोठ्या मंदिरांचे ठाऊक नाही. कारण नास्तिक असल्याने स्वताहून मंदिरे फिरायची सवय नाही..
साई भंडार्याला मात्र फुकटात जेवण बरेचदा केले आहे.
तसेच एकदा एका लंगरमध्ये फ्री मध्ये हंगर भागवून आलेलो.
आणि हो, एकदा २५ डिसेंबरला एका चर्चमध्ये फुकटचा केक आणि कॉफी चापून आलेलो.
हे मला आलेले अनुभव आहेत. विषय निघाला म्हणून लिहिले. यात धर्म आणू नका... म्हणजे मंदिरात पैसे घेतात आणि चर्च गुरुद्वारामध्ये फुकट खाऊ देतात असे काही दाखवायचा पोस्टचा हेतू नाही.
शिर्डीच्या जेवणाचे पैसे घेतात
शिर्डीच्या जेवणाचे पैसे घेतात ना? >>> हो. पूर्वी माफक का होईना होते, आता माहीती नाही.
शेगाव आणि अक्कलकोटला नाही घेत. मी अर्थात फार वर्षापूर्वी गेलेले. आताही जेवण प्रसाद फ्री मिळतो असं ऐकून आहे.
हे सरकार जगातली सगळ्यात मोठी
हे सरकार जगातली सगळ्यात मोठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे.
योगा डे चा इव्हेंट. त्यातही गिनिस बुक असेलच. कोणीतरी त्यानिमित्ताने आतापर्यंतच्या सर्वाधिक उंचीवरच्या योगा कार्यक्रमाचा विक्रम केलाय असंही ऐकलेलं
जी एसटीचा इव्हेंट.
यमुनातीरी श्री क्यूब बाबांचा कसलासा इव्हेंट.
आता खिचडी इव्हेंट.
शिर्डीच्या जेवणाचे पैसे घेतात
शिर्डीच्या जेवणाचे पैसे घेतात ना?
सिद्धीविनायकाच्या प्रसादाचेही पैसे घेतात.
>>
बरं, मग जनतेच्या पैशातून ६०००० जनतेला प्रत्येकी १५ ग्रॅम खिचडी फूकट दिली हे रेकॉर्ड होते तर!
त्या पंधरा ग्रॅम मध्ये
त्या पंधरा ग्रॅम मध्ये रामदेवबाबांचे केस किती ग्राम होते?
१५ लाखाप्रमाणे १५ ग्राम ...
१५ लाखाप्रमाणे १५ ग्राम ... खिचडी राजकारणावर घसरतेय
घसरतेय काय? खिचडीच राजकारणाची
घसरतेय काय? खिचडीच राजकारणाची आहे.
पतंजली ला 10हजार करोडचे काम
पतंजली ला 10हजार करोडचे काम दिले
गेल्या वर्षिचा टर्नओवर पतंजलीचा तेवढाच होता
महाघोटाळा आहे
भाताच्या एका दाण्याचं वजन २०
भाताच्या एका दाण्याचं वजन २० ते ३० मिलि ग्रॅम असतं. हे १४ ग्रॅम शिजवण्यापुर्वीचं वजन असेल तर ५०० ते ७०० भाताचे दाणे भरतील. एका माणसाला तेवढं पुरत असेल मला वाटतं.
आता यात डाळ, मसाले इत्यादी घालून फाईन ट्युन करा.
डेव्हिल इज इन डीटेल्स.
अपडेट : http://www.wolframalpha.com/input/?i=grain+of+rice इकडे सर्विंग साईझ ६५ग्रॅम दाखवली आहे. सो १४ मध्ये पोटाची बारिकशी खळगी भरेल.
भाऊ बातमी नीट वाचा, ९१८ किलो
भाऊ बातमी नीट वाचा, ९१८ किलो शिजवलेली खिचडी आहे. रेकॉर्ड बनवायचे असेल तर मोठा आकडाच सांगतील ना की नुसत्या तांदळाचा?
बरं हे घ्या,
World Food India event: 918-kg khichdi sets Guinness World Record
It was prepared with 125 kg rice, 45 kg moong dal, 20 kg vegetables, 6.5 kg salt, and several kilograms of jowar and bajra.
https://amp.scroll.in/article/856735/world-food-india-event-918-kg-khich...
झालं?
आणि ते दाणे नी ग्रॅम साठी ही साईट वापरू शकता किंवा दुसरी कोणतीही साईट.
http://www.traditionaloven.com/conversions_of_measures/rice_amounts_conv...
Amount:
1 cup US - white long rice
Equals:
185 g - gram
१५ ग्रॅम कितीसा झाला सांगा बरं!
हां, तेच ते, खळगी भरण्याचे
हां, तेच ते, खळगी भरण्याचे रेकॉर्ड.
प्रेझेंटींग द डेविल फ्रॉम द
प्रेझेंटींग द डेविल फ्रॉम द डिटेल्स....
इतक्या १६ ग्रॅम च्या भातात
इतक्या १६ ग्रॅम च्या भातात माझ्या तीन वर्षाच्या मुलाचा तोबरा पण भरत नाही. पोटाचा कोपरा तर सोडाच.
नाना, तो न शिजवलेला तांदूळ
नाना, तो न शिजवलेला तांदूळ आहे. इथे शिजवलेला भात १६ ग्रॅम दिलाय.
युवर डेविल इज ईविल.
जर खरेच १६ गिराम वाटायचे असेल
जर खरेच १६ गिराम वाटायचे असेल तर १६ ग्राम चिकन बिर्याणी द्यायला हवी होती ज्यात ८ ग्राम भात तर ८ ग्राम चिकन... पण बोनलेस हं
पाककृती आणि आहारशास्त्र हा एक
पाककृती आणि आहारशास्त्र हा एक विभाग जनरली मायबोलीवर उपयुक्त व लोकप्रिय आहे व इथे जनरली रेसीपी व संबंधीत गोष्टी चर्चिल्या जातात.
निदान इथे राजकारण आणू नका ही वेबमास्तर यांना नम्र विनंती.
तुम्हाला खिचडीच्या गिनीज बुक रेकॉर्डच्या निमित्ताने सरकार, मोदी ,गिनीज बुकवाले,भाजपवाले सर्वाबद्दल बडबड, टीका करायची आहे, ओके मग करा जरूर पण प्लीज पाककृती विभागामध्ये नको. इथे हे तमाशे मी याआधी पाहिलेले नाहीत.
सनव +१
सोनू, नाना

सनव +१
चालू घडामोडी मध्ये हलवा. (फाको नको)
सनव,
सनव,
कोणाला तमाशेवाले म्हणताय?
वेमा, जरा या ताईंकडे लक्ष द्या.
राष्ट्रीय खिचडी हाच एक तमाशा
राष्ट्रीय खिचडी हाच एक तमाशा आहे
तुम्ही धागा वाचलाय का? की
तुम्ही धागा वाचलाय का? की नुसते प्रतिसाद? की धाग्यात खाली बोल्ड केलेल्या वाक्यांमुळे गडबडलात? की ग्रुप मुळे?
खिचडीवर इतके धागे असताना लेखक पाककृती लिहितील? धाग्यात पाककृती दिसली?????
हे वाचणार का?
<<
तर असे हे अल्पमोलि, बहुगुणी अन्न राष्ट्रीय डिश होणार आहे. कुठल्याही “राष्ट्रीय” गोष्टीला असतो तसा मान या डिश ला पण मिळाला पहिलेच, त्यामुळे आपण एक “राष्ट्रीय डिश सन्मान संहिता” तयार करू. (तसेही सरकारी बाबू maayboli वाचतात हे गेल्या नोव्हेंबर मध्ये आम्हाला कळलेच आहे Wink त्यामुळे हि सन्मान संहिता सरकारपर्यंत आज ना उद्या पोहोचेलच) >>
ही पाककृती नाहीय ( हे सांगावं लागतंय, कुठे नेवून ठेवलास सारकाझम माझा!)
( मी सन्मान संहिते मधे काहीही वाढ केली नाही इथे हे खरंय)
सारकाझम समजला आणि प्रचंड
सारकाझम समजला आणि प्रचंड आवडला म्हणून इतके दिवस कोणी बोललं नाही. पण आज चर्चा नेहेमीचे थांबे घेऊ लागली म्हणून धागा हलवा अशी विनंती होऊ लागली असेल का?
ही पाककृती नाहीय ( हे सांगावं
ही पाककृती नाहीय ( हे सांगावं लागतंय, कुठे नेवून ठेवलास सारकाझम माझा!)====
पाककृती नाहीये म्हणूनच या विभागातून मूव्ह करा अशी विनन्ती प्रशासनाला केली आहे.
खिचडीच्या पोर्शन साइजवरून
खिचडीच्या पोर्शन साइजवरून चाललंय ना हे सगळं?
अनाथ मुलांना दिली म्हणे दरपोट १५ ग्राम खिचडी.
फुकट्यांना, भिकार्यांना पोसणे हा तमाशा असं काहींना वाटू शकेल.
नै हो
नै हो
तुम्ही करता तो तमाशा.
आम्ही करतो ते कीर्तन.
Pages