भरतभेट अर्थात पुण्यात झालेले एवेएठि

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

श्री. रॉबिनहूड व श्री. झक्की या दोन परममित्रांची भेट काल घडून आली. अनेक पुणेकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते. या निर्मळ आनंदाच्या क्षणांत आपल्यालाही सहभागी होता यावे, म्हणून ही प्रकाशचित्रे..

SA.jpgSA2.jpg

विषय: 

साहित्य संमेलना सारखं. गुलमोहर संमेलन + एवीऐठी.

बरं फोटो एवढेच आहेत का? नाव, याद्या कोण टाकणार आहे. जरा सुव्वाच अक्षरात येतील का?

(माझी खात्री आहे की असा बाफ जर काढला तर दोन पाच लोक पोटतिडकीने लिहीतील करा म्हणून.)

साहित्य संमेलना सारखं. गुलमोहर संमेलन + एवीऐठी >>

मग तिथेही वाद सुरू होतील की ते भारतात करावं की बा. रा. त करावं...

झक्की आणि रॉबिनहुड मुखपृष्ठावर झळकले मायबोलीच्या, बरच टी आर पी मिळवलेल् दिसतय ! Proud

बरं फोटो एवढेच आहेत का? नाव, याद्या कोण टाकणार आहे. जरा सुव्वाच अक्षरात येतील का?

>>>>>

केदार काही आणखी फोटो मी माझ्या PRAKASH THUBE या ऑर्कुट च्या पानावर टाकले आहेत ते तू पाहिले असशील . कारण बर्‍याच प्राण्यांची पावले(लेंड्या)माझ्या त्या पानावर मला दिसत आहेत. त्यावरून कोण कोण येऊन गेले ते कळले.ते आणि इतर सज्जनानी इथे टाकलेले एवढेच.

सुव्वाच हा शब्द 'सुवाच्य' असा लिहितात. आता तूच सुव्वाच हा शब्द चुकीचा लिहिल्यावर कोणीच सुवाच्य लिहिणार नाहीत उलट सुव्वाच लिहितील.

बाय द वे(त्या वाटेने निघालोच आहोत तर) मला असे विचारायचे आहे की, या जीटीजीची एक व्हिडिओ क्लिप मी 'तू नळी' (यू ट्यूब)वर 'वर चढविली '(अपलोड)आहे. पण ती सर्चला येत नाही कारण बहुधा ती माझ्या वैयक्तिक अकाउन्ट मध्ये उर्ध्वचढित झाली आहे.मात्र हितगुज दिवाळी अंकातील काही बाबी आणि वासुदेव नृत्य वगैरेच्या क्लिप्स तिथे सगळ्यांच्या पाहणीसाठी उपलब्ध आहेत ... हे कसे करतात ते कळवावे .माझ्याकडे ३ क्लिप्स आहेत....

अरे हो ते पाहिले आहेत. (ठसे सोडले आहेतच) Happy
सुवाच्य. सुवाच्य. सुवाच्य.

बहुतेक तो प्रायव्हेट झाला आहे. अपलोड करताना हे ऑप्शन येते. आणि व्हिडीओ अपलोड केल्यावर, उजव्या बाजूला URL येते, ते दिले की झाले.

व्वा, मज्जा केलेली दिसते आहे लोकांनी , पुढच्या वेळी नवर्‍याला घेउन नक्की येइल. कुठे ठरेल ते फक्त मला इ मेल करुन सांगा प्लीज Happy madhurani.shastri@gmail.com वर .

व्वा, मज्जा केलेली दिसते आहे लोकांनी , पुढच्या वेळी नवर्‍याला घेउन नक्की येइल.
>>>>
अहो मधुराणी. मायबोलीकरणींचे नवरे जीटीजीला आल्यास त्यांची फार शोचनीय स्थिती होते हो!(ते स्वतः मायबोलिकर नसतील तर). भेटा अगर लिहा :- उत्तर काशी. इन्ग्लन्डच्या राणीचा नवरा कोण तो ड्यूक का कायसासा , तो जसा खुळ्यासारखा राणीबरोबर --बरोबर कुठला-- राणीमागोमाग फिरत असतो तसे होते. विशेषतः रमी, बीअर ,झोप, सिगरेट, अशा 'भरल्या ताटावरून' उठवून आणल्यावर अधिकच खुळा होतो तो.

रॉबिना, माझ्याइथे ऑर्कुट अन युट्युब, दोन्हीही बॅन आहेत
मला इमेल वर पाठव बघु सगळे फोटो अन क्लिप! limbutimbu85@gmail.com
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिम्ब्या तुला इदाची सुटी नाही काय? तोबा तोबा!! (किंवा शिव शिव!!)

रॉबिन,ऑरकुटवरचे फोटो छान आलेत... फोटो पाहुन पुन्हा आठवणी ताज्या झाल्या..:)

फोटो पाहुन पुन्हा आठवणी ताज्या झाल्या >>
एवढ्यात जीटीजी आठवणीत जाऊन पुन्हा ताज्या होण्याइतपत जुना झाला? मला तर अगदी परवा सकाळी घडल्यासारखं वाटतंय सगळं! Proud
----------------------
इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर हो ना..

ऑर्कुट आणि युट्युब ची लिंक द्या की!

हा झाला लढतीचा शेवट.....

CAAHI3IX.jpg

निकलना खुल्द से आदम का सुनते आये है लेकिन,
बहोत बेआबरू होकर तेरे कूचेसे हम निकले ..... Proud
--- मिर्झा झक्कीयुद्दीन

CA2FOTAF_0.jpg

भाग्या , ऑर्कुट् वर PRAKASH THUBE या माझ्या पेजला सर्च दे . तिथे 'फोटो' या लिंकवर जा...

मिर्ज़ा गालिबचा शेर मिर्झा झक्कीच्या नावाने? सोबत खाली कार्टुन. मग वरचा हसणारा फोटो सुरवातीलाच काढला होता का?

झकास वृत्तांत, मस्त वाटलं वाचून...

--- मिर्झा झक्कीयुद्दीन Happy

मस्त झाले GTG, मजा आली.

आयला, टण्याला बघितल्यावर मी दचकलोच होतो!
आमच्या झकासरावाला थोडी पावडर फासून लावली की त्याचा टण्या होतो हे नव्हते माहीत मला! Lol

पूर्वी बघितलेल्यान्पैकी काही जणीन्नी "डाएटचे" फारच मनावर घेतल्याचे जाणवले! Happy उदाहरणार्थ....... जाऊदे!
अन पूर्वी बघितलेल्या चवळीच्या शेन्गा आता चान्गल्या जाडजूड काकड्या झाल्याचे लक्षात आले! Proud

एक पीन रॉबिनला मारली नाशिक बद्दल! अन मग काय? चारपाच जणान्चा शेप्रेट कम्पु बनुन नाशिक या विषयावर महत्वाची चर्चा करू लागला! अर्थात काकदृष्टितून हे सुटले नाहीच! Lol

तरी बर, टण्याने भावेस्कुलचा विषय काढला होता, आम्हि फारसा वाढवला नाही, नाहीतर वनथर्ड मेम्बर "भावेस्कुल" या एका विषयावर वेगळा कम्पु करुन बसले अस्ते

वैशालीत इडलीसाम्बार मागितल्यावर, इडली सुट्टी अन साम्बार वेगळे देतात हे माहित नव्हते! मी आपली मोठ्ठ्या बाऊलमधे साम्बारात आकण्ठ डुबवलेल्या इडल्यान्ची वाट बघत बसलो होतो. सगळ्यान्ची खाणी सुरू झाली तरी माझ्यासमोर काहीच नाही! शेवटी टाईमपास म्हणून थोरलीच्या डिश मधुन उपमा चाखू लागलो! (नशिब, मी तसे घेताना ती घरच्या सारखी एकदम किन्चाळली नाही)
शेवटी कुणाच्या तरी लक्षात आले की लिम्ब्या रिकामाच बसला हे, तेव्हा टेबलवर शोधल्यावर एक इडलीसाम्बाराची अनाथ डिश आढळल्यावर मी तातडीने तिचा ताबा घेतला

फारेण्डची, बिचार्‍याची भिजल्या मान्जरागत अवस्था झाली होती! झक्की अन रॉबिनच्या टीआरपी पुढे त्याने आणलेल्या चॉकलेट्स्चा निभाव न लागता ती पाल्यापाचोळ्याप्रमाणे विरुन गेली!

आर्फीला "तसा उभारलेला" बघितल्यावर मला माझ्या कॉलेजजीवनाची आठवण झाली! Proud

"लिम्बू"(अन) टिम्बू" या आयडीला प्रत्युत्तर म्हणून की काय, कुणी तरी गनिमी काव्याने नेमके माझ्यासमोरच दोन लहान गोन्डस लिम्बू अन टिम्बु बालकान्ना बसवले होते! Proud

कान्द्या अन अजुन कोणितरी मधेच माझ्या शेन्डीला लटकायचा प्रयत्न करुन पाहीला, पण त्यान्ना ते जमले नाही

या जीटीजीतली सगळ्यात महत्वाची घटना कोणती असे विचाराल तर सर्वकाळ असे जाणवत होते की आधीच्या पिढीतल्या कार्याध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, अध्यक्ष, टिकाकार इत्यादी मण्डळीन्ना "रिटायर" करवुन नव्या दमाच्या पुढच्या पिढीने जसे की चिनुक्स, अरभाट, टण्या, साजिरा (इत्यादी), सर्व भार उचलला होता. हा बदल स्वागतार्हच आहे, नाही का???

जर या जीटीजी ची जाहिरात आगोदरपासून नीटपणे करता आली असती तर पुण्यातले अजुन दहापन्धरा मायबोलीकर तरी नक्कीच उपस्थित राहिले अस्ते असे वाटते! (सन्दर्भ वरील गिर्‍याची पोस्ट)

मला आठवते त्याप्रमाणे मिनू थोडी उशिरा आली, तिला आलेली बघितल्या बघितल्या थोरली कानात कुजबुजुली "आता या कोण आणखी?" Proud मी हळूच तिला सान्गितले की ती "मिनू" आहे

वाडेश्वर मधे असताना बहुधा रुमाचा स्कार्फ की ओढणी की रुमाल, कायसेसे राहिले होते, कुणीतरी ते थोरलीच्या हातात दिले, ते घेवुन ती बाहेर उभ्या असलेल्या मायबोलिकरणीन्कडे गेली व म्हणू लागली "अहो काकू, हे तुमचे राहिले आहे का?"
तिने "काकू" असा शब्द उच्चारताच धरणीकम्प झाल्याप्रमाणे वाटून मला माझ्या पायाखालची भुमी थरथरत असल्याचा भास झाला! मी थोरली ला म्हणले देखिल... अग अग, काकू काय म्हणतेस???
त्या "काकू" बनलेल्या मायबोलीकरणीन्चे चेहरे बघायचे धाडस माझ्यात नव्हते!

तेवढ्यातल्या तेवढ्यात मला वाटते की मी तीन कॅमेरे वापरुन फोटो काढले, रॉबिनने देखिल त्याचा कॅमेरा माझ्याकडे दिला होता!

आर्फी, टंण्या (आणि बहुधा अडम, साजिरा, अरभाट), इत्यादीक बरीच तरुण मण्डळी जागा सोडून अधुनमधुन "उभी रहात होत".
त्यान्चे समजण्यासारखे आहे! पण हा कान्द्या का मधेमधेच इकडेतिकडे फिरत होता???? Proud कळले नाही बोवा

झक्कीन्च्या समोरच एक प्रख्यात विदुषी (पक्षी विद्वान लेखिका) बसल्या होत्या असे पुसटसे आठवते, मात्र त्यान्च्याशी वार्तालाप करण्याचा वा त्यान्चा ऑटोग्राफ घेण्याचा योग आला नाही!
त्यान्च्या बिझी रहाण्यामागचे, सकाळी सकाळी भुकेल्या पोटी डोसा अधिक इडलीचटणि हे पहिले कारण असावे, Lol दुसरी कारणे त्यान्नाच विचारायला हवित

माझ्या समोर काही काळ मायबोलीच्या एक प्रसिद्ध मॉडरेटर बसलेल्या होत्या! माझ्या पहाण्याप्रमाणे त्यान्चे सर्व घडामोडीन्वर, स्वतः फारस न बोलता, "बारकाईने" लक्ष होते!

झक्कीन्ना बघितल्यावर रॉबिनच्या चेहर्‍यावर उमटलेले निराशेचे तवन्ग मला तरी अगदी स्पष्ट पणे दिसले!
या तवन्गान्ची तुलना, आयुष्याची उणीपुरी पन्चवीसतीस वर्षे महाराष्ट्रात घालवूनही हाती काहीच न लागलेल्या औरन्गजेबाच्या चेहर्‍याशीच होऊ शकतील.
गेली पाचसहा वर्षे सलगपणे ज्या "महान झक्कीन्ची" कुरापत काढण्याची एकही सन्धी सोडली नाही, त्या झक्कीन्ची येवढीश्शी "लहान मूर्ति" बघुन रॉबिनला हा हन्त हन्त वाटले नसेल तरच नवल!

असो, आजचा शिमग्याचा मुहुर्त साधून ही आपली माझी निरीक्षणे मान्डली, बर का! चु. भु. द्या. घ्या. Happy
...;
आपला, लिम्बुटिम्बु

रॉबिन, ते निकलना खुल्द से आदम का पेक्षा, झक्कींना बघून तुम्हाला खालचा शेर जास्त पर्फेक्ट बसेलः
भरम खुल जाये झालिम तेरे कामत की दराझी का
अगर इस तुर्रा-ए-पुर् पेच-ओ-खम का पेच-ओ-खम निकले

Lol लिंब्या, हा वृत्तांत झकास.

या तवन्गान्ची तुलना, आयुष्याची उणीपुरी पन्चवीसतीस वर्षे महाराष्ट्रात घालवूनही हाती काहीच न लागलेल्या औरन्गजेबाच्या चेहर्‍याशीच होऊ शकतील.
गेली पाचसहा वर्षे सलगपणे ज्या "महान झक्कीन्ची" कुरापत काढण्याची एकही सन्धी सोडली नाही, त्या झक्कीन्ची येवढीश्शी "लहान मूर्ति" बघुन रॉबिनला हा हन्त हन्त वाटले नसेल तरच नवल!

>>>>>>>>>>>>>.
लिम्ब्या, हे सगळ्यात झकास Happy

त्या झक्कीन्ची येवढीश्शी "लहान मूर्ति" बघुन रॉबिनला

>>>>

या वरून आता उन्दीर कोण आणि मांजर कोण हा भाग्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आपसूकच मिळावे....

>>>>> या वरून आता उन्दीर कोण आणि मांजर कोण हा भाग्याला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आपसूकच मिळावे....
असुद्यात असुद्यात
अन तिला तुम्ही "खोदलेल्या पहाडाचे दर्शन" अन त्यामागचे "तुमचे कष्ट" याची देखिल जाणिव होईल, नाही???? Lol
बर, ते फोटो मेल मधे पाठवायचे बघ की लौकर, की तू पण "एक सरदार (अनुल्लेखाचा)"?????? Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

जोरात झालेला दिसतोय जीटीजी Happy
मला आधी कळवल असत तर मी पण येउ शकले असते....कार्याध्यक्ष याची नोंद घेतील अशी अपेक्षा Proud
सगळे वृत्तांतपण मस्त..मजा आली वाचून.

मजा आली वृत्तांत वाचून अन् फोटो पाहून, फोटोंबद्दल रॉबिनहूड यांचे आभार.
धमाल केलेली दिसतेय Happy

व्रुत्तांत मस्तच,
झक्किंना भेटायचे होते...
लिंबु भाव, आपली भेटही या आयडी ने व्हायची आहे... मोदि रिसॉर्टवर फारसे बोलणे झाले नव्हते...
रॉबिन हुड, ओर्कुटवर फोटो पाहिले...

वा भई वा........ धम्माल केलेली दिसतेय...... एका ऐतिहासिक क्षणाला आम्ही मुकलो म्हणावं लागेल Sad
पण पूनम आणि लिंब्या....... तुम्ही ती रुखरुख कमी केलीत. मस्त लिहिलाय वृत्तांत Happy
रॉबिनहुड भारी प्रकरण दिसतंय आणि झक्की चकचकीत Wink

Pages