आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुझ्याविना ,तुझ्याविना
भास का हा तुझा होत असे मला सांग ना
लागते ओढ का सारखी अशी सांग ना
झालो अनोळखी माझा मलाच मी
वाटे मला का व्यर्थ सारे सांग ना
तुझ्याविना ,तुझ्याविना

बरोबर आहे असं गृहीत धरून पुढील कोडे देतोय.
कोडे क्र ८११ हिंदी (१९९०-२०००)
र न ज त क त
म अ अ म ज र त
त य ज य न ज
त य म य न म
म ज द त प न
य क म ज न र त

८११
रूठ ना जाना तुमसे कहूँ तो
मैं इन आँखों में जो रहूँ तो
तुम ये जानो या ना जानो
तुम ये मानो या ना मानो
मेरे जैसा दीवाना तुम पाओगे नही
याद करोगे मैं जो ना हूँ तो

८१२
क्ल्यू : एक "प्रामाणिक" चित्रपट

@ अक्षय -- थोडेसे क्ल्यू संदर्भात
तुम्ही म्हणताय ते खरे आहे. जर गाणे किंवा त्या काळातील कलाकारांचे संदर्भ माहीत नसतील तर क्ल्यू कळत नाहीत.

तुम्ही / कावेरि / mr.pandit / सत्यजित -- जे नवीन गाण्यांचे रसिक आहात -- यांनी खेळायला सुरुवात करण्यापूर्वी, आम्ही सगळे जुनी गाणीवालेच होतो. फक्त झिलमिल, इश्श यांना नवी + जुनी सारखीच कुशलतेने यायची.

तेव्हा क्ल्यू देताना आम्ही असेच द्यायचो. पानाआडच्या फुलासारखे. वास तर येतोय, आहे ते कळतेय पण ""चटकन"" दिसत नाही. मग जो लौकर ओळखायचा तो अडलेल्यांना सब-क्ल्यू देउन क्ल्यूचा अर्थ लावायला मदत करायचा. सगळेच अडले तर क्ल्यू सोपा/सरळ केला जायचा. ती सवय आमची तशीच राहिलीय.

उदा १ -- आग्रे का लाला अंग्रेजी दुल्हन लाया रे -- या गाण्यासाठी --- गावच्या पाटलानं मडमेशी लग्न केलं, इपरीतच सारं --- असा १ क्ल्यू होता + बाकीचे

उदा २ -- ८१२ चे क्ल्यू बघा -- सरळ कलाकारांची नावे / त्यांचे इतर हिट चित्रपट ही माहिती नाही दिली. एक "प्रामाणिक" चित्रपट.
मग प्रामाणिकपणा या गुणांचे चित्रपट आठवायचे. सत्यकाम, दामिनी, अर्धसत्य वगैरे. मग गाणे कळते. असे जायचो आम्ही.

तुमचे क्ल्यू देणे आम्हाला जवळ जवळ उत्तर दिल्यासारखे वाटतात. अ + ब + क - ड = चित्रपट, मग गाणे ओळखायचे.

चूक काही नाही, दोन्ही पद्धतीत; आपण इथून पुढे , थोडे बदलून, एकमेकांच्या सोयीने क्ल्यू लिहीत जाऊ. मी लक्षात ठेवेन. Happy

८१२ हिंदी (८० -९०) -- उत्तर
मोरे घर आये सजनवा
डाल डाल कूहके कोयलिया
मन मयूर नाचे आंगनवा
मोरे घर आये सजनवा
चित्रपट -- इमानदार (गाण्याच्या प्रचलित ओळी -- मितवा तू कहा)

मीही जुनी गाणीच अधिक ऐकतो,पण चित्रपट पाहत नाही फार कुठलेच! त्यामुळे कथानकाशी संबंधीत क्ल्यू कामी येत नाहीत म्हणावे तसे! नवी गाणी क्वचितच,एखाद्या मित्राने मला आवडेल म्हणून ऐकायला सांगितली तर ऐकली जातात!

कारवीजींनी कोडे दिले नाही पुढचे.मी देतो एक छान,सोपे आणि गोड जुने गाणे

८१३.
स स प न क स स प क
स ज च व क अ द ब क

फ क ड भ य ग ग र ह
घ प म क न अ र ह
ह न ज छ ह फ ह व प क

८१३.
सुनो सजना पपीहे ने कहा सब से पुकार के
संभल जाओ चमनवालो के आये दिन बहार के
फूलों की डालियाँ भी यही गीत गा रही हैं
घड़ीयां पिया मिलन की नज़दीक आ रही हैं
हवाओं ने जो छेड़े हैं, फसाने हैं वो प्यार के

कोडे क्र ८१४ मराठी (२०१२-२०१७)
अ स अ स ब
त त ज य ज
क क क अ ज व
त त ह ब न

क्लू :-
नायक :- याने एका चित्रपटात पैलवान आणि नाच्या अश्या भूमिका केल्या आहेत
दिग्दर्शक :- ह्याचे दोन शहरावर आधारित लव स्टोरीवाली मुव्ही फेमस आहे.

८१५.

हिंदी (६७-७७) Happy

ज ज ह त द ह र छ (२)
म म म ब स स स म स स स(२)
अ क क ह ह र ल (२)
म म म ब स स स म ब स स स

सोप्पय एकदम!

अरे सोडवा की! अक्षय, मि. पंडीत, कारवी, स्निग्धा!
क्ल्यु: द्वंद्व गीत.
दोघेही गायक गायिका विख्यात.
संगीतकार जोडी प्रसिद्ध.

रागदारी वैगेरे काही नाही!

विनोदी अभिनेत्याचा चित्रपट!
संगीतकाराच्या जोडीतील एक मराठी नांव आता लगेच ओळखू येईल!
कुमार आहे पण हेमंत नाही! Happy

मला ते म म म स स स बघून रागदारीवाले वाटले; ब्रज भाषेतले बोल आणि मग गाणे सुरू असे असते तसे.
*********
हो मी पण विपु करून कशी आहेस विचारायला गेले होते. तेव्हा हेच वाचले. कधी येतं असं? आयडी डिलिट केला की?

कावेरीच्या नावावर क्लिक केल तर "पान पहायची परवानगी नाही" अस येतय>>>:( Sad Sad>>

अरेच्चा! कावेरिताईची आयडी का डिलिट झाली म्हणे?? Uhoh

Pages