भरतभेट अर्थात पुण्यात झालेले एवेएठि

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

श्री. रॉबिनहूड व श्री. झक्की या दोन परममित्रांची भेट काल घडून आली. अनेक पुणेकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते. या निर्मळ आनंदाच्या क्षणांत आपल्यालाही सहभागी होता यावे, म्हणून ही प्रकाशचित्रे..

SA.jpgSA2.jpg

विषय: 

मस्त लिहिलेत दोन्ही वृत्तांत Happy बाकी सर्वांनी जोडलेल्या पुरवण्या पण भारी हैत...

अरे व्वा, धम्माल केलीत की तुम्ही. पूनम, लिंबूदा वृत्तांत मस्त.
................................
माझे जगणे होते गाणे...

अरे व्वा, धम्माल केलीत की तुम्ही. पूनम, लिंबूदा वृत्तांत मस्त.
................................
माझे जगणे होते गाणे...

हुड फोटो चांगले आहेत्.त्या फोटोंमधील 'भारदस्त व्यक्तिमत्व' कोण आहे???
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

लिंबूटिंबूचा तिसरा आयडी कोणता म्हणे ? टोणगा की काय ?

पी-एस, लिंबु - मस्त वृतांत..
रॉहु - तुमचे ऑर्कुटवरचे फोटो तुम्ही परवानगी दिलीत म्हणुन पाहिलेत.. (पावले लपवुन आले होते Happy )अर्थात कोणी ओळखू आले नाहीत.. पण लिंबु ह्यांनी थोरलीचा उल्लेख केलाय वर त्यामुळे लिंबुटिंबु तुम्हाला थोरली बरोबर लगेच ओळखता आले. Happy Happy

वा वा छान जीटीजी.. छान फोटो आणि मस्त वृत्तांत.. खुप मिसलो वाटतं.. तरी रविवारी मी त्याच परिसरात होतो.. माहीती झाले असते तर आलो असतो.. असो पुढच्या वेळी..

छान वृतांत. भारतात असतो तर नक्कीच आलो असतो.
मलाही सगळ्याना भेटायचे होते. बरेच जणाना आधी भेटलोय तरी झक्कीना भेटता आले असते.
भारतात जे कोणी थोर मायबोलीकर येतील, त्या प्रत्येकासाठी असा समारंभ झालाच पाहिजे.

भारतात जे कोणी थोर मायबोलीकर येतील, त्या प्रत्येकासाठी असा समारंभ झालाच पाहिजे.

>>>

झक्की किंवा फारेन्ड पैकी थोर कोण? Light 1 रॉबिन मात्र लगेच देतील ह्या प्रश्नाचे उत्तर Happy

थेरं म्हणायच असेल Proud

आर्च : तू कधी येते आहेस भारतात ???????? Happy

~~~~~~~~~~~~~~
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे

मस्त वाटले फोटो पाहून आणी व्रुत्तांत वाचुन. पण माबो वर इतके लिहीणे आणी टापा करणे कसं काय जमतं बुवा? कदचीत माझा लिखाणाचा वेग कमी पडत असावा. तरीच अमेरीकेची अर्थव्यवस्था इतकी डबघाइला का आली ते आत्ता समजतय. आणी ओबामाचा इतका विरोध का आहे कामं देण्याबाबत.
Neways...jokes apart pan ithe yeun itake chan friends hou shaktat yach chan chitr aahe aaj....far chan vatal.. aani marathi manus agadi jagachya kanakopryaparyant pohochala aahe he pahun pan bare vatatay. mi ithe navin aslyane farashi koni mahit nahit mala..pan sagal vachun and gtgche photo pahun chan vatal..collegechi aathavan jhali. next gtg paryant majhi pan olakh jhali changali tar nakki awadel mala yayala.
dhanyvad...

मला कस काय कोणिच बोलावल नाहि य जिटिजि ला ???
क्रुपया माझी पण आठ्वण ठेवत जावी मा बो वाल्यानी!!????
Happy

एक विचारायचं राहिलं... शेवटी वेटरने प्रेमाने 'आईस्क्रीम आणु?' असं विचारलं का?? आणि विचारल्यावर 'नहीं, बिल लाओ' असं प्रेमाने(?) कोणी सांगितलं का?
...............................
माझे जगणे होते गाणे...

मला आठवली तेवढी 'क्षणचित्रे'..
--
वाडेश्वरात लोकांमधून वाट काढत 'आपल्या' लोकांचे वास अन माग काढत आत आलो, तर तिथे काही गडकरी उर्फ वाडकरी, अन शिवाय लिंबू, फारेंड, अन साक्षात झक्की दिसले.
वाडेश्वरने एकत्र जागा द्यायला असमर्थतता दाखविल्यावर 'चलो वैशाली' ची घोषणा झाली. 'झक्कींना कुणीतरी गाडीतून तिथे न्या रे' असे मयूरेश उर्फ कार्याध्यक्षांनी सांगितल्यावर झक्कींनी त्याला नम्र नकार दिला. (हे कार्याध्यक्ष आता फक्त नावाला उरले आहेत. प्रत्यक्षात ते कोणतेही कार्य आजकाल करीत नाहीत. बुधवारी, रविवारी, किंवा कोणत्याही वारी ते सर्वांत उशिरा येतात, अन सर्वांत आधी जायची त्यांना घाई असते. Proud ) अख्खा भारत खणून ठेवला असला तरी फ.कॉ. रस्ता त्याला अपवाद असेल, असे झक्कींना वाटले असावे. पण ते सपशेल खोटे ठरले. फुटपाथ अन रस्ते खणले तर होतेच, त्यात भर म्हणून महापालिकेच्या कचरागाड्या प्रेमाने झक्कींची वाट अडवून उभ्या होत्या. झक्की अचानक एखाद्या खणून ठेवलेल्या खड्ड्यात दिसेनासे होतील, या काळजीने मी त्यांच्या सोबत चालायचा प्रयत्न केला, पण थोडे चालल्यावर ते पुढे अन मी मागे अशी अवस्था झाल्यामूळे मीच खड्ड्यात न पडण्याची काळजी अन कसरत मला करावी लागली.
--
वाडेश्वर ते वैशाली या वाटेवर 'बरिस्ता' दिसल्यावर 'इथे बसू या की' असे झक्की म्हणाले. इतके २५-३० जण तिथे बसू शकणार नाहीत, असे मी त्यांना पटवून सांगायच्या प्रयत्नात होतो, तेवढ्यात बरिस्तामधल्या एक-दोन आकर्षण'स्थळां'वर माझी नजर गेली, तसे माझे बोलणे (आपसूक) तुटले.
नंतर वैशालीत झक्कींच्या बोलण्यातही अनेक वेळा 'स्थळांचा' उल्लेख आल्यावर मी त्यांच्याकडे संशयाने बघत होतो.
--
वैशालीत आल्यावर तिथे साडेपाच हजार लोक असल्याचे मला कळले. ('काहीही ठोकू नकोस. कशावरून साडेपाच हजार?' असा प्रश्न मीनूने केल्यावर मीही तिला 'मोजून ये जा' असे आवाहन केले. पण ते मोजून दाखविण्यापेक्षा एकदा ती बसल्यावर उठण्याचे काम जास्त आव्हानात्मक असल्याचे तिच्या लक्षात आल्यावर तिने माझा नाद सोडला. Proud ). जिन्याने वर जाऊन झाडांच्या सान्निध्यात व्यवस्था झाल्याचे लक्षात आल्यावर सर्वांना प्रसन्न वाटले, अन त्याबरोबरच साडेपाच हजार लोकांमध्ये येऊन पडल्याचे दु:खही नाहीसे झाले. तर, तिथे १-२ टेबले १०-१५ खुर्च्या, अन एका टेबलावर एक खुर्ची ठेवलेली आढळली. झक्कीमहात्म्य ओळखून वैशालीने खास ही जागा तयार केली की काय अशी शंका येऊन मी झ्क्कींना 'ही तुमची जागा' असे सांगितले. पण 'मी उभे राहून भाषण करणार आहे, शिवाय टेबला'वरच्या' खुर्चीत मला खाता येणार नाही असा युक्तीवाद झक्कींनी केल्यामूळे त्यांना टेबलावरच्या खुर्चीत बसवायचा बेत आम्ही रद्द केला.
--
दोन मोठी टेबले मिळूनही ८-१० जण अजून उभेच होते. शेजारच्या टेबलावर आरामात खानपान करीत असलेल्या एका 'कंपू'ला- त्यांच्या शेजारची एक रिकामी खुर्ची मी पटकावत, त्यांच्या प्रत्येक 'घासा'कडे पाहत, त्यांना 'लवकर उरका' अशी अप्रत्यक्ष सूचनाच केली. तिथे बसून राहिल्यामूळे त्या टेबलावर आपोआपच आमचा क्लेम झाला असला तरी माझी अवस्था तेवढा काळ 'धड कोणत्याच कंपूत नसल्याची' झाली होती..! मधूनच हिंदी बोलणार्‍या त्या लोकांकडे झक्की संशयाने, तर त्यांच्या डिश अन घासांकडे बघणार्‍या माझ्याकडे ते लोक दयार्द्र नजरेने- अशी बघाबघी चालली असतानाच त्यांचे एकदाचे संपले, अन उरलेल्या पूणेकरांनी फटाफट जागा पटकावल्या.
--
त्यानंतर ओळखपरेड सुरू झाली. अन सर्वांनी आपापले एकेक आयडी सांगितले. झक्कींनीही झक्की असाच सांगितला. 'मी एलटी' असा एक 'उल्लेखनीय' आवाज आल्यावर 'त्या वाकड्याचे काय झाले?' असा 'अनूल्लेखनीय' प्रश्न मीनूने (का कोणीतरी) विचारला. पण 'त्याचे अवतारकार्य आता समाप्त झाले असल्याने, त्या प्रश्नाचे प्रयोजन नसल्याचे' झाक्कींनी सांगून त्यावर पडदा पाडला.. Happy त्यानंतर मायबोलीकरांच्या फुलबाज्या अन रॉकेटे उडायला लागून दिवाळीमय वातावरण निर्माण झाले. सर्वांच्या हसण्याचा अन ओरडण्याचा आवाज टिपेला पोचला तेव्हा मी घाबरून आजूबाजूला बघितले, तर इतर सगळे माबोकरांकडे एलियन्स धरतीवर अवतरल्याच्या थाटात बघत होते. ते मी लक्षात आणून देताच, 'त्यांना म्हणावं, आम्ही तुमची केवढी करमणूक करत आहोत, तेही नया पैसा न घेता!' असे झक्की म्हणाले. मग इतरेजनांची काळजीच आम्ही सोडली.
--
आपल्या छोट्या डायरीत झक्की उपस्थितांची नावे शुध्द मराठीत 'टिपून' घेत होते. यांच्यापैकी कोण कोण लग्नाळले आहेत, असा प्रश्न झक्कींनी विचारला, तेव्हा इथे अनेक होतकरू उभे असल्याचे (तेव्हा ते खरेच उभेही होते, टेबल न मिळाल्यामूळे) त्यांना कळले. तेव्हा 'अरेरे, लग्नाळले नाहीत म्हणूनच हे सारे भंजाळले आहेत!' असेही कुणीतरी म्हणाले. टण्याला विचारल्यावर 'मला एकच कशी पूरेल?' असा पुराणमतवादी प्रश्न त्याने विचारला. याची शिक्षा म्हणून नेमक्या त्याच वेळी बाहेर पोलिसांनी त्याची गाडी उचलली.
--
हुडाने एंट्री घेतल्यावर भेट्सोहळा पार पडला. हुड (एकदाचा) भेटल्यामूळे बरे वाटते आहे, असे झक्की म्हणाले तेव्हा 'टोणगा भेटला असता, तर आणखी बरे वाटले असते नाही?' असा प्रश्न मी विचारला तेव्हा झक्कींनी वडा अन आवंढा बहूतेक एकाच वेळी गिळून पुटपूटत काहीतरी उत्तर दिले पण ते गदारोळामूळे ऐकू आले नाही. मग आशूने 'ऐकू येत नाहीये, त्यांना मोठ्याने बोलायला सांग' असे सांगितले तेव्हा हुडाने त्यांच्या तोंडासमोर माईक धरला असावा.
--
झक्कींना मध्येच फोटू दाखवायचे आठवल्यामूळे त्यांना त्यांच्या यजमानांकडे नेले. रस्त्यावर चालायची, अंगावर येणारी माणसे टाळण्याची, रस्ते ओलांडण्याची त्यांची कला, लगबग अन स्टाईल वाखाणण्याजोगी होती. मागे भोंगा वाजवत असलेल्या एका कारवाल्याला ते 'थांब जरा, बोंबलू नकोस. दिसत नाही का रस्त्यावरून फुटपाथवर चाललोय ते' असे खेकसल्यावर मला ते विशिष्ठ शहरातच गेली दोनेकशे वर्षे राहत असल्याचा भास झाला. विशिष्ठ शहर अन तिथली लोकं यांचं त्यांना प्रचंड आकर्षण असल्याचं समाधान मनात घेऊनच Proud मी त्यांचा अन त्या छानपैकी पार पडलेल्या जीटीजीचा निरोप घेतला.. Happy
--

(सर्व क्षणचित्रे खरीखुरी. पण अर्थातच पूनम म्हणते तसं स्वातंत्र्य लिहिणारा घेतोच. तरीही काही खोटे वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा.:फिदी: शिवाय हा वृत्तांत नसून क्षणचित्रे आहेत. म्हणजे काय, तर एखाद्या प्रचंड मोठ्या हत्तीकडे एकाच कोणत्यातरी अँगलमधून पाहून केलेली टिप्पणी. त्यामूळे चु.भू. माफी द्यावी.. Happy )

--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

>>>> तेवढ्यात बरिस्तामधल्या एक-दोन आकर्षण'स्थळां'वर माझी नजर गेली, तसे माझे बोलणे (आपसूक) तुटले
तरीच तुझ माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हत! Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

झक्कींचीही नजर नेमक्या त्याच आकर्षणस्थळांवर असल्यामूळे झक्की 'इथेच बसू या का?' असे म्हणाले असावेत, अन हे लक्षात आल्यावर'च' माझे बोलणे 'आपसूक' तुटल्याचे मी वर म्हटले आहे..!!

कळलं? Proud

--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

साज्या क्षणचित्रेच जास्त आवडली Happy [अधि/ अनाधीकृत वॄ.ची गोष्टच वेगळी! Wink ]

मी ही लिहिन म्हणतोय मंडळी.. जरास थांबा!

*********************
कंपून कंपूत सार्‍या कंप माझा कंपला... पुढच्या ओळी सुचल्यावर कंपीन!
Wink Biggrin

Pages