भरतभेट अर्थात पुण्यात झालेले एवेएठि

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

श्री. रॉबिनहूड व श्री. झक्की या दोन परममित्रांची भेट काल घडून आली. अनेक पुणेकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते. या निर्मळ आनंदाच्या क्षणांत आपल्यालाही सहभागी होता यावे, म्हणून ही प्रकाशचित्रे..

SA.jpgSA2.jpg

विषय: 

अरे वा, झक्की आणि रॉबिनहुड एकत्र, अभिनंदन दोघांचं ! Proud

जरा अज्ञान आहे.
जीटीजी समजलं पण एवेएठी? याचा फुल्फॉर्म काय?

. . .
पुढचा वृत्तांतच वाचा आता.. कसें? Happy

माझ्या कॅमेर्‍यातनं प्रतापगड.. सॉरी, सॉरी- वैशालीगड!!

प्रेमळ भेट झाली, अन मग पुढे..
"तो चंद्र हवा मजला".. हुड त्या चकाकत्या चंद्राच्या मागे हात धुवून लागला!!
26.jpg27.jpg37.jpg

मी धरतो माईक, तुम्ही करा बघू भाषण.. हुडाचा 'प्रेमळ' आग्रह!!
29.jpg

(एकमेकांना) खाऊन झालं, आता करू या जरा विद्वत्तापूर्ण, समाजप्रबोधक अन विचारप्रवर्तक चर्चा!!
31.jpg32.jpg

"दोन" पूर्ण चंद्र एकत्र प्रकटले, अन कुणाचे हात गालावर आले; तर कुणाचे कप्पाळावर!! "फिदी:
38.jpg

इतर (किंवा इतरांचे) फोटो टाकायला परवानगी असेल, तर सांगा; म्हणजे टाकतो इथेच. Happy

पूनम, तूच टाक समग्रसमरवृत्तांत. मी जमलं तर "क्षणचित्रे" (म्हणजे फोटो नाही) टाकतो.. Happy

--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

झाले! झाले!! झाले!!! पुण्यनगरीमध्ये दि. ८ मार्च, २००९ रोजी एक अभूतपूर्व एवेएठि संपन्न झाले. पण मंडळी, हे लिहायला जितके सोप्पे वाटतेय, तितकेच त्याचे आयोजन करणे अत्यंत अवघड होते.. का? तर, ऐकाच..

पार्श्वभूमि:
मा. झक्की मार्च भारतात येणार याच्या तुतार्‍या फेब्रुवारीपासूनच ऐकत होतो. भारतभेटीदरम्यान ज्या पुण्यनगरी आणि पुणेकरांबद्दल त्यांना अत्यंत जिव्हाळा वाटतो, तिथेही ते मुक्कामी येणारच होते. पण पुण्यामध्ये ते खूपच थोडा वेळ असणार होते. यायच्या आधी केवळ २ माबोकरांना (इट्समी आणि एलट्या) त्यांनी भेटण्याचे वचन दिले होते. बरं, भारतामध्ये ईमेल, मोबाईल वगैरे लोक वापरतात, किंबहुना ते नसेल, तर लोकांशी संपर्क ठेवता येत नाही, हे त्यांना कुठे ठाऊक होते? त्यामुळे, "मी येतोय. बालगंधर्वला सकाळी ९ वाजता मी थांबेन. ज्यांना जमेल त्यांनी या" इतकेच सांगून ते गायब! त्यामुळे बाकी लोकांनाही त्यांना भेटायचे असल्यास त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा असा प्रश्न आयोजकांना पडला.

त्याच दरम्यान क्रिकेटप्रेमी फारेंड हे लग्नानिमित्त (कोणाच्या?) पुण्यात आहेत असे त्यांनी कळवले. त्यामुळे त्यांना भेटायचे नक्की केले गेले. याच भेटीदरम्यान झ.काकांनाही भेटता येईल का अशी चाचपणी चिनूक्साने सुरू केली आणि प्रचंड द्राविडी प्राणायाम करत, लोकांना सतत मेल, फोन करत, इतकंच काय एक रिक्षा भाड्याने घेऊन त्यावरून भोपूने घोषणा करत त्यांनी समस्त पुणेकर माबोकरांना मा. झक्की आणि क्रि.प्रे. फारेंड यांना एकत्रच भेटायची संधी उपलब्ध करून दिली.

शामियाना:
मा. झक्कींना भेटायची सर्वांनाच उत्सुकता. त्यात हूड आणि ते अशीही ऐतहासिक भेट होणार असे समजले. त्यासाठी तर प्रशस्त शामियाना हवा. चिनूक्स हे नवीन पिढीचे आणि सळसळत्या रक्ताचे असल्याने त्यांनी प्रेमळ पण धाक दाखवणार्‍या 'वैशालीमावशी'कडे पाठ फिरवली आणि ट्रेन्डी 'वाडेश्वराला' साकडे घातले. तशी आमंत्रणेही सगळ्यांना गेली. पण तितक्यातच हूडाने युद्धाची तयारी केल्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली. आता मा. झक्कींच्या सुरक्षिततेचाच प्रश्न उपस्थित झाल्याने, अगदी ऐनवेळी गनिमी कावा करून पुन्हा एकदा 'मावशी'च्याच प्रेमळ छत्रछायेखाली प्रसंगोचित चाणाक्षपणा दाखवून चिनूक्स आणि अरभाटाने शामियाना उभारला.

पण इथे मावशीही गडबडली. एरवी मुश्किलीने रविवारी सकाळी १०-१२ जण माबोकर येतात. इथे तर एक आख्खी टोळीच तिला शरण आलेली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वांची आसनव्यवस्था झाली. शेजारच्या टेबलवर काही पुड्यूड्ज आरामात न्याहारी करत होते. त्यांच्यामध्ये साजिरा शिंगे मोडून सामिल झाला. त्याचा त्या पुड्यूड्जनी व्यवस्थित अनुल्लेख केला. आता अनुल्लेख सहन कसा होणार? त्याचा काहीतरी बोलून समाचार घ्यायलाच हवा न! म्हणून चिनूक्साने (तो लवकरच अमेरिकेस प्रस्थान करणार आहे, त्या निमित्त पॉलिश केलेले आणि सराव केलेले) इन्ग्रजी वापरून त्यांना 'रीक्वेस्ट' केली (किती खाल? उठा! आम्ही थांबलोय!). तेही ड्यूड्जना पसंत पडले नाही. त्यांनी निवांतपणे आवरूनच प्रस्थान केले. तेव्हा कुठे उरलेले सर्व माबोकर बसले. पण चिनूक्स आणि अरभाट हट्टाने उभेच राहिले (त्यांना जे सुचवायचे आहे, ते त्यांनी कृतीतून सुचवले). आदम आणि टण्यानी मात्र 'आम्हाला अजून वेळ आहे' म्हणत दिसेल ती खुर्ची पटकावली.

युद्ध सुरू:
आता सगळे एकदाचे (दोन सोडून) स्थानापन्न झाल्यावर ओळखपरेड सुरू झाली. प्रत्येकाने उभे राहून आपला एकच आयडी सांगितला. टण्या खरंतर इथे चान्स होता, सर्व गुन्हे, आपलं आयडी (मेट्रन, मी_ना, महिन इ) कबूल करण्याचा, पण तो त्याने वाया घालवला. त्याने 'श्रीमती तान्या' अशी ओळख करून दिली स्वतःची.
यशवर्धन उभा राहिल्याबरोब्बर सर्व घाबरले. म्हणून तो आयडी न सांगताच खाली बसला.
मयूरेश यांनी स्वतःची ओळख 'कार्याध्यक्ष' अशी अधिकृतपणे करून दिली. पण तो त्यांचा आयडी नव्हे. त्यांचा आयडी सांगताना ते अंमळ लाजले.
माझ्याकडे अतिरिक्त जबाबदारी असल्याने मी उभे राहून माझे नाव सांगितले नाही, पण माझा आवाज सर्वांपर्यंत नीट पोचला.
आदमाने नाव वगैरे न सांगता, 'मी अमेरिकेत येऊन जाऊन असतो' इतकीच स्वतःची ओळख करून दिली.
आशू_डीने आवेशयुक्त एन्ट्री मारून आल्याआल्याच स्वःची ओळख न देता, थेट 'तुम्ही झक्की, म्हणजेच रॉबिनहूड' असं म्हणत सर्वांना गार आणि गप्प केले. काहींना ठसके लागले, काहींचे तोंडचे पाणी पळाले, खुद्द झक्कीही 'अहो, मी नाही तो' म्हणायला लागले, इतका तो आवेश होता!
लिंबूटिंबू प्रथमच लिंबूटिंबू या आयडीने जीटीजीमध्ये सामिल झाले होते. त्यांचे स्वागत सगळ्यांनी टाळ्या वाजवून केले. त्यांनी आपल्या तीन आयडीजची कबूली दिली. त्यातला एक वाकड्या मार्गाने आता शहिद केल्याचेही कळले.

हे होत असेपर्यंत तंबी ऊर्फ चिनूक्स लोकांची ऑर्डर घेत होते. साजिराने खरंच शिंगं मोडली होती. ऑर्डर एक देऊन दुसरीच डीश पळविणे सारख्या बालिश कृती चालल्या होत्या त्यांच्या. नंतर खुलासा झाला की रविवारी सकाळी ८ला उठल्याने त्यांचे डोके थोडे गरम झालेय आणि त्यांना गार काहीतरी प्यायल्याशिवाय चैन पडणार नाही.

या दरम्यान मा. झक्कींनी त्यांच्या अमोघ वक्तृत्वाचे बाण भात्यातून काढायला सुरूवात केली होती. न्यू जर्सी मध्ये नुकतेच झालेले एवेएठि, त्यामध्ये आलेल्या बायका, पार्ले बाफ, त्यावरची खादाडी, कविता ते का वाचत नाहीत यावरचे विवेचन, एकमेकांची विचारपूस कधी, कशी आणि का वाचावी याचे अज्ञान, एकच व्यक्ती दोन अधिकृत आयडी का घेते यावरचे स्वगत, भारतामध्ये पांढरे कपडे का घालू नयेत याची टीप्पणी, ईत्यादी. त्यांच्या भाषाश्रीमंतीपुढे आम्ही स्तिमित, स्तंभित वगैरे झालो. असे निष्प्रभ होणे काही जीएसला पटेना. मग त्याने त्यांना खिंडीत गाठले. मोबाईलवर नाही नाही त्या युक्त्या करत त्याने मा. झक्कींना असे काही गंडवले की बिचारे दुसर्‍याचा फोनवरून स्वतःशीच संवाद साधू पहात होते!
(मध्यंतरी, न्यू जर्सी एवेएठिमध्ये काही बालकांनी झक्कींच्या खुर्चीखाली जाऊन त्यांना काटे टोचले असल्याची कोणालातरी आठवण झाली. तशी ऑफर एका उपस्थित बालकाला देण्यात आली होती, पण ती त्या बालकालाच पसंत पडली नाही आणि झक्की वाचले! :))

जीएसला मात्र त्याच्या निंदनीय कृत्याचे प्रायश्चित्त लगेचच घ्यावे लागले! तो मार्च महिन्यात असलेल्या ट्रेकची माहिती केप्याला देत असताना आदमाने सोयीस्कररीत्या 'ट्रेक' हा शब्द ऐकला नाही आणि जन्मजात भोचकपणा केला. काहीही गरज नसताना, 'तिथे ३ दिवस तुम्ही काय करणार' असा भाप्र विचारून जीएसच्या आत्तापर्यंतच्या सर्व चढाया अक्षरशः धुळीस मिळवल्या!

'भरतभेट' अर्थातच 'तो ऐतिहासिक प्रसंग'
आणि झाली हूडाची एन्ट्री! ज्यासाठी केला होता अट्टाहास तो क्षण हाहा म्हणता आला. हूड दमदार पावले टाकत झक्कींपाशी कोणताही सुगावा त्यांना न लागू देता पोचले. 'आले' 'आले' अश्या आरोळ्या उठल्या. झक्कीही उठले आणि निधड्या छातीने हूडाला सामोरे गेले. मा. झक्कींच्या योजनेनुसार हूड आपला सगळा दारूगोळा वाडेश्वरापाशी खर्चून दमूनभागून मावशीच्या आश्रयास आले होते. त्यामुळे कोथळे काढायची नुस्ती अ‍ॅक्शन झाली. दोघांनी टाळ्यांच्या कडकडाटात परस्परांना प्रेमपूर्वक आलींगन दिले. या घटनेचे साक्षीदार पापारॅझ्झी होतेच. अनेक जणांनी ते क्षण कॅमेर्‍यात बंदिस्त केले. उरलेल्यांनी मनात. झक्की-हूडही वधूवरांप्रमाणे सर्व कॅमेर्‍यांना पोझेस देत होते, हसत होते वगैरे. याला भरतभेट म्हणा, वा शिवाजी-अफझलखान भेट.. साक्षीदार पावन झाले हे खरे!

दोघेही नंतर स्थानपन्न झाले आणि चक्क एकमेकांची चौकशी वगैरे सुरू झाली. हे म्हणजे चिकन रश्श्याची अपेक्षा असताना अळूचं फतंफतं समोर यावं तसं झालं. पण लवकरच दोघांनीही एक गोष्ट स्पष्ट केली, की मायबोलीवर त्यांचे शाब्दिक युद्ध चालूच राहील. Thats business. This was just pleasure! तेव्हा कुठे सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि तंबीकडे पुढच्या डीशची ऑर्डर दिली.

'समरप्रसंगा' नंतरः
इतका वेळ सूर्यासम तेजस्वी मा. झक्कींसमोर आम्ही सर्व काजवे झालो होतो. क्रि.प्रे फारेंडाने त्याच वेळी झिपलॉकमधून पेशल अमेरिकी चॉकलेटं बाहेर काढली आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले. पण त्याचा चॉकलेटांचा अंदाज चुकला. ती फारच अपुरी पडली. त्याचे परिमार्जन म्हणून तो सगळ्यांना जेवायला नेईल असे त्याने वचन दिले. पण फारेंडा(कडे)चे लग्न असूनही मायबोलीच्या प्रेमाखातर तो बायकोचा अनुल्लेख करून आला, म्हणून त्याचे विशेष कौतुक (फक्त कौतुकच बरं, पार्टी माफ नाहीये, प्लीज नोट). त्याने बे एरिया जीटीजीबद्दल सांगायचा प्रयत्न केला; पण त्या जीटीजींना असलेली उपस्थिती आणि काल असलेली उपस्थिती याचा तौलनिक अभ्यास करता, त्या जीटीजींना जीटीजी म्हणू नये असे तोच म्हणाला.

आदमाने त्याच्या (म्हणे) सुवाच्य अक्षरात झक्कींना उपस्थितांची यादी करून दिली.

चिनूक्साला 'चिनू' म्हटलं की ऐकायला येत नाही. 'तंबी' म्हटलं तरी चालतं.

हूड आणि झक्की तहाची मुख्य अट अशी होती की हूडाने झक्कींना न्यूजर्सी स्थित सचिन_बी आणि माणूस यांच्यासाठी विवाहासाठी सुयोग्य स्थळं पहायला मदत करायची. परंतू पुण्यातच चिनूक्स, अरभाट (या दोघांनी उभं राहून.....), आदम, टण्या आणि देवदत्तजी असे इच्छुक असल्याने सचिन_बी आणि माणूस यांच्यासाठी झक्कींनी पाहिलेली सर्व स्थळं इकडेच ट्रान्स्फर झाली. सॉरी सचिन, माणसा, योग नाही सध्या तुम्हाला Proud

हूडाने सर्वांना नाशकाला यायचे सस्नेह आमंत्रण दिले. इथे मीन्वाज्जींना एक कविशंका Lol आली. पण ती हास्याच्या धबधब्यात विरली.

काशी आणि उत्तरकाशी यांनी सिंगापूराची आठवण काढली आणि पाखरांच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या. टण्या जागच्याजागी हलला (सर्व अर्थी) Proud

आशू सुगरण. तिला पोळ्या येतात. पण एरवी व्यस्त असल्याने त्या करता येत नाहीत. ही सुगरण कुचंबणा दूर करण्यासाठी ती लवकरच घरी गेली.

मा. झक्की आणि साजिरा तेवढ्यात झक्कींच्या घरी जाऊन झक्कींच्या घराचे आणि मुलगी-जावई यांचे फोटो घेऊन आले.

झक्कींनी समारोपाचे भाषण केले. पुणेकरांना नावं ठेवत असल्याची जाहीर माफी मागितली, आणि त्यांच्याकडे आबूदोस आहे हेही मान्य केले. सर्वांनी सिनेमे अवश्य पहावेत, आणि ते पहाताना वेशभूषेकडे आवर्जून लक्ष द्यावे हेही सांगितले. तसंच सर्व अविवाहित मायबोलीकरांनी लवकरात लवकर शुभमंगल करावे. 'आम्ही एकट्यानेच किती दिवस 'सफर' करायचे? तुम्ही आमचे 'हमसफर' बना' हेही केप्याच्या फाकोचा आधार घेत सांगितले. तसेच विवाहासाठी शक्यतो मायबोलीकरीण नको, बाहेरची मुलगी पहा, हा सल्लाही दिला. तिला नंतर माबोकरीण करून घेता येईल. यायोगे मायबोलीचा टीआरपीही वाढतो, हेही सांगून एक अ‍ॅडमिन कामही केले.

टण्याची दुचाकी पोलिसांनी उचलली.

अश्या रीतीने एक सुंदर एवेएठि सुफळ संपूर्ण झाला. चिनूक्साच्या माणसं जोडायच्या कौशल्यामुळेच इतके सगळे लोक एकत्र येऊ शकले. तसेच, वाडेश्वराचा आयत्या वेळी कोप झाल्यानंतर गडबडून न जाता फटाफट निर्णय घेत वैशालीमध्ये स्थलांतर करण्याचे ठरवून, लोकांना तसे कळवून, तसेच वैशालीमध्येही सर्वांची जातीने व्यवस्था बघितली याबद्दल चिनूक्स आणि अरभाटाचे विशेष आभार. (ही मुलं खरंच गुणी आहेत (आणि 'उभीही' आहेत बरंका ;)))

**************************

तटी: सगळ्यांना भेटून फार आनंद झाला. प्रत्यक्ष भेटी झाल्या की अनेक गैरसमज दूर होतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तरी, या वृत्तांतात जे लिहीले आहे, ते सर्वांनीच हलकेच घ्यावे. वृत्तांत लिहीताना सर्वच जण थोडे स्वातंत्र्य घेतात, त्यामुळे काही जागी विनोदासाठी अतिशयोक्ति झाली/ केली आहे, हे सर्वांनीच (एवेएठिला उपस्थित असलेल्या आणि केवळ वाचक असलेल्यांनीही) लक्षात घ्यावे, व वाद टाळावे. चूभूद्याघ्या.
इतिउप्पर काही शंका असल्यास, पुढच्या एवेएठिला भेटावे Happy
-----------------------------------
Its all in your mind!

कविशंका > Lol
छान वृत्तांत पूनम Happy
-----------------------------------------
सह्हीच !

वैनी, वृत्तांत वाचून प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही... उपस्थित होतो असे वाटले.. एकदम झकास वृत्तांत...
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...

हिम्याला अनुमोदन Happy ... वैनी शब्द सोडून Happy

    -------
    स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
    स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

      मस्त वृत्तांत. Lol

      एकदोन अतिशय महत्वाच्या गोष्टी राहील्या आहेत त्यापण कुणीतरी लिहा बरे. उदा: लिंब्यानी दरवेळीप्रमाणे वाटाण्याच्या अक्षता न लावता लिंबीच्या शेतातील तांदुळ काही ठराविक माबोकरांना गॅसवितरकासारखे चोरुन वाटले. (नाणी मिळतील अशी दुबळी आशा असल्याने मला पण त्यात सामील करुन घेतले.) जीएसने झक्कीन्ना एखाद्या प्रधानमंत्र्याने द्यावी तशी तारीख व वेळांचे संदभ्र देऊन रॉबीनचे व झ़क्कींचे एकमेकांविषयीचे वक्तव्य, भारतिय वेशभुषाकार व वेशभुषाविशयीचे मत. सिंगापूरच्या आठवणी निघताच उत्तरकाशीचे झालेले 'मन पाखरु पाखरु', मीनूने बारीक होण्याकरता केलेला साल्सा व त्याचे दुष्परीणाम, मंदीमुळे रंपाऐवजी चहा व क्रिमरोलने बुधवार साजीरा व्हावा अशी केलेली फर्माईश ऐकोन साजीर्‍याचा काळानिळा झालेला चेहरा इत्यादी नोंदी गहाळ झाल्या आहेत. Happy लिंब्याने दिलेला धक्का हा फार धक्कादायक नव्हता कारण जमलेल्या ४०% लोकांना माहीतच होते. एखाद्या धक्क्याचे स्वागत होऊन एक प्रकारे विरोधाभासच झाला. नेहेमीप्रमाणे पानभर स्वगते लिहीणारा लिंब्या जीटीजीला मात्र नेहेमीप्रमाणेच चिडीचूप होता. टण्याशास्त्री मात्र मूग (काहीतरी गिळुन आल्यासारखे वाटले म्हणुन मूग) गिळुन आल्यासारखे गप्प होते.

      वा .... फार काही मिसलय हे जाणवतय.
      मस्त लिहीला आहे वृत्तांत.
      === I m not miles away ... but just a mail away ===

      >>>> नाणी मिळतील अशी दुबळी आशा असल्याने Angry अपमान.... घोर अपमान, आशेचा (आशूचा नव्हे) घोर अपमान!
      तुजकडील नाणी मिळण्याची जी आशा मी गेली सतत अकरा/बारा वर्षे ठेऊन आहे तिला "दुबळी आशा" अस म्हणवत तरी कस तुला?????? Proud
      मला अजुनही आशा आहे की तू अजुनही दोन चार वेगळे देश हिन्डून तिथली नाणी माझ्याकरता आणशील! Happy
      ...;
      आपला, लिम्बुटिम्बु

      मस्तच गं.. अगदी जीटीजी इतकाच!
      आशू सुगरण. >> Rofl माझ्या नवर्‍याने वाचले तर माझे मायबोलीवर येणे बंद करील तो नसत्या गैरसमजांना आळा घालण्यासाठी! Lol
      ----------------------
      इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर हो ना..

      सहीये ! छान लिहिला आहे वृत्तांत Happy
      >>> 'तुम्ही झक्की, म्हणजेच रॉबिनहूड' Rofl
      >>> सिंगापूरच्या आठवणी निघताच उत्तरकाशीचे झालेले 'मन पाखरु पाखरु' मीनूने बारीक होण्याकरता केलेला साल्सा
      केपी, योग्य ठिकाणी स्वल्पविराम टाक रे. मला वाटलं, टण्याला मीनूने बारीक होण्याकरता साल्सा दिला. (की खरंच तसंच झालं ? :))

        ***
        Entropy : It isn't what it used to be.

        माझे मायबोलीवर येणे बंद करील तो > आणि तू करु देशील ?? Proud

        आदमाने त्याच्या (म्हणे) सुवाच्य अक्षरात झक्कींना उपस्थितांची यादी करून दिली. > आदमा इथेही टाकता येइल का रे यादी ?? Happy
        -----------------------------------------
        सह्हीच !

        सही वृत्तांत गं वहिनी... यापुढच्या पुण्यातल्या सर्व जीटीजींची तूच आता अधिकृत वृत्तांत लेखिका ..:)

        मस्त वृत्तांत पूनम...खरंच तिथे उपस्थित असल्यासारखं वाटलं वाचुन. Happy

        *****************
        सुमेधा पुनकर Happy
        *****************

        लिंब्या पुण्यात येशील तेव्हा सांग. तुला खरच नाणी देतो.

        स्लार्ट्या, त्यापेक्षा उपस्थित राहीला असतास तर या.दे.या.डो. बघायला पण मिळाला असता. Happy

        उपस्थित माबोकर्स :
        प्र. पाहुणे : झक्की, फारेंड, रॉबीनहुड, काशी व उत्तरकाशी (अर्थात मिस्टर काशी)
        स्वागतोस्तुक : चिनुक्ष, साजीरा, आरभाट
        काडीराम : जीएस
        धक्कातंत्र : एलट्या
        पा. कलाकार : एलट्याची ईडलिंबी थोरली
        इतर : मयुरेश, रुमा, यश व मिसेस यश, आर्फी, आशुंड्स्कोर्डी, टण्या, पूनम, मीनू, आदम, ईट्स मी आरती, देवदत्त आणी दस्तुरखुद्द
        बालकलाकार : नचिकेत (उर्फ यज्ञेश) व सिध्दार्थ

        यापुढच्या पुण्यातल्या सर्व जीटीजींची तूच आता अधिकृत वृत्तांत लेखिका .. >> झालं, कार्यभार दुसर्‍यांच्या खांद्यावर टाकणे हे (एकच) कार्याध्यक्षांचे काम चोख बजावतात आपले कार्याध्यक्ष! Proud
        ----------------------
        इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर हो ना..

        पूनम एवेएठी असं हवं ना गं ते.. एविएठी मी एवितेवी उठाठेवी असं कायतरी वाचतेय.
        लिंब्या हे बाकी चांगलं केलं नाहीस हं तू.. मला पण तांदूळ पाहिजे. आधीच सांगून ठेवतेय.
        झक्की आणि रॉबिन माझ्या मैत्रिणीसाठी पण एक चांगला मुलगा शोधा बरं तुम्हाला दोघांना आत्ताच तीची माहिती मेल करते. चिनू क्स तू जरा मला या दोघांचा ईमेल आयडी दे ना पटकन.
        ~~~~~~~~~

        ..

        पूनमने मला तीने लिहिलेला वृत्तांत मस्त आहे असं म्हणायला सांगीतलं आहे. म्हणुन मी म्हणते

        मस्त वृत्तांत आहे . Proud

        ~~~~~~~~~

        Lol सही लिहिलाय वृत्तांत..

        पूनम, "त्या" वृत्तांताचा बदला घेतलास ना लगेच ह्या वृत्तांतात.. Happy

        पार्श्वभूमि
        फेब्रुवारी महिन्यात कुणाच्यातरी विचारपुशीत झक्कीन्ची पोस्ट वाचली की ते म्हणे "लिम्बुटिम्बुला" ८ मार्चला बालगन्धर्वला भेटणार!
        मी थोडा सटपटलोच! अहो मागे २००५ साली असेच जाहिर करुन त्यान्ना भेटलेलो, पण तेव्हा फक्त ते अन मी असे दोघेच हिन्जवडीतल्या हॉटेल तमन्ना मधे भेटणार होतो, अन पुण्यापासून हिन्जवडीत तेव्हान्च्या त्या खड्डेभरल्या रस्त्याने कोण जासुसगिरी करत येणार नाही याची खात्री असल्याने मी निश्चिन्त होतो
        पण आत्ता तसे नव्हते! बालगन्धर्व हे सगळ्यान्च्याच आवाक्यातले ठिकाण होते.
        काय करावे याची निश्चिती होत नव्हती, शेवटी लिम्बीला विचारुन घेतले अन झक्कीन्च्या मेलला उत्तर पाठवले की तुम्ही या, आपण तिथे भेटूच! म्हणल काय होईल ते जाईल - हाय काय अन नाय काय
        झक्कीन्ना माझे दोन्ही फोन नम्बर कळवुन त्यातिल एक नम्बर सध्या बन्द आहे व त्यामुळे दुसरा मोबाईल घरीच ठेवलेला असो हे देखिल कळवले. कसे काय माहित, पण झक्कीनी मला केलेले फोन, एकतर मोबाईल न उचलल्यामुळे दुर्लक्षिले गेले (बहुधा लिम्बी झोपली असावी दुपारची) किन्वा थोरल्याने किन्वा थोरलीने फोन घेतलाच असेल तर "तसल्या मिस्ड कॉल्स्पैकी" असेल म्हणून सरळ कट करुन टाकला असेल! काय झाल ते झाल पण शेवटपर्यन्त माझा नि झक्कीन्चा सम्पर्क झाला नाही!
        त्याचवेळेस चिनुक्स च्या घोषणाबाजीतून आकलन झाले की त्याच दिवशी त्याच वेळी फारेण्ड करता वाडेश्वर येथे जीटीजी ठेवले जात आहे! म्हणले, हे भले शाब्बास! (सुन्ठी वाचून......) सगळी जन्ता तिकडे जाईल अन आम्ही गपगुमान इकडे बालगन्धर्वला भेटून घेऊ, हव तर झक्कीन्ना पोचवु नन्तर वाडेश्वरच्या बाहेर!
        पण असे होणे नव्हते! कस काय ठाऊक, झक्कीन्चा चिनुक्स अ‍ॅण्ड मण्डळीन्शी सम्पर्क झाला, बरीच फोनाफोनी झाली, मलाही जीएस, इट्स्_मी, दिपुर्झा यान्चे फोन आले व वाडेश्वरचे नक्की झाल्याचे कळले! दिप्याकडून चिनुक्स चा नम्बर मिळाल्यावर चिनुक्सला आशू, आयटी इत्यादिन्ना हा प्लॅन कळवण्याची खबरदारी घेण्याबद्दल सान्गितले!
        या सर्व गोन्धळात माझा आधीचा प्लॅन बारगळला! जर बालगन्धर्वच फिक्स राहिले अस्ते तर मी करणार असलेल्या वेशभुषेमुळे झक्की देखिल मला ओळखू शकले नस्ते इतकी माझी खात्री होती! पण असो.

        पूर्वतयारी
        नेहेमीप्रमाणेच, मी ठरवित असलेल्या कोणत्याही कामास आडकाठी कशी काय होत नाही, हे दाखवुन देण्यास की काय, ८ मार्चची सकाळ उजाडली तिच विषण्ण करणार्‍या एका घटनेने
        काय झाल होत की चार पाच दिवसान्पुर्वी धाकटीने कुठूनसे एक मान्जरीचे पिल्लू पिशवीत घालुन आणले होते! ते फारसे माणसाळलेले नसल्यामूळे एकटे एकटेच घराबाहेर रहात होते
        रविवारी सकाळी उठून दरवाजा उघडला तर अन्गणात ते पिल्लू मरुन पडलेले पाहिले! बोक्याने मारले होते, परसात गेलो तर तिथे, जिथे ते पिल्लु बसायचे तेथिल जिन्याखालील सामान अस्ताव्यस्त पडलेले. रानगट बोक्याची नि पिल्लाची बरीच धुमश्चक्री झाल्याचे ते दृष्य अन्गावर काटे आणित होते! धाकटीला उठवायचे की नाही, तिला दाखवायचे की नाही अशा सम्भ्रमात लिम्बी होती पण धाकटीने हे सहन केलेच पाहिजे असे तिला सान्गुन धाकटीला उठवुन ते सर्व दाखविले! तिच्या कडून एक खोके घेवुन त्यात त्या पिल्लाचा देह ठेवुन तिलाच ते टाकून यायला सान्गितले! ती आणि थोरली ते किर्याकर्म उरकुन आल्या

        अजुन मला कोणती गाडी नेता येईल याची निश्चिती नव्हती तर लिम्बीने तिच्या भावाकडून बाईक मिळवुन दिली, थोरलिच्या मागे हात धुवुन लागलो, तिला तयार केले व बाईक आणायला गेलो, तिथुन परस्पर पुण्याकडे निघालो, तोवर तब्बल आठ वाजलेले!
        झक्की बरोबर म्हणजे बरोब्बर साडेआठला वाडेश्वरला हजर होतिल अन मी वेळेत पोचलो नाही तर पुन्हा पुढच्यावेळी भेटेस्तोवर कायम "इन्डियन टाईम" बाबत ऐकुन घ्यावे लागेल या भिती पोटी वाटेत पेट्रोल भरण्यात वेळ घालवुनही मी बाईक अशी काही वेगात चालवली की खडकी बझार येथे डायव्हर्शन असुन सुद्धा बरोब्बर साडेआठला वाडेश्वरच्या दारात हजर झालो! Happy
        गाडी चालविताना देखिल, थोड्याच वेळापूर्वी उचलुन टाकलेल्या त्या कोवळ्या पिल्लाचा देह काही नजरेसमोरुन हटत नव्हता! मनात विचार की हा असला कसला अपशकुन??? पुढील सन्कटान्ची ही पूर्वसूचना तर नाही???

        वाडेश्वर
        थोरलीला सकाळच्या डेक्कनजिमखान्यावरील हे वातावरण अनोखे होते!
        सकाळी उठून फिरायला जाणारी माणसे ती इकडे पण बघते, पण फिरुन झाल्यावर रुपाली वैशाली आम्रपाली वाडेश्वर इत्यादी हॉटेलात गर्दी केलेली ती पुणेरी पेन्शनरान्ची आणि सजल्याधजल्या नीट आवरलेल्या तरुणतरुणीन्ची झुम्बड पाहून ती काहीशी आश्चर्य चकीत झाली होती! वाडेश्वरच्या पार्किन्गमधे नीटपणे बाईक लावली व आत शिरलो
        पुढील भागातच आमचे २००३ मधिल एक्स एचआर मॅनेजर दिसले, त्यान्ना नमस्कार केला, थोड्याफार ख्यालीखुशालीच्या गप्पा मारुन निघणार, तोच त्यान्नी प्रश्ण विचारला,
        काहो? अजुनही तिथेच आहात का??
        आयला! म्हणजे?? मनातल्या मनात बोल्लो, अहो त्या सलग दोन तीन वर्षातल्या तुम्हीच बनविलेल्या रिमुव्हलच्या लिस्टान्मधे मधे माझे नाव असुनही तगलो, आता तुम्ही नाहीत, पण मी अजुनही आहेच बर का तिथ!
        उघड येवढेच बोल्लो की अहो आता या वयात जॉब प्रोफाईल कस काय बरे बदलणार? तसेही आम्ही टाईमबार झालोत! एनिवे
        अजुन एका कटू आठवणीन्चा कडू घोट तसाच गिळीत आतिल बाजुकडे निघालो
        पहिल्यान्दाच वाडेश्वर मधे येत असल्याने तिथल्या बैठकव्यवस्थेचे व उपस्थितान्चे बारकाईने निरीक्षण करीत पुढे झालो तर एका हॉलच्या दाराशीच एका तरुणाने अडविले
        तुम्ही जयन्त का?
        हो,
        मी चिनुक्स, त्या तरुणाने ओळख करुन दिली, मोठ्या प्रेमभराने हात हातात घेवुन दाबला व आत मध्ये झक्की जिथे बसले होते तिथे घेवुन गेला!
        झक्की दिसल्यावर मग काय म्हणता? आधी मला शन्का होती की दस्तुरखुद्द झक्कीच माझा कात्रज तर करणार नाहीत ना? पण नाही, ते समोर याची देही हजर होते!
        त्यान्च्याबरोबर जिवाभावाच्या गप्पा झाल्या, चार वर्शान्पुर्वीच्या आठवणी निघाल्या, थोरलीची, जिने मागिल वेळेस त्यान्ना तिच्या शाळेत शाळा दाखवायला नेऊन, तिच्या मुख्याध्यापिकेला भेटायला लावुन बहुधा मागिल जन्माचा सूड उगविला होता, Proud तिची त्यान्नी मोठ्या प्रेमाने विचारपुस केली, आता गाडी चालवितेस का, लायसन काढले का वगैरे विचारले! Happy
        तोवर, मयुरेश, रुमा, यशवर्धन इत्यादी बरेच जण येवुन ओळख करुवून गेले, मला सगळ्यान्चीच नावे आठवत नाहीत त्याबद्दल क्षमस्व!
        अचानक कुणीतरी म्हणले "चला चला"
        झक्की विचारतात " हे काय? झाले जीटीजी???"
        मी आपल ठोकून दिल, नाही हो, नसेल बहुधा, दुसरीकडे जायचे असेल! Happy
        तिथुन आम्हि उठलो व वैशालीकडे जायचे आहे असे समजल्यावर तिकडे निघालो
        आता वाडेश्वर बाहेर लावलेल्या बाईकचे काय करायचे हा मोठा प्रश्ण होता! बाईक तेथुन काढून तिकडे न्यावी तर तिथे जागा मिळेलच याची खात्री नव्हती, पण वाडेश्वरच्या स्वतःच्या पार्किन्गमधे गाडी लावुन हादडायला मात्र वैशालित जाणे हे नैतिकदृष्ट्या पटत नव्हते, तरीही पार्किन्गच्या गरजेने मात केल्यामुळे निगरगट्टपणे गाड्या तेथेच ठेवुन वैशालिकडे निघालो
        मला वाटते की मयुरेशची गाडी देखिल तिथेच असावी
        वाडेश्वर ते वैशाली केव्हडेसे अन्तर? पण सुसन्कृत पुण्यातील उच्चभ्रु डेक्कनजिमखान्यातील या प्रमुख रस्त्यावरील गलिच्छता लाज आणत होती! जागोजागी कचर्‍याचे व बान्धकामाच्या सामानाचे ढीग, इतस्ततः थुन्कल्याच्या निशाण्या, सकाळी फिरावयास आणलेल्या पाळीव कुत्र्यान्नी केलेले विधी, हॉटेलचा कचरा गोळा करण्यास आलेला ट्रक, इत्यादिन मधुन वाट काढत काढत वैशाली जवळ पोहोचलो!
        हा सर्ववेळ झक्कीन्नी नाकाचा रुमाल काढण्याचे धाडस केले नव्हते! असो

        क्रमशः
        ...;
        आपला, लिम्बुटिम्बु

        अबे कांद्या,परवा फोन केलेलास तेव्हा सांगितले नाहीस मला जीटीजीचे! बाकी भरपूर मजा आलेली दिसतेय... मला न बोलवताच गेल्याबद्दल जीएस्साचा जाहीर निषेध! Happy
        _________________________
        -Impossible is often untried.

        पूनम मस्त वृत्तांत
        परत कालची मजा अनुभवली..
        केपी >>>सिंगापूरच्या आठवणी निघताच उत्तरकाशीचे झालेले 'मन पाखरु पाखरु', >>>> Happy

        वैनी : वृतांत नेहमीप्रमाणेच सुरेख ............ Happy

        ~~~~~~~~~~~~~~
        काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
        मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे

        अरेव्वा! वृत्तांत इतका धम्माल आहे तर प्रत्यक्षात काय मज्जा आली असेल !

        अरे व्वा पुणेकरांनी जोरदार एवेएठि केला...

        आरभट, चिनुक्स अभिनंदन Happy कार्याधक्षांची काळजी ( वाढविल्याबद्दल ) कमी केल्याबद्दल Happy
        साजिरा क्षणचित्रे फारच ऐतिहासीक आहेत... जमल्यास Pvt. अल्बम बनवून शेअर कर... :p

        पुनमचा अधिकृत वृत्तांत उत्तम...

        आणखी दोन - चार खुसखुशीत वृत्तांत आल्या शिवाय पोट भरणार नाही... Happy

        इंद्रा : कार्याध्यक्ष हा शब्द लिही बघू १० वेळा ................ Happy

        ~~~~~~~~~~~~~~
        काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
        मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे

        Pages