आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुमरा ला मानला पाहिजे. कसला शांत होता काल. अविश्वसनीय. मॅच्क्मिलन नि फिंच दोघांनाही काहीही टोटल लागली नाही. मलिंगा असताना बुमराहा ला दिली ह्याबद्दल मुंबई मॅनेजमेंट ला मानले पाहिजे. पण मुंबईला बॅटींग च्या धोरणांबाबत एकदा सिरीयस विचार करायला हवाय. काहीतरी ऑफ झालेय हे नक्की.

डीडी चा पार सुपडा साफ झाला आज. बंगलोर परवडले असे म्हणायचे का आता ?

"बंगलोर परवडले असे म्हणायचे का आता ?" - ह्यावरून एक जोक आठवला. रेसमधे सतत हारणार्या एका घोड्याला त्याचा मालक एका रेस च्या आधी भरपूर दारू पाजतो. हे ऐकल्यावर त्या मालकाचा मित्र त्याला विचारतो, 'मग काही फरक पडला का?' त्यावर तो मालक म्हणतो, "रेस मधे हारलेल्या सगळ्या घोड्यांमधे माझा घोडा सगळ्यात खुश होता." इतकाच फरक आहे आरसीबी आणी डीडी मधे. Wink

आता टुर्नामेंटच्या मध्यावर मागे जाउन सुरुवातीला वर्तवलेल्या अंदाजाच्या पोस्ट वाचायला मजा येतेय!
बऱ्यापैकी अंदाज बरोबर आलेत.... काही अगदी सपशेल चुकलेत सुध्दा! Wink

आज आरसीबी ने चांगलं फायटींग स्पिरीट दाखवलं. मुंबई ला अजूनही १८ रन्स हवे आहेत. आरसीबी जिंकले तर कोहलीसाठी खूप बरं वाटेल. मॅच हारल्यावरचा त्याचा चेहरा बघवत नाही.

चल, पुढच्या सगळ्या मॅचेस RCB जिंकू दे Wink रोहोत वेळेवर फॉर्ममधे आलाय.

कालची warner ची इनिंग कायच्या काय होती राव. पण williamson चा पॅडल शॉट shot of the day होता.

"कालची warner ची इनिंग कायच्या काय होती राव. पण williamson चा पॅडल शॉट shot of the day होता." - सहमत. शेवटच्या बॉल ला जेव्हा युवराज पळाला नाही आणी विल्यमसन रन-आऊट झाला तेव्हाचा त्याच्या चेहेर्यावरचा 'what the ****, ridiculously unbelievable' लूक पटला. त्या बॉल वर विकेट टिकवून युवराज ने नेमकं काय साधलं कुणास ठाऊक?

पुणे बहुदा ही मॅच सहज काढेल असा अंदाज आहे.

बेन स्टोक्स पुण्याच्याच भाषेत सांगायचं तर 'पैसे वसूल' खेळला.

उद्या हैद्राबाद वि. दिल्ली. मिशन कोलकता झालं, मिशन मुंबई झालं आता उद्या हैद्राबाद ला वर जाण्यासाठी दिल्ली प्राण पणाला लावणार का? Wink

दिल्ली ने टॉस जिंकून बॉलिंग घेतलीये. वेगळा अ‍ॅप्रोच आहे. एक तर त्यांची बॅटींग अननुभवी आहे, हैद्राबाद ची बॉलिंग खूप स्ट्राँग आहे आणी जर वॉर्नर आणी विल्यमसन खेळले, तर हैद्राबाद मोठा स्कोअर उभा करू शकतात. अर्थात, you can't keep doing the same thing and expect a different result. काहीतरी वेगळं करायला हवच आहे दिल्ली ला. जर वॉर्नर आणी विल्यमसन ला लवकर आऊट करू शकले, तर दिल्ली ला चांगली संधी आहे. मॅथ्यूज आणी जयंत यादव खेळताहेत.

यादव, मिश्रा आणी शामी नी चांगली बॉलिंग केलीये. अजून ४ महत्वाच्या ओव्हर्स आहेत. आणी नंतर दिल्ली चा अवघड चॅप्टर सुरू होईल - बॅटींग.

युवराज चा कॅच सोडल्यावर त्याने १३ बॉल्स मधे ४१ रन्स काढल्या. इसे कहते है मेहमान-नवाजी! दिल्ली वालोंकी बात ही कुछ और है!

आज दिल्ली चे सगळे बॅट्समेन खेळले. करूण नायर ला जर फॉर्म सापडला असेल, तर दिल्ली साठी एक मोठी गूड न्यूज आहे. पंत ला पडलेला यॉर्कर खतरनाक होता. शामी ने वॉर्नर ला टाकलेल्या यॉर्कर ची आठवण झाली. पण नायर आणी अय्यर ने विकेट्स टाकायला नको होत्या. अँडरसन कडून दिल्ली ला खूप जास्त अपेक्षा आहेत. विशेषतः मॉरीस परत गेल्यावर अँडरसन वर बॅटींग ची जवाबदारी जास्त असेल.

हैद्राबाद कडून युवी छान खेळला, पण युवराज च्या बाबतीत (आता) कन्सिस्टंसी नाहीये. भुवनेश वेगळ्याच जगात वावरत असल्यासारखा बॉलिंग करतो. मस्त! रशिद खान चा एक्स फॅक्टर अजून आहे की ईतक्यातच त्याला फिगर आऊट केलय कळत नाहीये. कौल पेक्षा सिराज जास्त भेदक बॉलर वाटतो.

उद्या कोलकता वि. पुणे. कोलकता आयपीएल मधली सगळ्यात सेटल्ड टीम आहे आणी पुण्याकडे स्मिथ, धोनी, स्टोक्स, ताहीर चार अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्रिपाठी, रहाणे, तिवारी, धोनी, स्मिथ, स्टोक्स वि. नरीन, कुल्टर-नाईल, उमेश आणी कुलदीप यादव अशी लढत बघायला मजा येईल.

दर सीझन प्रमाणे यंदाही मी सुरूवातीला "आयपीएल बोअर आहे" पासून सुरूवात करून कधी मुंबई, तर कधी पुणे तर कधी एखादी इण्टरेस्टिम्ग टीम (हैदराबाद सारखी) असे सपोर्ट करत "वॉर्म अप" झालो आहे. माझ्यासारखे अनेक असतील Happy

उद्याची मॅच इण्टरेस्टिंग असेल एकदम. बघायला हवी. इथे सकाळी १०:३० ला असल्याने बरे आहे. साहेबांच्या जमान्यानंतर अजून आवर्जून सकाळी उठून गेम्स बघितलेल्या नाहीत Happy

"दर सीझन प्रमाणे यंदाही मी सुरूवातीला "आयपीएल बोअर आहे" पासून सुरूवात करून कधी मुंबई, तर कधी पुणे तर कधी एखादी इण्टरेस्टिम्ग टीम (हैदराबाद सारखी) असे सपोर्ट करत "वॉर्म अप" झालो आहे. " - परफेक्ट वेळ आहे फा. प्लेऑफ्स च्या जवळ आयपीएल जास्त चुरशीची होते. अर्थात शेवटी काही अर्थशुन्य मॅचेस पण असतील (७व्या आणी ८व्या नंबर मधली वगैरे), पण त्याला ईलाज नाही.

माझा अंदाज: आत्ता जे टॉप ४ आहेत, तेच रहातील.
माझी सुप्त ईच्छा: त्या टॉप ४ मधल्या कुणाला तरी खाली खेचून डीडी ने त्या चारात जावे.

हो फेरफट्का, पाहातच आहे.

माझी सुप्त ईच्छा: त्या टॉप ४ मधल्या कुणाला तरी खाली खेचून डीडी ने त्या चारात जावे. >> आणखी सुप्त इच्छा, मुंबई व पुणे सोडून इतर दोघांपैकी Happy

काल दिल्ली चा ईतका मस्त विजय होऊनही स्वरूप कडून एकही कॉमेंट नाही म्हणजे आश्चर्य आहे. टीम बदललीस का रे?

आज पुणे वि. कोलकता. पुण्याची टॉस जिम़्ऊन बॉलिंग आहे. उथप्पा इंज्युअर्ड. सुर्यकुमार यादव खेळतोय.

अरे वाचतोय.... लिहावेसे नाही वाटले काही!

गेल्या काही मॅचेसमध्ये दिल्लीने इतका अपेक्षाभंग केलाय की एखाद्या विजयाने "येह जख्म नही भरेगा" Wink

हातातल्या मॅचेस घालवून आता नंतरनंतर अगदी हातघाईवर येतात हे लोक..... यावेळी तर मैदानावरच्या परफॉर्मन्सइतक्याच टॅक्टिकल मिस्टेक्स जबाबदार आहेत..... काय विचार करतात आणि काय डोकी लावतात तेच कळत नाही!

आपल्यापेक्षा द्रवीड-ॲप्टॉन वगैरेना जास्त कळत असेल म्हणायचे आणि सोडून द्यायचे!

१९व्या ओव्हरच्या लास्ट बॉलवर शेल्डन जॅक्सनने ओव्हरथ्रो केल्यानंतर गंभीरची reaction बघितली का?

"गेल्या काही मॅचेसमध्ये दिल्लीने इतका अपेक्षाभंग केलाय की एखाद्या विजयाने "येह जख्म नही भरेगा" - सहमत!! मी तर गेले काही दिवस फुल्ल टू फिलॉसॉफिकल झालोय डीडी च्या बाबतीत.

आज त्रिपाठी मस्त खेळला. शतक थोडक्यात हुकलं. ईतके दिवस महाराष्ट्राकडून रणजी खेळणार्या त्रिपाठी चं नावही कुणी ऐकलं नसेल (ह्या धाग्यावर अपवाद सापडतील ही आशा आहे), पण आयपीएल ने त्याला ओळख मिळवून दिली. तसच काहीसं अंकित बावणे चं व्हावं असं वाटतं.

"१९व्या ओव्हरच्या लास्ट बॉलवर शेल्डन जॅक्सनने ओव्हरथ्रो केल्यानंतर गंभीरची reaction बघितली का?' हो. गंभीर आणी कोहली कॅप्टन्सी टेंपरामेंट च्या बाबतीत बर्याच बाबतीत सारखे वाटतात. They just hate losing and they don't even try to hide it.

उद्या डीडी - वि. गुजराथ लायन्स. गुजराथ कडे आता ५ च फॉरिन प्लेयर्स उरले आहेत. त्यातला एक यूएई चा सूरी आहे. म्हणजे तो प्रश्न सुटल्यात जमा आहे. डीडी बहूदा हैद्राबाद विरुद्ध खेळलेली च टीम खेळवेल. जर झहीर फीट झाला तर शामी ऐवजी तो आत येईल. पण तो नसणं दिल्ली साठी ब्लेसिंग इन डिसगाईज आहे.

आयपीएल मध्ये
मॅन ऑफ द मॅच
सिरिज,
फायनल पर्पल कॅप
फायनल ऑरेंज कॅप
चँपिअन टीम
रनर अप टीम
वगैरे

ह्यांचे मॉनेटरी रिवार्ड्स काय आहेत.

Pages