आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"मिश्रा.... मिश्रा..... पहील्या मॅचला असा खेळला असतास तर गड्या!" - हो ना! त्या चार क्लोज मॅचेस पैकी ती पहिली होती.

दिल्ली चे ईंडियन बॅट्समेन अननुभवी आहेत जे त्यांच्या इनकन्सिस्टंट परफॉर्मन्सेस मधून दिसतं.

ऑन इट्स ओन, आजची मॅच जबरदस्त झाली.

आज पंजाब वि. मुंबई. मुंबई चा प्लेऑफ मधला प्रवेश निश्चित असला, तरी त्यांना मोमेंटम पकडायला हवा. हैद्राबाद विरुद्ध ते जसे हारले, ते बघता, आज कडक खेळ अपेक्षित आहे.

पंजाब साठी तर प्लेऑफ मधे मुसंडी मारण्यासाठी लढणं गरजेचंच आहे. त्यामुळे ही मॅच जबरदस्त होईल अशी अपेक्षा आहे.

ईतक्या महत्वाच्या मॅच ला मॅक्सवेल ला ईशांत शर्मा ला खेळवायची दुर्बुद्धी का व्हावी?

मॅच संपल्यावर जर ईशांत शर्मा चांगला खेळला असेल, तर मी ते कबूल करीनही, पण तरी हे वरचं विधान बदलणार नाही Happy

इशांत शर्मा सोडून दुसरा बरा बॉलर नसेल रे मॅक्सवेल कडे.. तो तरी काय करणार बिचारा.. त्यातल्या त्यात जास्त अनुभव असलेला बॉलर खेळवलाय.. पण दुसरी बॉलिंग असल्यामुळे फरक पडणार नक्कीच..

मलिंगा एकदम हरवलेला वाटतो आजकाल. काय प्लॅन होते देव जाणे पण भज्जी ने पहिल्या ओव्हरमधे एव्हढे लेंग्थ बॉल का दिले मॅक्सवेलला ? तो मारताना मिसहिट होईल असा काही प्लॅन होता का देव जाणे ? साहाची सेंच्युरी झाली तर पंजाब हरणार हे नक्की, अमला ने नवस घेतला असेल Wink

आज मुंबईची आतिषबाजी बघायला मिळणार बहुतेक...

पर्फेक्ट कॅचेस मध्ये मला तरी संजय शर्माची (कॉट-अ‍ॅन-बोल्ड) कॅच सरस वाटतेय, एस्पेशियली फॉलो-थु मध्ये घेतल्यामुळे...

मार्श गेल्यावर मुंबईने साहा आणी पटेल ला फारसं काही करू दिलं नाहीये. ८-९-७ ईतकेच रन्स निघाले आहेत १७-१८-१९ ओव्हर्स मधे. पंड्याने शेवटच्या ओव्हर मधे परत १६ रन्स दिले. अर्थात काहीही झालं तरी २३१ चं टारगेट खूप मोठं आहे. मुंबईतर्फे कुणीतरी blinder इनिंग खेळायची गरज आहे. नाहीतर प्रीती च्या गालावरची खळी पहायला मिळेल. Happy

संजय शर्मा >> संदीप शर्मा

मला रोहित शर्मा ची मिड विकेट्वाली अधिक सरस वाटलेली. reflex वर घेतलेले कॅच जबरदस्त असतात हे मान्य करूनही त्यात नशिबाचा भाग असतो असे मला वाटते. ह्याउलट शर्माचा कॅच anticipate केला होता नि लेफ्ट साईडला मूव्ह होउ लागला होता. त्यावरही बॉल आवाक्यात नाही बघितल्यावर त्याने डाव्या बाजूला झोकून एका हाताने बॉल पकडला होता नि खाली पडताना बॉल आपटून निघू नये म्हणून दुसर्‍या हाताचा support दिला होता. split second मधे कॅच घेताना जे reflex मधे होते त्यापेक्षा कॅच घेण्याच्या प्रयत्नामधे जाणीवपूर्वक केलेले विचार जाणवले म्हणून हा कॅच अधिक आवडला. हेच सगळे पंत ने घेतलेल्या कॅचलाही तंतोतंत लागू होते पण पंत कडे किपिंग ग्लोव्ह्ज होते नि वेळ भरपूर असूनही त्याला judge करता आला नाही हे खटकले. पांडे ने long on वर आडवा सूर मारत उजव्या हाताने पकडायचा प्रयत्न केलेला एक कॅच जर पकडला गेला असता तर best catch झाला असता.

बरोबर संदिप शर्मा.

बाकि, या अशा आउटस्टँडिंग कॅचेस पकडण्यात रिफ्लेक्सेस बरोबर नशिबाचाहि भाग असतोच. संदिप शर्माची कॅच मला वेगळी वाटते कारण (बॉलर अस्ल्याने) इतरांसारखा लगोलग कॅच पकडायला तो "रेडी" नव्हता...

मुंबई जिंकता जिंकता हरले, पोलार्ड चा धाव न घेण्याचा डिसीजन महागात पडला. शेवटच्या दोन ओव्हर जबरी पडल्या.

एके काळी ईतक्या रन्स वन-डे मधे व्हायच्या. काहीच्या काही रन्स चा पाऊस पडला वानखेडेवर. पंजाब हेल्ड देअर नर्व्ह!

जबरा मजा आली आज. आता हैद्राबाद गॅस वर Happy स्टोक्स आहे कि गेला ? तोही गेला असेल तर पुण्याचे काय होईल ?

स्टोक्स आहे कि गेला ? - स्टोक्स आहे अजून. ताहीर आणी फाफ गेले. म्हणजे उद्या झंपा, स्मिथ, स्टोक्स आणी ख्रिश्चन (का क्रिस्तीयन?) खेळणार पुण्याकडून. रंगतदार अवस्थेत आलीये आयपीएल.

पुणे - दिल्ली मॅच. दिल्ली ने टॉस जिंकून बॅटींग घेतलीये. सरप्रायझिंग! पण बरं झालं. सतत २००+ स्कोअर्स चेस करणं सोपं नाहीये.

आज दिल्ली ने तीनच परदेशी खेळाडू खेळवले आहेत.

पुण्यासाठी अगदी अत्यावश्यक नसला, तरी विजय आवश्यक आहेच. बघू काय होतं ते.

भंकस केली राव पुण्यानी, एकदम बंडल हरले, तो तिवारी स्वतःला धोनी समजला बहुतेक, आधी नुसत्याच एक एक धावा काढल्या, तेव्हाच मारायला पाहिजे होती एखादी छकडी,

जबरदस्त झाली मॅच. दिल्ली held their nerve. शामी ने धोनी ला डायरेक्ट हीट वर केलेला रनआऊट अमेझिंग होता. धोनी ला पूर्णपणे unexpected होता. माझ्या मते तो टर्निंग पॉईंट होता.

दिल्ली चा असा परफॉर्मन्स बघितला की I wonder, what it could have been!. जर त्या चार क्लोज मॅचेस पैकी दोन जरी जिंकल्या असत्या, तर दिल्ली आज टॉप फोर मधे असती. असो.

उद्या ची पहिली मॅच हैद्राबाद - गुजराथ, हैद्राबाद साठी महत्वाची आहे.

दुसरी मॅच क्रॅकर असणार आहे - मुंबई - कोलकता.

I think it is pretty much done deal now, MI and KKR will be Top 2 teams (order yet to be decided). Pune will be third team for sure.

का का? असंच का म्हणे?
हैद्राबाद येणार तीन नंबर वर, उद्याची मॅच जिंकून,
जर पुणे परवा जिंकलं तरंच तीन नंबर वर येतील, नाहीतर टाटा बाय बाय
आणि उद्या जर मुंबई जिंकली तर केकेआर तीन नंबर फेकले जातील, पण त्यांचा नेट रनरेट जास्त असल्याने ते पुण्याच्या वरती राहतील,

अरे पंजाब मागच्या तीन मॅचेस अटितटीला आणून जिंकलय, दर वेळी फासे बरोबरच पडतील असे नाही म्हणून पुणे तिसरी टीम असेल असे. law of averages.

पुण्याने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला.

आता परिस्थितीनुसार

हैद्राबाद * गुजरात = यात गुजरात शेवट गोड करण्याच्या दृष्टीकोणातून उतरेल. हैद्राबादला विजय अत्यावश्यक आहे. आरसीबी बरोबरचा १ पॉईंट महत्त्वाचा ठरतोय. फक्त एक विजय आणि १७ अंक घेऊन सरळ दुसर्‍या स्थानावर पोहचण्याची संधी हैद्राबादला मिळणार आहे.

मुंबई * कोलकता = दोन्ही संघ १ ल्या स्थानासाठी खेळतील. जर कोलकता जिंकली तर दोन्ही संघाचे १८ -१८ अंक होतील आणि नेटरनरेट कोलकताचा सर्वोत्तम असल्याने मुंबईला ढकलून ते पहिल्या अढळस्थानी विराजमान होईल. आणि मुंबई दुसर्‍या स्थानी येतील.

पंजाब * पुणे = वरील दोन्ही सामन्यात हैद्राबाद आणि कोलकता जिंकले तर पुणे जिंकून फक्त ३ र्‍या स्थानी येऊ शकतील त्यांचा नेटरनरेट मायनस मधे असल्याने १८ अंक घेऊन सुध्दा ते कोलकता व मुंबईच्या मागेच राहतील. पंजाबला ही मॅच जिंकावीच लागणार आहे. जर ते जिंकले आणि हैद्राबाद सुध्दा जिंकले तर पुणे स्पर्धेबाहेर होईल आणि मुंबई (जर जिंकली), हैद्राबाद (जर जिंकली), कोलकता(जर हारली), आणि पंजाब असा क्रम लागणार. थोडक्यात पंजाब जरी जिंकली तरी ती काठावर पास म्हणजे ४थ्या स्थानावर राहिल.

Delhi Daredevils win over Rising Pune Supergiant on Friday night has set up the Indian Premier League for an exciting weekend. Four teams – Sun Risers Hyderabad (15 points from 13 matches), Kolkata Knight Riders (16 from 13), Rising Pune Supergiant (16 from 13) and Kings XI Punjab (14 from 13) - are playing for three places in the playoffs. Mumbai Indians (18 from 13) have already qualified, but would want to cement their place in the top 2.

Three matches. Eight possible outcomes.

The last match of the league phase – DD vs RCB – is inconsequential, as both team are out of the contention. Results of the remaining three matches – SRH v GL, MI v KKR and KXIP v RPS – will determine the teams that go through and the teams that top the table. Let’s look at each combination of results:

1)If SRH, KKR and RPS win, the teams that will qualify are MI 18, KKR 18, RPS 18, SRH 17. MI and KKR have better NRR so are likely to get the top two, while RPS and SRH will end up playing the eliminator.

2) If SRH, KKR and KXIP win, the teams that will qualify are MI 18, KKR 18, SRH 17 and KXIP 16. KXIP will edge out RPS on better NRR.

3) If SRH, MI and RPS win, the teams that will qualify are MI 20, RPS 18, SRH 17 and KKR 16. MI and RPS end up as the top two, while KKR and SRH face off in the eliminator.

4) If SRH, MI and KXIP win, the teams that will qualify are MI 20, SRH 17, KXIP 16 and KKR 16.

The results above are based on an SRH win in the first match. Now let’s look at what happens if SRH loses.

5) If SRH loses, but KKR and RPS win, the teams that will qualify are MI 18, KKR 18, RPS, 18 and SRH 15.

6) If SRH loses, but KKR and KXIP win, the team that will qualify are MI 18, KKR 18, KXIP 16 and RPS 16. SRH will be crushed if such a scenario unfolds.

7) If SRH loses, but MI and RPS win, the teams that will qualify are MI 20, RPS 18, KKR 16, SRH 15.

8) If SRH loses, but MI and KXIP win, then SRH gets knocked out. The team that qualify are MI 20, tie on 16 points among KXIP, KKR and RPS. KKR will likely be in the top 2 on NRR unless they lose badly to MI and KXIP wins big.

What each team needs to do?

SRH: Must win its match to be sure of qualifying for the playoffs. If it wins, it has a chance of making the top two if MI and KXIP win their matches. If it loses, SRH will be praying for an RPS win against KXIP to qualify.

MI: The table toppers are sitting pretty with 18. A win will give them a certain place in the top 2. Even if they lose, they should make the top 2 on the strength of their NRR.

KKR: KKR are almost guaranteed a place in the playoffs because of their strong run rate, but must win their encounter against Mumbai to get a top 2 berth. Even if RPS wins and ties with KKR at the top of the table, the latter will edge RPS out of the top because of a better NRR

RPS: With the poorest run rate of the lot, RPS will be keenly watching today’s encounters. If SRH loses, Pune will qualify even if they lose their last match. If SRH wins, they will have to beat KXIP to qualify. If RPS win their final game, they can eye a top 2 finish provided MI beat KKR.

KXIP: The equation is simplest for KXIP. They must beat RPS or they are out. Of the two matches, they would be rooting for SRH and KKR to lose. Then, if they beat RPS by a big margin, they could technically hope for a top 2 finish, edging out KKR on NRR. That would be one of the most dramatic turnarounds of the IPL.

Source: http://www.moneycontrol.com/news

Pages