भरतभेट अर्थात पुण्यात झालेले एवेएठि

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

श्री. रॉबिनहूड व श्री. झक्की या दोन परममित्रांची भेट काल घडून आली. अनेक पुणेकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते. या निर्मळ आनंदाच्या क्षणांत आपल्यालाही सहभागी होता यावे, म्हणून ही प्रकाशचित्रे..

SA.jpgSA2.jpg

विषय: 

झक्की आणि रॉबिन माझ्या मैत्रिणीसाठी पण एक चांगला मुलगा शोधा बरं तुम्हाला दोघांना आत्ताच तीची माहिती मेल करते. चिनू क्स तू जरा मला या दोघांचा ईमेल आयडी दे ना पटकन.
>>>>
झक्की आणि रॉबिन हे फक्त बोलतात, प्रत्यक्ष कृती काही नाही. आणि इथे उपवर लायनीने (म्हणजे त्या कवितेतल्या रुळाशेजारच्या लाइनप्रमाणे नव्हे Proud ) उभे राहिलेले असताना तू झक्की आणि रॉबिन ह्यांचे मेल आयडी उघड उघड मुद्दाम () विचारते आहेस. अरेरे.

अरूण... कार्याध्यक्ष X १० वेळा Happy

लिंब्या... तुझं स्वगत झालं... आता वृतांत येऊ दे लवकर...

उर्वरीत फोटो माझ्या ओर्कुतवरील पानावर्'फोटो' लिंकवर आहेत. ते फोटो टाकताना संबंधितांची ओळख उघड करण्याची परवानगी न घेतल्याने त्यांची नावे टाकलेली नाहीत. ऑर्कुतवर PRAKASH THUBE असा सर्च दिल्यास माझे पान सापडेल.

रॉबिन आता सातवे आसमान मे होंगे. झक्कि भेटले ना.
हे तर अगदि भारत आणि पाकिस्तानचा "हिंदुस्तान" झाल्यासारख वाटतय
.
>>>>>>

मंडळी ही आहे जुन्नर बीबी वरील झेड_प्रतिभा हिची कॉमेन्ट !! आहे की नाही इरसाल?

मजा आली फारच. बर्‍याच दिवसांनी असे जीटीजी अनुभवायला मिळाले.
चिनुक्ष, साजिरा, अर्भाट व इतर सर्व संयोजकांचे कुशल आयोजनाबद्दल अभिनंदन.

मु. पो. वैशाली
इतर सर्व प्रमुख लोकान्च्या लगेच मागे रहाण्याची दक्षता मी घेत होतो, हो, चुकुन हरवून जायला नको!
वैशाली मधे वरील मजला आहे हे माहीत नव्हते, सगळ्यान्च्या मागे मागे मी व थोरली गोलाकार जिन्याने वैशालिच्या गच्चीवर पोचलो
मला मनात शन्का भेडसावत होती की आता येवढ्या सन्ख्येने आलेल्या लोकान्ची बैठक व्यवस्था कसे काय जमविणार? तिथे तर आधीपासूनच बरीच गर्दी होती
गच्चीच्या एका कडेला दोन तीन टेबल जोडून केलेल्या ठिकाणी लोक स्थानापन्न होऊ लागले, काही जण, बहुधा समयसुचकता पाळून व "पाहुण्यान्ना प्रथमाधिकार देण्यासाठी" स्वतः बाजुलाच उभे राहिले!
अशा कार्यकर्त्यान्पैकी मी नसलो तसेच पाहूणाही जरी नसलो तरी कदाचित "बिनबुलाया मेहंमान" असावा अशी दाट शन्का असल्याने आणि उभे रहाण्याची क्षमता नसल्याने मी थोरलीसहीत सरळ जाऊन खुर्च्या पटकावल्या! खरे तर मला झक्कीन्शेजारी बसायचे होते, पण त्या जागी आधिच कुणी कुणी बसल्याने मी बेत बदलून टेबलाच्या एका कोपर्‍यात व कठ्ठड्याच्या भिन्तीबाजुच्या खुर्च्या निवडल्या! समोरुन येणारे व एकन्दरीतच सर्व गच्चीचे दृष्य तेथुन बघता येत होते!
आता माझे एकच काम होते, निरीक्षण आणि परिक्षण! मधेच थोरलिने काही विचारल्यास तिला माहिती सान्गणे! Happy
माझ्यासमोर दोन लहान मुले बसली होती, डाव्या बाजुला उत्तरकाशी! Happy त्यान्च्या पलिकडे बहुधा जीएस, त्यापलिकडचे मात्र, माना वळवुन वळवुन वाकुन बघुनही मला दिसत नव्हते!
समोर मुलान्च्या कडेच्या दोन तीन खुर्च्यान्मधे आळीपाळीने वेगवेगळ्या आयडीज येवुन बसुन गेल्या
कधी इट्स्मी, तर नन्तर आशू, मधेच टण्या तर नन्तर मिनू
समोरील मुलान्चे उद्योग जोरदार चालू होते! चित्रे काढायला त्यान्ना पेन देणे, नॅपकिनचे कागदापासून ते करत असलेल्या वस्तु कौतुकाने न्याहाळणे इत्यादी बाबी करताना मला मी पोगो वरील "मिस्टर बीन" बनत असल्याचे भासू लागले
तिकडे झक्कीन्ची टकळी जोरदारपणे अखन्डीत सुरू होती, सवालजवाब झडत होते, चौकार षटकार मारून झक्की हशा अन टाळ्या वसूल करत होते, दूर बसल्यामुळे फारसे ऐकू येत नसले तरी मुकपणेच आम्हीही त्या हशाटाळ्यान्च्या आनन्दात सामिल झालो होतो
मधेच कोणीतरी म्हणले की रॉबिनहूड येणारेत!
मला थोडी शन्का होती की खरच येणार का! तसा मी रॉबिनला पूर्वी भेटलेलो होतो त्यामुळे ओळखण्यात अडचण पडणार नव्हती
झक्की २००५ मधे जेव्हा भेटले होते, तेव्हा माझाही त्याना पहिला हाच प्रश्ण होता की "रॉबिनहूड म्हणजे तुम्हीच तर नव्हे?"
नन्तर २००७ मधे रॉबिनहूडशी प्रत्यक्ष गाठ झाल्यावर झक्की वेगळे, अन हा हुडा वेगळा हे नक्की झाले होते
अन काय सान्गता राव? रॉबिनहूड खरोखरच आले की! हातात भारीचा डिजिटल कॅमेरा घेवुन आले!
त्यान्च्या भेटीचा सोहळा म्या पामराने काय वर्णावा?
जसे काही बराक ओबामा राज ठाकरेच्या भेटीला आलाय
किन्वा इतिहासात वर्णन केल्याप्रमाणे पुरू राजा सिकन्दराला बजावुन सान्गतोय.... राजाप्रमाणे वागव! Proud
असो
तोवर अन्दाज घेवुन चिनुक्सने प्रत्येकाला काय हव त्याची ऑर्डर घ्यायला सुरुवात केली होती, मला वाटते की बहुधा टण्या त्याला मदत करीत असावा
साजिर्‍याची (बिनकामाची) लगबग वाखाणण्यासारखी होती
गप्पा अगदी रन्गात आलेल्या, जीएस मधुन मधुन यॉर्कर टाकून झक्कीन्ची दान्डी उडवु पहात होता, झक्कीही तितक्याच तत्परतेने त्याच्या प्रश्णास बगल देऊन वेळ मारुन नेत होते
वैशालीच्या वेटर्स नी कटकट न करता सगळ्यान्ना त्यान्चे पसन्दिचे खाद्यपदार्थ पुरवले!
मागाहून चहा आला
मधेच थोरली माझ्या कानाशी लागुन बोलली की ते काका बघ, कॉन्ट्रिब्युशन गोळा करताहेत, मी म्हणल, करुदेत, आपल्यापर्यन्त आले की देऊ!
चिनुक्स इमानेइतबारे जबाबदारी निभावत होता!
खरे तर झक्कीच सगळ्यान्चे बील भरण्याच्या मूड मधे होते, पण त्यान्ना नम्रतापूर्वक नकार देण्यात आला!
(वर सान्गण्यात आले की हे "पुणेरी आदरातिथ्य आहे, व आपण आमचे पाहूणे आहात")
माझ्या मते एकुण तीसएक जण तरी हजर होते, पैकी मायबोलीवर न येणारे असे मोजकेच दोन तीन होते, बाकी सर्वान्चा मायबोलीशी प्रत्यक्ष सन्पर्क होता

मधेच थोरलीने विचारले, त्यान्च्या अन्गावर मायबोलीचे टीशर्ट कसे काय? तुमच्याकडे का नाही?
तिला सान्गितले, त्या टीशर्टना कॉलर व खिसा नाही, म्हणून मी कधी घेतले नाहीत, जेव्हा कॉलर व खिसा असेल तेव्हा घेईन

मधेच झक्की उठून बाहेर गेले व परत येताना त्यान्ना पुर्वी मेल मधे सान्गितल्याप्रमाणे तिकडची चिल्लर व त्यान्च्या मुलिच्या लग्नाचे व घराचे फोटो घेवुन आले! ते बघण्यात छान वेळ गेला! डॉलरची नोट व चिल्लर बघुन मुली खुष झाल्या!

होता होता हळु हळू सगळे पान्गू लागले! तरी वैशाली बाहेर फुटपाथ वर बरेचजण जमले, साजिरा व उत्तरकाशी यान्नी भर वहात्या रस्त्यामधे उभे राहुन ग्रुपचे फोटो काढले! मधेच मिनू येवुन विश करुन गेली

झक्की चिल्लर आणणार हे माहित होते, तेव्हा रिकाम्या हाताने त्यान्ना कसे परत पाठवायचे या सद हेतुने लिम्बीच्या शेतातील तान्दुळाच्या दोन तीन पिशव्या बनवुन आणल्या होत्या, पण झक्कीन्ना इकडून तिकडे काहीही नेण्याचे अलाऊड नाही असे त्यान्नी सान्गितल्यावर त्यान्ना तान्दुळ देण्याचे रहीत केले! Happy

मात्र आधिच ठरविल्याप्रमाणे, जे सर्वात शेवटपर्यन्त माझ्याबरोबर रहातील त्यान्ना बाकि व आता झक्कीन्च्या वाट्याचेही तान्दुळ देऊन टाकायचे असे ठरवलेले, त्याप्रमाणे समोर उपलब्ध आयडिन्ना त्या तीन पिशव्या "हे लिम्बीच्या शेतातील तान्दूळ" असे सान्गुन दिले! Happy

बाईकने औन्धरोड मार्गे मी थोरलीबरोबर घरी परतलो ते या जीटीजीच्या सुखद आठवणी घेऊनच! Happy

या जीटीजीच्या सन्योजनात सहभागी चिनुक्स व इतर सर्वान्चे हार्दिक आभार!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मीनू, देईन ग तुला नक्की तान्दूळ! Happy पुढच्या वेळी नक्की!
...;
आपला, लिम्बुटिम्बु

व्वा!!! पूनमवैनी, लिंबूदा अत्यंत रसभरीत वर्णन! Happy जे जे प्रत्यक्ष ह्या सोहळ्यास उपस्थित राहू शकले त्यांचा आता मला हेवा वाटतोय! Sad

झक्की मुंबईत भेटूयात!

*********************
All desirable things in life are either:
1.Illegal
2.Banned
3.Fattening or
4.Married to Others.
Wink Biggrin

खुसखुशीत वृत्तांत!! एकूणातच सगळ्यांनी धम्माल केलेली दिसतेय!

------------------------------------------
1st rule of Daughter-in-Law : Nod & Smile!

वृत्तांत ए-वन!

हुडाच्या ऑर्कुटातल्या फोटुत टेबलावरचे पदार्थ (उपमा आणि सांबारवडे) मस्त दिस्ताहेत.
हुडाचं जीवन सार्थकी लागलं म्हणायचं!

अधिक फोटो.साठी माझ्या PRAKASH THUBE या ऑर्कुट वर सर्च मारून फोटो लिंक वर शोधावे....

इथे उपवर लायनीने (म्हणजे त्या कवितेतल्या रुळाशेजारच्या लाइनप्रमाणे नव्हे ) उभे राहिलेले असताना तू झक्की आणि रॉबिन ह्यांचे मेल आयडी उघड उघड मुद्दाम () विचारते आहेस. अरेरे.>>> ट्ण्या माझं नेटवर्क स्ट्राँग आहे बरं का.... मी most eligible bachalors शोधतेय त्यामुळे तुला कधीच बाद केलंय... दिवे घे.

~~~~~~~~~

अरे वा एकदम मस्त झालेले दिसतय जीटीजी. वृतांत आणि फोटो मस्तच. याची देही याची डोळा झक्की व रॉबीनहूड एकत्र बघायला मिळाले म्हणजे जीटीजीला हजर असलेल्यांचे जीवन सार्थकी लागले म्हणायच.

मृ Happy मी पण पदार्थांकडे बघून जाम उसासे टाकले !! भूक लागल्याने की काय माहित नाही पण अल्मोस्ट सांबाराचा खमंग वास आल्याचा पण भास झाला!! Wink

अरे सही रे....

२ -२ मस्त वृत्तांत आणि फोटो पण...
धन्यवाद...

तरीपण मिसल्याचं फीलिंग आहेच...

मी पुण्यात आलो की भेटू सगळे...

तुमच्यापैकी कुणीही लंडन ला येणार असेल तर कळवा इकडेही भेटू...
_______
झिंगालाला हुम्...
झिंगालाला हुम्...
झिंगालाला हुम्...
हुर्र... हुर्र...!!!

मस्त वृत्तांत. Happy

सगळ्यांनी चांगलंच हादडलेलं दिसतंय वैशालीत..

झक्की, अहो तुम्हाला विशिष्ठ शहरातल्या लोकांनी फितवलं की हो..... Proud

एवेएठि या शब्दाचा कुणी अर्थ सांगू शकेल का?
शरद

"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा;
कल शब, मौसमकी पहली बारिश थी! 'परवीन शाकर'

एकाच वेळी एकाच ठिकाणी.

चिनूक्स चांगला सालस मुलगा दिसतोय. फोटो टाका बरं त्याचा. माझ्या यादित टाकल पाहीजे त्याला.

चिनूक्सा, घाबरू नको रे बाबा. मी चांगल्या होतकरू मुला मुलींची यादी संभाळते. Happy

आयला झक्कीआजोबा चांगलेच स्टाईलीश रहातात वाटत.

वृतांत चांगले आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

खास महिला दिनाचा मुहुर्त का निवडला ?
बाकि दोघां परममित्रांच्या भेटी वारंवार घडोत, या शुभेच्छा.

नमस्कार मंडळी.

सर्व पुणेकरांचे मनःपूर्वक आभार. सर्वाट जास्त मजा मला आली यात काहीच शंका नसावी. माझ्या मते माझ्या चेहेर्‍यावरून आनंद ओसंडून वहात होता. त्यामुळे आजूबाजूचे पण आनंदित दिसत होते. तरी पण कुणितरी म्हणाले की अहो तुम्ही आम्हाला भेटून आनंद झाला असे का म्हणाला नाहीत? तर मी अधिकृतरीत्या तसे जाहीर केले.

वृत्तांत छानच, PSG व लिंबूटिंबू या दोघांचेहि.

मुख्य म्हणजे सांगू नये अश्या गोष्टी सांगितल्या नाहीत! होत्या तश्या दोन चार.
मला वाटले कुणि तरी लिहील की झक्कींना 'पैसे देऊ नका' म्हंटल्यावर ते म्हणाले 'च्यायला, आधी माहित असते, तर मी पण एकाच्या जागी दोन प्लेट्स नि चहा ऐवजी मँगो शेक किंवा तत्सम महाग पेय घेतले असते!'

तर खुलाश्या साठी: "मी तसे म्हणालो नाSही! (मोठ्याने)"

>>>> सर्वाट जास्त मजा मला आली
तुलना कशाशी ते स्पष्ट करावे ही विनंती! Proud

झक्की, भेदरलेले डोळे दिसू नयेत म्हणून डार्क ग्लासेस का? पण पहिल्या फोटोत अगदी कौतुकमिश्रित नजरेने पहात आहेत हूडाकडे. Proud

कल शब, मौसमकी पहली बारिश थी! 'परवीन शाकर'

शरद , परवीन शाकीर
कैसे कह दूं के मुझको छोड दिया है उसने
बात तो सच है मगर बात है रुसवाईकी.........

>>>>चिनूक्स चांगला सालस मुलगा दिसतोय.

आर्च, त्याच्या लिखाणावरुन काही वेगळाच गैरसमज झाला होता का आधी? जो आता फिटलाय? Proud

इतिउप्पर काही शंका असल्यास, पुढच्या एवेएठिला भेटावे <<<<

पुनमः ही धमकी आहे की विनंती.. Happy
वॄत्तांत छान आहे.. (मिनू म्हणाली म्हणून मी ही)

विनय Happy

वृत्तांत खरचं मस्त होता.... देसाई तुम्हाला टफ कॉम्पीटीशन आहे बरका वृत्तांत लिहीण्यात.... Happy
वैशालगड खुप दिवासांनी बघायला मिळाला....
आजुन सय्यद बंडांचा वृत्तांत वाचला नाही.. तोही छान जमलाय असं खुद्द शिवाजी महाराजांच म्हण्णं आहे..... Lol
मी तर म्हणतो आता ए वे ए ठी फंडच काढा आणी पुण्यात भेटलेली सगळी मंडळी आणी बारा बाफं वाली सगळी असं बारातच ए वे ए ठी ठेवा, कसं......?

Pages