आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ५

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 June, 2017 - 00:48

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -४ : http://www.maayboli.com/node/62658

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

१६२३ हिंदी (५०-६०)
स छ स ग क ल क
ज त क ब स र स

१६२३ हिंदी (५०-६०) -- उत्तर
सुनो छोटी सी गुडिया की लंबी कहानी
जैसे तारों की बात सुने रात सुहानी
सुनो छोटी सी गुडिया की कहानी

१६२४ मराठी जुने
फ ब ग म ह
प स अ ड म अ

१६२५ हिंदी (६०-७०)
त ग ह ल म त त अ न स
म अ न त ब ल न स
त अ क अ प ज अ म त क
त ग म त ब अ म त क

१६२५ हिंदी (६०-७०) -- उत्तर
तेरा ग़मख़्वार हूँ लेकिन मैं तुझ तक आ नहीं सकता
मैं अपने नाम तेरी बेकसी लिखवा नहीं सकता
तेरी आँख के आँसू पी जाऊं ऐसी मेरी तक़दीर कहाँ
तेरे ग़म में तुझको बहलाऊं ऐसी मेरी तक़दीर कहाँ

१६२६ हिंदी ७०-८०
म त अ प प क द ब
ज अ ख न ह
व क क क स

चित्रपट -- याच नवाचा एक हॉरर शो / मालिका पण आहे
नायक-नायिका -- याच जोडीचा दुसरा सिनेमा याच वर्षी आला ज्यात हीच नायिका लाडावलेली, हट्टी, मनमानी करणारी दाखवली आहे.
बाकी सगळे नेहमीचेच कलाकार पडद्यामागे..

१६२६ - उत्तर
मैं तो एक पागल, पागल क्या दिल बहलाएगा
जिसे अपनी खबर ना हो
किसी को क्या समझाएगा

१६२७
हिंदी (१९६० - ७०)

न अ श क स क प क
य छ ह ज क प क

नग्मा ओ शेर की सौगात किसे पेश करू
ये छलकते हुये जज़बात किसे पेश करू

कोडे क्र १६२८ हिंदी (१९६१-१९६५)
क झ च क प
ज च च क

क्लू
चित्रपट : आज कामवाली बाई कामावरच नाही आली
संगीतकार तेच जे स्निग्धाताईंच्या हिंदी गाण्यात असतात गायिका तीन बहिनीपैकी एक.
कामवालीला समानअर्थी शब्द काय काय आहेत ते बघा त्यातलं एक ह्या चित्रपटाच नाव आहे
संगीतकार इतनी शक्ती हमे दे ना दाता वाले
आशाताई बरोबर

संगीतकार तेच जे स्निग्धाताईंच्या हिंदी गाण्यात असतात गायिका तीन बहिनीपैकी एक. >> ओ पी + आशा का?
अजुन काही तरी क्लु द्या, ते कामवाली काही डोक्यात येईना

संगीतकार छडी लागे छमछम वाले >> वसंत देसाई
इतनी शक्ती देना - कुलदिप सिंग Uhoh

संगीतकार छडी लागे छमछम वाले
बराच गोंधळ झालाय माझा त्यामुळे तुमचाही असो छडी लागे वरून जावा सापडेल पटकन

वसंत देसाई/आशाता/गदि माडगूळकर/ मोलकरीण
माझ्या चुकीने फारच गोंधळ उडालेला दिसतोय म्हणून बऱ्यापैकी शिजवून दिलंय आता मीठ बरोबर की चूक न बघता पटकन खाऊन टाका

कशी झोकत चालली
कशी झोकात चालली कोळ्याची पोर ,
जशी चवथीच्या चंद्राची कोर ... ...

दादा के बच्चे मराठी गाण दिलं आणी हिन्दी लिहिलय वर Angry

नशीब माझा नंबर लागला... Happy

१६२९,हिन्दी,२०१०-२०१७
च र च र ज क ल
क क ल क प
प स अ द क श
ख म अ क र
ज ज र ज ज र ज अ अ अ अ अ............

क्लू ?

सध्या मला इमेज अपलोड करायला जमत नाहीये सो सगळ्यांनी ५ वेळा काजू कतली असं म्हणा आणि पाणी प्या Happy

असं म्हणा >> नुसत म्हणा...... अरे किती शोधत होते मी क झ वरुन सुरु होणार, आशाताईंनी गायलेल, वसंत देसाईंच संगीत असलेल कामवाली म्हणके नौकरानी नावाच्या सिनेमातल गाणं आणि तुम्ही काजु कतलीच नुसत नावच घ्यायला सांगताय. जिव्हासुख नाही तर निदान नयनसुख तरी मिळू द्या Wink

जिव्हासुख नाही तर निदान नयनसुख तरी मिळू द्या>>>>>>ताई Lol

क्ल्यु:
१) नायिका : अ‍ॅक्टर ,प्रोडुसर्,मॉडेल आहे..

Pages