पेहरेदार पिया की - बॅन झाले पाहिजे का?

Submitted by दक्षिणा on 20 July, 2017 - 09:32

सध्या सोनी वरील पेहरेदार पिया ही सिरियल 'आदरवाईज' गाजते आहे. प्रोमो पाहून लक्षात येत होतं की हे काहीतरी 'वेगळं प्रकरण' आहे. आता तर हि सिरियल चक्क सुरू झाली आहे ना? Uhoh
आजच फेसबूक वर पुणे लेडिज गृप वर एक पोस्ट पाहिली की आपण ही सिरियल बॅन करायला अपिल करू.
इतक्या लहान मुलाचे आई वडील त्याला 'अशी' भुमिका करायला परवानगी कसे देतात? किंवा हा काय विषय आहे का? इ. अनेक मुद्दे घेऊन तिथे चर्चा सुरू होती/आहे.
तुमचे मत काय? मी व्यक्तिशः एकही एपिसोड पाहिला नाहिये. पण इतके सगळीकडून आवाज येतायत की मी माझी उत्सुकता दडपून ठेवू शकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे पण बेबीसिटर कम कुक कम पहरेदार कम सेक्रेटरी अशी जी पोस्ट असते त्याला बायकोच म्हणतात ना इन जनरल ? लग्नच का म्हणुन काय विचारता Proud Happy

म्हणजे आता शयनेषु रंभा तेवढं राहिलं.
पण भरत फार कावले कोणीतरी इंटीमेट सीन बद्दल बोललं तर.. म्हणून आता म्हणत नाही. म्हणत नाही कसलं.. झालं already म्हणून. Lol

ऊंच माझा झोकाला ऐतिहासिक मालिकेच्या मुद्द्यावर उगाचच बरेच जणांकडून डिफेन्ड केले जातेय.
एखाद्या ऐतिहासिक मालिकांत बालविवाह दाखवू शकतात. कारण तो प्रत्यक्षात घडलाय...
पण काल्पनिक मालिकांत दाखवू शकत नाही कारण प्रत्यक्षात तो घडला नाही..
हे लॉजिकच मुळात चुकीचे आहे.
कारण या लॉजिकने जर या मालिकेत दाखवलेली घटना प्रत्यक्षात कुठे घडली तर चालवून घ्यावी लागेल. किंवा जगात जे प्रत्यक्षात घडते ते मग काहीही असो दाखवल्यास चालून जाईल असा अर्थ होईल.
कुठल्या गोष्टीचे उदात्तीकरण केले जातेय किंवा नाही वा कुठल्या गोष्टीला प्रमोट केले जातेय किंवा नाही हा ईतकाच मुद्दा हवा.

तरी बरं त्या हुषार कुत्र्यानी वाचवलं नाहीतर माधुरीचीपण "वहिनी पिया की" झाली असती. >> अंपायर बनण्यापासून लग्नासाठी जोड्या जमवण्यापर्यंतची सगळी ज्यासाठी ब्रेन वापरावा लाग्तो ती डिसिजन मेकिंगची कामं टफीकडेच असतात पहिल्यापासून.
त्याने पत्रं बहलकडे देवून त्याला नेमून दिलेले त्याचे काम केले त्यात काय मोठे नवल.

senior citizen trapped in a young man's body >>> लोल

हाब, बरोबर आहे Lol

अरे पण बेबीसिटर कम कुक कम पहरेदार कम सेक्रेटरी अशी जी पोस्ट असते त्याला बायकोच म्हणतात ना इन जनरल ? लग्नच का म्हणुन काय विचारता
<<
Biggrin

ती काकु वडील जिवंत असतांना विष घालुन मुलालाच का मारायला निघते? मालिकेचे शिर्षक हे आहे म्हणुन नाहीतर कर्झ ची स्टोरी करायला हरकत नव्हती.
लिंक मधे दिया चे नाव तेजस्वीनी पारेख वायंगणकर दिलय. म्हण्जे पारेख की वायंगणकर? पण बरीच्शी अनुश्का सारखी दिसते...

<पण भरत फार कावले कोणीतरी इंटीमेट सीन बद्दल बोललं तर>

मी कुठे कावलोय? उलट मी लिहिलंय , भारतातल्या मालिकांत इंटिमेंट सीन्स क्वचित दाखवतात. त्यात कावणं यु रेड बिटवीन द लाइन्स? मी तर तसे सीन्स दाखवतील म्हणून अ‍ॅडव्हान्समध्ये कावलेल्या लोकांना धीर देतोय, नका कावू म्हणून.

पिया की वहिनी Lol

बाकी हा धागा अगदी पक्का ऋ धागा वाटायला लागलाय Wink

लिंक मधे दिया चे नाव तेजस्वीनी पारेख वायंगणकर दिलय. म्हण्जे पारेख की वायंगणकर? पण बरीच्शी अनुश्का सारखी दिसते.
<<
पारेख नाही , प्रकाश.
तेजस्विनी प्रकाश वायंगणकर.
अनुष्का पेक्षा खूप सुंदर आहे Happy

तस्मात कुंभार हो , गाढवास तोटा नाही
- बऱ्याचशा सिरियल्स च्या कथानकाबद्दल वाचून (माबोवरचे काही धागे बघून) वगैरे आठवणारे वाक्य.
~ बेंबट्या जोशींचे तिर्थरूप

मस्तच

आता तर विनोदी धागा केलाय याचा..

म्हणजे आता शयनेषु रंभा तेवढं राहिलं. >>> ती रुममध्ये प्रवेश करते तेव्हा स्केट्सवरुन घसरते तेव्हा मला काही सेकंद वाटुन गेलं की आता काय नेहमीचा सीन दाखवतात की काय ? Lol

तो श्रीदेवी परी असलेला कोणतातरी सिनेमा होता ना एक? त्यात असाच एक जायदाद साठी जीव टांगणीला लागलेला मुलगा असतो ज्याला ती स्वत:च्या मूडप्रमाणे लहानमोठा करत असते. मोठा झाला की त्याचा सलमान खान होतो. (शरीराने - मनाने सलमान मोठा झालेला आहे हा आरोप सिद्धं करणं अशक्यं!) इथेही काही तसाच प्रकार करणार आहेत की काय?

'वहिनी पिया की' जाम हसवल या वाक्याने.
'चंद्रमुखी' मलाही आवडायचा हा सिनेमा तेव्हा.

मला आठवतेय मी मम्मीला बोलले होते की मलाही असेच एका रात्रीत मोठे व्हायचेय
मस्त वाटलेलं

घ्या....
http://m.hindustantimes.com/tv/pehredaar-piya-ki-smriti-irani-asked-to-b...

The petition was posted by a Mansi Jain on Change.org and over 51,000 people had already signed it by Thursday 4pm. The petition reads, “Pehredar piya ki. - A 10 year old impressionable little kid(” piyaa”) caressing and stalking a lady who’s more than double his age and filling sindoor in her “maang” is being telecasted at prime time -8:30pm on sony. (Family time) It is to be devoured by the entire Nation. Imagine the kind of influence it will steadily and perpetually infuse in the viewers mindset. We want a ban on the serial. We do not want our kids to be influenced by such tv serials. Join us in signing the petition to ban this serial

ज्यांना ही सिरीयल बॅन व्हावी असे वाटते त्यांनी खालील पिटिशन वर सही करावी
https://www.change.org/p/ban-on-the-tv-serial-pehredarpiyaki

Pages