सेवाभावी संस्था: मैत्री

अधिक माहिती

मैत्री स्वतःशी, मैत्री सर्वांशी.

मैत्री ही पुण्यातील स्वयंसेवी संस्था मेळघाटातील अगदी दूरच्या गावांमधे आरोग्य व शिक्षण या करता काम करते. स्वयंसेवी माध्यमातून गेली अनेक वर्षे सरकारी मदत न घेता आपले काम सुरू आहे. प्रत्येक माणसाला समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आणि उर्मी असते यावर आमचा दृढ विश्वास आहे. म्हणूनच त्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे आणि संधी उपलब्ध करून देणे आम्ही आनंदाने करतो.

मैत्रीच्या मेळघाट व इतर कामांसाठी तुम्ही यथाशक्ती आर्थिक मदत करू शकता. तुम्हाला एखादा आठवडा काढणे शक्य असेल तर मेळघाट मध्ये जावून एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही तज्ज्ञ व्यक्ती म्हणून शिबिरामध्ये तुमचे ज्ञान व कौशल्य शिकवू शकता. तुम्हाला मेळघाटात जाणे शक्य नसेल तर तिथल्या उपक्रमांची पूर्वतयारी करण्यामध्ये पुण्यात मदत करू शकता. उदा. शैक्षणिक साधने बनवणे, तान्ह्या बाळांसाठी कपडे तयार वा गोळा करणे, ते पिशव्यांमध्ये भरणे, औषधे जमा करणे, धान्य/ शिधा गोळा करणे व पाठवण्याची व्यवस्था करणे इ.

पुण्यामध्ये ग. रा. पालकर शाळेत आपण इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकवण्यासाठी मदत करतो, त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. तुमच्या सोसायटीमध्ये 'रद्दी संकलन' सुरु करू शकता. 'मैत्री' साठी निधी जमा करण्याचे काही कार्यक्रम आम्ही करतो, त्यात तुम्ही मदत करू शकता. विविध कंपन्यामध्ये CSR ला पाठविण्यासाठी मेळघाट विषयीचे प्रस्ताव लिहिणे व त्याचा पाठपुरावा करणे या कामी आम्हाला मदत करू शकता. पुण्यातील ऑफिसमध्ये कार्यालयीन कामात काही वेळेला मदत लागते तेव्हा तुम्ही येऊ शकता. 'मैत्री' बाबत इतर लोकांना सांगून स्वयंसेवक व देणगी मिळवून देण्यासाठी आम्हाला मदत करू शकता..... अशा खूप काही कल्पना आणि मार्ग आमच्यापाशी आहेत आणि आम्हाला खात्री आहे की तुमच्याकडे यापेक्षा कितीतरी अधिक कल्पना असतील. चला तर मग, आपण एकत्र मिळून चांगले काहीतरी घडवूया.

Maitri is registered under the Bombay Public Trusts Act, 1950 on 31st July 1999 (E-2898 / Pune). PAN Number: AAATZ0344C, FCRA Registration Number: 083930473.

Registered Address
“Kalyan”, 32, Natraj Society, Karvenagar, Pune 411052. Maharashtra, INDIA.

Office Address
Flat No. 9, Mahadev Smruti,
Near Bal Shikshan Mandir,
Mayur Colony,
Kothrud, Pune 411038

Telephone Numbers
Office: +91-20-2545 0882

Website : http://www.maitripune.net
E-mail
Office: maitri1997@gmail.com

शीर्षक लेखक
'मैत्री शाळा १०० दिवसांची – आपल्या गावी', मेळघाट - २०१३-१४ लेखनाचा धागा
Apr 25 2022 - 7:51am
हर्पेन
21
मैत्री - वार्षिक कार्यक्रम २०१८ लेखनाचा धागा
Jul 16 2018 - 3:18am
हर्पेन
8
मैत्रीकरता रद्दी संकलन १ ऑक्टोबर २०१७ लेखनाचा धागा
Aug 27 2017 - 12:32am
हर्पेन
3
मेळघाट 'मैत्री शाळा' - २०१५-१६ लेखनाचा धागा
Jan 29 2016 - 6:55am
हर्पेन
52
मेळघाट धडक मोहिम २०१६ लेखनाचा धागा
Jul 18 2016 - 2:18am
हर्पेन
21
मेळघाट 'मैत्री शाळा' - २०१६-१७ लेखनाचा धागा
Oct 12 2016 - 7:33am
हर्पेन
7
मेळघाट मैत्री - आनंद मेळावा २०१६  लेखनाचा धागा
Dec 19 2016 - 1:32am
हर्पेन
5
निवेदन - १०० दिवसांची शाळा - मेळघाटात स्वयंसेवक हवेत. लेखनाचा धागा
Jan 22 2013 - 5:39am
हर्पेन
28
मेळघाट मैत्री शाळा - एक झलक लेखनाचा धागा
मे 4 2014 - 11:41pm
हर्पेन
67
मेळघाटातील गावमित्रांची पुणे भेट व कार्यशाळा - संक्षिप्त वृत्तांत लेखनाचा धागा
Jun 12 2014 - 12:49am
हर्पेन
28
'मैत्री शाळा १०० दिवसांची – आपल्या गावी', मेळघाट - २०१४-१५ लेखनाचा धागा
Jul 28 2014 - 2:24am
हर्पेन
19