Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15
ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दयनीय म्हणावं की पथेटिक?:
दयनीय म्हणावं की पथेटिक?:
Has President Trump told you about the time the head of the Boy Scouts called to say his was the best speech ever delivered to the more than century-old organization? What about when the president of Mexico picked up the telephone to let him know that his tough enforcement efforts at the border were paying off handsomely?
The anecdotes, both of which Mr. Trump told over the last week, were similar in that they appeared to be efforts to showcase broad support for the president when his White House has been mired in turmoil. But they also had another thing in common, the White House conceded on Wednesday: Neither was true.
दयनीय म्हणावं की पथेटिक?: >>
दयनीय म्हणावं की पथेटिक?: >> खरच आता आपलीच कीव येते रे.
अध्यक्ष ट्रम्प यान्नी रशिया
अध्यक्ष ट्रम्प यान्नी रशिया विरुद्ध बन्धने आणणार्या बिलावर स्वाक्षरी करुन त्याला मान्यता दिली. त्याशिवाय काही मार्ग शिल्लक नव्हता (बिल परत पाठवणे अशक्य होते).
रशिया ७००+ अमेरिकन राजनैतिक अधिकार्यान्ना रशियामधुन हाकलणार आहे या घटनेबाद्द्ल ट्रम्प महाशयान्चे अवाक्षर किव्वा ट्विटही नाही. पण स्वाक्षरी केल्यानन्तर त्यान्नी रशिया विरुद्धच्या बिला बद्दल नापसन्ती व्यक्त केरुन त्रारगा नोन्दवला. काँग्रेसपेक्षा परदेशी देशांशी (रशिया, नॉर्थ कोरिया, चिन... ) ते जास्त चांगले व्यवहार करू शकतात असा त्यान्चा दावा आहे.
<<दयनीय म्हणावं की पथेटिक?: >
<<दयनीय म्हणावं की पथेटिक?: >> खरच आता आपलीच कीव येते रे>>
---- ३ वेळा धडधडित खोटे (जनरल्स, सैन्य अधिकार्यान्शी ट्रान्स जेन्डर... , बॉय स्काउट, मेक्सिको फोन).
सर्व मस्त गोन्धळ आहे. जॉन केलीने स्कारामुची सारख्या वाचाळाला बाहेरचा रस्ता दाखवलाच आहे, बहुधा तो ट्रम्पचा स्मार्ट फोन जप्त करेल. सर्व स्टाफ (यात कुशनर, इवान्का, महारथी पण आले) त्यालाच रिपोर्ट करणार आहे.
नॉर्थ कोरिया आणि अमेरिका
नॉर्थ कोरिया आणि अमेरिका दोन्हीकडे सर्वोच्च नेतृत्व टोकाचे बेभरवशाचे आहे... कालचे fire, fury, power... असे शब्द वापरल्यावर टिलर्सन किव्वा डिफेन्स सेक्रेटरी काय डोम्बल्याची डिप्लोमॅसी करणार? आज ट्रम्प थोडे मवाळ झाले आहेत पण काल थोडा सय्यम दाखवायचा आणि सेक्रेटरीन्ना परिस्थिती हातळू द्यायची...
स्फोटक असलेली परिस्थिती निवळण्यास कोण मदत करेल ?
Hi Genuine question. Is the
Hi Genuine question. Is the preemptive strike going to be one of the possibilities? Share markets are already spooked here in India. Fire and fury as the world has never seen before is to be taken literally or to be ignored like the usual speeches? Is this kind of conflict needed right now? CNN is already speaking a different language.
http://edition.cnn.com/2017/08/11/politics/us-north-korea-strike-first/i...
<<<या घटनेबाद्द्ल ट्रम्प
<<<या घटनेबाद्द्ल ट्रम्प महाशयान्चे अवाक्षर किव्वा ट्विटही नाही. >>>
काल रात्री ८ वाजता ट्रंपने सांगितले की धन्यवाद रशिया - नाहीतरी इतक्या लोकांची तिथे गरज नव्हतीच, आता आमचे पैसे वाचले.
<<<<“I want to thank him because we’re trying to cut down our payroll, and as far as I’m concerned I’m very thankful that he let go of a large number of people because now we have a smaller payroll,” >>>> politico.com
किती पैसे वाचणार देव जाणे, फार तर यांचे अलाउन्स वाचतील, पण त्यांना काय नोकरीवरून काढून टाकता येणार नाही सहजासहजी!
बाकी आता सगळे जनरल्स, सगळे कॅबिनेट मेंबर्स, ट्रंपचे सगळे सल्लागार यांनी न्यू जर्सीत येऊन ट्रंपच्या तोंडावर पट्टी नि हातात बेड्या घालाव्या! कोरियाचा नेता तर अत्यंत माथेफिरू मनुष्य! अमेरिकेशी पंगा म्हणजे काय खेळ आहे का? पण त्याचे उत्तर म्हणजे आपणहि तेव्हढाच माथेफिरूपणा करावा असे नव्हे. पण ट्रंपचे काही सांगता येत नाही!
ट्रम्प भाऊंना एका बाबतीत
ट्रम्प भाऊंना एका बाबतीत मानले पाहिजे. १५-२० वर्षापुर्वीच्या मुलाखतीतसुद्धा तो नॉर्थ कोरियाला वेळीच आवरा म्हणत आहे. तेव्हा त्यांच्याकडे अण्वस्त्रेदेखील नव्हती.
अहो सर. माणूस टिव्ही वर आपण
अहो सर. माणूस टिव्ही वर आपण स्वतः काहीतरी आहोत ह्या आविर्भावात जर सतत काहीतरी वटवट करत असेल तर कधी तरी त्याचा तुक्का लागून एखादा अंदाज बरोबर येतोच. जे ह्या भौला समजत होतं ते तेव्हाच्या राष्ट्राध्यक्षांना (जे अडवायजर/स्ट्रटिजिस्ट लोकांचे म्हणणे एकायचे) समजत होतच की. ट्रंप बरच काही बोललेला आहे मागच्या कित्येक वर्षात आणि त्याचा ओवरॉल हिट रेशियो बघितला मग लक्षात येइल की नेमकं तो किती अकलेच्या गोष्टी करतो ते.
“I want to thank him because
“I want to thank him because we’re trying to cut down our payroll, and as far as I’m concerned I’m very thankful that he let go of a large number of people because now we have a smaller payroll,” >> म्हणजे ह्या लोकांना स्टेट डीपार्टमेंट इतरत्र बिनपगारी प्लेस करणार असा समज असावा त्याचा.
एकदम चर्चिलच आहे तो नव्या
एकदम चर्चिलच आहे तो नव्या युगाचा
पण सिरीयसली मानायचेच असेल भौ ला, तर रिपब्लिकन स्टेज वर उभे राहून बिनधास्तपणे इराक वॉर म्हणजे मोठी चूक होती हे जेव्हा त्याने २०१५ मधे सांगितले, तेव्हा ते ऑडेशियस होते. तोपर्यंत रॉन पॉल व रॅण्ड पॉल सोडले तर ते कोणी मांडलेले नव्हते, आणि इतके आक्रमकरीत्या कोणीच नाही, आणि हे दोघेही तसे आउटसाइडरच, म्हणजे बेस चा फार सपोर्ट नसलेले समजले जात. तसेच जेव्हा "रेस" सुरू झाली तेव्हा हुकमी कॅण्डिडेट असेल असे वाटले होते त्या जेब बुश ची भर स्टेज वर बालिश हेटाळणी करून त्याने मोठा रिस्क घेतला होता. It could have gone in any direction. नंतर पोप बद्दलही बोलला. पण तो पर्यंत अॅण्टी-हिलरी सेण्टिमेण्ट इतके होते की काही फरक पडला नाही.
अनेकांना लक्षात असेल की सुरूवातीच्या डिबेट्स मधली त्याची अनेक वाक्ये अगदी बिन्डोक नसायची. नंतर काय झाले माहीत नाही
ट्रम्प मनात येईल ते बोलतो,
ट्रम्प मनात येईल ते बोलतो, आपल्या बाळासाहेबांसारखं. लोकांना आवडतं ते त्याचं माणसासारखं बोलणं. एखादा सेल्स पर्सन जसा कार विकताना हिचा पिकप असला भारी आहे की बापजन्मात कोणी बघितला नसेल असं सागतो, तसच तो कोरिआशी बोलताना करतो जगाने अशी दिवाळी बघितली नसेल अशी मी कोरिआत करेन. त्याला आपण सेल्स मध्ये नाही राष्त्र्ट्राध्यक्ष आहोत हे समजत नाही. तो आपला त्याच्या फॅन बेसला सेल करत बसतो.
हो नेत्यांच्या बोलण्यातील
हो
नेत्यांच्या बोलण्यातील शब्द अन शब्द तोलूनमापून घेतलेला असणे (आणि त्यात बहुतांश वेळा लॉजिक असणे) या दोन्ही परंपरा त्याने धुडकावून लावलेल्या आहेत :). आता तो आधी बोलतो आणि मग सगळे व्हाइट हाउस सारवासारव करत बसते 
ओबामाच्या 'रेड लाइन' वर इतकी टीका सर्वांनी केली. आता हा फायर अॅण्ड फ्युरी म्हणून बसलाय. काही नाही केले तर मग ओबामापेक्षा काय वेगळा आहे असे होईल. काही केले तर उगाच युद्ध ओढवून घेतले, असे.
अहो सर. माणूस टिव्ही वर आपण
अहो सर. माणूस टिव्ही वर आपण स्वतः काहीतरी आहोत ह्या आविर्भावात जर सतत काहीतरी वटवट करत असेल तर कधी तरी त्याचा तुक्का लागून एखादा अंदाज बरोबर येतोच. जे ह्या भौला समजत होतं ते तेव्हाच्या राष्ट्राध्यक्षांना (जे अडवायजर/स्ट्रटिजिस्ट लोकांचे म्हणणे एकायचे) समजत होतच की.
>>>
माझ्या मते तरी हा माणुस जितका भंपक भासवतो तितका नकीच नाहिये. हा इथला लालू म्हणता येईल. त्याला लोकांना काय हवे आहे याची नस सापडली आहे व तो जी बडबड करतो ती आले मनात, टाकले फोनात (ट्विटर) या धर्तीवर नसून खूप कॅल्कुलेटेड आहे असे माझे तरी मत झाले आहे. २०२०च्या निवडणुकीत हा निवडून येईल यावर मी आत्ताच बेट लावायला तयार आहे - एकच कन्डिशन की हा इम्पिच नाही झाला पाहिजे या टर्ममध्ये.
हो, तो खुप कॅल्क्युलेटेड आहे
हो, तो खुप कॅल्क्युलेटेड आहे पण पॉलिसी मेकिंग, परराष्ट्रिय धोरण आणि इतर बर्याच यु एस प्रेझ करता अत्यंत गरजेच्या असलेल्या गोष्टीत नसून धुळफेक, दिशाभूल करणे ह्या सगळ्यात आहे.
परत निवडून येण्याचे म्हणाल तर ते टोटली होऊ शकतं. त्याचं क्रेडिट जनतेला द्यावं लागेल.
टवणे +१
टवणे +१
तो जे बोलतो ते कायम डिरेक्टली त्याच्या फॅन बेस, वोट बँक साठीच बोलतो. बाकीचे लोक त्याचे बोलणे मॉरॅलिटीच्या दगडावर डोकी फुटेस्तोवर आपटत बसतात. पण त्याचा फॅन बेस आजिबात घटत नाही. तो कायम प्रेसिडेंट म्हणून नाही तर कँडिडेट म्हणूनच बोलतो.
२०२०च्या निवडणुकीत हा निवडून येईल यावर मी आत्ताच बेट लावायला तयार आहे - एकच कन्डिशन की हा इम्पिच नाही झाला पाहिजे या टर्ममध्ये. >> तो स्वतःच्या कारनाम्यामुळे ईम्पीच होत नाही ह्यावर बेट लावायला मी तयार आहे. त्याच्याच गोटातल्या ईतरांनी काही मेजर काड्या केल्या तर त्याची अवस्था वाईट होऊ शकते.
ट्रंप म्हणजे एखाद्या दीड
ट्रंप म्हणजे एखाद्या दीड वर्षाच्या मुलासारखा. पॅम्पर न लावता घरात सैरभैर धावत असतो नि दाया नोकर त्याच्या मागून सारवासारव करत हिंडत असतात. तसे तो बरळतो नि मग मागून कुणितरी स्पष्टीकरण देतात.
असे म्हणतात की दुसर्या बाजीरावाच्या कारकीर्दीत इतक्या लोकांचे इतके हाल झाले की धर्म काही असो, ब्रिटिश परवडले असे लोक म्हणाले म्हणून ब्रिटिशांना फारसा विरोध झाला नाही - ब्रिटिशहि वाईट आहेत हे लवकरच कळून चुकले, पण तोपर्यंत भारतीयांमधे कुणि नेता सापडत नव्हता जसे सध्या रिपब्लिकन, डेमोक्रॅटिक पक्षात कुणिच निवडून येउ शकत नाही! कारण निवडून येण्यासाठी काय करायचे हे त्यांना समजतच नाही. कायम आपले उच्चभ्रू लोकांत वावरतात, साधारण लोकांचे प्रश्न काय आहेत, त्यांना कसे समजावून सांगायचे हे कळतच नाही
कुणि काही म्हणा, सध्याच्या अमेरिकेतील लोकांना तोच राष्ट्राध्यक्ष व्हावा असे वाटते. यात त्याचा शहाणे असण्याचा व नसण्याचा प्रश्न नसून जनता किती हवालदिल झाली आहे हे कळते. बुडत्याला काडीचा आधार.
<<ट्रम्प भाऊंना एका बाबतीत
<<ट्रम्प भाऊंना एका बाबतीत मानले पाहिजे. १५-२० वर्षापुर्वीच्या मुलाखतीतसुद्धा तो नॉर्थ कोरियाला वेळीच आवरा म्हणत आहे. तेव्हा त्यांच्याकडे अण्वस्त्रेदेखील नव्हती.>>
-------- ट्रम्पने अनेक मुलाखती दिल्या आहेत, सोमवारी जे बोलतो त्याच्या अगदी विरुद्ध तो मन्गळवारी बोलतो. तुम्हाला कोणते वक्तव्य सोईचे आहे ते घ्यायचे.
(अ) अनेक मुलाखती मधे ("क्रुकेड" हा त्याचा शब्द) हिलेरीला जेल मधे टाकण्याबद्दल त्याने वल्गना केली होती, निवडुन आल्यावर १८० कोनामधुन फिरला आणि हिलेरी वर स्तुती सुमनान्चा वर्षाव केला.
(ब) मागच्या दहा दिवसात, सेशन्सच्या कामा वर अनेक वेळा नापसन्ती व्यक्त केली, अगदी घालवला जाणार असेच सुतोवाच केले होते आणि दुसर्याच दिवशी त्याच्यावर पुर्ण विश्वास आहे असे WH ने सान्गितले. काल सेशन्सच्या कामाची आणि मेहनतीची स्तुती.
(क) जेम्स कोमी बद्दल पण तसेच... आधी वाईट, पण मग हिलेरीची फाईल पुन्हा उघडायचे सुतोवाच केल्यावर खुप चान्गला... मग त्रासदायक वाटल्यावर पुन्हा वाईट....
(ड) काही महिन्यान्पुर्वी नॉर्थ कोरियन (किव्वा रशियन, इराणियन) नेत्यासोबत चर्चा करणुआत काही गैर नाही. अशी चर्चा, sorry deal, करायला काहीच हरकत नाही आहे अशी भुमिका आणि अगदी परवा fire - fury चा तोफगोळा फेकल्यावर काल नॉर्थ कोरिया मोठे चॅलेन्ज नाही अशी तुलनेने मवाळ भुमिका आणि आज परत locked and loaded...
खुप खुप बोलायचे, दोन टोकाच्या भुमिका २४ तासात घ्यायच्या, कुठल्या दिवशी काय भुमिका घेणार याचा अन्दाज बान्धणे कढिण आहे.... अनियन्त्रण आणि अनिश्चितता ह्या ट्रम्पच्या जमेच्या बाजू आहेत,
शत्रुला म्हणा करत बसा अन्दाज.
घटनाक्रम १, जुलै २०१६:
घटनाक्रम १, जुलै २०१६:
- डॅलस शहरात 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर'चा (बीएलएम) निषेध मोर्चा निघाला.
- या मोर्चात सर्व वर्णांचे लोक सामील झाले होते. बव्हंशी कुठल्याही हत्यांराशिवाय.
- आर्मीतून निवृत्त झालेल्या एका माथेफिरू 'लोन वूल्फ'ने या मोर्चाच्या आडून पोलिसांवर हल्ला केला आणि पाच पोलिस अधिकारांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं.
- संबंधित 'लोन वूल्फ'ला पोलिसांनी एका रोबोटद्वारे ठार केलं. संबंधित 'लोन वूल्फ'चा 'बीएलएम' चळवळीशी वा त्या मोर्चाशी काही संबंध आढळून आला नाही. या हल्ल्याचा 'बीएलएम'ने तीव्र निषेध केला, पण चळवळीला असलेली सहानुभूती मोठ्या प्रमाणात घटली आणि पुढील काही दिवसांत आधीच विकेंद्रित, उत्स्फूर्त असलेले हे निषेध मोर्चे संपुष्टात आले.
- पोलिसांवरील या हल्ल्याचा सर्व थरातल्या, सर्वपक्षीय राजकारण्यांनी (यात ओबामाही आले) निषेध केला.
- यानंतर ओबामाने व्हाईट हाऊसमध्ये एक सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यात स्थानिक राजकारणी, राज्याचे गव्हर्नर, पोलिस अधिकारी, सुरक्षाविषयक सल्लागार आणि 'बीएलम'चे प्रतिनिधी होते. एकून ४० लोकांपैकी केवळ दोन व्यक्ती बीएलएमशी संबंधित होत्या.
काही रिपब्लिकन राजकारण्यांनी या घटनाक्रमाची मांडणी 'पोलिसांवर हल्ला करणाऱ्या बीएलएम मेंबर्सना ओबामाने व्हाईट हाऊसमध्ये बोलावले' अशी केली. फॉक्स न्यूजने इमानेइतबारे आपल्या धन्याचं काम करून ही विधानं सातत्याने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचत राहतील, याची दक्षता घेतली. आधीच फॉक्स न्यूजचा कोअर प्रेक्षकवर्ग म्हणजे ओबामाला 'केनियन मुस्लिम + सिक्युलर + अँटाय-ख्राईस्ट' समजणारा. या बातम्यांमुळे ओबामा हा देशद्रोही असून तो स्वत: जातीने कृष्णवर्णीय-श्वेतवर्णीय यांच्यातील तेढ वाढवण्याचे प्रयत्न करतो आहे, असाही काहींनी समज करून घेतला.
एकदा या स्लिपरी स्लोपवर गाडी गेली की, ओबामा तिसऱ्यांदा निवडणूक लढवायच्या तयारीत आहे (वास्तव: 'घटनेनुसार ते शक्य नाही. अर्थात, अमेरिकन सिटिझन्सना आपल्याच देशाची घटना कितपत माहीत असते, हा प्रश्नच आहे') किंवा फ्लोरिडात ज्या १७ वर्षीय ट्रेवन मार्टिनला राहत्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये गोळी घालण्यात आली, तोच कसा या बाबतीत दोषी होता आणि ओबामाने कसं बिचाऱ्या झिमरमनला यात अडकवलं (वास्तव: 'प्रस्तुत खटला फ्लोरिडा राज्यात तेथील स्थानिक ज्युरींच्या समोर चालला. पोलिस डिस्पॅचने कारमधून बाहेर न पडण्याचा सल्ला दिल्यानंतरही झिमरमनने तो धुडकावून ट्रेव्हन मार्टिनचा पाठलाग केला होता; मात्र तो पुराव्याअभावी सुटला. या खटल्यानंतरही त्याला दोनदा त्याच्या मैत्रिणींवर हल्ला करण्याबद्दल आणि एकदा 'रोड रेज'च्या केसमध्ये अटक झाली आहे.') यासारख्या कपोलकल्पित गोष्टींवरही काही लोकांचा विश्वास बसू लागला.
घटनाक्रम २, ऑगस्ट २०१७:
- शार्लट्सव्हिल, व्हर्जिनिया शहरात व्हाईट सुप्रिमसिस्ट्स निओनाझींचा निषेध मोर्चा निघाला. या मोर्चात ओबामा आणि ज्यू धर्मीयांविरुद्ध* घोषणा देण्यात आल्या. (*निओनाझींचा इस्त्रायलला पाठिंबा असतो, तो ख्रिस्तजन्माने पुनीत झालेली धरती म्हणून. अमेरिकेतल्या ज्यूद्वेषी घटनांची संख्या ही मुस्लिमद्वेषी घटनांहून कितीतरी अधिक आहे.)
- या मोर्चात फक्त श्वेतवर्णीय सामील झाले होते. बव्हंशी हत्यारांसह आणि पेटते पलिते घेऊन.
- आर्मीतून निवृत्त झालेल्या एका माथेफिरू 'लोन वूल्फ'ने मोर्चाच्या विरोधकांवर गाडीने हल्ला केला. त्यात एक महिला ठार आणि वीसहून अधिक लोक जखमी झाले.
दुवा: https://youtu.be/D7FPmojhEeE
(वॉर्निंगः ग्राफिक कन्टेन्ट!)
- जेम्स ॲलेक्स फिल्डला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अटक केली.
- जेम्स ॲलेक्स फिल्ड 'व्हॅनगार्ड अमेरिका' ह्या व्हाईट सुप्रिमसिस्ट, निओनाझी संघटनेतर्फे मोर्चात सामील झाला होता.
- या हल्ल्याचा सर्व थरातल्या, सर्वपक्षीय राजकारण्यांनी निषेध केला. एरवी ट्विटरवर ॲक्टिव्ह असणारे प्रेसिडेंट ट्रम्प मात्र बराच काळ शांत होते. बहुधा आपल्याच मालकीच्या गोल्फकोर्सची तुंबडी करदात्यांच्या पैशातून भरली जात असताना, २०२० सालच्या रिइलेक्शनची ॲड शूट करण्यात व्यग्र असावेत!
- मग अगदी मुळमुळीत शब्दांत, ट्रम्पने या घटनेचा जनरल टर्म्समध्ये निषेध व्यक्त केल्यावर अनेक रिपब्लिकन सिनेटर्सनी या शिखंडी वृत्तीचे वाभाडे काढले आहेत.
U.S. President Donald Trump's reelection campaign released its first television advertisement on Sunday...The ad's release comes amid intense criticism of Trump's response to the events in Charlottesville, Virginia, where a planned rally by white supremacists led to violence that killed a counter-protester.
Speaking on Saturday from his golf resort in Bedminster, New Jersey, Trump stopped short of calling the demonstrators "white supremacists" and instead criticized groups on "many sides." Even members of his own party said he had failed to adequately condemn those behind the violence.
हा वॉल स्ट्रीट जर्नलमधल्या (मर्डॉकच्या मालकीचे) घरच्या अहेराचा दुवा:
https://www.wsj.com/articles/gop-leaders-criticize-trumps-response-to-ch...
बाकी फॉक्स न्यूजवर हे प्रकरण डाऊनप्ले करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न चालला आहे, तो प्रेक्षणीय आहे.
. . . . . . .
ट्रम्पच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचे रामराज्य अवतरणार होते आणि अमेरिका ग्रेट होणार होती. कुणी सांगावं, कदाचित काही ट्रम्पसमर्थकांचा हाच निकष असेल!
बाकी फॉक्स न्यूजवर हे प्रकरण
बाकी फॉक्स न्यूजवर हे प्रकरण डाऊनप्ले करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न चालला आहे, तो प्रेक्षणीय आहे. >> हे एकदम परफेक्ट बोललास.
काल पासूनिथे लिहायचं होतं पण
काल पासूनिथे लिहायचं होतं पण जमलं नाही. ह्या वर्जिनिया मधल्या घटनेच्या रिस्पॉन्स मध्ये मला वाटतं ट्रंपनी सापाच्या शेपटीवर पाय दिलाय. माझ्या सामान्य ज्ञाना नुसार व्हाईट लोकं हे काही वर्षातच मायनॉरिटी होणार आहेत (आत्ता असतील तर माहित नाही). क्लिंटन विरुद्ध ट्रंप मध्ये बरीच लोकं मला वाटतं रिंगच्या बाहेर बसून राहिले आणि त्यामुळे ट्रंप निवडून आला. आता ह्या अशा स्टॅन्समुळे तर इतर सगळ्याच मायनॉरिटीज च्या विरोधात तो जात आहे. ब्लॅ़क, ब्राऊन आणि नॉन रेसिस्ट व्हाईट असा फ्रंट आता नक्की बाहेर पडेल वोट करायला. अजून ह्या सारख्या एक दोन चुका केल्या तर मग नाही यायचा निवडून पुढच्यावेळी.
बुवा, निवडून यायचं न यायचं
बुवा, निवडून यायचं न यायचं हे पन्नास पैकी फक्त चार ते सहा राज्यांवर अवलंबून आहे. तिकडे लोकांना असं इतक्या तीव्रतेने काही वाटलं तर बदल होईल. अन्यथा नाही. अर्थात जीओपी मधूनच आला नाही असं होऊ शकतं.
आणि अर्थात सध्याचं सिनेट वेगळ्या पार्टीकडे जाउ शकतंच.
पण ते नेमकं प्रकरण काय आहे?
पण ते नेमकं प्रकरण काय आहे? पुतळ्यांचं राजकारण महाराष्ट्रासारख्या थर्ड वर्ल्ड कंट्रीत ठिक पण इथे पण हे कुठे काढलंय? १९२४ साली तिथे जनरल लीचा पुतळा उभा केला, तो आज हटवायचा प्रयत्न करणं हे कोणी कोणाच्या शेपटावर पाय देण्यासारखं आहे?
ट्रम्पबाबा म्हणाले की
ट्रम्पबाबा म्हणाले की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात.
इज धिस अ टर्निंग पॉइंट इन युनायटेड स्टेट्स सोशल फॅब्रिक? इतिहास दर्शवितो की नरसंहार, तबाही झाल्याशिवाय सहसा अश्या चळवळी थांबत नाहीत. व्हाइट मायनॉरिटीमध्ये जायच्या आधी ते आत्ता आहेत त्यापेक्षा राजकीय प्रबळ बनतील का?
मजाए बुवा, ओबामामाने
मजाए बुवा, ओबामामाने 'इस्लामिक टेरर' चा नाव घेऊन निषेध केल्याचे कधी ऐकले नाही, अगदी ऑरलँडो आणि सॅन बर्नांडिनो नंतर देखिल. आणि आत्ताच लुबरलांच्या तोंडाला फेस का येतो आहे?
अमेरिकन लोकशाही ही
अमेरिकन लोकशाही ही संख्याबळापेक्षाही भूगोलावर अवलंबून आहे. हाऊसमध्ये जेरीमँडरिंगमुळे आणि शहरांत एकवटलेल्या डेमोक्रॅटिक मतदारांमुळे, रिपब्लिकन पक्षाला कमी मतं पडूनही सहज बहुमत मिळतं; तर सिनेटमध्ये वायोमिंगची लोकसंख्या कॅलिफोर्नियाच्या १/६०असूनही, वायोमिंग आणि व कॅलिफोर्निया यांना समान प्रतिनिधित्व आहे.
एकंदरीत लोकसंख्येच्या भौगोलिक विभागणीचा कल बघता मिडवेस्ट अधिक श्वेतवर्णीय, अधिक रिपब्लिकन होत जाईल आणि सन-बेल्टमधील राज्यं अधिक कॉस्मोपॉलिटिन होऊन डेमोक्रॅट्सकडे झुकतील अशी चिन्हे आहेत. अर्थात, याला काही काळ जावा लागेल आणि तोवर रिपब्लिकन पक्षाचीही भूमिका बदलू शकेल.
जेरीमँडरिंगची केस सुप्रिम
जेरीमँडरिंगची केस सुप्रिम कोर्ट ऐकणार होतं ना? त्यातुन काही निघालं तर इंटरेस्टिंग असेल.
हो, ऑक्टोबरात बहुतेक ती
हो, ऑक्टोबरात बहुतेक ती कोर्टासमोर येईल. पण ऑलरेडी एक 'ढापलेली' सुप्रीम कोर्ट सीट आहेच की रिपब्लिकनांकडे.
ओबामामाने 'इस्लामिक टेरर' चा
ओबामामाने 'इस्लामिक टेरर' चा नाव घेऊन निषेध केल्याचे कधी ऐकले नाही >> म्हणजे एकाने गाय मारली म्हणून दुसर्याने वासरू मारणे समर्थनीय असे म्हणताय का ?
रस्ट बेल्ट सन बेल्ट काहीही
रस्ट बेल्ट सन बेल्ट काहीही डेमोक्रॅट व्हायची मला तरी शक्यता दिसत नाही. साधा सोपा व्हाइट युरोपिअन वि इतर असा हा झगडा होणार आहे
Pages