पेहरेदार पिया की - बॅन झाले पाहिजे का?

Submitted by दक्षिणा on 20 July, 2017 - 09:32

सध्या सोनी वरील पेहरेदार पिया ही सिरियल 'आदरवाईज' गाजते आहे. प्रोमो पाहून लक्षात येत होतं की हे काहीतरी 'वेगळं प्रकरण' आहे. आता तर हि सिरियल चक्क सुरू झाली आहे ना? Uhoh
आजच फेसबूक वर पुणे लेडिज गृप वर एक पोस्ट पाहिली की आपण ही सिरियल बॅन करायला अपिल करू.
इतक्या लहान मुलाचे आई वडील त्याला 'अशी' भुमिका करायला परवानगी कसे देतात? किंवा हा काय विषय आहे का? इ. अनेक मुद्दे घेऊन तिथे चर्चा सुरू होती/आहे.
तुमचे मत काय? मी व्यक्तिशः एकही एपिसोड पाहिला नाहिये. पण इतके सगळीकडून आवाज येतायत की मी माझी उत्सुकता दडपून ठेवू शकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"तेजस्वी प्रकाश" करून पंजाबीकरण का केले माहीत नाही. >>> तेजस्वी असल्यामुळे प्रकाश पडला असेल फा . Proud
कशी छान जगावेगळी मॉडर्न लिंगनिरपेक्ष लव्हस्टोरी >>> लिंगनिरपेक्ष कशी ?
BTW ते Buzzfeed India कोणी मायबोलीवरचं चालवतयं का ? तिथे पण हेच मुद्दे आलेत.

त्या टॅलंट हंट रिॲलीटी शोजमध्ये सात आठवर्षाच्या मुलींना " पल्लू के नीचे दबा के रखा है" असले द्वयार्थी गाणे म्हणायला लावतात ,हा पिडोफीलीया नाही का?}}}

मुलीना असं करावं लागणं यावर बंदीची मागणी झाली नाही. अलीकडेच & टीव्हीवर गन्गा नामक मालिका होती त्यात ७ वर्षांची मुलगी बालविधवा, पांढरी साडी नेसते, सासरचे तिचा छळ करत असतात वगैरे होतं. सैराट चित्रपटात जी नायिका होती ती शूटच्या वेळी किती वयाची होती? ती आता दहावी झाली म्हणे. तिने प्रणय सीन्स केले होते. म्हणजे फक्त male child चा असा विवाह दाखवला तर बंदी आणि बाकी femlae child च्या बाबतीत सर्व काही स्वीकारार्ह, असं दिसतंय. तरी बरं अमा यानी मालिका बघून अपडेट दिली आहे.
अजून एक गमन्त म्हणजे गेम ऑफ थ्रोन्स मध्येही अल्पवयीन राजपुत्र आणि त्याच्यापेक्षा मोठी बायको हा प्रकारहोता . मग त्यावर बंदीची मागणी का नाही? ते अमेरिकन आहे म्हणून चालेल? Or is it just too good to ban?
असो. कोणत्याही चूक गोष्टीला टीव्ही वा सिनेमा माध्यमातून दाखवणे योग्य नाही. मी मुलगा मूलगी कोणत्याच बालविवाह वगैरेचं समर्थन करू शकत नाही. पण आपले outrage आणि freedom of expression च्या कल्पना किती selective असतात याचं आत्मपरीक्षण प्रत्येकाने करावं.

काही दिवसांपुर्वी गळ्यात गळे घातलेली मंडळी मागच्या पानावर चक्क भांडली! (एकतर्फी का होईना)

बाकी मालिकेबद्दल उत्सुकता वाटतेय. बघते युट्युब वर.

अमा,
सिरोयलच्या चर्चेसाठी दुसरा धागा सुरु करा, इथे सिरियल न बघता बॅन डिमांड करणार्यांना पुरवु नका अपडेट्स :).
जे भाग पाहिले ते मलाही चांगले वाटले , चांदोबातली परीकथा वगैरे शोभेल . कपडे दागिने , कलाकर तर टॉप !
परमीत सेठीच्या राजबिंड्या प्रेझेन्सची स्तुति करत होते तोवर तो मेला देखील :(.

@ सैराट आणि आर्ची,
एक शंका -
सज्ञान होण्याचे कायद्याने वय १८ आहे. लग्नाचे कायद्याने वय मुलींना १८ आणि मुलांना २१ आहे.. बहुतेक
मात्र हे वय वयात येण्याचे नाहीये. अपवाद वगळता सर्वच मुले-मुली त्या वयाच्या आधीच शारीरीकदुष्ट्या वयात आलेली असतात असे मला वाटते. बहुतेक १४ वर्षाच्या आसपास.

सनव, गुड पॉइण्ट. Let's look at it frankly. मला जेथे दोघांपैकी एक लहान आणि एक प्रौढ दाखवतात ते सगळेच खटकले. पण त्यातही मुलगी लहान असेल तर जास्त खटकते. का ते माहीत नाही. सगळ्याच कल्चर्स मधे बायकांना त्याबाबतीत फारसे अधिकार आत्ताआत्तापर्यंत (आणि काहींमधे अजूनही) नसल्याने सॉफ्ट कॉर्नर असेल.

पण दोन्ही प्रेमी प्रेम करण्याच्या वयातले असतील, तर ते खटकत नाही. सैराट, कयामत से कयामत तक ई. टाइमपास ची स्टोरी खटकली नाही, पण ते दोघे हीरो/हीरॉइन भयानक डोक्यात गेले. "शाळा" मधली कथा जरा जास्तच लहान मुलांची वाटली. पण ती फक्त "क्रश" स्टोरी होती, त्यामुले तितकी खटकली नाही.

परमीत सेठीच्या राजबिंड्या प्रेझेन्सची स्तुति करत होते तोवर तो मेला देखील :(. >>> म्हणुनच बघणेबल वाटतेय नाहीतर त्याची ओव्हर्याक्टींग नाही सहन होत मला

डीजे, "जास्त" खटकते :). दोन्ही खटकते, पण मुलींबद्दल जास्त. कदाचित ते उंच माझा झोका ची कौतुके डोक्यात गेलेली अजून तशीच आहेत :). मुलांचे मोठ्या स्त्री शी लग्न लावलेले अजून इतके पाहिलेच नाही मूव्हीज्/सिरीयल्स मधे. या सिरीयलची माहिती वाचून ते ही चुकीचेच वाटले आहे. त्यामुळे तुझा पॉइण्ट कळला नाही.

मला स्त्रियांना समान अधिकार न देता जी बंधने लादली जातात ती सगळीच डोक्यात जातात. काकस्पर्श मी पाहिलेला नाही पण त्याची कथा ऐकून पहिले डोक्यात आले होते ते म्हणजे हा कोण ठरवणार तिने काय करायचे ते. या पॅटर्न्स ची हिस्टरी जास्त आहे, त्यामुळे ते साहजिकच जास्त खटकते.

१. या माझ्या पोस्टकडे दुर्लक्ष करणे हाही एक पर्याय आहेच.
२. आ.रा.रां.नी सीरियल न पाहता, जिप्सीचं नक्की काय झालं होतं हे नीटसं आठवत नसताना दाखवलेला righteousness कौतुकास्पद होता एकूण. त्यानंतर इथे उत्तर द्यायला न येण्याचाही.
एकूण त्यांचे hatchets bury केल्याचे दावे आणि हे असले समाजस्वास्थ्याचे उमाळे दोन्ही तितपतच आणि तात्पुरतेच असतात हे लक्षात आलं. यापुढे स्वच्छ मनाने दुर्लक्ष करता येईल.
<<
पहिला पर्याय स्वीकारलेला आहे होता. धन्यवाद!

(जिप्सीचे काय 'झाले' नव्हे, "केले" ते चांगलेच आठवते आहे. ज्या धाग्याची लिंक दिलीय, तिथे हे प्रकरण पूर्णतः झालेले नव्हते, अजून मला अल्झायमरने गाठलेले नाही.)

माझ्या वतीने कुणी बोलल्यावर पूर्वी येत असत तसेच एकापाठी एक योद्धे किल्ल्याबाहेर निघताहेत, हे पाहून डोळे निवले. हॅचेट्स बरी केल्या, म्हणूनच तर पेडोफिलिया विरोधकांनी या सिरियलीत दाखवलेल्या सत्प्रवृत्तीविरुद्ध लिहायला यावे, असे ते आवाहन होते.

अन्यथा अनुल्लेखाने मारणे कसे, ते आम्ही तुमच्याच मोठ्ठ्या शाळेत, मोठ्या कष्टाने, "अनेक आहुती देऊन" शिकलोत, हे नमूद करतो Wink

मा. वेमा/अ‍ॅडमिन.

माझ्या नावाने उल्लेख होऊन आलेल्या प्रतिसादांना व्यक्तिसापेक्ष उत्तर लिहावे लागते. त्याबद्दल क्षमस्व.

बाकी सगळे स्वच्छ मनाने चालू द्या.

फा :).
एग्झॅक्ट्ली , दोन्ही खटकायला हवे, पण इथे फक्त यावेळी बालक लहान आहे म्हणून खटकतय असा सूर दिसला बॅन डिमा ड वाल्यांचा.
उंच माझा झोका, बालिका वधु साठी सगळ्यांकडे एक्स्प्लेनेशन्स आहेत !

दुसरी महत्वाची गोष्ट.

इतर सगळ्या विकृत सिरियलच्या/तत्सम प्रकारच्या घटना/ धाग्यांवर मी त्यांना बॅन करायची डिमांड केली नाही, म्हणजे मी त्यांना समर्थन देऊन फक्त हीच एक सिरियल बॅन करा म्हणतोय, असा त्याचा अर्थ होत नाही.

ह्म्म्म... एवढ्याशा लहान मुलाशी लग्न करायला लागते आहे त्यात वयाने सज्ञान असलेल्या मुलीवर अन्याय होत आहे, असे इथे सिरियलसमर्थकांना वाटत नाहिये याचे आश्वर्य वाटले. Wink

पण या धाग्यावर जिप्सीच्या धाग्याचा संबंध कसा आला? तिथल्या जिप्सीला झाडणार्‍या लोकांनी इथे पेडोफिलिया ला सपोर्ट केलेले कुठे दिसले हे सांगितलेच नाहीत की आरारा ?

माझा ह्या विषयावर कुठलाही स्टँड नाही कारण फकतं पैसे कमावण्यासाठी ही सनसनाटी आयडिया कपडेपट, परंपरा आणि ईमोशन्सच्या वेष्टणात घालून विकली जात आहे ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
पण ज्यांना लग्न झालेले दाखवलेले चालते आहे त्यांना 'ह्या' नवरा बायको मधले ईंटिमेट सीन्स दाखवलेले चालतील का? असे विचारायचे आहे.
की प्रेक्षकांनी असा 'पुढचा' विचार करायचा नाही ह्यबद्दलही डिस्क्लेमर दिलेला आहे?

फा, दीपांजली +१

दोन्ही खटकतं म्हणणं ठीक, त्यावर वाद होऊ शकत नाही.
पण या सिरियलवर बॅन आणा म्हणणारी काही मंडळी दुसर्या काही कलाकृती (ज्यांत सिमिलर आक्षेपार्ह मुद्दे आहेत- सैराटपासून गॉट पर्यंत) आवडीने बघतात, फ्यान आहेत हेही लक्षात घ्यायला हवं.

पण ज्यांना लग्न झालेले दाखवलेले चालते आहे त्यांना 'ह्या' नवरा बायको मधले ईंटिमेट सीन्स दाखवलेले चालतील का? असे विचारायचे आहे.>> हीच तर गोम आहे हाब! बाकी सगळ अळिमिळि गुपचीळी! बसा डोक खाजवत, कारण यच्च्वायत चॅनेल वाले हा मुद्दा निकालात तर काढतात्च

सनव ह्यांचे मागचे प्रतिसाद वाचले.
जोवर मायनरचे वय ही मटेरिअल फॅक्ट विक्रीसाठी/प्रदर्शनासाठी वापरत नाहीयेत आणि ती पडद्यामागची माहिती आहे तोवर कलाकाराचे खरे वय ही सिनेमा/सिरिअल बनवणारे, कलाकाराचे पालक आणि पाल्यं ह्यांच्यामधले प्रायवेट अफेअर आहे.
चहाच्या गाडीवर काम करणारा मायनर बालमजूर आहे पण घरी मायनरने केक बनवला म्हणून तो बालमजूर होत नाही तसेच.
त्या मायनरने बनवलेले केक विक्रीसाठी ठेवून तुम्ही त्याला कामाला लावले तर मात्रं तो बालमजूर होईल.

गॉट २९७ एसी मधल्या काळातली आहे त्या ह्यूमन वॅल्यूज आता आपण कॅरी करत नाहीत. ही मालिका वेगळ्या व्ह्युअर बेस साठी बनवलेली आहे जिथे १५+ वय आणि पॅरेंटल कंट्रोल अपेक्षित आहे.
सैराट मधले पडद्यावर कॉलेजातली मुले सज्ञान दाखवली आहेत. वर म्हंटले तसे आर्चीच्या वयाचा मटेरिअल म्हणून वापर केलेला नसल्यमुळे तिचे खरे वय ही बाब प्रायवेट अफेअर आहे.
गॉट्/सैराट आणि ह्या चर्चेतल्या सिरिअलची तुलना कळाली नाही.

हो बरोबर प्राजक्ता. म्हणून हा जंक कन्सेप्ट आहे आणि तो चकचकीत वेष्टणात घालून विकल्या जात आहे हे ऊघड असतांना जे दाखवलेले आहे ते मान्य आहे म्हणत त्याला डिफेंड करण्यामागचे नेमके कारण समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे.

वर म्हंटले तसे आर्चीच्या वयाचा मटेरिअल म्हणून वापर केलेला नसल्यमुळे तिचे खरे वय ही बाब प्रायवेट अफेअर आहे.

रियली? तसं मग आईबापानी बाय देअर चॉईस अल्पवयीन अपत्याचं लग्न केलं तर ते पण प्राआयव्हेट अफेअर आहे का?

ही मालिका वेगळ्या व्ह्युअर बेस साठी बनवलेली आहे जिथे १५+ वय आणि पॅरेंटल कंट्रोल अपेक्षित आहे.

गॉट दाखवतात ना भारतात? आणि पहरेदार काही पोगो वर दाखवत नाहीत, सोनी चॅनल आहे ना? मग गॉट च्या बाबतीत १५+, parental control फॉलो केला जाईल अशी खात्री आहे पण पाहरेदार बद्दल तशी खात्री नाही? Got चा काळ वेगळा आहे, काल्पनिक आहे हा मुद्दा मान्य पण बालिका वधू च्या वेळी आजच्याच काळात दाखवून दावा केला होता की राजस्थानात असं आजही होतं आणि ही मालिकाही राजस्थानातच घडते आहे.

मी ही मालिका बघत नाही, समर्थनही करत नाही. काही चूक दाखवलं तर कारवाई व्हावीच पण मग तोच न्याय अशा प्रकारच्या सर्वच कलाकृतींना लावणार का- even where the victim is female?

पण ज्यांना लग्न झालेले दाखवलेले चालते आहे त्यांना 'ह्या' नवरा बायको मधले ईंटिमेट सीन्स दाखवलेले चालतील का? असे विचारायचे आहे.
<<
फक्त या शो पुरतं बोलायच् झालं तर त्यांचं कायदेशीर लग्नं मुलगा २१ चा झाल्यावर करा असं मुलाचा बाप मरता मरता सांगतो, सध्या जे २-३ भाग युट्युब वर पाहिले त्यात इस्टेट आणि मुलाला सख्या भावांपंपासून धोका आहे म्हणून राजकुमारी दिया घरात यावी एवढच दिसलं.
अर्थात तुम्ही म्हणताय तसं बालकांचे इंटीमेट सीन्स वगैरे टोकाचे आक्षेपार्ह काही दाखवले तर न बघणे आपल्या हतात आहे आणि टीव्हीला सेन्सर बोर्ड असेल तर सिरीयल इतक्या टोकाला जाईल असं वाटत नाही.
बाकी मराठी रिअ‍ॅलिटी शोज मधे लहान मुलींना पालक द्वयर्थी लावण्यांवर अश्लील हावभाव करत नाचु देतात हे त्याच कॅटॅगरी मधे मोडतं पण पहतात, कौतुकही करतात सो कॉल्ड सुजाण प्रेक्षक, तिथे कोणी बॅन डिमांड नाही करत :).

रियली? तसं मग आईबापानी बाय देअर चॉईस अल्पवयीन अपत्याचं लग्न केलं तर ते पण प्राआयव्हेट अफेअर आहे का? >> नाही त्यांना शिक्षा होईल कारण लग्नाचं वय कायद्यानं ठरवलेलं आहे पण सिनेमा/सिरिअल मध्ये काम करण्यासाठी कायद्याचं बंधन नाही. तान्हे बाळ ही काम करू शकते.

हो गॉट भारतात दाखवतात पण ती भारतीय प्रेक्षकांसाठी बनवलेली नाही. जसे महाभारत ईराण मधल्या प्रेक्षकांसाठी बनवलेली नव्हती. आवड असल्यास कोणीही काहीही बघू शकते पण तुम्ही महाभारत आणि गॉटची तुलना करू शकत नाही. फ्रेंड्स, हाऊ आय मेट योर मदर ही दाखवतात भारतात मग तुम्ही फ्रेंड्स आणि हाआमेयोम सारखे जोक्स टाकणार का चर्चेतल्या ह्या भारतीय मालिकेत?

बालिकावधू (मी पाहिली नाही पण आय्डीया आहे) वर कारवाई झाली नाही म्हणून ह्यावर होऊ नये असे काही आहे का?

मी ही मालिका बघत नाही, समर्थनही करत नाही. काही चूक दाखवलं तर कारवाई व्हावीच पण मग तोच न्याय अशा प्रकारच्या सर्वच कलाकृतींना लावणार का- even where the victim is female? >> हो लावावा. मी ही बघ्त नाही वा समर्थन करत नाहीये. पण हे एक जंक बिझनेस गिमिक आहे जे चुकीचे आहे असे वाटते आहे म्हणून स्टँड समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.

चुकीच्या प्रथा असतील पण हे त्याच्यं ग्लोरिफिकेशन आहे. प्रथेबद्दल ती नाहीशी व्हावी अशी कळकळ दिसली असती तर कदाचित ही चर्चा झाली नसती.

फक्त या शो पुरतं बोलायच् झालं तर त्यांचं कायदेशीर लग्नं मुलगा २१ चा झाल्यावर करा असं मुलाचा बाप मरता मरता सांगतो, सध्या जे २-३ भाग युट्युब वर पाहिले त्यात इस्टेट आणि मुलाला सख्या भावांपंपासून धोका आहे म्हणून राजकुमारी दिया घरात यावी एवढच दिसलं. >> म्हणजे लिव-ईन का ? हे नातं ९ वर्षाच्या मुलाला कसं समजावून सांगितलं ह्या बद्दल ऊत्सुकता आहे.
ते 'मांग में सिंदूर भरायचे' टाईप्स टिपिकल सीन बघितले ते कसे एक्स्प्लेन करणार?

ईस्टेटीचा सांभाळ करण्यासाठी ट्र्स्ट चा कायदेशीर पर्याय ऊपलब्धं असतो.. आई वडिलांसारखेच अधिकार असलेले कायदेशीर 'लीगल गार्डियन' ही अपॉईंट करता येतात.
मग लग्नंच का?

Pages