आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्निग्धाताई तुम्ही किंवा सत्यजितजींनी कोडे दिले की मी आधी ओळी मोजतो त्या दोनच्या गटात बसल्या की गझल असण्याची दाट शक्यता असते मग गूगलला विचारतो बाबा जगजितसिंग दाखव तो दाखवतो लगेच नाहीच सापडले तर search मध्ये माझी काव्यशक्ती पणाला लावतो चुकलं तरी तो बरोबर त्या गजलेवर नेऊन सोडतो Happy

कोडे क्र १६०७ हिंदी (२००५-२०१०)
च र च र ध स म
ह स ह स प म छ ज
ह स ह स छ छ छ छ छ
ब क झ पृ ख ख ख ख ख
ह स ह स ब क झ प म

chanda re chanda re, dheere se muska
haule se haule se, palkon mein chhup ja
chanda re chanda re, dheere se muska
haule se haule se, palkon mein chhup ja
haule se haule se
chhan chhan, chhan chhan, chhan chhan chhana
baadal ke jhule pe
khhan khhan, khhan khhan, khhan khhan khhana
haule se haule se, baadal ke jhule pe muska
chanda re chanda re, dheere se muska
haule se haule se, palkon mein chhup ja
dheere se muska
palkon mein chhup ja

इति गुगल प्रसन्न!

१६०८.हिन्दी गझल
च क स क द प न
क ग थ ज त ग क ब न

फ अ ग अ फ अ ब अ अ व
अ ह ख क द म न न

द न अ अ स त क त-म
त न अ ब क ल फ न

(जगजीतजींनी गायिलेली आहे,१९९०-१९९५)

पर्फेक्ट स्निग्धाजी!
द्या पुढचे कोडे!

फ़सल-ए-गुल आई फ़िर एक बार असीनाने-वफ़ा,
अपने ही खून के दरिया में नहाने निकले

दिल ने एक ईंट से तामीर किया हसीं ताजमहल,
तुने एक बात कही लाख फसाने निकले

१६०९ हिंदी
अ अ त ख अ द अ न अ
क भ ह ज क प य अ

कोडे क्र १६१० मराठी
स म त म क
ज त त म अ
दोन मिनिटं पुरेशी आहेत हे कोडे ओळखायला अगदी बघितलं तरी कळेल

१६११ हिंदी
त प क अ त स भ
न द च ह न ह च ह
ज स थ अ अ फ ब
न द च ह न ह च ह

तेरे प्यार को इस तरह से भुलाना
न दिल चाहता है न हम चाहते है
जो सच था उसे एक फसाना बनाना
न दिल चाहता है न हम चाहते है

पुढचे कोडे द्या कुणीतरी!

१६१२. हिन्दि ५०-६०
ज क म ज ग ज
अ अ य थ क ग ज
क क अ प म ग ज
ब ब अ स ड ग ज

१६१२. हिन्दि ५०-६० -- उत्तर
जाने कहा मेरा जिगर गया जी
अभी अभी यहीं था किधर गया जी
किसी की अदाओं पर मर गया जी
बडे बडे अंखियों से डर गया जी

मुझे दर्द-ए-दिल का पता न था
मुझे आप किस लिये मिल गये
मै अकेले युंही मजे मे था
मुझे आप किस लिये मिल गये

मुझे दर्द-ए-दिल का पता न था
मुझे आप किसलिए मिल गए
मैं अकेले यूँ ही मजे में था
मुझे आप किसलिए मिल गए

१६१४ हिंदी
च ज च ज र ज
क अ ह अ त म अ
म प क भ स ल अ

तुम्ही द्या ना... Happy
हो ताई... Happy
द्या तुम्ही कोडे..पंदितजी रागावलेत...

मीच देते...
१६१५,हिन्दि,१९९१-१९९९
त क प क म न ह
क च ह त ख त म न ह.
ल ह म त य क ह ह
त ज ह म त म न ह..

तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है
क्या चीज़ हो तुम खुद तुम्हें मालूम नही है
लाखों हैं मगर तुमसा यहाँ कौन हसीन है
तुम जान हो मेरी तुम्हें मालूम नही है

Pages