Submitted by दक्षिणा on 20 July, 2017 - 09:32
सध्या सोनी वरील पेहरेदार पिया ही सिरियल 'आदरवाईज' गाजते आहे. प्रोमो पाहून लक्षात येत होतं की हे काहीतरी 'वेगळं प्रकरण' आहे. आता तर हि सिरियल चक्क सुरू झाली आहे ना?
आजच फेसबूक वर पुणे लेडिज गृप वर एक पोस्ट पाहिली की आपण ही सिरियल बॅन करायला अपिल करू.
इतक्या लहान मुलाचे आई वडील त्याला 'अशी' भुमिका करायला परवानगी कसे देतात? किंवा हा काय विषय आहे का? इ. अनेक मुद्दे घेऊन तिथे चर्चा सुरू होती/आहे.
तुमचे मत काय? मी व्यक्तिशः एकही एपिसोड पाहिला नाहिये. पण इतके सगळीकडून आवाज येतायत की मी माझी उत्सुकता दडपून ठेवू शकत नाही.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी ही मालिका बघत नाही,
मी ही मालिका बघत नाही, समर्थनही करत नाही. काही चूक दाखवलं तर कारवाई व्हावीच पण मग तोच न्याय अशा प्रकारच्या सर्वच कलाकृतींना लावणार का- even where the victim is female? >> हो लावावा.
Exactly..मीही हेच म्हणत आहे. बालिका वधू किंवा गंगा चे एपिसोड्स आजही streaming साठी उपलब्ध आहेत. लहान मुलींचे डान्स (?) शोज आजही आहेत. बंदी आणायची तर ती या सर्वावर एकाच वेळी आणा, एकच लॉजिक लावा. फक्त हाच शो एक वाईट, बाकी कशावर बंदी आणायची गरज नाही - हा सूर बंद करा!
बलात्कार , खून , चोरी - लीगल
बलात्कार , खून , चोरी - लीगल नाही तरी दाखवतातच ना सेरेल्स मध्ये...
बाल विवाह पण दाखवू द्या मग.
ट्रस्ट केला तर सिरीयल संपेलना
ट्रस्ट केला तर सिरीयल संपेलना पायलटलाच.
आणि देसी इमोसणल, लीगल अक्कल कमी असलेले, खूप जास्त देसी पिक्चर बघणारे जीव मरताना असाच देसी इमोशनल विचार करत असतील.
बाकी एखाद्या देशात लग्नाचे लीगल वय 'क्ष' असेल तर पडद्यावर पण तो लीगल नियम पाळून (म्हणजे सिरीयल मधील पात्राचे आणि ते साकारणाऱ्या अभिनेत्याचे/ अभिनेत्रीचे शुटींग करतानाचे वय) दाखवायचं बंधन ही अपेक्षाही का__ही _ही टाईप वाटली.
मी सिरीयल/ प्रोमो काही काही बघितलेलं नाही. बघण्याची इच्छाही नाही. प्रतिसाद आकडा खूप जास्त दिसला म्हणजे मनोरंजन होणार या माफक अपेक्षेने आलेलो.
बाकी एखाद्या देशात लग्नाचे
बाकी एखाद्या देशात लग्नाचे लीगल वय 'क्ष' असेल तर पडद्यावर पण तो लीगल नियम पाळून (म्हणजे सिरीयल मधील पात्राचे आणि ते साकारणाऱ्या अभिनेत्याचे/ अभिनेत्रीचे शुटींग करतानाचे वय) दाखवायचं बंधन
--- इथे १४ वर्षांची (minor?) मुलगी मेकिंग आउट सीन करते आहे इतकाच मुद्दा आहे. केजीतला पाच वर्षांचा मुलगा annual day ला चाचा नेहरू किंवा लोकमान्य टिळक बनतो तेव्हा त्याचं वय ६० वर्ष नाही म्हणून त्याने नेहरू बनू नये असं नाही. पण नेहरू किंवा टिळक बनून छान स्पीच देणं आणि नायिका म्हणून प्रणय दृश्य देणं यात फरक नाही का?
सैराटच एक नाही आपल्याकडे रुटिनली असतं हे.
सनव,
सनव,
पूर्वी नूतन काम करत असलेले सिनेमे तिला स्वतःला वयाच्या अटीमुळे थिअटरमध्ये जाऊन बघण्यास परवानगी मिळत नसे.
तुम्ही पडद्यामागची माहिती आणि पडद्यावर दाखवलेले हे मिक्स अप का करत आहात? आर्ची पडद्यावरही १४ चीच दाखवली असती तर नक्कीच आक्षेप घेतला असता. तिला मायनर असतांना मचुअर सीन करू द्यायचे की नाही हा तिच्या पॅरेंट्स चा लुक आऊट आहे. तिच्या प्रायवेट माहितीशी पेक्षकांना काहीही कर्तव्य नसावे.
ती १४ वर्षांची आहे ही फॅक्ट बाहेर कळेपर्यंत कुणाला अंदाज ही आला नाही की ती मायनर आहे. तिची अॅक्ट कन्विन्सिंग होती जी नॅशनल लेवलवर सुद्धा रिकगनाईझ झाली. ती जर १९ वर्षाच्या भुमिकेत असतांना १०-१२ चीच दिसली असती सिनेमा पहिल्या दिवशीच पडद्यावरून ऊतरला असता.
प्रत्येक कलाकाराची पर्स्नल माहिती मिळवून तिची सिनेमा बघायला जाणे आणि मग खतरजमा करून त्याची निंदा वा कौतुक करणे हे प्रेक्षकांनी करावे असे तुमचे म्हणणे आहे का?
पेहरेदार मध्ये मुलगा ९ वर्षांचाच दाखवला आहे आणि त्याचे २२ वर्षाच्या मुलीशी लग्न होतांना दाखवले आहे जे आक्षेपार्ह आहे. प्रत्यक्षात तो मुलगा २९ वर्षाचा असला तरी त्या सिरियलवर आक्षेप कायम राहिला असता.
अहो हा जो मुलगा आहे त्यानेच
अहो हा जो मुलगा आहे त्यानेच जर अजून एका सिरीयलमध्ये २९ वर्षांच्या मुलाचा रोल केला आणि त्यात त्याला लग्न, mature scene करायला लावलं तर केवळ त्यात त्याचं पात्र २९ वर्षीय आहे म्हणून त्याचं खरं वय विसरून जायचं का?
जर सिनेमा सेन्सॉर प्रमाणित
जर सिरियल/सिनेमा सेन्सॉर प्रमाणित असेल आणि मला त्याची २९ वर्षांच्या मुलाची अॅक्ट कविन्सिंग वाटत असेल तर तो मायनर आहे ह्या माहितीचा आणि सिनेमा/सिरियलमधील त्याच्या भुमिकेचा तुम्ही लावत असलेला परस्पर संबंध माझ्या अजूनही ध्यानात येत नाहीये.
एक सोपे उदाहरण, मायबोलीवर लेख वाचताना लिहिणाऱ्या प्रत्येकाचे वय जाणून घेण्याची गरज तुम्हाला पडते का?
पण लेखकाच्या कथेतले ९ वर्षाचे पात्रं लग्नाच्या आधी लिवईन करते असे लिहिले तर तुम्हाला विचित्र वाटणार नाही का?
९, १०,१४,१९,२२,२९ इतके नंबर्स
९, १०,१४,१९,२२,२९ इतके नंबर्स मिक्स झालेत अता या बीबीवर
हाबर्ग शी सहमत
हाबर्ग शी सहमत
९, १०,१४,१९,२२,२९ इतके नंबर्स
९, १०,१४,१९,२२,२९ इतके नंबर्स मिक्स झालेत अता या बीबीवर>>>
आकडे काढून टाकून सरळ मायनर
डीजे हो नंबरपेक्षा मायनरच
डीजे
हो नंबरपेक्षा मायनरच बरं.
आपले ते हे वेताळ भाऊ मुलीना १८ आणि मुलाना २१ का? असे ज्वलंत प्रश्न निर्माण करून आणि इथे उपस्थित करून महाचर्चा आयाजित करतील नाहीतर.
९, १०,१४,१९,२२,२९ इतके नंबर्स
९, १०,१४,१९,२२,२९ इतके नंबर्स मिक्स झालेत अता या बीबीवर>>>

एखादा मटकेवाला या कॉम्बोवर एखादा नंबर खेळेल.
आपले ते हे वेताळ भाऊ मुलीना
आपले ते हे वेताळ भाऊ मुलीना १८ आणि मुलाना २१ का? असे ज्वलंत प्रश्न निर्माण करून आणि इथे उपस्थित करून महाचर्चा आयाजित करतील नाहीतर.
ही मालिका न पाहणारे,
ही मालिका न पाहणारे, पाहण्याची शक्यता नसलेले आणि एकंदरित (भारतीय) मालिकाच न पाहणारे लोक ९ वर्षांचा मुलगा आणि १८ वर्षांची मुलगी यांचं लग्न झालेलं दाखवलं म्हणजे लगेच त्यांचे शरीरसंबंध ही होतील आणि ते दाखवले जातील असे तर्कवितर्क करीत धावून आलेले पाहून एखादी मालिका पाहून होणार नाही, त्यापेक्षा काहीपट अधिक मनोरंजन झाले.
भारतातल्या मालिका पाहणार्यांना आतापर्यंत तरी हे लक्षात आले असेल की मालिकेतल्या दोन सज्ञान व्यक्तींच लग्नं झालं तरी (बहुसंख्य मालिकांत) शरीरसंबंध जुळून यायला युगानुयुगे लागतात. पाचशे मालिकांपैकी एखाद्या मालिकेत असा शरीरसंबंध आल्याचं 'दाखवलं', तर त्याची भरपूर चर्चा होते.
-----------
अमांच्या पोस्ट्स वाचू न 'आंधी' मधली आपल्या विरोधी उमेदवाराच्या प्रचारसभेत थेट घुसून त्याच्याच स्टेजवरून इमोसनल भाषण ठोकणारी आरती आठवली.
----------
अभिनेता साकारीत असलेल्या पात्राचे वय आणि त्याचे प्रत्यक्षातले वय यांच्यातला संबंध आणि त्यासाठी तेरा वर्षांच्या अभिनेत्रीने १८ वर्षांचे पात्र रंगवणे प्रत्यक्षातले उदाहरण फारसे भयानक न वाटता, ते नावाजले गेले असल्याचे दिसल्यावर, ९ वर्षांच्या मुलाने २९ वर्षांच्या पात्राची भूमिका निभावणे आणि भूमिकेची गरज म्हणून शरीरसंबंध दाखवणे ही कल्पनाशक्तीची भरारी पाहून थक्क झालो.
कोणे एके काळी आपल्याकडे नाटकांत आणि सिनेमांत काम करायला कुलीन स्त्रियांना परवानगी नव्हती आणि त्यामु़ळे वेश्याव्यवसाय करणार्या स्त्रीला सिनेमात काम मिळाल्याची आठवण झाली. पुरुष स्त्रीपात्रे रंगवीतच.
-----------
बालिका वधू ही मालिका बालविवाहाला विरोध करायला आणि 'उंच माझा झोका' रानडे दांपत्यांचे कार्य दाखवायला काढली होती असं समजणारे, तेही त्या मालिका पाहिलेले प्रेक्षक आहेत. (त्यामुळे या मालिकेत खरंच त्या दोघांचा शरीरसंबंध दाखवतील, असं वाटणारे लोकही असूच शकतात) . किचन पॉलिटिक्स, विबासं यांना प्रेक्षक कंटाळलेत असं वाटल्यावर लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या मिषाने प्रेक्षकांची काळजे पिळवटायची टूम निघाली . उतरन, बालिका वधू, उंच माझा झोका, बालविधवेवरची मालिका, मग झाशीची राणी आणि महाराणा प्रताप यांच्या लहानपणापासून सुरुवात करणार्या..... अशा अनेक मालिकांचे पीक आले. यातल्या अनेक मालिका यथावकाश व यथाशक्ती विबासं किंवा लग्न मोडणे, लग्न जुळणे, किचन पॉलिटिक्स या नेहमीच्याच वळणाला लागल्या. अगदी उंच माझा झोका मालिकेत किचन पॉलिटिक्स , सासुरवास यांत चवीपुरत्या मिठाइतके रमाबाईंचे शिक्षण आणि सामाजिक कार्य होते. तोच ट्रेंड या मालिकेने पुढे लांबवलाय. मोठ्यांपेक्षा लहानांचा अभिनय व व्यक्तिरेखा जास्त बांधून ठेवतात. त्या पात्रांत प्रेक्षकांनी वेळेची आणि भावनांचे गुंतवणूक केली की त्या बळावर वर्षानुवर्ष कमाई करता येते. हे मालिकावाल्यांना पक्क कळलंय.
मालिकेचा फक्त पहिला भाग पाहून आणि पुढे पाहणार नसल्याने माझाही प्रतिसाद 'बाद' आहे हे माहीत असूनही लिहिलेय.
हाब , सगळ्याच पोस्ट्स मस्त
हाब , सगळ्याच पोस्ट्स मस्त
लग्न का केलं याच समर्थन अगदी
लग्न का केलं याच समर्थन अगदी काल्पनिक कथा म्हणुन ही नीट केलं नाहिये ..
लहान मुलाच रक्षण करण्याचे शंभर मार्ग असताना.. मुलीशी लग्न हाच उपाय का सुचावा..
त्यात जर पारंपारिक मालिका आहे तर मुली तर कमजोर वगैरे अस्तिल ना त्यांच्या मते..
काहितरी खुप क्रिटिकल कारणामुळे.. एखाद्या चुकी मुळे.. लग्न करावं लागल असं असतं तर निदान विचार केला असता..
सबळ कारण नाहिये ..
सनसनाटी काहितरी दाखवायच हाच हेतु
बलिका वधु , उंच झोका ई. सिरियल्स पण पहायला नकोच वाटायच्या पण तरीही यात लग्न करण्याची कारणं तरी बिलिव्हेबल होती.. बालविवाह तर होतच होते.. आणि उंच झोका तर रियल स्टोरी..
आनंदी अगदी अगदी. आज तुझे
आनंदी अगदी अगदी. आज तुझे माझे विचार जुळतायत
समजा ह्या मुलिनंच दगाफटका करून इस्टेट हडप केली तर?
दक्षे, आता तू सुरवातीलाच
दक्षे, आता तू सुरवातीलाच त्यांची सगळी स्टोरी फोडणारेस का ग?

बाकी सगळ जाऊ दे खड्ड्यात ,पण
बाकी सगळ जाऊ दे खड्ड्यात ,पण मला एक कळत नाही जे नातेवाईक मुलाच्या आई वडीलांना मारु शकतात ते दियाला आणि त्या पोराला नाही का मारणार ? का दियाकडे काही सुपरपाॅवर आहे का ? उगाच काहिही दाखवतात
आणि दियाचे आई वडील कसे काय तयार होतात स्वतःच्या मुलीच लग्न लावून द्यायला ,त्या मुलाच्या वडीलांनी त्या दियावर आणि तिच्या कुटुंबियांवर काही उपकार केले असतील पण उपकारांची परतफेड करायला कुणी स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेणार नाही
वही तो .. व्हाय दिया ????????
वही तो .. व्हाय दिया ??
हाब यांच्या सगळ्या पोस्ट
हाब यांच्या सगळ्या पोस्ट योग्य आहेत.
मस्त स्टोरीलाईन
समजा ह्या मुलिनंच दगाफटका करून इस्टेट हडप केली तर?>>>>> दक्षिणा
ण मला एक कळत नाही जे नातेवाईक मुलाच्या आई वडीलांना मारु शकतात ते दियाला आणि त्या पोराला नाही का मारणार ? का दियाकडे काही सुपरपाॅवर आहे का ? उगाच काहिही दाखवतात>>>> एवढं लॉजिक नसतंय ह्या रद्दड सिरीयलीमधे.
थाग्याचं शीर्षक आणि हेडरमधला
थाग्याचं शीर्षक आणि हेडरमधला मजकूर बदलायची वेळ झाली.
मालिका ban करा ऐवजी मालिकेवर चर्चा आणि ते चल्ला पिसं काढू टाइप आन्हिक..कॉपीराइट नसल्यास.
नातेवाईक मुलाच्या आई वडीलांना
नातेवाईक मुलाच्या आई वडीलांना मारु शकतात ते दियाला आणि त्या पोराला नाही का मारणार ? का दियाकडे काही सुपरपाॅवर आहे का ? उगाच काहिही दाखवतात>>>>मनाली सुपर लॉजिकल क्वेश्चन
आणि दियाचे आई वडील कसे काय
आणि दियाचे आई वडील कसे काय तयार होतात स्वतःच्या मुलीच लग्न लावून द्यायला ,त्या मुलाच्या वडीलांनी त्या दियावर आणि तिच्या कुटुंबियांवर काही उपकार केले असतील पण उपकारांची परतफेड करायला कुणी स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेणार नाही>>>> त्या लहान मुलाच्या वडिलांनी त्या दियाला घोड्यापासून वाचवलेलं असत ते उपकार फेडायचे असतात म्हणे. आणि आई वडील आधी विरोधातच असतात पण दिया ताईना त्यागमूर्ती बनायचं असतं.
अरे लोकहो, किती विचार करताय,
अरे लोकहो, किती विचार करताय, ईतक विचार करायचा तर जवळपास सगळ्याच मालीका बंद कराव्या लागतील.
जो पर्यंत आपली करमणुक (डोक-बुद्धी बाजुला ठेऊन) होतेय तो पर्यंत हवतर पहायची , नाही तर रीमोट आपल्याच हातात असतो
त्या लहान मुलाच्या वडिलांनी
त्या लहान मुलाच्या वडिलांनी त्या दियाला घोड्यापासून वाचवलेलं असत ते उपकार फेडायचे असतात म्हणे. आणि आई वडील आधी विरोधातच असतात पण दिया ताईना त्यागमूर्ती बनायचं असतं.
काहीही दाखवतात . एकदा घोड्यापासून वाचवतात म्हणून कुणी एवढा त्याग करेल का ? आणि त्या पोराच्या बापाला काही कस वाटत नाही मरताना हे असल वचन मागताना ,ह्याच्या पोराच रक्षण व्हाव म्हणून एका मुलीने स्वतःच्या आयुष्याच नुकसान करून घ्यायच
http://www.loksatta.com
http://www.loksatta.com/manoranjan-news/pehredaar-piya-ki-serial-televis...
'कथानकाच्या नावाखाली काहीही दाखवू नका'
'पहरेदार पिया की' या मालिकेविषयी कलाकारांनीच व्यक्त केली खंत
जी स्वत:च एवढी घाबरत बिचकत
जी स्वत:च एवढी घाबरत बिचकत बाचकत गृहप्रवेश करते ती कितीशी पहरेदार पियाकी बनू शकेल . आणि पॉपकॉर्न ने गृहप्रवेश ?

>>आई वडिलांसारखेच अधिकार
>>आई वडिलांसारखेच अधिकार असलेले कायदेशीर 'लीगल गार्डियन' ही अपॉईंट करता येतात.
मग लग्नंच का?
हे आपल्या "हम आपके है कौन" मध्ये पण होतं. आईविना पोर वाढवायला माधुरीचं मोहनिश बहलशी लग्न. तरी बरं त्या हुषार कुत्र्यानी वाचवलं नाहीतर माधुरीचीपण "वहिनी पिया की" झाली असती.
Pages