ड्रंक लेडी विथ ऑडी..

Submitted by अश्विनीमामी on 10 June, 2015 - 01:28

आपल्या विशाल मुंबई शहरात व उपनगरांत रोज अनेक अपघात घडतच असतात. पण आज सकाळीच ही बातमी वाचनात आली व मन हेलावून गेले. जान्हवी गडकर ह्या ३५ वर्षीय वकील महिलेने दारुच्या नशेत उलट दिशेने ऑडी गाडी चालवली. ताशी १२०किमी च्या आसपास स्पीड होता. इस्टर्न फ्रीवे हा दिवसा उजेडी पण भरधाव जाणार्‍या वाहनांमुळे जरा डेंजरसच आहे. पण हा अपघात व जीवित हानी टाळता आली असती.

मूळ बातमी इथे आहे.
http://www.mumbaimirror.com/mumbai/cover-story/Drunk-corp-lawyers-Audi-r...

जे दोन पुरूष वारले त्यात एक टॅक्सी चालक व एका कुटुंबातील कर्ता पुरूष. तीन मुलांचा बाप. हे कुटुंब मुलाचा दहावीतील निकाल सेलिब्रेट करून घरी परत येत होते. राइट साइडनेच टॅक्सी चालली होती. दोन मुलींचे कॉलेज संपले व मुलगा दहावी झाला म्हणून कदाचित ते खुशीत असतील. तर प्राणच गेले ते ही हकनाक. व्हिक्टिम ऑफ ड्रंक ड्रायविंग!!! सांसरिक जबाबदारी थोडी हलकी होते आहे असे वाटण्यच्या क्षणीच जाणे.... सब उपरवाले की मर्जी. असे म्हणू शकतो पण मला इथे त्या महिला वाहन चालिकेचा राग आला आहे.

वकिली फर्म्स मध्ये अनेक पदे भूषवलेली, मोठ्या कंपनीत व्हीपी पदावर असलेली स्त्री, कामानंतर जेवना बरोबर सहा व्हिस्कीचे पेग पिते व कार राँग साइडने ११ कि,मी चालवते फ्री वेवर इतका जोरात अपघात होतो कि फायर ब्रिगेड बोलवायला लागावे. व तिला एवढे कळायला हवे होते कि ह्या अवस्थेत गाडी चालवू नये?! का अशी अपेक्षाच चुकीची आहे.

पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावरही ती झोपून गेली व दुसृया दिवशी स्टेटमेंट दिले. अपघाताच्या ठिकाणी पैसे देउन मिटवायचा प्रयत्न केला हे पटले नाही. हिला आता स्री आहे म्हणून कमी शिक्षा होईल, स्त्रियाना पण हवी तेवढी दारू प्यायचा हक्क आहे वगैरे चर्चा होतील . पण मग दारू प्यायल्यावर
कार न चालवायची बेसीक जबाबदारी व समजूतदार पणा पण हवा की नको. स्वातंत्र्य हवे पण जबाब्दारी घेणार नाही अशी मानसिकता बरोबर नाही. तिच्या वागणुकीचे बिल स्त्रिस्वातंत्र्या वर फाड्णे पटत नाही. हा फक्त एक अपघात समजावा असे अपील तिच्या आईने केले आहे. .....ऑलरेडी ती आम्हाला एक मनमिळाऊ कलीग म्हणूनच माहीत आहे वगिअरे छापून आले आहेच. ग

त्यातही तिची ऑडी असल्याने अपघात झाल्यावर एअर बॅग मुळे तिला कमी इजा झाली व टॅक्सीत तसे काही सोय नसल्याने पुढील जागी बसलेला चालक व पॅसेंजर तिथेच वारले. टॅक्सीत एअर बॅग का नसते. लॉजिकली असायला हव्यात नाही का?

सुरुवातीलाच तिने रॉग साइड घेतली. काही तरी होईल म्हणून एका चालकाने तिच्या मागे जायचा प्रयत्नही केला पण फारच जोरात गाडी चाल्वत असल्याने तो मागे पडला. व व्हायचे ते होउनच गेले.
गुन्हा सिद्ध झाल्यास!!! तिला १० वर्शाची सजा होउ शकते.

पण ते दोन जीव गेले... त्यांच्या कुटुंबियांची हानि भरून येणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय उपयोग असल्या लोकांच्या शिक्षणाचा... इतक्या साध्या गोष्टीही कळत नसतील तर कायद्याची डिग्री काय कामाची

पण मग दारू प्यायल्यावर कार न चालवायची बेसीक जबाबदारी व समजूतदार पणा पण हवा की नको. स्वातंत्र्य हवे पण जबाब्दारी घेणार नाही अशी मानसिकता बरोबर नाही. >>>>> सुशिक्षित लोकंही हे बिन्धास्त करतात व असल्या बेदरकार स्वातंत्र्याचं समर्थन/पुरस्कार करतात तेव्हा हताश वाटतं. विरोध करणारा वाईट ठरतो. हेच लोक भारतात कायदा पाळला जात नाही म्हणून गप्पा करत असतात. उच्चपदस्थ असा वा झोपडपट्टीतले असा...दारु ही तिचा परिणाम दोन्हींवर सारखाच करते. तिच्याकडे भेदभाव नाही. तिला ऑडी/खटार्‍यातला फरक कळत नाही. तिला सुशिक्षित/अशिक्षित, श्रीमंत/गरीब फरक कळत नाही.

आज पेपरात वाचून खूप वाईट वाटले.
दारू पिऊन गाडी चालवणे हे चूक आहे पण याचे समर्थन मायबोलीवरही इतके ऐकले आहे की अशी मानसिकता भरपूर आहे यात काही वाद.
त्या बाईच्या आईला म्हणाव ज्या घरातल्या मुलांचे बाप गेले त्यांना सांग ना केवळ एक अपघात म्हणून.

आपण इथे बोलून काय होणार म्हणा. सलमानला शिक्षा होऊ नये म्हणून प्रार्थना करणारेही आहेत. आणि पैशाच्या जोरावर सुटता येते हे सलमान, अंबानीचा पोरगा यांनी आधीच सिद्ध केलेले आहे. सामान्य माणूस कुत्र्याची मौतच मरणार.

टॅक्सीतील प्रवासी, ज्यांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन केले, त्यांना कोणत्याही चुकीविना एव्हढी मोठी शिक्षा भोगावी लागली, हे दुर्दैव....

मलाही खुप राग आला आहे. एखादा गाडी भरधाव चालवतच असेल तर त्याला रोखण्याची कुठलीच यंत्रणा आपल्याकडे नाही.

अगदीच स्वप्नरंजन आहे हे, पण दारू पिताना जे सोबत असतात किंवा बारटेंडर्स... वगैरेनी गाडीच्या चाव्याच ताब्यात घेतल्या पाहिजेत अशा वेळी.

जे दगावले त्यांच्याबद्दल फारच वाईट वाटले.

वाईट बातमी.

इतके अंतर चुकीच्या दिशेने एक्सप्रेसवे वर ट्रॅफिकमधे गाडी चालते आहे, यावर आवर घालण्याची यंत्रणा असावी असे प्रकर्षाने वाटते.

आपल्याकडे 'राँगसाईड' गाड्या घालणे हे इतके बिनदिक्कित व कॉमनली होते, की त्यात काही चूक आहे असेही लोकांना वाटत नाही. अशांना स्वतःच्या मनाचा धाक तर नसतोच, वरतून पोलीसांचा धाक वाटेल अशी कारवाई होताना दिसत नाही.

ती ज्या कुणाबरोबर होती त्याने/ तिने तिला या अवस्थेत गाडी चालवायला स्ट्रिक्टली मना करायला पाहिजे होतं.. अगदी बळजबरी ने सुद्धा/ हॉटेल स्टाफ ची मदत घेता आली असती.. कारण इतका विचार करण्याची शुद्ध त्या बाई ला नव्हती .
आता तिला आपल्या चुकी ची घोर शिक्षा मिळू दे..

.

अतिशय वाईट बातमी. कुणी करतं आणि कुणी भरतं. आजकाल लोकांना पैसा आणि पावर मुळे भानच राहिलं नाही आहे. स्वतः भरधाव गाडी चालवली पण ऑडी सारखी गाडी असल्याने बहुतेक वाचली.

आणि अशा हायफाय गाड्या त्यांच्या नेहमीच्या (प्रोग्रॅम्ड)ड्रायव्हर ला सोडून इतरांना सुरू होत नाहीत असं पुसट ऐकलंय. खरं का? Uhoh

.

.

दारू पिऊन गाडी चालवणे वाईट आहे हे सर्वांनाच माहित आहे. आणि मध्यंतरी पोलिसांनीसुध्दा त्याविरोधात कडक धोरण अवलंबले होते. जागोजागी वाहन चालकांची तपासणी होत होती आणि त्यात दोषी आढळणार्‍या व्यक्तिंविरोधात गुन्हे नोंदवून त्यांना दंडित ही केले गेले. तरी सुध्दा समाजात जनजागृती होत नाही हेच खरंतर अनाकलनीय आहे.

सकाळी वर्तमानपत्रात ही बातमी वाचली, त्या कुटुंबीयांबद्दल आणि टॅक्सीचालकाबद्दल खुप वाईट वाटले. आनंदाचे क्षण क्षणभरातच एका दुसर्‍याच्या चुकीमुळे दु:खात बदलून गेले. त्या वकील स्त्रिला तिने केलेल्या गुन्हा बद्दल जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायला पाहिजे.

ती बाई देशातील सर्वात मोठ्या पेट्रोलिअम प्रॉडक्ट खाजगी कंपनीत इव्हीपी पदावर आहे. कंपनी पण बदनामी होउ नये म्हणून प्रकरण दाबणार हे नक्की. दोघी मुलींची लग्ने व करीअर, मुलाचे पुढील शिक्षण वगैरे होईलही पण बापाविना. त्याचे वाइट वाटते. मी हे फुकट कळवळ्याने लिहीत नाही आहे.
रोज उठून आपण जे जगण्याचे गणित मांडत असतो ते कधीही कुणाच्याही अश्या अ‍ॅक्टने पाटीवरून पुसूनच टाकले जाउ शकते. ह्या जाणिवेने हादरायला होते. पन्नाशीत तर जास्तच. त्या मुलाला ६५% मार्क मिळाले होते आणि ते ही कुटुंबाच्या अपेक्षेपेक्षा जास्त होते त्यामुळे सर्व खूष होते इतक्या त्यांच्या जीवनाकडून साध्या अपेक्षा.

.

आता खरतर मीडियाची कसोटी आहे. १० वर्षे सतत प्रकाशझोतात ठेऊन सलमान खानची केस दाबू दिली नाही. तसेच ह्या केसचा पुरेसा, सतत पाठपुरावा करून दोषी व्यक्तीला सजा होणे हे अपरिहार्य करावे. ती ज्या कंपनीमध्ये कामाला होती त्याचा पाठपुरावा करून त्या कंपनीकडून तिचे निर्दोष सिद्ध होईपर्यंत निलंबन होईल हे पाहावे. सर्वसामान्य गरीब आरोपींना त्यांच्या कंपन्या अशीच वागणूक देत असतात. तेव्हा तिलाही अशीच वागणूक मिळाली पाहिजे!!

पैसेवाल्यांना शिक्षा माफ असते हे तर सलमानने दाखवून दिलेच आहे. भारतीय न्यायव्यवस्थेचा झुकलेला तराजू पुन्हा एकदा पाहायला मिळेल आता.

तिला कडक शासन झाले पाहिजे हे नक्की ..
अर्थात आता पैसा काय काय रंग दाखवतो कुणास ठाऊक ..
सलमानच उदा आहेच समोर..

अमा,

>> ...पण मला इथे त्या महिला वाहन चालिकेचा राग आला आहे.

मला या बाईच्या डोक्याचा खिमा झालेला बघायला आवडेल. तिच्या चुकीची ही एकमेव रास्त शिक्षा आहे.

आ.न.,
-गा.पै.

जे झाले ते दुर्दैवी आहे. आशा करतो त्या महिलेला योग्य शिक्षा होईल...

पण एवढी उच्चशिक्षित महिला देखील आपले भान हरपून अशी बेसिक चूक करते यात मद्यपानाचा जराही दोष नाही का? तिने घेतलेले मद्यही अर्थातच हातभट्टीचे नसून चांगल्या ब्रांडचेच असणार, तरीही हे घडले...

दुर्दैवाने आपण संपुर्ण दारूबंदी करू शकत नाही.. तर मग अश्या अवस्थेत गाडी चालवू नये हा नियम बनवलाय.. पण खरे तर गाडी चालवणे हे एक अपघाताला आमंत्रण द्यायचे साधन आहे.. एखादी व्यक्ती जिचा मद्यधुंद अवस्थेत आपल्या मेंदूवरचा ताबा सुटलाय ती कधीही घातकच असते.. तिने काहीतरी अपघात घडवायची वाटच का बघायची
. ती त्या अवस्थेला पोहोचताच तिच्यावर निर्बंध लावण्यात आले पाहिजे.. कारवाई झाली पाहिजे.. साधे रस्त्यानेही चालताना हे लोक महिलांशी छेडखानी आणि त्यावरून मारामार्या करू शकतात, यातही एखाद्याचा नाहक बळी जाऊ शकतो, एखाद्या महिलेची अब्रू धोक्यात येऊ शकते..

नाहीच शक्य दारूबंदी तर किमान बारना लिमिट आखून दिले पाहिजेत की याच्यापुढे सर्व्ह करायचीच नाही.. उदाहरणार्थ आमच्या ऑफिसच्या पार्टीत दारूशारू असते. फुकट मिळाल्याने लोक आणखी पितात. बहकतात. दंगे करतात. बाहेर जाऊन हे लोक काय गुण उधळतात याच्याशी अर्थातच ऑफिसला घेणेदेणे नसते, पण पार्टीत होणारे गैरवर्तन हा ऑफिसच्या प्रतिष्टेचा प्रश्न ठरल्याने आता प्रत्येकाला कूपन्स देत लिमिट आखून दिलेय.. बारवाल्यांनाही किमान एवढे करायची सक्ती केली पाहिजे, अन्यथा पुढे होणार्या अपघाताला त्यांनाही जबाबदार धरण्यात यावे. म्हणजे अश्या एखद्या टल्ली झालेल्या व्यक्तीला ते आपल्या जबाबदारीवर घरी पोहोचवून तरी येतील.

तिने घेतलेले मद्यही अर्थातच हातभट्टीचे नसून चांगल्या ब्रांडचेच असणार, तरीही हे घडले...>>>> भिन्तीवर डोके आपटुन घेणारी बाहुली.( कोणाकडे इमेज असेल तर टाका)

रश्मी, हल्लीच मी व्हॉटसपवर एक पोस्ट वाचलेली. त्यात हातभट्टीची दारू कशी बनते, सरकारमान्य देशी दारू हा काय प्रकार आहे, ती कशी बनते, या कश्या निकृष्ट दर्जाच्या असतात आणि यामुळे चांगल्या दर्जाची दारू कशी उगाचच बदनाम आहे असे सुंदर विवेचन केले होते, त्यामुळे थोडे नवल वाटले ईतकेच.

अरे बाबा ऋन्मेष, दारु ही दारुच असते. मग तिला कोणत्या का गोन्डस नावाने सम्बोधा नाहीतर उन्ची ग्लासातुन द्या किन्वा साध्या ग्लासातुन द्या. ती तिचा परीणाम साधणारच. ती विदेशी असो वा हातभट्टी, तिचा परीणाम खोलवर होतोच. मग कितीका सावरायचा प्रयत्न करा.

अरे ऋन्मेष,
दारू कोणत्याही प्रतीची असो, उच्च वा निच, उत्कृष्ठ वा निकृष्ट - परिणाम एकच = मेंदूवरचा ताबा जाणे
(अतिप्रमाणात मद्य प्राशन घातकच मग ते उंची परदेशी असो, कंट्री असो, वा हातभट्टी असो)

Pages