Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23
आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.
पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी काय कानडीत लिहिलेले ?
मी काय कानडीत लिहिलेले ?

६ नवीन खेळाडू घेऊनही
६ नवीन खेळाडू घेऊनही जिंकल्यामुळे मुंबई चा कॉन्फिडंस प्रचंड वाढेल. मस्त झाली मॅच.
गुजराथ चं कँपेन निराशाजनक ठरलं. १११ ची ओपनिंग मिळाल्यावर ह्या मॅच मधे तरी ते कडक फाईट देतील असं वाटलं होतं.
उद्या पुणे वि. पंजाब मधे विनर
उद्या पुणे वि. पंजाब मधे विनर टेक्स ईट ऑल.
कोलकता ला कोणतीही टीम हरवू
कोलकता ला कोणतीही टीम हरवू शकत नाही. कोलकता स्वतःहून हारते.
कालच्या मॅच मधे गंभीर नंतर आलेले सर्व फलंदाजांचा अॅप्रोच जवाबदारी काय होती हा प्रश्न कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्ना इतकेच रहस्यमयी आहे.
२ फलंदाज आउट झाल्यानंतर उथप्पाने आरामात खेळून काढायचे सोडून ख्रिस लीन ची प्रत्येक मॅच मधे बरोबरी का करायला बघत आहे? आल्याआल्या षटकार, मोठे फटके मारायचा प्रयत्नात प्रत्येक मॅच मधे बाद होत आहे. भारतीय संघात न घेण्याचे हे प्रमुख कारण आहे. फार्मात असुन सुध्दा निव्वळ घाई करण्याकरीता फटके मारत राहण्याची सवय रॉबिन ला एक "जवाबदार" फलंदाज होण्यापासून रोखत आहे. रॉबिन न खेळल्यामुळे मागील ३-४ मॅच मधे कोलकताला पराभव स्वीकारावा लागला आहे.
युसुफ पठाण नामक अत्यंत बेभरवसाचा फलंदाज आहे. काल प्रत्येक बॉल हा षटकार मारण्यासाठीच टाकण्यात येत आहे. आणि मी षटकार प्रत्येक बॉल वर मारणारच असा एक खुळचट विश्वास रिकाम्या डोक्यात भरून पठाण फलंदाजीला उतरलेला. एका शॉट वर कॅच झाली नाही स्वतः वाचलोय असे होऊन सुध्दा दुसर्या बॉल वर अंधपणे बॅट फिरवण्याची किमया फक्त पठाण करू शकतो. पठाण जर शांतपणे खेळून थांबण्याचा प्रयत्न केला असता तर मॅच १६-१७ ओव्हर मधेच संपली असती.
मनिष पांडे खेळपट्टीवर टिकण्याच्या नादात ऐनवेळेस जॉनसनची ओव्हर जवळपास मेडन घालवली त्या आधीच्या ओव्हर्स मधे चांगले १०-१२ धावा येत होत्या. ती लय पांडेने त्या ओव्हर मधे तोडली परिणाम त्यानंतरच्या ओव्हर मधे झाला. आणि ग्रॅम्हम ची विकेट गेली. पांडे २०-२० मधे वनडे सारखा खेळत आहे. धावांचा स्पीडही वाढवत नाही आणि चेंडूही जास्त वाया घालवतो. ४ बॉल खेळून काढल्यावर एक चौकार मारणे हे वनडे मधे चालून जाते पण २०-२० मधे नाही चालत.
असेच चालू राहिले तर केकेआर पहिल्याच एलिमेशनमधे स्पर्धेबाहेर फेकली जाईल. पहिल्या ६ ओव्हरच्या पुण्याईवर सगळी मॅच जिंकली जात नाही हे गंभीरने इतर फलंदाजांना सांगायला हवे.
आजची पहिली मॅच प्रचंड
आजची पहिली मॅच प्रचंड महत्वाची तर दुसरी केवळ औपचारिकता!
डीडीने अजुन एखादी जरी मॅच जिंकली असती तर आजची दुसरी मॅचही डिसायडर झाली असती.... असो!
पुणे जिंकुन दुसऱ्या स्थानी जावे ही सदिच्छा!
बाय द वे, साक्षी धोनी आणि गोयंका यांच्यामधले ट्वीटरयुद्ध कुणी फॉलो करतय का? बॅकराउंडला असल्या गोष्टी चालू असताना त्याच टीमसाठी मैदानावर जाउन परफॉर्म करण किती अवघड असेल धोनीसाठी!
प्रत्येक नवरा हा स्वतःच्या
प्रत्येक नवरा हा स्वतःच्या बायकोला वचकून असतो. हे वरील उदा. वरून स्पष्ट होते. मग तो नवरा ओबामा असो अथवा धोनी असो.
Sakshi is doing right thing..
Sakshi is doing right thing..... कुठल्याही आदर्श पत्नीने हेच केले असते!
I dont know why cant Dhoni just opt out where he has no respect!
मुंबई, पुणे, हैद्राबाद,
मुंबई, पुणे, हैद्राबाद, कोलकाता..
काल पंजाब-पुणे मॅच अगदीच
काल पंजाब-पुणे मॅच अगदीच पिचकवणी झाली. पुण्याची टीम मस्त जिंकली. आता उद्या मुंबई-पुणे. स्टोक्स नसल्याचा फटका पुण्याला बसण्याची शक्यता आहे.
डीडी च्या चाहत्यांसाठी (including me) सांगायचं झालं तर उरलेल्या टीम्स मधे दिल्ली दुसरी आली.
>>उरलेल्या टीम्स मधे दिल्ली
>>उरलेल्या टीम्स मधे दिल्ली दुसरी आली. Wink
कालची मॅच पण हातातली होती..... as always broke down under pressure!
असो..... कालची जिंकली असती तर उगाच आपल्यासारख्यांना चुटपुट लागून राहीली असती की एका मॅचसाठी प्लेऑफ हुकले.... त्यापेक्षा हे बरेच म्हणायचे
"कालची जिंकली असती तर उगाच
"कालची जिंकली असती तर उगाच आपल्यासारख्यांना चुटपुट लागून राहीली असती की एका मॅचसाठी प्लेऑफ हुकले.... त्यापेक्षा हे बरेच म्हणायचे" -
खरय!
एका फिक्स्ड टूर्नामेन्ट साठी
एका फिक्स्ड टूर्नामेन्ट साठी किती ती चर्चा आणि श्रम ?
दिल्ली ने ऑक्शन मधे मस्ट सेट
दिल्ली ने ऑक्शन मधे मस्ट सेट केले होते नि तरिही गंडले.
बंगलोरने ऑक्शन मधे मस्ट सेट केले होते नि तरिही गंडले.
लायन्सनी ऑक्शन मधे टोटल पाट्या टाकल्या नि गंडले
मुंबई ने फारसे उल्लेखनीय बदल केले नाहित नि मस्त खेळलेत.
हैद्राबाद ने फारसे उल्लेखनीय बदल केले नाहित नि मस्त खेळलेत.
पुढच्या ऑक्शन मधे बंगलोर ने काय करावे असे वाटते ?
"पुढच्या ऑक्शन मधे बंगलोर ने
"पुढच्या ऑक्शन मधे बंगलोर ने काय करावे असे वाटते ?" - वॉटसन, गेल ऐवजी कुणीतरी सध्या खेळत असलेले २ परदेशी खेळाडू घ्यावेत. दोन तरी विकेट्स घेणारे, इंपॅक्ट बॉलर्स घ्यावेत.
दिल्ली कडे डिकॉक - ड्युमिनी परतले की त्यांना बाकी काही करायची गरज भासू नये असं वाटतय.
पहिली क्वालिफायर - मुंबई वि.
पहिली क्वालिफायर - मुंबई वि. पुणे.
मुंबई ची पहिली बॉलिंग आहे. तिवारी च्या जागी पार्थिव हा बदल सोडला तर बाकीचे बदल अपेक्षित होते (मॅग्लेनगन, मलिंगा, बुमराह). पुण्याने स्टोक्स च्या जागी फर्ग्युसन / फर्गसन ला घेतलय.
त्रिपाठी, रहाणे, स्मिथ, धोनी, मनोज तिवारी ह्या सगळ्यांना जबरदस्त बॅटींग करावी लागणार आहे.
वानखेडेचं पिच बदललय का?
वानखेडेचं पिच बदललय का? पुण्याचे ८ ओव्हर्स मधे फक्त ४८?
ही मॅच हरले तर मॅक्लेशानच्या
ही मॅच हरले तर मॅक्लेशानच्या कृपेने हरले असे खुशाल धरून घ्या. स्लॉग ओव्हर्स मधे बेदम मार खातो हे माहित असूनही त्याला १९ वी ओव्हर का दिली असावी ? strike बॉलर आहे तर स्लॉग ओव्हर पर्यंत का ठेवतात त्याला ? मलिंगा ह्यापेक्षा काय वाईट करू शकला असत देव जाणे.
काय हे, पुण्यानी मुंबईला
काय हे, पुण्यानी मुंबईला इतक्या किरकोळीत हरवलं तरी पण एक सुद्धा पोस्ट नाही. रोहित शर्माचा डिसीजन चुकला पण बाकी पुण्यानी जबरदस्त बॉलिंग केली. सुंदरच्या बॉलिंगवर स्मिथनी परफेक्ट कॅच घेतले तिथे मॅच फिरली.
(No subject)
वॉशिंग्टन सुंदर हा एक जबरदस्त
वॉशिंग्टन सुंदर हा एक जबरदस्त फाईंड आहे. तो अंडर-१९ मधे पण चमकला होता. आज ज्या पद्धतीनं विकेट खेळली, ते अगदीच अनलाईक वानखेडे होतं. पण मस्त मॅच बघायला मिळाली. पुण्याकडे मुंबईच्या तुलनेत धोनी आणी स्मिथ च्या रूपानं बिग मॅच प्लेयर्स चा अनुभव जास्त होता आणी तोच उपयोगी पडला.
उद्या हैद्राबाद वि. कोलकता.
मूळात मुंबईची strength बॅटींग
मूळात मुंबईची strength बॅटींग असताना बॉलर ला साथ देईल अशा पिचवर मॅच का खेळले ? रोहित शर्मा ला हे बॅटींग पिच वाटले होते. पहिल्या २० ओव्हर्स झोपला होता कि काय
समोरच्या v मधे जास्तीत जात धावा निघाल्या नि साईडस ना मारताना टायमिंग (थांबणार्या बॉलमूळे) चुकत होतो हे जाणवले नाहि का मुंबईला ? किती जण साईडला मारताना बाद झाले.
"रोहित शर्मा ला हे बॅटींग पिच
"रोहित शर्मा ला हे बॅटींग पिच वाटले होते. पहिल्या २० ओव्हर्स झोपला होता कि काय " - त्याच्या पोस्ट मॅच कॉमेंट्स बघून मलाही हाच प्रश्न पडला होता. रहाणे ची बॅटींग, स्मिथ ची विकेट वगैरे गोष्टी बघून बराचसा अंदाज येत होता की स्लो विकेट आहे.
भारी मारली काल पुण्याने मॅच.
भारी मारली काल पुण्याने मॅच.
फायनल मुंबई पुण्याच व्हायला
फायनल मुंबई पुण्याच व्हायला हवी! म्हणजे आख्या आयपीएल मध्ये ४ वेळा मुंबईला हरविता येईल!
मुंबई हा आता पुण्यासाठी एकदम सोप्पा पेपर झाल्या सारखे वाटतेय!
आज हैद्राबाद वि. कोलकता.
आज हैद्राबाद वि. कोलकता. हैद्राबाद चं पारडं जड वाटतय. दोन्ही कॅप्टन्स 'बिग मॅच प्लेयर्स' आहेत. त्यामुळे मजा येईल.
टॉस जिंकून केकेआर ने बॉलिंग घेतलीये. दोन्ही टीम्स आपआपल्या कंफर्ट झोन मधे आहेत. केकेआर ला चेस करायला आणी सनरायझर्स ना डिफेंड करायला आवडतं.
केकेआर ला ६ ओव्हर्स मधे ४८
केकेआर ला ६ ओव्हर्स मधे ४८ धावा करायच्या आहेत. पहिल्या ओव्हर मधे ११/२. भुवी - द बॉस!
केकेआर आता मुंबई शी दुसरी
केकेआर आता मुंबई शी दुसरी क्वालिफायर खेळणार. हैद्राबाद ने जरी उथप्पा, पठाण आणी लिन ला आऊट केलं तरी, गंभीर असेपर्यंत केकेआर ला धोका नव्हता.
आजचे गंभीरचे लुक्स priceless
आजचे गंभीरचे लुक्स priceless होते
पाऊस पडून गेल्यामुळे
पाऊस पडून गेल्यामुळे भुवीसारखा स्विंगवर मास्टरी असणारा गोंलंदाज अतिशय धोकादायक होतो. कोलकताचे नशिब बलवान होते की २० षटकांचा खेळ झाला नाही अन्यथा आरसीबी सारखे ५०च्या आत आउट नक्कीच झाले असते.
(पाऊस पडून गेल्यावर अॅव्हरेज स्वींग बॉलर सुध्दा समोरच्या टीमची दणादण उडवू शकतो. हे स्टुअर्ट बिन्नी ने बांग्लादेश विरुध्द सिध्द केले आहे. इथे तर समोर भुवी, कौल, सिराज सारखे स्वींग बॉलर होते)
शेवटची क्वालिफायर, मुंबई - वि
शेवटची क्वालिफायर, मुंबई - वि. कोलकता.
मुंबई ने ट्टॉस जिंकून बॉलिंग घेतलीये. जॉन्सन खेळतोय.
कोलकता ने अंकित राजपूत ला खेळवलय पठाण च्या जागी.
Pages