कर्नाळा भटकंती

Submitted by आशुचँप on 17 September, 2010 - 08:14

क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...

गुलमोहर: 

एकदम जबरदस्त Happy क्लॅरिटी जबरदस्त काही काही फोटूतील. आणखीण माहिती मिळेल काय?
कसं जायच कर्नाळ्याला पुण्यातून? १,९, ११, १३ प्रकाशचित्रे जबरदस्त आहेत Happy

धन्यवाद,

पुण्यातून स्वारगेटवरून पनवेल बसने जाता येते. अगदी सकाळपासून बसेस असतात. साधारणपणे तीन-साडेतीन तास लागतात. (तिकीट ११५ रु) सुट्टीच्या दिवशी ट्रॅफिक भयंकर असते.
पनवेलवरून बसेसपण जातात पण शिरढोणला जाण्यासाठी सहाआसनी आहेत. त्याने आपण कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या दाराशीच उतरतो. शिरढोण अलीकडे लागते पण थोडे पैसे दिले तर सहा आसनीवाले पुढे नेऊन सोडतात.

त्या झेंड्याखाली बसून ब्लाईंडफोल्ड खेळायला मज्जा येईल नाही!!!

फोटो जबरी आलेत.. स्पेशली ९,१०,१४...

व्वाह!!! सगळेच फोटो एकदम भ न्ना ट.
त्या माकडाचा फोटो ज ब र द स्त!!!
पण आशु, मन नाही भरलं. (जर वेळ असेल तर) अजुन येऊ देत Happy

यो साहेबांच्या सुरेख प्रकाशचित्रांनंतरही मी माझे फोटो टाकण्याचे धाडस करत आहे.>>>>>>मित्रा, तुझे हे फोटो बघुन मला आत्ता माझे फोटो डिलीट करावेसे वाटत आहेत (खरंच). Happy

योग्या.. घडेल घडेल.. अशी अफलातून चित्रमालिका तुझ्याहातून नक्की घडेल.. माळशेज घाटाची मालिका किती फेमस आहे माहीती आहे ना रे.. डेली सोप झालीये.. ब्लॉगर्स साठी Proud

आशूचॅम्प.. तुझ्याबरोबर एखादा ट्रेक करायला नक्कीच मजा येईल.

धन्यवाद लोक्स...

हिम्सकुल - कुठल्या झेंड्याखाली म्हणतोयस..लिंगोबावरच्या?

मंदार, सुकी, भुंगा, बुमरँग, वैद्यबुवा मनापासून धन्यवाद

मित्रा, तुझे हे फोटो बघुन मला आत्ता माझे फोटो डिलीट करावेसे वाटत आहेत (खरंच).

>>>>>>>>>काय पण बोलतो राव तू :लाजून प्रचंड लाल झालेला बाहुला:
असो तुला आवडले हे पाहून भरून पावलो.

सुकी, नक्कीच जाऊ आपण. मलाही तुमच्याबरोबर येण्याची जाम इच्छा आहे.

छान फोटो आहेत, प्रचि क्र. ७ ..... मला नेहमी प्रश्न पडतो, हा झेंडा लावायला टोकावर कोण आणि कसा गेला असेल. spiderman-02207-2.gif

अगदी शाळेत असल्यापासून जात होतो तिथे. आता पाय साथ देतील असे वाटत नाही, पण असे फोटो बघितले कि परत जावेसे, वाटते एवढे खरे.

प्रसिक--- अरे तिथे ठाकर जमातीचे लोक असतात ते चढतात म्हणे त्या लिंगोबावर. माबोवर पण एक विमुक्त म्हणून आहेत, त्यानेही दोराशिवाय हा सुळका चढण्याचा पराक्रम केला आहे.

नंद्या, मनिष, प्रिती, मितान, मनकवडा, झकासराव....
मनापासून आभार

यो- मित्रा अरे आहेस कुठे तु. तुला आणि योगेशला दोघांनाही माझे फोटो आवडले त्यामुळे अंगावर मूठभर मांस चढले आहे. (आधीच वजन वाढले आहे त्यात ही भर)
दिनेशदा धन्यवाद. तुमच्याबरोबर तिथे भटकायला प्रचंड आवडेल.

मस्त प्रचि... अस्मादिक आणि माकडाचा असे २ खास आवडले. खूप वर्षे झाली इकडे जाऊन. सुळका सर केला होता त्या आठवणी जाग्या झाल्या.. मस्तच!!!

तिथे ठाकर जमातीचे लोक असतात ते चढतात म्हणे त्या लिंगोबावर. माबोवर पण एक विमुक्त म्हणून आहेत, त्यानेही दोराशिवाय हा सुळका चढण्याचा पराक्रम केला आहे.............. हॅट्स ऑफ अशा माणसांसाठी. आणि मला वाटायचे ईतक्या वर हेलिकॉप्टर ऊतरवायला कोण गेलं असेल.... ashuchamp माहितीसाठी धन्स.....wave.gif

आपल्या माहितीसाठी सांगतो.. कर्नाळा सुळका हा 'अतिशय सोप्या' श्रेणीच्या प्रस्तरारोहणा मध्ये मोडतो. ह्यापेक्षा कैक पटीने कठीण असलेल्या सुळक्यांवर आपल्या बहाद्दर मराठी पठ्यांनी झेंडे रोवलेले आहेत... Happy

भटक्या, माहीतीबद्दल आभार,
मला हे माहिती होते. मला विशेष असे वाटले की विमुक्तने कोणत्याही तयारीशिवाय हा सुळका चढला. त्याने अगोचरपणा केलाच पण धाडस मानले पाहिजे.
बाकी अजून एकाही सुळक्यावर चढायचा योग आलेला नाही पण सांगाती वाचून त्या सुळक्यांच्या वर्णनांची पारायणे झाली आहेत.

आशु... सुळक्याचा शेवटचा टप्पा दोरीशिवाय जरासा अवघड आहे. खास करून उतरताना.

आत्ता माझ्या बाजूला 'सांगाती' आहे. नोव्हेंबरसाठी ट्रेक प्लान करतोय... Lol

अरे ग्रेटच, मलापण सांग, शक्य असेल तर मला यायला नक्की आवडेल. (अर्थात तुला ते चालले पाहिजे. कारण मी अतिशय सावकाश चालतो) Happy

Pages