आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ४

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 May, 2017 - 04:49

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संगितकार -रवि Lol
संगीतकार -- भारतीय स्वयंपाकघरात ही असतेच

मग काय करणार......... नूतन, किकु, आशा...........दर वेळी काय नवीन क्ल्यू द्यायचे......प्रश्न पडतो...

११२६ हिन्दि १९६०-७०
ज प ह ज अ ह
ज प ह ज अ ह
द क च व अ न च
न त ब
ज प ह ज अ ह

द्या हो mr.pandit चांगलासा क्ल्यू तिला, बिचारी इतकी धडपडते.... थोडे सोपे होईल तिला, जुन्या कलाकारांची थोडी ओळख पण होईल..
नावं देऊ नका अजिबात....

क्लु - एका स्पर्धेत जिंक्लेले आठजण एका बेटावर जातत व तिथे त्यांचा एकामागोमाग मुत्यु होतो\
२.- मराठि आभिनेत्रि -कोल्हापुरचि आहे
३. एक विनोदि कलाकार

तुम्ही तर सिनेमाचे नांवच
तुम्ही तर सिनेमाचे नांवच सांगितले की हो!
एवढे सोप्पे जगणं करून सोडणे म्हणजे अतीच>>>>
कावेरि साठि आहे

हो ना. नाहीतर नुस्ती वाचून जाते.. ओ की ठो कळत नाही,, एकही गाणे ओळ्खू येत नाही.
मी दिलेले तुम्ही एक्स्पर्ट लोकं लग्गेच ओळ्खणार म्हणून तुम्हीच कोणीतरी द्या पाहू..

मी दिलेले तुम्ही एक्स्पर्ट लोकं लग्गेच ओळ्खणार म्हणून तुम्हीच कोणीतरी द्या पाहू..>>

असे नाही द्यायचे कोडे!

अनघाताई व्वा! Happy
गुमनाम मला वाटलेलं पण मरथि नायिका कळली नाही....

मराथी अभिनेत्री आणि कोल्हापुरची म्हनून मी पद्मिनी कोल्हापुरे ची गाणी शोधत होते ..तीचे मुव्ही सगळे ८०चे होते... Lol ,मी विचारणार होते कि साल चुकलय का ...तर......... उत्तर आलेलं...

११२६ नाहिहो १२२६... १२वे शतक चालु है...

१२२७ हिन्दी, २००१-२००७
द ल ल म त प क क,
त प क क त प क क,
द च ल म इ क क इ क क,
द ल् ल म त प क क त प क क............

१२२८.हिन्दी (१९९०-२०००) अगदी सोप्पे
च स प क
क च न ल च क न
अ म ह अ म ह

ज स अ ख प क
ह प ख ग क ब क
फ स प क
क च न ल च क न

ल ह क श क ख
अ स त ह ख म ब
ख स प क

ह द अ अ ब ज द
प ज झ क झ ज अ
र स प क

क च न ल च क न
अ म ह अ म ह

एवढं मोठ्ठं Happy
मी सगळ लिहिन फक्त १ क्ल्यु द्या...

क्ल्यु—
१)नायक- एक प्रसिद्ध अभिनेत्री व एका क्रिकेटरचा मुलगा,actor,producer
२)नायिका- actress,businesswoman,producer

Pages