आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

फॉर अ चेंज किकुचंच आहे महान मधलं
कोडे क्र २८०३ मराठी (२०१८)
र छ म म
त प
स र स ग
त प

ह त अ त
म अ य
अ ब य
क त क म
प अ ख
न अ ख

२८०३ उत्तर
रंगधणु छेडणारी मनमंजिरी मोहिनी
तू परी…
स्वप्नांनी रंगणारी साजिरी गोजिरी
तू परी…

होते तुझी आहे तुझी
मी उमलून येताना
अन बहरून येताना
कळला तुला कळला मला
प्रेमाचा अर्थ खरा
नात्याचा अर्थ खरा

कोडे क्र २८०४ हिंदी (२०१५-२०१८)
त ज र त क ह
त ज छ त क र
त च ह त य ड ल ह
अ म अ क क

त ह व
त ब ब ब ह म
त य ह म
त य ह म

तू जो रूठा तो कौन हंसेगा
तू जो छूटा तो कौन रहेगा
तू चुप है तो ये डर लगता है
अपना मुझको अब कौन कहेगा
तू ही वजह..
तेरे बिना बेवजह बेकार हूँ मैं
तेरा यार हूँ मैं
तेरा यार हूँ मैं
२८०५. मराठी
न घ त ज
ज त त ह
ज व ध
स फ ह
त स स म क
म स य घ द
स ज अ
म म प

मला गाणेच माहिती नाही!
नविन गाणी मी ऐकत नाही त्याचा हा परिणाम! लागले तरी बदलतो रेडिओ / टिव्ही चे चॅनेल्स!

२८०५

नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

कोडे क्र २८०६ हिंदी (२०१२-२०१८)
क क
त ल द म ग झ
म क व प च च क
म ज व म श क द
म ज व र प द द
र प व
च क अ ब म च क व

२८०६ - उत्तर
कलाइयां कलाइयां
तू लेया दे मेनू गोल्डन झुमके
मैं कन्ना विच पावां चुम चुम के
चिटीयां कलाइयां वे ओ बेबी मेरी white कलाइयां वे

हे घ्या सोप्प!
२८०७
हिंदी (१९८० - ९०)

च र म अ ब त द ह
ख प अ ह
ख स श ह

२८०७.

चाँदनी रात में, एक बार तुझे देखा है
ख़ुद पे इतराते हुए,
ख़ुद से शर्माते हुए
चाँदनी रात में ...

२८०८
हिंदी

व ह द द ज म ग ल ल
व न म प ड क म ज ब ल

२८०८ >> उत्तर
वो हसीन दर्द दे दो, जिसे मैं गले लगा लूँ
वो निगाह मुझ पे डालो, के मैं ज़िन्दगी बना लूँ

मध्ये एक मुव्ही आलेला हिंदी माध्यमावर समथिनग त्यात पण होतं हे गाणं. गायक, गीतकार, संगीतकार एकच आहे याचा

तारे गिन गिन याद’च तेरी
मैं ता जागा राता नू
रोक ना पावा अँखियाँ विच
गम दिया बरसता नू

हो हो हो हो
हो हो हो हो
हो हो हो हो
हो.. हो.. इश्क़ तेरा तड़पावे

हिंदी,2810,1972-80
अ क झ क स म द ज स
त द न अ ब द न अ...
ब क क झ क ज ब ज स
म म त ह म म म त ह म.....

सोप्प...

२८१०

आँखियोंके झरोखोसे मैंने देखा जो साँवरे
तुम दूर नजर आये बड़ी दूर नज़र आये

Pages