आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्थप्पा तसा काही मॅचेस खेळलाय पण तो तिथे 'नॉर्मल' खेळलाय तेंव्हा त्याचे नसणे साहजिक आहे. फक्त आजचे त्याचे effortless shots बघून नि ज्या तर्‍हेने त्याने ताहिरचा कोथळा काढून पुण्याला फुस्स केले ते बघून उगाचच चूट्पूट लागली एव्हढेच.

जाता जाता, आजच गावस्कर कुलदीप यादवचे भविष्य उज्ज्वल आहे म्हणालाय Happy

दिल्ली डेअरडेव्हिल्स ने क्विंटन डी कॉक ला रिप्लेसमेंट म्हणून मर्लॉन सॅम्युअल्स ला घेतलय. मला प्रश्न पडलाय की त्यांना आज अचानक कसं कळलं की डी कॉक खेळत नाहीये ते. का रोल कॉल घेता घेता अचानक लक्षात आलं की अरेच्च्या, बरेच दिवस बघतोय डी कॉक दिसत नाहीये, म्हणजे बहूदा खेळणार नसावा ह्या सीझन ला.

आज रैना वि. विको. बंगलोर पेटून खेळेल असं वाटतय.

टेक्निकली बंगलोर आणि गुजरातला ईथून पुढे खरंच चांस आहे का?
डीडी पुढ्च्या दोन्ही जिंकून काही तरी करू शकते अशी अपेक्षा तरी करू शकतो.

केकेआर, मुंबई, हैद्राबाद आणि पुणे हे सेमीज मधे येतील असे वाटते.

बंगलोर ने मागच्या वर्षी असच सगळे अंदाज चुकवत आणी शेवटच्या बर्याच मॅचेस सलग जिंकत (७-८?) फायनल मधे प्रवेश मिळवला होता आणी त्या मोमेंटम वर ते फायनल जिंकतील असं वाटलं होतं.

डीडी कडून अपेक्षा खूप आहेत, पण बहुदा flatter to deceive होईल. Sad

१३०+ टोटल आणी चहल, बद्री (थोडासा नेगी सुद्धा) चा स्पिन अ‍ॅटॅक असताना, ह्या नवीन बंगलोर पिच वर आरसीबी ला write-off नाही करता येणार. जर दव नाही पडलं, तर मॅच अजूनही ईंटरेस्टींग होऊ शकते.

बंगळुरू संघानं आता पुढील सामने सरावासाठी खेळावे..
आता ते अभिमानाने सांगू शकतील विजेत्यांचा यशात आमचा मोलाचा वाटा! Wink

RCB आता अभिमानानं म्हणू शकतात, 'विको म्हणे आता उरलो.... अपकारापुरता'. आता ते 'हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे' ह्या न्यायानं खेळतील.

उद्या दिल्ली ने सिरियसली करूण नायर ला एक मॅच बसवून बघावं. आत्ता आहे, त्यापेक्षा वाईट काही होईल असं वाटत नाही. अंकित बावणे ला ट्राय करायला हरकत नाही. आणी ईंडियन बॅट्समेन ना एका पाठोपाठ पाठवण्यापेक्षा थोडं मिक्स & मॅच करावं. उदा. अय्यर आणी बिलींग्ज, ऋषभ पंत, अँडरसन, संजू / बावणे, मॉरीस, बावणे / संजू वगैरे. अर्थात अनाकलनीय बदल करण्यात दिल्ली चा हात कुणी धरू नाही शकत.

उद्याची दुसरी मॅच - हैद्राबाद - पंजाब पण चांगली होईल असं वाटतय. सॅमी पंजाब कडून खेळला तर मजा येईल.

अर्थात अनाकलनीय बदल करण्यात दिल्ली चा हात कुणी धरू नाही शकत. >> हे डोके upton चे असावे असे मला वाटते.

विको ऑसी सिरीज पासून विचित्र अडकला आहे. त्याचे पूर्ववत होणे Champions Trophy च्या द्रुष्टीने जबरदस्त जरुरी आहे. हीच बाब रोहित बद्द्ल. त्यासाठी पुढचे सामने ह्या दोघांना जबरदस्त लागाला हवेत. रैना परत पूर्वीसारखा मनमोकळा खेळायला लागलाय. मनोज तिवारीच्या झटक्यापासून जुना धोनी परत आलाय. Add Raana, Pant and it will be competitive team.

अप्टन च दिल्ली चा मुख्य कोच आहे ना? शक्य आहे.

चँपियन्स ट्रॉफी खेळणार आहे का इंडिया? टीम पाठवायची डेडलाईन उलटुन गेलीये. आयसीसी बरोबर पैशाचं गणित सुद्धा फसलय.

DD needs to play below 11 today and in the same sequence:
Billings, Samson, Iyer, Pant, Anderson, Bawane, Morris, Rabada, Zaheer, Nadeem & Mishra

लोकल भारतीय फलंदाजांच्या lineup मध्ये बिलिंग्स हवाच, तो आहे तोपर्यंत त्याला नीट वापरले पाहिजे, कमिन्स कंट्युनिअसली खेळतोय...... त्याला एखादी मॅच विश्रांती देउन बघायला हरकत नाही, रबाडा मागची मॅच चांगला खेळला... कोलकाताच्या पीचवर तो यशस्वी ठरु शकतो..... पुढच्या दृष्टीने ॲंडरसनला पण सेटल व्हायला वेळ दिला पाहिजेल.... मॉरीसनंतर तोच त्याच्या रोलच्या थोडाफार जवळ जाउ शकतो
नदीमच्या पहील्या दोन मॅचनंतरच्या परफॉर्मन्सनंतर त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय पटत नाही.... He needs to be in team and bowl in powerplay
कोलकत्त्याचे पीच बघता झहीरला बहारदार कामगिरी करण्याची आज चांगली संधी आहे!

माती खाल्ली दिल्ली ने परत आज. ईथून पुढे दिल्ली पाचव्या नंबर पर्यंत जरी आली तरी मी देवावर, भुतावर आणी आत्तापर्यंत ऐकलेल्या चमत्कारांनी भरलेल्या पुराणकथांवर विश्वास ठेवीन बहुदा. Wink

अत्यंत अनाकलनीय टॅक्टीक्स आहेत दिल्लीच्या. ४ ते १२ ओव्हर्स मधे संजू आणी श्रेयस ने बाऊंड्री मारायचा प्रयत्न सुद्धा नाही केला. फक्त बॉल्स थर्डमॅन, फाईन लेग, स्क्वेअर लेग आणी व्ही च्या पट्ट्यात तटवत सिंगल्स घेत होते. खरं तर एकाच्या जागी दोन वगैरे सुद्धा प्रयत्न दिसले नाहीत. करूण नायर ने अजून नेमकं काय केलं की डीडी च्या थिंक टँक ला कळेल की तो आऊट ऑफ फॉर्म आहे? त्याचे बाऊंड्री शॉट्स वगळता तो प्रत्येक बॉल ला चाचपडत होता.

केकेआर चं कौतुक करावं तितकं कमी आहे. सगळे रिसोर्सेस ईतके व्यवस्थित वापरून ते टॉप ला गेले आहेत. वेल प्लेड केकेआर आणी much deserved victory!

हैद्राबाद-पंजाब सुरू झालीये.

आजपर्यंत डीडीची फील्ड प्लेसमेंट एकदम ॲक्युरेट असायची ..... आज काय फिल्डींग लावलेली देव जाणे!
बॅटींगबद्दल बोलायलाच नको.... १८०-१९० पर्यंत जाऊ शकणारा स्कोअर १६० वर आणून ठेवला!

"आज काय फिल्डींग लावलेली देव जाणे!" - झहीर बाहेर गेल्याचा फटका बसला फिल्ड प्लेसिंग ला. बॅटींग बद्दल एक मिनीट मौन पाळू.

कुल्टर-नाईल चे यॉर्कर्स जबरदस्त होते.

वॉर्नर - धवन जबरदस्त खेळताहेत.

"आज काय फिल्डींग लावलेली देव जाणे!" - झहीर बाहेर गेल्याचा फटका बसला फिल्ड प्लेसिंग ला. >> झहीर असतानाही फारसे काही वेगळे नव्हते. बरोबर मिश्रा कि पोजिझनमधे होतो दर वेळी. अतिशय अनाकलनीय प्रकार होता सगळा. Eden Gardens वर कमिन्स, मॉरिस, रबाडा, झहिर नि अँडरसन हा पेसर्सचा ताफा घेऊन जर जिंकता येत नसेल तर दिल्ली तळालाच असलेली बरी.

ईशांत शर्मा आपल्या रेप्युटेशन ला जागून बॉलिंग करतोय. १९ व्या ओव्हर मधे त्याला २० रन्स काढल्या. हैद्राबाद च्या बॉलिंग अ‍ॅटॅक कडे पहाता २००+ स्कोअर करायची त्यांना परवानगी देऊ नये. १३०-१४० ला त्यांनी इनिंग डिक्लेअर केली तरी चालेल. मॅच ईंटरेस्टींग तरी होईल.

इशान किशन कसला क्लीन हीटर आहे! व्वा! मस्त! मॅक्कलम ने विकेट फेकली. रैना आणी फिंच चांगल्या बॉल्स वर तरी आऊट झाले, पण गुजराथ एकदम बॅकफूट वर गेले आहेत.

रोहित शर्मा ने भुवया कोरल्या आहेत का? 'अगबाई अरेच्च्या' दिसतोय.

फेनॉमेनल ! गुजरात हरले त्याचे वाईट वाटतेय, पण मुंबई जिंकल्याचा आनंद जास्त ! बुमरा !!

गुजरातची फिल्डिंग ऑस्स्सम !

डीडी नुसतं पॉईंट्स टेबल च्याच बॉटम ला नाही तर रॉक बॉटम ला गेले आहेत. ह्यापेक्षा जास्त वाईट खेळता येईल का? पंजाब कडून संदीप शर्मा ने मस्त बॉलिंग केली.

पुढची मॅच जबरदस्त होईल कोलकता वि. हैद्राबाद. दोन्ही टीम्स मस्त आहेत.

Pages