आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कशी झोकात चालली कोळ्याची पोर >> >>> तुम्ही लिहिलेले गाणे चुकलेय ना मेघा...... मग नवीन कोडे कसे दिलेत ?
कोडे क्र १६२८ हिंदी (१९६१-१९६५) >>>>>>> हे दिलेय ना अक्षयनी.... मग ??

कोडे क्र १६२८ हिंदी (१९६१-१९६५) -- उत्तर
कैसे झोक (में) चली कोळी (की) पोर
जैसे चौथ (के) चांद (की) कोssर

असे आहे ते.

१६२९ --- आलिया / प्रियांका / आणखी कोणी?

आ. & प्रि. नाहि

क्ल्यु:
२) गायिका : &टीवी वरच्या सिंगिंग रियॅलिटी शोची जज...

आता येईल.. Happy

नमस्कार सर्वाँना!
धमाल चालली आहे इथे तर! Happy

काजु कतली मला पण हवी अगदी जिव्हासौख्यासह!

Happy

क्रुश्नाजी आलेsssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss
Happy Happy Happy

पार त्या सिंहगडावर पण जाऊन आले.. Sad>>>>

सध्या जास्तच बिझी! इकडे डोकवायलाही वेळ नाही! बरीच छान छान गाणी आलेलीत की!

चली रे, चली रे
जुनूं को लिए
कतरा, कतरा
लम्हों को पीये
पिंजरे से उड़ा
दिल का शिकरा
खुदी से मैंने इश्क किया रे
जिया, जिया रे जिया रे

हो Happy
जिया जिया रे जिया रे जिया जिया रे जिया ओ ओ ओ ओ ओ. अस आहे ते...
जिया रे जियारे ते वेगळं थारे बिन लागे नाही मोरा जिरा रे ते हे...
पुर्ण लिहा कि....
आणि जुनं द्या क्रुश्नाजी आलेत आता..........................

१६३०..

चुप है धरती, चुप हैं चाँद सितारे
मेरे दिल की धड़कन तुझको पुकारे

१६३१..

हिंदी
क्ल्यु ची गरज नाही

सोप्पे घ्या

स क द य प
त ज न त म क न ह

घ्या सगळ्यांनी........ अरे, कृष्णा पण आहेत... वेळेवर आले Happy
काजू कतलीच्या बाजूला कोण ते विचारायचे नाही.....आपले आपण ओळखायचे
1628.jpg

काजू कतलीच्या बाजूला कोण ते विचारायचे नाही.....आपले आपण ओळखायचे>>>>>

आपण काजू कतली खायची आणि त्याला अंगठे धरायची शिक्षा! ये अच्छी बात नहीँ है! एखादी तरी द्यायला हवी! Wink

१६३१.. हिंदी -- उत्तर
सागर किनारे दिल ये पुकारे
तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है

त्याने काय केलय ते बघा आधी.... तसे पण डिशकडे तोंड करून उभे केलेय Happy
च क प "हिंदीत" चंदन का पलना शोधले पण पुढची मागची दोरी सापडेना....... होती कोण, कोळ्याची पोर...!! मग तीच देईल ना नारळीपाक....

शिक्षा मान्य
ते वरती मराठी लिहलं नाही ते न बघता क्लुच देत बसलो Lol
स्निग्धाताई तर बिचाऱ्या पार हिंदी गाण्याच्या शेतात फिरून आल्या दमल्या असतील त्यांना एक extra द्या बरं

१६३२ मराठी जुने
क त स स
क भ अ र

घ्या हो तुम्हीपण....... Happy स्निग्धा गेल्या असतील घरी बहुतेक........ आणि थोडे नंतर येणार्‍यांसाठी ठेवूया.

ताई बंट्या बोलायला उद्धट वाटतं म्हणून तुम्ही बंट्याश्री बोलता ना... मला पण लय वेगळ वाटतं..म्हनून मी बंती..म्हणते.. Happy

१६३३ हिंदी १९७५ - १९८०
क ब द ड स द क ब
द द फ ह क त ह क भ ......

दोन्ही गायक गोड गळ्याचे

ताई बंट्या बोलायला उद्धट वाटतं म्हणून तुम्ही बंट्याशी बोलता ना... मला पण लय वेगळ वाटतं..म्हनून मी बंती..म्हणते.. >> .. Happy

ताई बंट्या बोलायला उद्धट वाटतं म्हणून तुम्ही बंट्याशी बोलता ना... >> Happy हो
लता रफी असेल...किंवा तलत

Pages