पेहरेदार पिया की - बॅन झाले पाहिजे का?

Submitted by दक्षिणा on 20 July, 2017 - 09:32

सध्या सोनी वरील पेहरेदार पिया ही सिरियल 'आदरवाईज' गाजते आहे. प्रोमो पाहून लक्षात येत होतं की हे काहीतरी 'वेगळं प्रकरण' आहे. आता तर हि सिरियल चक्क सुरू झाली आहे ना? Uhoh
आजच फेसबूक वर पुणे लेडिज गृप वर एक पोस्ट पाहिली की आपण ही सिरियल बॅन करायला अपिल करू.
इतक्या लहान मुलाचे आई वडील त्याला 'अशी' भुमिका करायला परवानगी कसे देतात? किंवा हा काय विषय आहे का? इ. अनेक मुद्दे घेऊन तिथे चर्चा सुरू होती/आहे.
तुमचे मत काय? मी व्यक्तिशः एकही एपिसोड पाहिला नाहिये. पण इतके सगळीकडून आवाज येतायत की मी माझी उत्सुकता दडपून ठेवू शकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुनही एक सिरियल होती ज्यात मोठा भाऊ मरतो आणी मग ती हिरोइन छोट्या भावाशी लग्न करते. काही तरी दुष्काळ रीलेटेड स्टोरी होती... कुमकुम नावाची मालिका होती ती.. जुही परमार.

हे म्हणजे तुझी पोस्ट नाही सुजा.
हे म्हणजे सिरियल विषयी.
तुझी पोस्ट वर quote केल्याने तसे वाटतय खरे वाचताना. confusion करता सॉरी.

फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशनला फाट्यावर का मारत आहात? हातात रिमोट आहे ना?
मुलं दहा बारा वर्षांची असतानाच बर्याच मोठ्या स्त्रीयांच्या प्रेमात पडतात(स्वानुभव) >> सिंजी अगदी मान्य आहे तुमचं म्हणणं पण प्रेमात पडेपर्यंत ठिक आहे, त्या वयात लगेच कोणीही इतक्या मोठ्या स्त्रीशी लग्न करत नाही, त्याहिपेक्षा स्त्रीया इतक्या लहान मुलासोबत लग्न करतात? या सिरियल मध्ये तर दाखवलं आहे ना तिने त्याच्याशी लग्न केलेलं? आयमिन दोघांनी एकमेकांशी? एकूण काय तर पुरूष प्रेमात पडला की त्याच्या मनाप्रमाणे मग ती स्त्री कितीही लहान्/मोठी असो, त्याच्या निर्णयाप्रत लग्न झाले पाहिजे? Uhoh तिची मर्जी? तिची इच्छा? एकूण समाजात नक्की मेसेज काय जातोय?
बरं तर बरं की अगदी पुर्वी पाळण्यात लग्न होत होती, ती आई वडिलांच्या मर्जिने. इथे तर हा मुलगा स्वतः प्रपोज करताना, फोटो काढताना, आत्ताच एक प्रोमो पाहिला त्यात लाह्यानी भरलेलं मापटं आणून तिला ते ओलांडायला सांगतो आहे का तर तांदुळाच्या डब्यापर्यंत हात पोहोचला नाही वगैरे वगैरे....
मग काय १०-१२ वर्षाच्या मुलाने ही सिरियल पाहिली तर त्याला असे पाऊल उचलायला एका अर्थी प्रवृत्त केले जाऊ शकतेय ना?

मुळात लहान मुलांना सीरिअल्स मध्ये काम करू देणेच चुकीचे आहे...
>>>>>>
मग बालकलाकारांचे रोलही पन्नाशीतले स्टार करणार का Happy

मुळात लहान मुलांना सीरिअल्स मध्ये काम करू देणेच चुकीचे आहे... >> हे टोक झालं.
लहान मुलांना साजेशी भुमिका असेल तर जरूर करावी. हे असलं काहीतरी नको Sad

भारतात बालमजुरी बंद आहे... सिरीयल मध्ये काम करणारा लहान मुलगा आणि हॉटेलात काम करणारा लहान मुलगा, सेमच नाही का केस... अभ्यास दोघांचाही बुडतोच

What explains the marriage of a 10-year-old boy with an 18-year-old woman?
The best part we all love about the show is the freedom of Diya’s character. She is not forced to take the decision. It is her own choice to marry the boy.

In today’s generation, we see a young girl marrying a 40-year-old person and it is taken as a vow and her choice. The same way, Diya has made this choice out of certain circumstances, where she marries to protect the boy. That is very brave.
(Copied from: https://thereel.scroll.in/844667/tv-show-pehredaar-piya-ki-is-not-about-...)
मुलीची मर्जी आणि मुलाची? It's a child abuse case. What does a 10 year old boy know about consent and/or marriage? एकूणच मुलाखत वाचून निर्मात्यांनी किती सखोल विचार करून मालिका बनवली आहे हे स्पष्ट होतंय Angry

प्रोड्युसरने कितीही डेफेण्ड केल तरी बालविवाह जिथे कायद्याने अलाउड नाही तिथे अशा कपोलकल्पित स्टोर्‍या दाखवुन काय साध्य करणार आहात.

दोघांमधे किती वर्ष्यांच अंतर आहे पेक्श्या ईतक्या लहान वयात त्या मुलाचे लग्न दाखवले आहे हा प्रॉब्लेम आहे का? काही कॉमेन्ट्स वरुन कोण कोणापेक्श्या किती लहान आहे ह्या वर पण ऑब्जेक्शन आहे - ते नसायला हवं.

पाच महिन्याच्या वासरापेक्षा हे कितीतरी बरं म्हणायची वेळ आणली ह्या ७४ वर्षाच्या बाईने.

http://www.loksatta.com/trending-news/woman-marries-with-calf-in-cambodi...

स्पष्ट बोलायचे, तर या मालिकेचे समर्थन करणारी लोकं अत्यंत भिक्कारचोट व दांभिक आहेत.

"9 वर्षांचा मुलगा एक स्त्रीशी विवाह करताना दाखवलेय." << हे ज्ञान मला वरच्या एका पोस्टवरून प्राप्त झाले.

आपल्याला पेडोफिलिया लिगलाईज करायचा आहे, की शिष्टसंमत?

मायबोलीवर मिरवणूकीचे फोटो टाकताना त्यात लहान मुलामुलींचे फोटो आल्याबद्दल पेडोफिलियावरून जिप्स्याला झाडणारी झाडं धरणारी मंडळी कुठे गेलीत?

आपण कसलं समर्थन करतोय, हे समजत नाहिये का? इतकी बुद्धी भ्रष्ट अन बधीर झालीये का आपली सगळ्यांची?

अच्छे दिन. जरठबाला विवाह, त्याच्या विरुद्ध जरठा-बालक विवाह. मज्जाय सगळी!

प्रचण्ड वेगाने उज्ज्वल भूतकाळाकडे!

बीएम्केजे.

↑ ही पोस्ट पहिली दोन पाने वाचून लिहिलेली आहे.

भारतीय सेन्सॉर बोर्ड, जे अमर्त्य सेनांच्या मुलाखतीत फडतूस शब्दांबद्दल ब्लीप मारतं, त्यांचे संस्कार इथे बहुतेक पंचगव्य प्राशन करून गप पडलेत.

पेडोफाईल्स xxxचे! Angry

ह्याचा प्रोमो मी फेसबुकवर बघितला. अत्यन्त बिनडोक , निर्बुद्ध असेच शब्द सुचले.
कोणाचं तरी accident होते , मग एक माणूस आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्या मुलीला लग्न करायची गळ घालतो . का तर म्हणे लग्न केल्यानेच ती मुलगी त्या लहान मुलाच रक्षण जास्त चांगल्या प्रमाणे करू शकेल . ती मतिमंद मुलगीही भूतकाळतील घोड्याच्या हल्ल्यापासून झालेल्या बचावाचे उपकार स्मरून ह्या विवाहाला मान्यता देते. आणि त्यांचं लग्न होतं. काय बिनडोक मालिका आहे.सगळं लॉजिक , तर्क , शहाणंपण खुंटीवर टांगून ठेवलेत .युझलेस पीपल !!

प्लिजच गिव्ह मी अ ब्रेक Angry

अरे पण बालविवाहाला कायद्याने मान्यता नाहीये ना? मग त्याचे स्पष्टीकरण कसे दाखवलेय मालिकेत? गांधर्व पद्धतीने दाखवलाय का विवाह?

वर बालमजुरीचा विषय निघालाय म्हणून काही, कदाचित येथे अवांतर ठरेल तरीही...

बालमजुरीच्या समस्येत खोलवर डोकावून बघा आणि काय दिसतं सांगा..
च्रप्स, टिवी सिरीअल्स मध्ये as a acting म्हणून तुम्ही जी बालमजूरी समजताय ती 'बालमजुरी' नाहीये..तो शौक आहे त्या कलाकारांचा आणि त्यांच्या आईबापांचा!!!!!
हॉटेलमध्ये काम करणारा लहान पोर्या आणि ते बालकलाकार यांच्यात तुलना होऊच शकत नाही...
अभ्यास बुडवून कोणी अंगमेहनतीची बालमजुरी करत असेल तर त्याला मी सैल्यूट करतो.. पण जरा त्या मुलांचाही विचार व्हावा जे शाळेतच जात नाहीत, शिक्षणापासून कोसो दूर आहेत आणि अंगमेहनतीची कामं करतायत.. (हॉटेलात काम करणं हे तुलनेनं खुप सोपं काम आहे.) बालमजूरीची समस्या, त्यांची कारणे, उपाय हा खुप किचकट आणि संवेदनशील तसेच व्यापक विषय आहे.. कोणी जाणकारानं यावय स्वतंत्र धागा काढावा.. महत्वाचा विषय आहे Happy
मला वाटतं, जुन्या माबोवर दक्षिणा ताईंनी बालमजुरीबाबत लिहीलेलं आहे पण तेथे सविस्तर चर्चा झालेली दिसत नाही.. कुठं असेल तर मला ती लिंक द्यावी हि विनंती..

बालमजुरी वैगेरे सेन्सिटीव्ह विषय प्लीज आणु नका ह्या भिक्कार सिरीयलच्या धाग्यावर.
आरारा, स्पष्ट परखड पोस्ट आवडली.

बिपिन चन्द्र तुम्ही दिलेली लिन्क पाहिली आणि त्या बाईची दयाच आली मला.
दु:खावर मात करून जगणे अनेकांना जमत नाही, मग कुणाशी तर गेलेल्या माणसाबद्दल् बोलणे, त्याला कुणाशी तरी रिलेट करणे इ. प्रकार सुरू होतात.
आता वासराच्या अनेक सवयी तिच्या नवर्‍यासारख्या आहेत असं लिहिलंय... Uhoh काहीही.

हिंदी कार्यक्रम पाहात नसल्यामुळे सीरियलबद्दल मत नोंदवू शकत नाही.

आ.रा.रा. यांनी जिप्सी यांना मायबोलीवर पेडोफीलियावरून झाडलं गेल्याचा उल्लेख केलेला वाचला म्हणून ही पोस्ट लिहीत आहे.
या धाग्यावर जिप्सी यांना उद्देशून लिहिल्या गेलेल्या मूळ पोस्ट्स आणि त्यानंतर मायबोलीने जाहीर केलेलं धोरण वाचता येईल. तिथली जिप्सी यांच्यावर पेडोफीलियाचा आरोप केलेली / त्यावरून झाडणारी कुठलीही एक पोस्ट आ.रा.रा. यांनी दाखवून द्यावी अशी मी त्यांना विनंती करते.

तशी पोस्ट न सापडल्यास एकतर आपण अपुर्‍या/चुकीच्या माहितीवर किंवा आठवणीवर आधारित (आणि असंबद्ध - मूळ धाग्याशी त्याचा काय संबंध?!) पोस्ट लिहिली याबद्दल दिलगीरी व्यक्त करणे किंवा कोणीतरी कोणालातरी 'फेव्हर' म्हणून ते म्हणतात त्या पोस्टी उडवल्या गेल्या असतील असा आणखी एक बिनबुडाचा आरोप करणे इत्यादी पर्याय आहेत. या माझ्या पोस्टकडे दुर्लक्ष करणे हाही एक पर्याय आहेच.

ते अभिव्यक्तिस्वातंत्र्य, उच्चारस्वातंत्र्य, घटनाबाह्य सेन्सॉरशिपला विरोध इत्यादींचं काय झालं म्हणे? की ते पहेरेदार पिया की, इंदू सरकार इत्यादीच्या निर्मात्यांकरता नसतं?

बिपिनजी, पटत नसलेल्या गोष्टींना विरोध करणेही अभिव्यक्तिस्वातंत्र्यातच येते... आता या विरोध करण्याला विरोध करणेही अभिव्यक्तिस्वातंत्र्यात येतेच. लिबरल गोष्टी नॉन-लिबरल लोकांना समजणे अवघड असते थोडे, पण ठिक आहे, सांगणे आपले काम आहे.

नानाकळा,

{{{ स्पष्ट बोलायचे, तर या मालिकेचे समर्थन करणारी लोकं अत्यंत भिक्कारचोट व दांभिक आहेत. }}}

हा देखील अभिव्यक्तिस्वातंत्र्याचाच अविष्कार आहे ह्याचा साक्षात्कार घडवून आणल्याबद्दल अभिनंदन.

Pages