भटकन्ती करण्यासाठी ठिकाणे

Submitted by पशुपत on 22 April, 2017 - 00:57

मला ट्रेकिंग चे खूप आकर्षण आहे लहानपणापासून. पूर्वी पुण्याच्या आसपासच्या किल्ल्यांवर जाउनही झाले आहे. जसे कि तोरणा , राजगड , पुरन्दर , सिंहगड , लोहोगड , विसापूर .
छोटे ट्रेकही केले होते. उदा कात्रज - सिंहगड , कावळ्या किल्ला - शिवथर - हिरडोशी
परत सुरूवात करायची आहे. काही मित्र भक्कम ट्रेकर आहेत पण त्यंच्याबरोबर एकदम जाणे झेपणार नाही . त्यासाठी तयारी म्हणून छोटे १५-२० कि.मी. चालण्याचे एक-दोन दिवसाचे ट्रेक सुचवा. शक्यतोवर सपाट चालणे हवे. किंवा थोडे फार चढणे - उतरणे चालेल.
खालील ठिकाणांबद्दल कुणाला माहिती आहे का ?
१. मढे घाट ते शिवथर : असा पायी जाण्यासाठी मार्ग आहे काय ? अन्दाजे अंतर किती असेल ?
२. शिवथर ते रायगड पायथा : असा पायी जाण्यासाठी मार्ग आहे काय ? अन्दाजे अंतर किती असेल ?

पशुपत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतके मायबोलीकर भटके आहेत पण इथे एकही प्रतिसाद नाही?
मुंबई, ठाणे राहणाऱ्यांना घाट चढून जाण्याची गमत मिळते तशी पुणेकरांना मिळत नाही.
तुम्ही दिलेल्या यादीत गड आहेत पण ते वारंवार जाण्याच्या कामाचे नाहीत असे मला वाटते.

जुन्नर परिसर पाहा. चावंड. शिवनेरी. नाणेघाट माथा.
कामशेत - कोंडेश्वर - ढाक गाव. ढाकगड.
नेरळ - माथेरान.
तैलबैला - सुधागड- पाली, पाली -सरसगड.

पशुपत तुम्ही लिहीलेले दोन्ही ट्रेक आता उन्हाळ्यात जाण्यासाठी फार चांगले नाहीत. आत्ता एप्रिल मे मध्ये ट्रेकला सुरुवात करूच नका असा स्पष्ट सल्ला राहील माझा.

पावसाच्या दोन चार झडी येऊ देत मग तुम्हाला तुम्ही कुठे राहता त्या एरियातल्या किल्ल्यांची अख्खी यादीच देईन.

आता चालणे, पळणे, पायांचे व्यायाम याच्यावर भर द्या, स्टॅमिना वाढवा.

इतके मायबोलीकर भटके आहेत पण इथे एकही प्रतिसाद नाही?>>>>>>>

मायबोलीवर आता फारसे कोणी फिरकत नाहीत
आम्हा सर्वांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे तिकडेच सगळी चर्चा असते

मायबोलीवर आता फारसे कोणी फिरकत नाहीत
आम्हा सर्वांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे

बरोबर. आणि त्यातून भराभर संपर्क होऊन भटके जातात. तरीही तुमच्यापैकी एकाने तरी काही लिहिले पाहिजे इतरांच्या भल्यासाठी.

या हंगामात नाही
राजमाची रात्री त्यातल्या त्यात
पण सोबत माहीतगार पाहिजे

भटकायची आवड आहे, निसर्गाची आवड आहे, पण उन्हात भटकणे नकोसे वाटते, त्रास होतो तो वेगळाच.
तरी पाऊसात कुठेकुठे हुंदडायला आवडते, यंदा पाऊस सुरू झाला की कर्नाळा पक्षी अभयारण्यातील कर्नाळा फोर्टवर जायचे आहे. कदाचित भारी वगैरे नसेल ते, किंबहुना भारी नकोच आहे. ट्रेक म्हणण्याऐवजी जंगलात भटकणे आणि थोड्याफार पायर्‍या चढणे असेच हवे आहे. लेकीसोबत जायचे आहे. त्यात मला असे कुठे फिरण्याचा अनुभव नाही. तरी कोणी कर्नाळाला गेले असल्यास आपले अनुभव आणि माहिती ईथे दिल्यास आवडेल. म्हणजे पावसाळ्यात स्लिपरी वगैरे असते का? नुकतेच काही दिवसांपुर्वी पायथ्याशी जाऊन आलो. पण उन्हं ईतके होते आणि बारका पोरगाही सोबत होता त्यामुळे कुठे चढायच्या नादाला लागलो नाही. मोर आणि माकडे बघून परतलो.

नसते स्लीपरी, सुळक्यावर असेही वरती जाता येत नाही
प्रवेशद्वार आणि थोडी तटबंदी आहे शिल्लक
पावसाळ्यातच जाण्यासारखा आहे
लहान मुलांना अगदी सहज करता येईल असा आहे

ओके, धन्यवाद
पावसाळ्यातच जायचे आहे. कारण मागे आमच्या ऑफिसचे गेलेले. वरतून दिसणार्‍या व्यू चे फोटो पाहिलेले. खूप छान होते. जर फोटो बघायला छान वाटत असतील तर स्वतः मेहनत करून वर गेल्यावर तो व्यू बघायची मजा काही औरच याची कल्पना करू शकतो. तो अनुभव घ्यायचा आहे.

ओह, फोटो उडवलेत तिथले...

मला आता गड चढण्याचे मनात नाहीये .
सपाट , वनराईत निसर्गात चालणे अपेक्षित आहे.
<<शक्यतोवर सपाट चालणे हवे. किंवा थोडे फार चढणे - उतरणे चालेल.
खालील ठिकाणांबद्दल कुणाला माहिती आहे का ?
१. मढे घाट ते शिवथर : असा पायी जाण्यासाठी मार्ग आहे काय ? अन्दाजे अंतर किती असेल ?
२. शिवथर ते रायगड पायथा : असा पायी जाण्यासाठी मार्ग आहे काय ?>>
हे त्याच अनुषंगानेच लिहिले होते.

आणि
आता जुलै पर्यंत कुठे जाणे शक्यच नाही हे खरेच आहे.

अच्छा, म्हणजे त्या सुळक्यावर जायचेच नसते. म्हणजे माझ्या ऑफिसवाले तिथे गेलेच नसावेत. मी उगाच तो बघून टेंशनमध्ये यायचो Happy

सुळक्यावर जायला टेक्निकल रोप क्लाइब करावा लागतो
पण वरती मधमाशांची पोळी आहेत
त्यामुळे सहसा कोणी जात नाही
काहींनी विना रोप जायचा प्रयत्न केला त्यांचे अपघातही झालेत

सपाट , वनराईत निसर्गात चालणे अपेक्षित आहे.>>>
अंधारबन ला जावा मग
त्यातल्या त्यात तेच सोपे आहे

बाकी वनराई म्हणजे मग भिमाशंकर रानात गुप्त भीमाशंकर करून परत येणे, भरपूर पक्षी दिसतात, शेकरू दिसतं
स्वानुभवातून सांगतोय
पण तिथ लै माकडं आहेत आणि अंगावर येतात
सोबत खाऊ पिऊ ठेऊ नका

बहिरी जोर घुमटी पण विचार करू शकता
पण तिथं पाण्याचा एकमेव स्रोत आहे आणि जंगली प्राणी आहेत
वाटाड्याशिवाय अजिबात फिरकू नका

आर्थर सीट ला खूप चढण आहे , तोवर सपाट आहे

कर्नाळा पक्षी अभयारण्यातील कर्नाळा फोर्टवर एकदा उन्हाळ्यात गेलो होतो १५-२० वर्षांपूर्वी. ती वाट अभयारण्यातून जाते, म्हणून म्हणलं गड नाही आवडला तरी चार पाच पक्षी दिसतील. त्यावेळी पक्षी मधला प पण कसा ओळखायचा माहीत नव्हतं, बाकी निरीक्षण कधी कुठे करायचं वगैरे तर जाऊच द्या. भर दुपारी टळटळीत उन्हात तिथून गेलो आणि कावळा पण दिसला नाही. गडावर तर इतकी घाण होती की पुन्हा जायचं नाही असं ठरवून परत आलो. आता गडावर काही सुधारणा आहे का?

असे नुसतेच चालत गेलात उन्हाचे तर कसे दिसतील पक्षी
त्यांचीही काही वेळ असते हो
पहाटे लवकर, सूर्योदय होत असताना भरपूर पक्षी दिसतात
आणि तेही चालत असताना नाही, शांतपणे एका जागी बसून राहिलो तर
बरडींग करणारे अनेक ग्रुप असतात, फेसबुक वर पण सापडतील
त्यांच्यासोबत जाता आले तर पहा
आपल्याला न दिसणारे, ऐकू न येणारे पक्षीही त्यांना दिसतात, ऐकू येतात
म्हणजे ते असतात, पण आपल्याला ते सापडत नाहीत Happy

कामशेत - जांभिवली बस असे. पुढे वाहन असल्यास कोंडेश्वर / चालत अर्धा तास. तिकडेच भटकून परत- हे एकमेव सोपे ठिकाण आहे. कोंडेंश्वरर्यंत जा पुढे घाटमाथा गाठून वरून खाली सांडशी ( कर्जतमधले गाव) दिसते. पावसाळ्यात रौद्र ओढा असतो तो ओलांडणे अवघड. आणि ढगांमुळे काहीच दिसत नाही.( इथून एक वाट राजमाचीला लांबून जाते. त्यासाठी गाईड लागेल.)

२) जुन्नर ते घाटघर वाटेवर चावंड गडाचा स्टॉप आहे. गड करायचा नसल्यास 'पूर' गावाचा नाका आहे. पूर गावचे अप्रतिम मंदिर आणि मागची वनराई सुंदर. घाटघरच्या पुढे दोन किमी नाणेघाटमाथा आणि पायी भटकण्याची हौस पुरवा. चार जणांनी गाडी केल्यास हसतखेळत वनविहार होईल.

सह्याद्रीत मे महिना म्हणजे करवंद,जांभळं आंबे.

आशुचँप, पक्ष्यांबद्दल परफेक्ट सांगितलेत...
किकां(श्री किरण पुरंदरे)बरोबर काही काळ घालवला पाहिजेत हरचंद तुम्ही..

पक्षी पाहण्याचे चांगले/चांगली ठिकाणे म्हणजे कोरडे पडलेले ओढे. कोकणातले / देशावरचे. दोन्ही तिरांवरची झाडे,फांद्या आत वाकलेल्या असतात. सावली असते. पक्षी निवांत असतात. कुठे खळग्यांत पाणी असते त्या आधारे कीटक,पक्षी राहतात.
बाकी बर्डिंगवाल्यांच्या नादी लागू नये. त्यांना जागा गुप्त ठेवायच्या असतात. चार फेसबुक चालवणाऱ्यांना कळले की त्या जागेची चौपाटी चार वर्षांत होते. म्हणून ते आपली खात्री झाली नाही तर टाळतात.

लोणावळा - लायन पॉइंट - कोरलईनंतर रस्त्याने चालत वाटेत कुठेही रानात घुसा. भरपूर पक्षी दिसतील. निवांत असतात. रविवारी मात्र हर्ले डेविडसन मोटो ग्रूपवाले भयानक आवाज करत शांतता भंग करतात सकाळी. ते सोडल्यास रान तुमचेच आणि पक्ष्यांचे.

आशुचँप, हो खरं आहे. तेव्हा आम्हाला पक्षीनिरीक्षणातला प पण माहीत नव्हता, त्यामुळे हा मूर्खपणा झाला. वरती लिहिले आहेच ना. ते दुपारची वेळ वगैरे मुद्दाम लिहिले, म्हणजे आम्ही किती चुकीची वेळ निवडली ते कळायला. म्हणजे चूक आमची होती आणि आम्ही नावं उगाच ठिकाणाला ठेवत होतो. मला वाटलं हे एक्सप्लेन करावं लागणार नाही. असो!

पशुपत, बाकी किकांना कधी भेटलो नाही, पण माझा भाऊ पक्षीनिरीक्षण करतो. त्यामुळे वरती लिहिलेली माहिती आता मला ऑलरेडी माहीत झाली आहे. Happy
किकांचे काही व्हिडियोज आणि पूर्वी आकशवाणीवर त्यांचे आवाज ऐकून त्यांच्यासोबत कुठेतरी गेलं पाहिजे असं खूप वाटलं होतं पण कधी योग आला नाही.

कर्नाळ्याच्या अनुभवानंतर पुढे काही ठिकाणी पक्षीमित्रांसमवेत जाण्याचा योग आला तेव्हा अनेक गोष्टी कळल्या. कधी पटकन लक्शातही न येणारे पक्षी त्यांना कसे दिसतात हे अजूनही कोडंच आहे. पाणथळांचं महत्त्व आणि उन्हाळ्याचा हंगाम वगैरे गोष्टी पण कळाल्या. हुप्पूच्या जोड्या दिसायला जंगलात तासन तास बसून राहिलो. पेंटेड स्टॉर्क जेव्हा पंख पसरून झेप घेतात तेव्हा खाली बोटीत बसून तो नजारा बघण्याची हौसही फेडली. कधी सुवेळा माचीवरून एका बाजूला कित्येक मिनिटे (की तास) एकदाही पंख न फडफडवता केवळ कड्यावरून वर येणार्‍या ऊष्म हवेच्या झोताच्या आधाराने एका जागी हॉवर करणारी ब्राह्मणी घार कधी पहिल्यांदा पंख फडफडवेल त्याची वाट पहात वेळ घालवला. आता हे पक्षी काही दुर्मिळ वगैरे नाहीत, हे माहीत आहे, पण त्यांच्या उडण्याची नजाकत, काही पक्ष्यांचे आवाज हे मनाला वेड लावतात. बंदीपूरच्या जंगलात एका भिल्लाने एखाद्या बॉटनिस्टला माहीत नसेल इतकी त्यांची शास्त्रीय माहिती जेव्हा सांगितली होती तेव्हा थक्क झालो होतो.

एका भिल्लाने एखाद्या बॉटनिस्टला माहीत नसेल इतकी त्यांची शास्त्रीय माहिती
अशांना bnhs पगार देते व ते तिकडून रिपोर्टिंग करतात. त्याने bnhs चा वेळ वाचतो. शिवाय त्यांना पक्ष्यांची संख्या मोजायलाही शिकवले आहे.
एकदा नांदूर माध्यमेश्वरलाही भेट द्या. सिन्नरपासून एक रस्ता तिकडे जातो. ( सिन्नर - शिरडी ९० किमी / सिन्रर - नांदूर मा २० किमी.) तिथे वनखाते महा चा मनुष्य वसतीला असतो तो रोज रिपोर्टिंग करतो त्यास भेटा.

आता एवढी ठिकाणे दिली आहेत तर मे महिना याचा विचार न करता एखादे ठिकाण पाहाच.
होळीनंतर ( आगोठा) सुरू होतो आणि गाणारे पक्षी गातात. पावसाळ्यात, थंडीत गप्प असतात आणि शोधावे लागतात.

Sad, हरचंद..
खूप interesting आणि उद्बोधक माहिती दिलीत..
आणि छान गप्पा झाल्यासारखं वाटल.