भारताच्या पुढचे प्रदुषणाचे आव्हान !!

Submitted by मिलिंद जाधव on 8 July, 2017 - 13:37

डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा गार्बेज रिसाक्लींग हा भारताचा एक ज्वलंत प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या भारतात प्लॅस्टीक
गार्बेज हे ईतर गार्बेजप्रमाणेच डंप केले जाते कारण काही तुरळक अपवाद सोडता भारतात प्लॅस्टीक रीसाक्लींगची ईफेक्टीव पद्धती वापरली जात नाही. प्लास्टीक गार्बेज हे डीग्रेडेबल नसल्याने ते ह्या डंप ग्राऊंड मध्ये मुळ रुपात तसेच रहाते.

दर रोज आपण साबण, शँपु, टुथपेस्ट वापरतो हे सर्व केमिकल्सने बनवलेले असतात, त्याचा बराच अंश हा ड्रेन द्वारा परत नदीत, जमिनीत सोडला जातो. समजा ऐखाद्या छोट्या शहराची लोक संख्या १० लाख आहे तर दररोज सकाळी किती केमिकल पॉलुशन होत असेल ?

भारतीय रेल्वेत काही गाड्यांसाठी चहासाठी प्लॅस्टीक कप ऐवजी मातीचे कुल्हड वापरले जातात. दक्षिण भारतात स्टील ताटांऐवजी केळीच्या पानात जेवंण द्यायची पद्धत अजुनही आहे. महाराष्ट्रात पुर्वी पत्रावळीवर जेवण वाढले जाई.

डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा वापर, केमिकल टुथपेस्ट , साबण , शँपु वापरणे हा तुमच्या मते प्रॉब्लेम आहे का ?
जर आहे तर ईतक्या मोठ्या प्रॉब्लेमच सोल्युशन काय आहे ?

जर रामदेव बाबा सारख्या एका योगी पुरुषाने शेतकर्यांच्या सहाय्याने केमिकल रहीत साबण, शँपु वैगेरे बनवले आहेत.
अश्या प्रॉडक्टने वर सांगीतलेल्या पॉल्युशन प्रॉब्लेम्सचा उतारा मिळेल का ?

Group content visibility: 
Use group defaults

भरत, मी माझ्या आजूबाजूला जे बघते त्याबद्दल बोलते. वस्तू वाहून न्यायला सोप्या जातात म्हणून त्या प्लास्टिकच्या पिशव्यांत भरल्या जातात. प्लास्टिक नकोच ही ठाम भूमिका घेतली तर उद्या तिथेही पर्याय शोधले जातील.

प्लास्टिक नको असे कोणी म्हणत नाहीये असे मी सार्वत्रिकीकरण करत असेन तर मी कदाचित चुकतही असेन पण मग तसे दिसायला हवे ना मला. माझ्या आजूबाजूला नाही तर निदान कुठेतरी बातमी तरी... जशी एखादीच बातमी येते मेघालयातले खेडे कचरा मुक्त झाल्याची. तशी.. गडकिल्ल्यांवरून ढिगानी बाटल्या, प्लास्टिक गोळा केल्याचे फोटो येतात, आठ दिवसात परिस्थिती जैसे थे असते. माझया गावचे कचरामुक्त फोटो मी हल्लीच बघितले. माझे गावही टुरिस्ट आकर्षण आहे. आता गेल्यावर कळेल परत किती कचरा झाला ते. हे सगळे मोठ्या प्रमाणावर जेव्हा थांबेल तेव्हाच सार्वत्रिकीकरण होते की नाही ह्याचा पुरावा मिळेल. नाहीतर तुम्ही व मी कापडी पिशव्या गेले कित्येक वर्षे वापरतोय... आपल्या दोघांवरून बाकी जनताही हेच करतेय हा निष्कर्ष नाही काढता येत ना?

अभि-नव, जे दुकानदार प्लास्टिक पिशव्या दुकानात ठेवत होते त्यांच्यावर चलन फाडून कारवाई केली, 5000 रुपये दंड घेतला. माझी मुलगी दुकानात गेली असता तिच्या समोर एका दुकानात ही कारवाई घडत होती. तो दुकानदार उद्वेगाने म्हणाला की हे चलन मी आता लामीनेट करून टांगतो इथे म्हणजे तरी लोक प्लास्टिक पिशव्या मागायचे बंद करतील. लोकांना थांबवता येत नाही म्हणून सरकार दुकानदारांना दंड करते. नमुत जागोजागी कचऱ्याचे दोन दोन डब्बे लावलेत, सुका व ओला कचरा वेगळा टाकणे सोयीचे व्हावे म्हणून.

दुकान व हॉटेलचे फुटपाठवरील अधिक्रमण खूप आधीच बंद झालेय. आता कुठलाही दुकानदार बाहेर माल मांडून ठेवत नाही. मुंढ्यांना तर शहर कार मुक्तही करायचे होते. त्यांनी तसे बोलून दाखवलेही होते. नवे आयुक्त तेही करतील. Nmmt गाड्यांचे gps enabled अँप आहे जे वापरून आपण बस स्टॉपवर उभे असताना पुढची गाडी किती वेळाने येईल हे बघू शकतो. गाड्यांची संख्या वाढवून व गाडी कधी येणार याची माहिती देऊन लोकांनी कार सोडून पालिकेच्या गाड्यांनि प्रवास करावा याचे प्रयत्न आयुक्त करत होते. नमूं प्रदूषण मुक्त करायचीच हे स्वप्न त्यांनी पाहिले, त्यांच्या स्टाफनेही साथ दिली. पुढचे आयुक्तही प्रयत्न करताहेत पण लोकांची तेवढीच साथ हवी. जी अजूनही मिळत नाहीये. वॉक विथ कमिशनर ला लोक गर्दी करायचे, मग कमिशनर जे सांगतात ते पाळायला नको…??

हो भरत, पण आम्हीच निवडून दिलेले राजकारणी नतद्रष्ट निघाले, दोन्ही प्रकारचे, सत्ताधारी व विरोधक. जोवर मुंढे विरोधकाना चेपत होते तोवर सत्ताधाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या, जेव्हा सत्ताधाऱ्यांच्या शेपटीवर पाय पडला तेव्हा तेही उलटले. असो. मुंढ्यांसारखे लोक जितका वेळ राहतात त्या वेळात ते खूप जणांना प्रेरित करतात. नमूं पालिका खूप लोकाभिमुख आहे. मला स्वतःला खूप चांगले अनुभव आलेत. जेव्हा केव्हा तक्रार केलिय तेव्हा लगेच दखल घेतली गेलीय. आपले माबोकर डॉक्टर गायकवाड खूप चांगले काम करताहेत तिथे.

साधना पोस्ट आवडल्या

नमूं पालिका खूप लोकाभिमुख आहे. मला स्वतःला खूप चांगले अनुभव आलेत. जेव्हा केव्हा तक्रार केलिय तेव्हा लगेच दखल घेतली गेलीय >>>> हे वाचून पण खूप चांगले वाटले.

<<<<पालिका आयुक्त प्रयत्न करताहेत पण लोकांची तेवढीच साथ हवी. जी अजूनही मिळत नाहीये. >>>>
लोकांनी आपल्या सवयी बदलायला हव्यात. ते सहज शक्य होणार नाही. लहानपणातच स्वच्छतेचे संस्कार शाळेतच झाले पाहीजेत, बर्याच देशात हे करत आहेत. चांगले नागरीक शाळेत घडु शकतात. सोशल रीस्पॉंसिबीलीटीचे संस्कार घरी करता येण्यासारखी परिस्थिती अजुन तरी आपल्या ईथे नाही.

ऐकत्र आलेल्या कचर्यातुन प्लॅस्टीक, मेटल, पेपर कचरा वेगळा करुन त्याचे व्यावसाईक स्तरावर रिसायक्लिंग करणे खुप कठिण आहे. रॅग पिकरनी कचरा उचलुन त्याच्या भरोश्यावर रिसायक्लिंग करणे म्हणजे समाजाची उन्नती नाही.
आपल्या ईथे कचर्यात काय येईल ह्याचा भरोसा राहीलेला नाही. डेड बॉडी ते बॉडी पार्ट पर्यंत काहीही येउ शकत.

नेहमी प्रवाही असयला पाहीजेत अश्या मुंबईतल्या जाम झालेल्या नदीं, नालेना बघितल्यास परिस्थिती किती गंभिर आहे ह्याची कल्पना येईल. हे नदी नाले त्यात पडणार्या कचर्यामुळे पुर्णपणे जाम झालेले असतात. प्रदुषणामुळे मिठी नदीमध्ये कोणतेही जलचर जीवाणु नसतात असा ऐक अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यात पुढे लिहील होत की नदीतील प्रदुषण कमी केल्यानंतर जलचर जीवाणु परत आले होते.

साधना खूप छान प्रतीसाद. मी मात्र कापडी पिशव्या आताच नाही तर लहानपणापासुन वापरतेय. आईला शिवणाची आवड त्यामुळे उरलेल्या कापडाच्या पिशव्या हमखास बनत. आणी दणकट, टिकाऊ पण. भाजी, दळण यासाठी सोप्या.

जीव गेला तरी मोबाईल घरी न विसरणारे कापडी पिशव्या मात्र न चुकता विसरतात. हेच लोक सोशल मीडियावर पर्यावरण बिघडले म्हणून याला चोप त्याला चोप करत असतात, स्वतःला एकदा चोपा की....>>>>> हे एकदम खरे.

साधना, सगळ्या पोस्ट आवडल्या. पर्यावरणाची कळकळ फार आवडते व नुसतीच त्यावर चर्चा न करता आमलात आणते व त्यावर जागरुकता आणते. खूपदा आपल्या हातात तक्रार करणं असतं ते करत नाही ... मला काय करायचे, मी माझ्या पुरतं करतेय ना ही च मनोभूमिका दिसते.
नागपूरला मेट्रो येऊ घातली आहे . निवडणूकी पूर्वी धावेलही. योग्यवेळी सुरु होतेय पण प्रश्न हा पडलाय की मेट्रो आल्याने कार खरेदी किती टक्क्याने कमी झाली किंवा पेट्रोलच्या खपावर किती फरक पडलाय , हे जाणून घ्यायला पाहिजे.

Proud

साबण हे केमिकलच असते. साबणाची बेसिक व्याख्याच सोडियम / पोटॅशियम अल्कली व फॅट यांच्या संयोगाने तयार होणारे केमिकल आहे. त्यामुळे ते केमिकलच असते.

Pages