१. बासमती तांदूळ – १ वाटी
२. बेसन – १ वाटी
३. तेल – ४ टेबलस्पुन
४. दही – २ टेबलस्पुन
५. हळद – १/२ टी-स्पुन
६. तिखट – २ टी-स्पुन
७. जिरे – १ टी-स्पुन फोडणी करता
८. लवंग – ३-४
९. काळीमिरी- ३-४
१०. दालचिनी- अर्ध्या बोटा इतका एक तुकडा (आमच्याकडे नव्हता)
११. तमालपत्र- १
१२. मसाल्याची वेलची – १ (काळी वेलची)
१३. मीठ – चवीनुसार.
प्रथम एका ताटलीत बेसन घेऊन त्यात अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ एकत्र करून , त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा तेलाचे मोहन घालावे. हे सगळे एकत्र मळून त्यात गरजेनुसार पाणी घालून ते बेसन घट्ट मळून घ्यावे. मळून घेतल्यावर त्याच्या लांब लांब वळ्या करून (साधारण अंगठ्या इतक्या जाड) ठेवाव्यात.
आता एका पातेल्यात पाणी गरम करून (अंदाजे लोटाभर) त्याला उकळी फुटल्यावर त्यात तयार गट्टा सुरळी अलगद सोडाव्यात. गट्टा सुरळी आधी पाण्यात बुडतात. त्या पाण्यावर तरंगायला लागल्या की त्या शिजल्या असे समजावे. मग त्या पाण्यातून काढून थोड्या थंड करून त्यांचे बोटाच्या पेरा इतके तुकडे करावेत. हे झाले आपले गट्टे तयार.
आता एका कुकर मध्ये २ चमचे (टेबल स्पुन) तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, तमालपत्र, मसाल्याची वेलची, दालचिनी घालून थोडे परतावे. आता त्यात कापून ठेवलेले गट्टे घालून ते अंदाजे दीड दोन मिनिटे परतावेत. परतणे झाल्यावर त्यात भिजवून ठेवलेले तांदूळ घालावेत. त्यावर हळद, तिखट अन चवीनुसार मीठ घालून नीट परतावे तांदूळ (अंदाजे २ मिनिटे). ते परतून झाल्यावर त्यात गट्टे उकळलेले गरम पाणी दोन वाट्या घालावे. हे महत्वाचे आहे कारण ह्याने एकतर ते पाणी वाया जात नाही अन गट्टे अंगच्या चवीत शिजतात. आपण पाणी गरम घालणार आहोत त्यामुळे कुकरचे झाकण लावून फक्त २ शिट्या घ्याव्यात. जास्त घेतल्यास भात मऊ होऊन पुलाव खराब होऊ शकतो. एक शिटी घेतल्यावर एलपीजी थोडा कमी करावा. अन दुसरी शिटी थोड्या वेळाने घ्यावी.
दुसऱ्या शिटी नंतर कुकर गार होऊन झाकण पडेस्तोवर ठेवावा मग गट्टे के चावल गरमागरम सर्व करावेत.
गट्टे के चावल पारंपारिकरित्या आंबूस अन घट्ट कसुरी मेथी घातलेल्या मारवाडी कढी सोबत खातात. पण वेळ नसल्यास आपण कुठलेही एक रायते, किंवा ताजे फेटलेले घट्ट दही थोडे तिखट मीठ अन जिरेपूड घालून सोबत खायला घेऊ शकता. आम्ही बुंदी चे रायते ठेवले होते.
हा अगदी गोळाभाताचा भाऊ वाटतोय
हा अगदी गोळाभाताचा भाऊ वाटतोय की. छान आहे रेसिपी.
मस्त आजे रेसिपी. मी
मस्त आहे रेसिपी. मी खाल्लेल्या गट्टे के चावल मध्ये बर्याच भाज्याही तेलावर परतून भातात घातल्या होत्या. चव छान होती. ते ही एक वेरिएशन आहे का?
Sopi Ani chan pak kruti.
Sopi Ani chan pak kruti.
Mi barech diwas karaycha mhantey!
सुरळ्या काय मस्त दिसतायेत :०
सुरळ्या काय मस्त दिसतायेत :० . एक्दम एक्सारख्या .
अरे वा ! सोन्याबापू .बऱ्याच
अरे वा ! सोन्याबापू .बऱ्याच दिवसांनी एन्ट्री .
मस्त आहे पाकृ. राजस्थानी उगमाची दिसतेय., बुंदी रायत्याचा फोटो पण कसला भारी आलाय
@सायो, मला कल्पना नाही, मी
@सायो, मला कल्पना नाही, मी असा प्लेन गट्टे पुलाव अन खिचडी असलाच प्रकार खाल्ला आहे. (चुरलेली कसुरी मेथीपाने घालून केलेल्या मारवाडी कढी सोबत)
@जाई, म्हणजे काय, मारवाडी प्रकार आहे अस्सल, सासुरवाडी स्पेश्यल... राजस्थानातली सासुरवाडी आहे माझी. पुलाव रायते सगळे तयार करणारी सौ बापुसाहेबच होय.
दिसतेय छान ...
दिसतेय छान ...
खरं तर हे मारवाडी, राजस्थानी पद्धतीचे जेवण माझ्या टेस्ट बड्सला रुचत नाहीत. नाश्त्याचे पदार्थ आवडतात, जेवण नाही. यात ताक दही कढी असले प्रकार असतात ते एक मात्र चांगले वाटते. दुपारी लंचला बरेचदा मित्रांसोबत राजस्थानी थाली खायला जातो. ते लोकं दालबाटी नावाच्या पदार्थाची तारीफ करून तीन तीन, चार चार खातात, मला नेहमी अर्धेच जाते
भारी फोटो आणी क्रुती!
भारी फोटो आणी क्रुती!
सोन्याबापू, तुमच्या रेसिपीने
सोन्याबापू, तुमच्या रेसिपीने गट्टे के चावल केले. मी गाजर, कांदा, फरसबी आणि फ्लॉवर ह्या भाज्याही घातल्या आणि त्याकरता काही फेरफारही केले. पण मोस्टली हीच रेसिपी फॉलो केली. इकडे टाकल्याबद्दल धन्यवाद.
वाह मस्त फोटोज आणि रेसिपी .
वाह मस्त फोटोज आणि रेसिपी .
ह्याला सॉसेज का पुलाव म्हणून पण खपवता येइल
बायकोला तेच म्हणले, हे गट्टे
बायकोला तेच म्हणले, हे गट्टे सुरळी अगदी फ्रॅंकफर्टर म्हणून खापेल म्हणून
@सायो, आता तुमच्या पद्धतीने एकदा करून पहावा लागेल गट्टे पुलाव
रेसिपी मस्त. आवडली.
रेसिपी मस्त. आवडली.
मस्त आहे रेसिपी. आणि तुम्ही
मस्त आहे रेसिपी. आणि तुम्ही ज्या प्रकारे एक एक स्टेपचे फोटो टाकले त्यासाठी स्पेशल थँक्स!
@सायो- मेजर बदल असा काय केला?
सनव, मेजर बदल अजिबात नाही
सनव, मेजर बदल अजिबात नाही केला. तेलावर गट्टे परतून बाजूला काढल्यावर त्यात कांदा परतला. त्यावर आलं, लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, रजवाडी गरम मसाला घालून परतून त्यात भाज्या परतल्या आणि बाजूला काढल्या. पुन्हा तेलाच्या फोडणीत उरलेला खडा मसाला परतून त्यावर तांदूळ घातले. भाज्या, गट्टे वगैरे घालून भात शिजवला.
मस्त पाकृ आणि फोटो!
मस्त पाकृ आणि फोटो!
फोटो दिसत नाहीत सोन्याबापू..
फोटो दिसत नाहीत सोन्याबापू..
पाकृ आणि फोटो दोन्ही मस्त.
पाकृ आणि फोटो दोन्ही मस्त.
@दक्षिणा ताई,
@दक्षिणा ताई,
फ्लिकर वरून चिकटवले आहेत, कदाचित म्हणून दिसत नसावेत काय? मी व्यु पब्लिक ठेवला आहे
धन्स सायो!
धन्स सायो!
मूगडाळीचे बारीक गट्टे असलेला
मूगडाळीचे बारीक गट्टे असलेला पुलाव गेल्या आठवड्यात खाल्ला
(No subject)
सायो, भातात तेल जरा जास्त
सायो, भातात तेल जरा जास्त झालंय असं मला वाटतंय
रेसिपी मस्त आहे
फोटो आणि रेसिपी मस्त
फोटो आणि रेसिपी मस्त
संपदा, गट्टे, भाज्या आणि भात
संपदा, गट्टे, भाज्या आणि भात वेगवेगळं तेलावर परतल्यामुळे तेल जरा जास्त लागतंच.
भारी आहो फोटो सायो! छोले पण
भारी आहो फोटो सायो! छोले पण टेंप्टिंग दिसताहेत...
मस्त फोटो सायो!
मस्त फोटो सायो!
सायो मस्त दिसतोय पुलाव.
सायो मस्त दिसतोय पुलाव. ग्रेव्ही छोले आहे का? वरती बापूंचा यम्मी पुलाव- रायता आणि हा ग्रेव्ही पुलाव दोन्ही भारी फोटो आणि प्रेझेंटेशन.
आता करायलाच पाहिजे.
@बापू अजून येऊदेत मारवाडी रेसिपी! मला मारवारी थाळी फार आवडते!
माझ्या जैन मित्रांच्या
माझ्या जैन मित्रांच्या वर्षातून दोनदा होणार्या दाळबाटी पार्टीला गट्टेकी सब्जी असणार म्हणजे असणारंच. अनेक वर्ष दाबून खाल्ले आहेत गट्टे.
बापू शक्य असल्यास केर-सांगरी च्या भाजीची रेसिपी टाका. मेथी-पालक आणि ईतर भाज्या दीड-दोन रुपये किलो असण्याच्या जमान्यात केर-सांगरी २५ ते ३० रु. किलो अशी काहीही असायची. पण आमचे मारवाडी मित्रं करायचे आणि खाऊही घालायचे.
फार आठवतात ते दिवस.
केर सांगरीची साग्रसंगीत भाजी
केर सांगरीची साग्रसंगीत भाजी कर असा आग्रह गृहलक्ष्मीस केला आहे, ऐकेल अशी आशा आहे, ,
केल्यास नक्की देतो हायझेनबर्ग, सुकी (वाळवलेली) सांगरी आज ₹९००/किलो (अक्षरी रुपये नऊशे प्रतिकिलो फक्त) दराला पोचली आहे उत्तम प्रतीची, गम्मत म्हणजे सांगरीच्या शेंगा म्हणजे आपण दसऱ्याला पूजतो त्या शमीवृक्षाच्या शेंगा होत.
सनव, जमेल तसं (म्हणजे बैकू करून खायला घालेल तेव्हा तेव्हा) इकडे पोस्टीं पाडूच
केर सांगरीचे रेडी टू कुक पॅक
केर सांगरीचे रेडी टू कुक पॅक पाहिले होते. आणायला हवे
Pages