पेहरेदार पिया की - बॅन झाले पाहिजे का?

Submitted by दक्षिणा on 20 July, 2017 - 09:32

सध्या सोनी वरील पेहरेदार पिया ही सिरियल 'आदरवाईज' गाजते आहे. प्रोमो पाहून लक्षात येत होतं की हे काहीतरी 'वेगळं प्रकरण' आहे. आता तर हि सिरियल चक्क सुरू झाली आहे ना? Uhoh
आजच फेसबूक वर पुणे लेडिज गृप वर एक पोस्ट पाहिली की आपण ही सिरियल बॅन करायला अपिल करू.
इतक्या लहान मुलाचे आई वडील त्याला 'अशी' भुमिका करायला परवानगी कसे देतात? किंवा हा काय विषय आहे का? इ. अनेक मुद्दे घेऊन तिथे चर्चा सुरू होती/आहे.
तुमचे मत काय? मी व्यक्तिशः एकही एपिसोड पाहिला नाहिये. पण इतके सगळीकडून आवाज येतायत की मी माझी उत्सुकता दडपून ठेवू शकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता हेच बाकी होतं, ‘पिया’ आणि त्याची ‘पहरेदार’ जाणार हनिमूनला>>> हो ना, सुहागरात पण दाखवली म्हणे. म्हणूनच हि पिटिशन दाखल केलीये.

पण मग जेव्हा "गेम ऑफ थ्रोन्स" एवढं आवडीने बघितलं जात, तर मग या मालिकेवर का आक्षेप आहे? "गेम ऑफ थ्रोन्स" सुद्धा स्टार वर्ल्ड वर दाखवतात,
जेव्हा "कसम" सारख्या मालिकेतून लहान वयाची नायिका आणि मोठ्या वयाचा नायक यांचं जोडपं असतं तेव्हा कुठे हा आक्षेप जातो?

बॅन करावी म्हणून पिटीशन साईन करणं मला पटत नाही. आपले मत देऊन, आपण ही बघणार नाही असे म्हटले तरी खूप झाले. बावळट मालिकांना बंद करायचे असेल तर दुर्लक्ष करणे हे एकच हत्यार आहे. पिटीशन वगैरे प्रकार अधिकच्या प्रसिद्धीसाठीच वापरले जातील असे वाटते.

आजच कुठेतरी वाचले कि हि मालिका बॅन व्हावी म्हणून साईन झालेल्या पिटीशनची दखल सरकारने (बातमीत स्मृती इराणी यांनी) घेतली आहे.

पण मग जेव्हा "गेम ऑफ थ्रोन्स" एवढं आवडीने बघितलं जात, तर मग या मालिकेवर का आक्षेप आहे?>>

गेम ऑफ थ्रोन्स मध्ये बालविवाहाचं उदात्तीकरण कुठे दाखवलंय? उलट ते तसले छंद असलेल्या मेरिन ट्रँट की कोणाला तरी आर्या चांगली ठेचताना दाखवलीय की!

मी काय म्हंतो.. आता पिटिशन गेलंच आहे सरकारात, तर चालतीय तेव्ढी चालू दे शिरीयल.
'उद्यापासून बंद' असं ठरलं की, मग शेवटच्या भागात, आजतागायत शिरियल मधे जे काही घडलं ते मुक्काम पोस्ट ढेबेवाडी तल्या कुण्या गन्या नावाच्या इरसाल पोराला पडलेलं सपान होतं असं दाखवून टाकायचं ! काय ????

दोन तीन भाग पाहिले अधून मधून .
बाकी काही असू दे , दियाचे कपडे बाकी झक्कास आहेत.
वेगळेच रम्ग , ती दिसते पण खूप गोड .

आर्या चांगली ठेचताना दाखवलीय की!<<<<<<
हो मग ते ही चुकीचं आहे, एक लहान मुलगी मोठा हिंसाचार करते हे योग्य वाटतं? तुम्हाला जर असं म्हणायचं की गेम ऑफ थ्रोन्स हे चांगलं आहे, बरोबर दाखवतात आणि मग पेहेरेदार पिया की हे चुकीचं?
म्हणजे हिंसाचार आहे तर योग्य पण बाल विवाह चा फार अयोग्य?

गेम ऑफ थ्रोन्स मध्ये भरपूर भयंकर गोष्टी दाखवल्या आहेत पण ती सिरीयल दरवर्षी स्टार वर्ल्ड वर दाखवली जाते, सगळ्यांना ती सिरीयल खूप आवडते सुद्धा!! मग त्या सिरीयलला का नाही आक्षेप?
हा प्रकार सिलेक्टिव्ह प्रोटेस्ट सारखा वाटतो.

मुलांनी मालिका बघू नये असे वाटतं असेल तर मुलांना तसं समजावून सांगावे, टीव्ही वरून ते चॅनेल लॉक करावे, या साठी सरकायला का वेठीस धरायचं?
आपल्या मुलाने क्राईम पेट्रोल किंवा फिअर फाइल्स बघू नये अशी काळजी घेतोच ना.

हा प्रकार सिलेक्टिव्ह प्रोटेस्ट सारखा वाटतो.
<<
अमेरिकेतल्या एचभीओमधे काय होतं, त्यावरून आमच्या भारत देशात आम्हीही तशीच घाण केली पाहिजे, असे सिलेक्टिव्ह संस्कार इथे बर्‍याच लोकांवर झालेले दिसताहेत.

निस्तुला, आपण अमेरिकेत आहात ना? मग इथे "व्हेंटिंग" करण्यापेक्षा तिथे गेम ऑफ थ्रोन्सविरुद्ध प्रोटेस्ट लाँच करा, आम्ही मदतीला येऊ इथून. इन्सेट तिथेही इल्लिगल आहे. पण स्वतः अ‍ॅक्शन न घेता प्रोटेस्ट करणार्‍यांबद्दल असे लिहून तुम्हीही सिलेक्टिव्ह टार्गेटिंगच करीत आहात असे म्हणतो.

*
सरकायला का वेठीस धरायचं?
<<
मग सरकार कशाला आहे? सरकारच्या जबाबदार्‍या काय फक्त अमर्त्य सेनचे इंटरव्ह्यू ब्लीप करण्यापुरत्या आहेत का?सेन्सॉर बोर्ड अन इन्फॉर्मेशन ब्रॉड्कास्टिंग मिनिस्ट्री काय फक्त पंप्रचे फोटोवाल्या जाहिराती छाप्ण्यासाठी आहे का? पूर्वीच्या सरकारच्या काळी आपल्या चपलेचा अंगठा तुटला तरी इटलीपासून उद्धार सुरू होत मौनीबाबापर्यंत शिव्याशाप येत असत, ते आठवतेय का?

आ.रा.रा. सर, तिचा मुद्दा काय तुम्ही बोलताय काय? आणि काय ही भाषा? माबो आहे, तुमच्या घराचा दिवाणखाना नाही.
च्रप्स , तुमच्याकडून तर अजिबात अपेक्षा नव्हती.
ती मालिका सोडून भलतेच विषय घेऊन कुरवाळत आहात.
मुद्दा पटला नसेल तर नीट सांगा, असली भाषा वापरून, तुमच्या विचारांचं दारिद्र दाखवत आहात
निस्तुला कधी म्हटल्या की गेम ऑफ थ्रोन्स चांगलं आहे? त्यांना प्रोटेस्ट करायचं आहे? त्यांनी त्यांचा मुद्दा शेवटच्या ओळीत व्यवस्थित सांगितला आहे.

आ.रा.रा. तुम्ही कोण आहात? काय बरळताय? शुद्धीवर आहात का? तुमच्या सारख्या माणसांमुळे मायबोलीवर यावेसे वाटत नाही

च्रप्स , तुमच्याकडून तर अजिबात अपेक्षा नव्हती +११११

एक लहान मुलगी मोठा हिंसाचार करते हे योग्य वाटतं? मग त्या सिरीयलला का नाही आक्षेप?>>>
ज्या कारणासाठी उंच माझा झोकाला आक्षेप नाही त्याच कारणासाठी. ऊंमाझो ही पिरियड सिरिज आहे आणि त्या काळात जो नॉर्म होता त्याचंच चित्रीकरण त्यात आहे. गॉट सुद्धा मध्ययुगीन काळासारख्या काळात घडते. त्यावेळी लोकांचं आयुष्यमानच चाळीस-पन्नास वर्षं होतं आणि पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा-मुलगी जवळपास प्रौढ गणले जात. शिवाजी महाराजांनी तोरणा वयाच्या सोळाव्या वर्षी घेतला. आजच्या काळाचे निकष त्याला लावायचे झाले तर त्यांना हिंसक कारवाया केल्याबद्दल बालसुधारगृहात पाठवावं लागेल.
दुसरं असं की हिंसाचार/सेक्स आणि त्याचं उदात्तीकरण यांच्यात गल्लत होते आहे. गॉट मध्ये ज्या ज्या चुकीच्या गोष्टी दाखवल्या आहेत त्या वाईट पात्रांनी केल्या आहेत, प्रोटागोनिस्टनी नव्हेत. सरसकट हिंसाचार वाईट असा निकष धरला तर महाभारतही बॅन करायला लागेल.

मुलांनी मालिका बघू नये असे वाटतं असेल तर मुलांना तसं समजावून सांगावे, टीव्ही वरून ते चॅनेल लॉक करावे, या साठी सरकायला का वेठीस धरायचं?>>> हा मुद्दा चांगला आहे पण इतर देशांत जिथे प्रौढांचे कार्यक्रम दाखवले जातात तिथे ते रात्री उशिरा असतात. तसेच व्ही-चिपसारख्या सोयी आहेत. भारतात असतात की नाही माहित नाही. आता असतील बहुतेक.

हा प्रकार सिलेक्टिव्ह प्रोटेस्ट सारखा वाटतो.>>>
अर्थात. वर लिहिल्याप्रमाणे सबजेक्टिव्हली सारासारविचार करूनच प्रत्येक सिरियलचं मेरिट ठरवलं पाहिजे. सब घोडे बारा टक्के न्याय कसा चालणार?

ज्यांना गेम ऑफ थ्रोन्स बॅन व्हावी असे वाटत असेल त्यांनी स्मृतीताईं कडे तक्रार नोंदवावी. सद्यपरिस्थितीत तो उपाय सर्वात इफेक्टिव्ह वाटतो!

च्रप्स , तुमच्याकडून तर अजिबात अपेक्षा नव्हती >>>
ईतरांच्या नाऊमेद करणार्‍या प्रतिक्रियांबद्दल अ‍ॅडमिनकडे तक्रार करणार्‍या च्र्पस ह्यांनी एका नवीन स्त्री आयडी ने '4 hours left' म्हणजे नक्की काय असा प्रश्नं विचारला असता 'तुमचं थुकलेलं चाटायला तुम्हाला ४ तासांचा टाईम दिला आहे' असे म्हंटले होते.
आणि काही मिनिटातंच साळसूदपणे नेमकं तेच करत पोस्ट बदलून सोज्वळ भाषेत पुन्हा लिहिली.

अवांतराबद्दल क्षमस्व.

ईतरांच्या नाऊमेद करणार्‍या प्रतिक्रियांबद्दल अ‍ॅडमिनकडे तक्रार करणार्‍या च्र्पस ह्यांनी एका नवीन स्त्री आयडी ने '4 hours left' म्हणजे नक्की काय असा प्रश्नं विचारला असता 'तुमचं थुकलेलं चाटायला तुम्हाला ४ तासांचा टाईम दिला आहे' असे म्हंटले होते. >>> अशा आयडीवर कारवाई कशी नाही झाली अजुन ?
लोकांना व्यवस्थित भाषेत उत्तर द्यायला काय अडचण असते देव जाणे . निषेध अशा प्रवृत्तींचा .

हुपपाहुईया... तुमच्या लेवल ला जाऊन उत्तर देऊ शकत नाही..फक्त प्रोफाईल मध्ये स्त्री सेलेक्त केलं म्हणजे स्त्री आयडी होत नाही... आणि तुम्ही स्त्री नाहींयत हे सगळ्या माबो ला माहीत आहे.. असले फेकू स्त्री आयडी घेऊन कोणीपन येतंय माबो वर..

क्षमा करा दक्षिणा ताई- धाग्याचा हा विषय नाही पण हुपपाहुयीला सवय आहे असे धागे भरकातवायची म्हणून उत्तर दिलेय...

तुम्हाला बर्याच दिवसांपासून सांगायचं होतं बरं झालं तुम्ही विषय काढलात.
मी स्त्री आहे की नाही, प्रोफाईल मध्ये लिहिलेले खरे आहे की नाही हे सगळे गौण आहे च्र्प्स. मायबोलीने आधार कार्डामधली खाजगी माहिती भरा असा नियम काढलेला नाही. आयडी काय लिहितो ते महत्वाचे आहे. लिहिणारा आयडी स्त्री की पुरूष, ओरिजिनल की डुप्लिकेट त्याने काहीही फरक पडत नाही. चुकीचं लिहिणारे खरे आयडी ही ऊडाले आहेत आणि खोटे ही, स्त्री ही आणि पुरूषही.
तुम्ही जे लिहिले ते चूक आहे आणि त्याबद्दल तुम्ही सबंधितांची माफीही मागितली नाहीत त्यामुळे तुम्ही कारवाईस पात्रं आहात.
ईथेही पुन्हा अरेरावीचीच भाषा करीत आहात, त्यामुळे तुम्ही जे लिहिले त्याबद्दल अजूनही तुम्हाला मनातून दिलगिरी वाटत नसून तुम्ही पुन्हा हीच भाषा बोलणार हे ओघाने आलेच. असो.
तुम्ही दुसर्‍या आयडीला कुठल्या भाषेत काय लिहावे हा तुमचा प्रश्नं आहे, मी फक्तं तुम्ही लिहिलेले मायबोलीकरांसमोर आणण्याचे काम केले आहे, ईतकेच.
ह्या धाग्यावर मी पुन्हा तुम्हाला ऊत्तर देणार नाही.

अवांतराबद्दल पुन्हा एकदा क्षमस्व.

तुम्ही जे लिहिले ते चूक आहे आणि त्याबद्दल तुम्ही सबंधितांची माफीही मागितली नाहीत त्यामुळे तुम्ही कारवाईस पात्रं आहात
>>> तुम्ही admin आहेत का? Admin करतील कारवाई, तुम्ही का दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालताय..
तुमचा काय संबंध आहे ?
माझी चूक असती माझा आयडी नसता आतापर्यंत..

बाकी अ रा रा यांची पोस्ट मला आवडली,.. एखाद्याची पोस्ट आवडते किंवा नाही आवडत... मला आवडली म्हणून लिहिले आवडली...

तुम्ही admin आहेत का? Admin करतील कारवाई, तुम्ही का दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालताय..
तुमचा काय संबंध आहे ?
माझी चूक असती माझा आयडी नसता आतापर्यंत..

बाकी अ रा रा यांची पोस्ट मला आवडली,.. एखाद्याची पोस्ट आवडते किंवा नाही आवडत... मला आवडली म्हणून लिहिले आवडली...>>>>>
व्याकरणात एकही चुक नाही? स्वच्छ व बिनचुक लिहील्याबद्दल च्रप्स यांचे अभिनंदन. Rofl

च्र्प्सची ती पोस्ट वाचली होती आणि तीन चार दिवस मायबोलीवर यावेसेच वाटले नाही. स्त्री असो वा पुरुष , एका साध्या प्रश्नाला कोणी ईतक्या हीन भाषेत ऊत्तर कसे लिहू शकतो, खूप सिक वाटले कुणाला असे लिहिणे. Sad
ईथे वर म्हणत आहेत की त्यांच्यावर कारवाई झाली नाही म्हणजे त्यांनी लिहिलेले चूक नव्हते. खरोखर निषेध आहे अशा प्रवृत्तीचा. Angry

तुमच्या सारख्या माणसांमुळे मायबोलीवर यावेसे वाटत नाही > खरंय कल्पना. ह्या अश्या असंस्कारी, हीन भाषेतल्या लिखाणामुळे यावेसेच वाटत नाही मायबोलीवर. अ‍ॅडमिन कसे काय खपवून घेतात अश्या लोकांना कुणास ठाऊक.

अश्विनी.. धाग्याचा विषय काय तुम्ही बोलताय काय...
कशाला धागा भरकतावताय अजून...
अजून 10 प्रतिसाद याच विषयावर येतील आता..
तुमच्या सारख्या लोकांमुळे माबो वर विषय सोडून धागे भरकटतात. पण असे खूप आयडी आहेत कोणाला कोणाला बोलणार.. असो..सध्या यापुढे या विषयावर बोलण्याची इचछा नाही.. तुमचं चालू द्या...आणखी 4- 5 ड्यु आयडी घेऊन हाच विषय कंतीनु करा... रामराम

च्रप्स माझा कुठलाही डुप्लिकेट आयडी नाही. एका आयडी नेच तुमच्यासारख्यांच्या हीनकस प्रतिक्रिया वाचुन होणारा मनस्ताप कमी आहे की काय? सरळ सरळ ऊत्तर लिहिले आहे तुमच्या प्रतिक्रियेला त्यात माझा डुप्लिकेट कुठुन आला. तुम्ही एकटे खरे आणि बाकी सगळे डुप्लिकेट असं आहे का? तुम्ही वाट्टेल ते हीनकस लिहिलेल्याचा निषेध करणारे सगळे डुप्लिकेट आहेत का? श्री नावाच्या आयडीनेही तुमचा निषेध केला आहे ते पण डुप्लिकेट्च. डुप्लिकेटने तुम्ही लिहिलेले दाखवून दिले म्हणून तुम्ही लिहिले ते बरोबर होते का?
हीनकस लिहिल्याची चूक मान्य न करणे त्याचा पश्चाताप न वाटणे .. खरे आहे तुम्हाला या काय कुठल्याच विषयावर बोलायला तोंड राहिले नाहीये.

Pages