Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15
ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
'ट्रंपचा उद्योग नाही' हा
'ट्रंपचा उद्योग नाही' ही स्टिक वापरायची का पॉलिसी ठरवताना? बरं.
जीओपी सेनेटर क्रुझ, पॉल यांनी
जीओपी सेनेटर क्रुझ, पॉल यांनी तर त्यांनी सुचवलेले बदल हेल्थ केअर बीलात सामील केले नाहित तर सरळ-सरळ विरोध दर्शवला आहे. मग यात छुपे पणा कुठुन आला? >> बरोबर आहे तुझे राज, हे दोघे सिनेटर म्हणजेच समस्त सिनेट वगैरे होते. हेल्थ केअर बिलाचा draft तर थेट मायबोलीवर उपलबध करून दिला होता. फायनान्स बिल रोज ट्वीटर वर फिरवले होते. हेल्थ केअर बिल ४ तारखे आधी पास करून घ्यायचा अट्टाहास निव्वळ लोकांना ४ तारखेच्या BBQ पार्टीचा आनंद कसलेही टेंशन न घेता यावा म्हणूनच केला होता हो.
आजचे morning joe वाले ट्वीटस वाचले का ? अजिबात dignity नाहीये.
. देशापुढे कसले प्रश्न आहेत नि ट्वीटस कसले तर ? हे.
नशिब फेसलिफ्टमुळे ब्लीड करत
नशिब फेसलिफ्टमुळे ब्लीड करत होती (ते ही खोटचं आहे म्हणा), नॉट फ्रॉम व्हॉटेवर. मूर्ख माणूस आहे.
आणखी मजा म्हणजे फस्ट लेडी ने
आणखी मजा म्हणजे फस्ट लेडी ने अँटी सायबर बुलिंग कॅम्पेन सुरु केलं आहे

आणि त्याच्या आगेमागे हा हे सगळं ट्विट करतोय
आता तर वैताग करायचा पण कंटाळा
आता तर वैताग करायचा पण कंटाळा आला! काल बोलणार?
हे वाच्लं का? This shit is alarming!!
https://www.yahoo.com/news/nra-video-calls-clenched-fist-response-protes...
आता तर वैताग करायचा पण कंटाळा
आता तर वैताग करायचा पण कंटाळा आला! काल बोलणार? >>> Welcome to the club! या पुढची पायरी श्री. नंद्या४३ यांनी गाठलेली - तुका म्हणेल उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे ... हटकेश्वर हटकेश्वर ...

>>हेल्थ केअर बिलाचा draft तर
>>हेल्थ केअर बिलाचा draft तर थेट मायबोलीवर उपलबध करून दिला होता.<<
एक्झॅक्टली माय पॉइंट. त्या बीलात इतके मुविंग पार्ट्स (स्टेकहोल्डर्स तर अगणित) आहेत कि फायनल ड्राफ्ट तयार होऊन, बील फ्लोर वर यायल्या पुढचा आठवडा/महिना उगवला तर आश्चर्य वाटायला नको. हे असं असताना कुठल्या अँगलने हे बील "छुप्या रितीने पास करुन घेण्याचा प्रयत्न" केला गेला/जात आहे हा प्रश्न मला पडलेला आहे. [छुप्या रितीने म्हणजे गुपचुप, गनिमी काव्याने हा अर्थ - माझ्या माहितीनुसार. आणि ते हि शक्य आहे का लोकशाहित, वोट न घेता?]
मॉर्निंग जो बाबतीतलं ट्विट तर माझ्यामते सगळ्याच अॅंगलने निषेधार्ह...
राज, व्होटला बिल टाकलं आणि
राज, व्होटला बिल टाकलं आणि लगेहात पास करून घेतलं (ते पाच सिनेटर्स नसते तर) की झालं ना? लोकांना समजेपर्यंत वेळच दिला नाही, की कोन्ग्रेशनल डिस्त्रिक्टमध्ये लोकांचा पाठींबा आहे का नाही, विरोध असेल तर त्या झळा बसायच्या आधीच बिल पास करून घेतलं की झालं. म्हणूनच बशीतन वरात निघाली पेन्सिल्व्हनिआ अॅव्हेन्युला ना? असही हे बिल लागू व्हायला बराच काळ आहे, उद्या सकाळच्या ट्वीटला कशी सारवा सारव करायची हे सोडून इतका पुढचा विचार कोणी करतं तरी का !!
फायनल ड्राफ्ट तयार होऊन, बील
फायनल ड्राफ्ट तयार होऊन, बील फ्लोर वर यायल्या पुढचा आठवडा/महिना उगवला तर आश्चर्य वाटायला नको >> हे सामान्य ज्ञान सिनेट मेजॉरिटी लीडर्स नसावे बहुधा म्हणून ते ४ तारखेच्या आधी बिल पास करण्याची धडपड करत होते ? CBO report ची वाट पाहायलाही का तयारी नव्हती असे वाटते तुला ?
https://www.vox.com/policy-and-politics/2017/6/26/15877594/senate-health...
ओबामाची ८ वर्षे नि ट्रंपचे सहा महिने मिळून अजून रिपील करता येईल एक धड बिल बनवता येत नाहीये नि हे देशाचा कारभार control करताहेत policy ठरवताहेत. क्रूज चे suggestion तर धन्यच आहे. बहुधा रिपील चा अर्थ पण "facts" च्या अर्थाबरोबर बदलला असावा
choice finance bill हाऊसमधे आठवडाभर आधी declare करून pass करून घेतले हे विसरू नकोस. (Paul Ryan claims this is a win for main street - I want what he smokes, man) हे नतद्रष्ट बिल Dodd Frank च्या ज्या सोयी रद्द करतेय ते बिल वर्षभर समोर होते. केव्हढी efficiency बाबा GOP ची ! मूळात ज्यांच्या मूळे Dodd Frank आणायची गरज २००८ नंतर पडली त्या समस्त big banks record profit मधे असताना त्यांना अधिक सूट देण्याची नक्की आवश्यकता काय आहे हे तुला समजले असेल तर मलाही समजाव. Kentucky मधे business regulations काढल्यानंतर काय झाले हे ताजे आहे. पण लक्षात कोण घेतो ?
<<<ट्रंपचा शस्त्रास्त्रे
<<<ट्रंपचा शस्त्रास्त्रे विकण्याचा धंदा नाही. (हो, नाहीतर हिलरी आणि ओबामा (तसेच म्याकेन वगैरे) त्याच्या ताटाखालची मांजरे बनून राहिले असते.>>>
अहो छ्या:, काही लोकांना ट्रंपखेरीज दुसरे कुणि दिसतच नाही. ट्रंपचा धंदा उत्तम चालू आहे, त्यासाठी त्याला काही करायला नको.
अमेरिकेत शस्त्रात्रे विकण्याचा धंदा फार मोठ्या प्रमाणावर आहे. गन बनवणारे एन आर ए ला पैसे देतात, ते रिपब्लिकनांना पैसे देतात . शेवटी कुणीकडून का होईना अमेरिकेत पैसे आले तर बरेच ना!!
सध्या इराणमधे अराजक नाही असे म्हणता, जेंव्हा रेगन प्रेसिडेंट असताना इराणवर पूर्ण बंदी होती तरी प्रसंगी कायदा उल्लंघून इराणला शस्त्रे पुरवू न त्या पैशाने काँट्रांना दुसरा देशात अराजक माजवायला अमेरिकेने (ऑलिव्हर नॉर्थने) मदत केलीच होती.
तर अराजकाचे अमेरिकेला वावडे नाही,
ट्रंप प्रेमींना माहिती असती, ट्रंप प्रेमापायी आंधळे झाले नसते तर त्यांना खालील प्रश्न सुचले असते -
मुळात या देशातून असे किती लोक दरवर्षी अमेरिकेत येतात? त्यापैकी किती लोक पुढले सहा महिने इथे आले नाहीत तर अमेरिकेचे काय बिघडले असते?
या प्रश्नांचा विचार करून मग जर बंदीला उगाच विरोध करू नका असे म्हंटले असते, तर जरा सभ्यपणाम, हुषारपणा झाला असता.
पण असे की, माहिती करून घ्यायची नाही, अभ्यास करायचा नाही, जे करतात ते खोटे बोलतात म्हणायचे, नि एकदम कुठल्याहि विषयावर भांडायलाच ऊठायचे.!!
म्हणूनच मी म्हणतो यापुढे असल्या लोकांशी वाद घालू नका, त्यांच्याशी बोलू नका - बाहेरून बघणार्याला कळणार नाही वेडा कोण नि शहाणा कोण?
असामी, तुमचे म्हणणे पटते. पण तुमची चूक अशी की तुम्ही अभ्यास केलात, खर्या खोट्याची शहानिशा केलीत, त्यामुळे इथल्या एक दोन लोकाम्च्या दृष्टीने तुम्ही फेक न्यूज!
चालू दे. रेगनबरोबर आठ वर्षे, बुष, इराक युद्ध यांच्याबरोबर आठ वर्षे काढून जगलो आता आशा आहे की स्वतःच स्वतःला नाहीसे करून घेतील.
>>
>>
मुळात या देशातून असे किती लोक दरवर्षी अमेरिकेत येतात? त्यापैकी किती लोक पुढले सहा महिने इथे आले नाहीत तर अमेरिकेचे काय बिघडले असते?
या प्रश्नांचा विचार करून मग जर बंदीला उगाच विरोध करू नका असे म्हंटले असते, तर जरा सभ्यपणाम, हुषारपणा झाला असता.
पण असे की, माहिती करून घ्यायची नाही, अभ्यास करायचा नाही, जे करतात ते खोटे बोलतात म्हणायचे, नि एकदम कुठल्याहि विषयावर भांडायलाच ऊठायचे.!!
<<
अतिरेकी, दहशतवादी ह्या लोकांचा प्रभाव हा संख्येवर अवलंबून असतो का? आजिबात नाही. एक ढळढळीत उदाहरण म्हणजे १९ अतिरेक्यांनी ४ हल्ले केले, चार विमाने अपहरण केली आणि त्यातली तीन महत्त्वाच्या इमारतींवर आदळली, एक कोसळले. पण ह्या हल्ल्यानंतर तमाम विमान उद्योग बदलले. जगभरात कुठेही विमान प्रवास करु इच्छिणार्यांच्या प्रवासावर ह्या हल्ल्याचा अत्यंत वाईट परिणाम झाला आहे. जाचक तपासणी, वेळखाऊ रांगा, जाचक नियम ( पाणी नाही, नेलक्लिपर नाही), सुरक्षा यंत्रणांचा प्रचंड खर्च आणि ह्याचा बोजा पुन्हा जनतेवरच. हे सगळे केवळ १९ अतिरेक्यांनी घडवले. तेव्हा किती लोक हल्ले करत आहेत, किती हल्ले होत आहेत ह्या संख्येच्या प्रमाणात अतिरेकी हल्ल्यांचा परिणाम नसतो. तो परिणामही अतिरेकी असतो आणि त्यात सगळी सामान्य जनता भरडून निघते. त्यामुळे अशीच विषाची परीक्षा पुन्हा बघण्यापेक्षा त्याला प्रतिबंध केलेला बरा नाही का?
<<हे सगळे केवळ १९
<<हे सगळे केवळ १९ अतिरेक्यांनी घडवले. तेव्हा किती लोक हल्ले करत आहेत, किती हल्ले होत आहेत ह्या संख्येच्या प्रमाणात अतिरेकी हल्ल्यांचा परिणाम नसतो. तो परिणामही अतिरेकी असतो आणि त्यात सगळी सामान्य जनता भरडून निघते. त्यामुळे अशीच विषाची परीक्षा पुन्हा बघण्यापेक्षा त्याला प्रतिबंध केलेला बरा नाही का?>>
------- तुमचे म्हणणे विचार करण्यासारखे आहे... पण हे १९ अतिरेकी लिबीया, सुदान, सिरिया, इराण, सोमालिया, येमेन या पैकी कोणत्या देशामधुन आले होते ?
२००१ नन्तर (अतिरेकी विरोधी कारवाईची) आगीची झळ कोणत्या देशाला लागली तर - अफगाणिस्तान आणि इराक. हे १९ अतिरेकी या दोन्ही देशामधुन अलेले नव्हते. ५० हजाराहुन अधिक निरपराधी या दोन देशात अतिरेकी विरोधी हल्यामधे किव्वा घडवुन आणलेल्या स्फोटात मारले गेले आहेत.
ज्या एकाच देशामधुन हे सर्व अतिरेकी आले होते त्या देशाविरुद्ध अमेरिका काहीच बोलत नाही तर घनिष्ट मैत्री सम्मन्ध ठेवतो. आग रामेश्वरी आणि बम्ब सोमेश्वरी अशातला प्रकार आहे.
गेल्या ३-४ वर्षात अमेरिकेत किव्वा युरोपात जे हल्ले झालेले आहेत ते बाहेरुन आलेल्यान्नी केलेले नाहीत तर घरातच तयार झालेल्यान्नी केले आहेत.... दोन्ही प्रकारात निरपराधी लोक मारले जातात याचे मला मोठे दु:ख आहे.
उदय वर्मावर बोट ठेवलेत. उत्तम
उदय वर्मावर बोट ठेवलेत. उत्तम पोस्ट.
शेंडे वर म्हणाले आहेतच ना, की ट्रंपचे उद्योगधंदे त्या १९ अतिरेकी आलेल्या देशात आहेत त्यामुळे तिकडे सगळं आलबेलकआहे, आणि राहीलही. विषयच संपला.
कतारला ट्रंपचे कॅबिनेट मंत्री पाठींबा देतात आणि हा सौदीला पाठींबा देतो, अमेरिकेचे राजदूत अमेरिकन अध्यक्षाच्या विरुद्ध जाहीर बोलतात कोणाचा पायपोस कुणाच्यात नाही. आजच्या ट्वीटने तर कहर पातळी गाठली आहे.
>>त्यांना अधिक सूट देण्याची
>>त्यांना अधिक सूट देण्याची नक्की आवश्यकता काय आहे हे तुला समजले असेल तर मलाही समजाव<<
डाड-फ्रँक मधली काहि रेस्ट्रिक्शन्स शिथील केली यावर तुझा हा रोख दिसतोय, पण ते लहान बँकांसाठी आवश्यक होतं कारण या नियमांमुळे छोट्या बँकांचं कंबरडंच मोडलं होतं (हे स्वतः बार्नी फ्रँक ने कबुल केलेल आहे
). आणि मोठ्या बॅकांचं (अॅसेट्स इन मल्टाय बिलियन्स) म्हणशील तर त्यांनी डाड-फ्रंक्सचे नियम त्यांच्या ऑपरेशन्स मध्ये ऑलरेडी अंतर्भुत केलेले आहेत, जोडिला स्ट्रेस टेस्ट हि आहेच (एव्हरी अदर इयर असली तरीहि) त्यावर नजर ठेवायला. उलट याबीलाने "टु बिग टु फेल" हि संकल्पनाच मोडीत काढलेली आहे, ज्याचा भार तुझ्या-माझ्यावर पडत होता...
>>पण हे १९ अतिरेकी लिबीया,
>>पण हे १९ अतिरेकी लिबीया, सुदान, सिरिया, इराण, सोमालिया, येमेन या पैकी कोणत्या देशामधुन आले होते ?<<
वापरुन गुळ्गुळीत झालेलं आर्ग्युमेंट आहे हे.
अतिरेकि कुठल्या देशातुन आले हे महत्वाचं आहे कि ज्या देशात अतिरेक्यांचं ब्रीडिंग ग्राउंड आहे, बुट कँप्स आहेत ते महत्वाचं. सौदि मध्ये किती अतिरेकि तळ आहेत हे सांगु शकाल?
उद्या कोणीतरी भारतातल्या माथेफिरुने अतिरेकि हल्ला घडवुन आणला तर तुम्ही काय भारतावर ह्ल्ला करा असं म्हणणार?..
>>
>>
गेल्या ३-४ वर्षात अमेरिकेत किव्वा युरोपात जे हल्ले झालेले आहेत ते बाहेरुन आलेल्यान्नी केलेले नाहीत तर घरातच तयार झालेल्यान्नी केले आहेत.... दोन्ही प्रकारात निरपराधी लोक मारले जातात याचे मला मोठे दु:ख आहे.
<<
हे खोटे आहे.
१. सॅन बर्नार्डिनोचा हल्ला करणार्या दांपत्यातील बाई बाहेरून आलेली होती. एकंदरीत माहितीवरून तीच जास्त जहाल अतिरेकी होती आणि तिने आपल्या नवर्याला अतिरेकी बनवले असावे असे दिसते आहे.
२. सोमालियाहून आलेल्या निर्वासिताने ओहायो विद्यापीठात कार शस्त्र म्हणून वापरून लोकांना चिरडायचा प्रयत्न केला तो अतिरेकी होता. सुदैवाने त्याला ठार केले गेले.
३. वॉशिंग्टन राज्यातील मॉलमधे एका तुर्की अतिरेक्याने गोळीबार करुन ५ लोकांना ठार केले तो अमेरिकेत जन्मलेला नव्हता. तुर्कस्तानातून स्थलांतरित होता.
४. सेंट क्लाऊड मिनेसोटा इथे एका अतिरेक्याने मोठ्या चाकूने हल्ला केला. सुदैवाने केवळ १० लोक जखमी झाले. पण हल्ल्याचा उद्देश त्यांना मारणे हाच होता. हा इसमही लहानपणी केनयाहून स्थलांतरित झालेला होता.
५. २०१० मधील टाइम्स स्क्वेअर बाँब हल्ल्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तानात जन्मलेला निर्वासित होता. त्याचा प्रयत्न फसला ह्याचा अर्थ तो अतिरेकी नव्हता असे होत नाही.
अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे बाहेरून येणारे सगळे लोक सज्जन आणि पापभीरू असतात हा निष्कर्ष खरा नाही.
बरोबर आहे. म्हणून तात्पुरतीच
बरोबर आहे. म्हणून तात्पुरतीच बंदी घातली आहे, शिवाय जे येतील त्यांचे धागे दोरे माहित असतील.
ही बंदी खरे तर नुसती सिंबॉलिक आहे. तेंव्हा त्याच्या विरुद्ध उगाच आरडा ओरडा करू नये असे माझे मत आहे. ट्रंपने प्रचारात सांगितले तसे केले - लोक तेव्हढ्यावर खूष होत असतील तर होऊ दे. भिंत बांधू, मेक्सिको पैसे देईल असे सांगितल्यावर लोक मत देतात, निवडून देतात, त्याने उद्या सिम्बॉलिक शंभर फूट लांब भिंत बांधून म्हंटले की मी सांगितल्याप्रमाणे केले नि लोक खूष झाले तर देतील मत त्यालाच पुनः. ओबामाकेअर रद्द करीन, ती केल्यातच जमा आहे. काही लोक म्हणतात लोकांना प्रिमियम परवडणार नाही मग ते इन्शुरन्स घेणार नाहीत (असा तर्क) त्यावर रायन म्हणतो तो त्यांच्या इच्छेचा प्रश्न आहे - कायदा तसा नाही. मग कायदा पास करून खरेच लोकांचे हाल झाले नि तरी त्यांनी पुनः ट्रंपलाच मत दिले तर आश्चर्य वाटणार नाही.
या देशातले लोक असेच, त्यांना वेडे म्हणा काही म्हणा - तेच मते देतात. बर्याच लोकांना काय हवे आहे ते समजून घ्या. तुम्हाला ट्रंप नि रिपब्लिकन नको असतील तर जास्त मते मिळवून निवडून कसे यायचे ते बघा.
उगाच ट्रंपच्या नादी लागण्यात अर्थ नाही. नाहीतरी ट्रंप नि त्याचे लोक म्हणजे रात्रीच्या विनोदी शो साठी मोठ्ठा विषय एव्हढेच त्याचे महत्व.
काय केल्यावर आपले लोक निवडून येतील याचा विचार करावा.
<<<<भारतावर ह्ल्ला करा असं
<<<<भारतावर ह्ल्ला करा असं म्हणणार?..>>>>
हल्ला करा कोण म्हणताय? बंदी घाला.
काही लोकांच्या मते एका भारतीयाने जरी अतिरेकी कारवाई केली अमेरिकेत, तरी सगळ्या भारतीयांनाच बंदी घाला खुश्शाल.
हिंमत असेल तर परकीय मालावर जबरदस्त कर आकारा. भारतीय लोकांना नोकर्या देणार्या कंपन्यांवर जबरदस्त कर लावा - ट्रंपने तसे म्हंटलेच होते. करा ना खुश्शाल तसे. रायन म्हणेल टीव्ही, आयफोन महाग झाले, परवडले नाहीत तर घेऊ नका - तुमची स्वेच्छा!
मागे एकदा बिल गेट्सने धमकी दिली होती - भारतीयांना यायला बंदी कराल तर मायक्रोसॉफ्ट भारतात नेईन!! बघू तसे करतो का? ट्वीटर करणार्या कंपनीनेहि तसे केले नि अमेरिकेत ट्वीटर बंद केले तर ट्रंपचे काय होईल - तो भोंगा घेऊन इकडे तिकडे लोकांना शिव्या देत हिंडेल!
पुन्हा एकदा प्रयत्न करतो.
पुन्हा एकदा प्रयत्न करतो. ज्या देशांत अराजक असते तिथे लोकांना तपासून व्हिसे देणे दुरापास्त असते. नागरिकांच्या पार्श्वभूमीबद्दल पुरेशी विश्वसनीय माहिती मिळत नाही. सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि इजिप्त हे काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ देश नाहीत पण निदान तिथे सरकारे आहेत जी अमेरिका काही प्रमाणात तरी नियंत्रित करु शकते. तिथल्या नागरिकांबद्दल विश्वसनीय माहिती देऊ शकते. आणि त्यामुळे व्हिसा देताना योग्य ती काळजी घेणे शक्य आहे. अराजक असलेल्या देशात असे काही शक्य नाही. बंदी घातलेले देश हे अराजक, यादवी असणारे आहेत हा मोठा फरक आहे. परराष्ट्र खाते आणि संरक्षण खाते ह्यांच्या सल्ल्यावर आधारित हा निर्णय आहे.
तो भोंगा घेऊन इकडे तिकडे
तो भोंगा घेऊन इकडे तिकडे लोकांना शिव्या देत हिंडेल! >>>
राज, तुमचा युक्तीवाद पटला
राज, तुमचा युक्तीवाद पटला नाही. तुमचे उदाहरणही गैरलागू आहे.
सौदी अरेबियावरील राग केवळ १९ पैकी १४ अतिरेकी सौदी होते म्हणून नाहीये, तर ज्या विचरसरणीतून हे हल्ले झाले तिचे मूळ तिथे आहे म्हणून. शिवाय राजघरण्यातील काही व्यक्तींनी अर्थपुरवठा केला असावा असे मानायला जागा आहे.
ओपिनिअन पोल मध्ये ही इज डुईंग
ओपिनिअन पोल मध्ये ही इज डुईंग वेल अगेन अशी न्युज आहे आज
काहीही असेल तरी त्याला प्रचंड प्रमाणात सपोर्ट आहे हे नाकारता येणार नाही
बरोबर की चूक? यावर ही वेगळा वाद होईल
तो जे काही बोलतो ते विचित्र असतं हे खरं
पण इतर ज्याप्रकारे त्याला सगळ्यासाठी दोष देतात हे ही तितकंसं बरोबर नाही
हे म्हणजे चिकन पहिले की एग ? असं आहे
प्रत्येकजण प्रत्येक वेळी सगळीकडेच स्वतःच च बरोबर हा अजेंडा घेऊन वागतोय
टोकाच्या भूमिका प्रत्येक बाबतीत प्रत्येकाकडून, जो जास्त जोरात ओरडतो त्याचा दिवस
एकुणातच पारंपरिक रित्या जे वागणं चूक समजल जायचं त्याच ग्लोरिफिकेशन करणे
आणि संपूर्ण चुकीच्या वागण्याचं समर्थन करण्याची त्याला प्रोत्साहन देण्याची प्रवृत्ती हल्ली च्या जगात सगळ्याच क्षेत्रा मध्ये वाढीस लागली आहे
पण हे सगळं मान्य नसलेला एक फार मोठा जनसमुदाय आहे आणि त्याला पद्धतशीर पणे दुर्लक्षिण्यात आलं आहे हे ही नाकारता येणार नाही
पुन्हा प्रश्न तोच, कोण बरोबर कोण चूक?
या दोघांमधील झगडा म्हणजे आज सार्वजनिक, सामाजिक जीवनात जे काही सुरु आहे ते असं वाटत
सगळा गोंधळ आणि शेवटी भरडले जाणार सामान्यजन
मोठ्या बॅकांचं (अॅसेट्स इन
मोठ्या बॅकांचं (अॅसेट्स इन मल्टाय बिलियन्स) म्हणशील तर त्यांनी डाड-फ्रंक्सचे नियम त्यांच्या ऑपरेशन्स मध्ये ऑलरेडी अंतर्भुत केलेले आहेत >> लिक्॑इडिटी असणे, न असणे , किती असणे वगैरे ह्याबद्दल स्लोन पासून शिकागो univच्या academics मधे एकवाक्यता नाहिये अजून त्यामूळे खरच regulations शिथील केल्याने फरक पडणार आहे कि नाही हा मुद्दा वेगळाच राहतोय. सत्यापेक्षा आशावादावर अवलंबून घेतलेली हि स्टेप वाटते. (हे मी किंवा लिबरल मिडीया नाही तर फोर्बस म्हणतेय ). ज्या big banks economy क्षणात खाली आणु शकतात त्यांच्यावरच त्यांच्या नियमांची अमलबजावणी करायची परवानगी देणे कितपत पटतेय ?
ह्यापलीकडे जाऊन राज तू म्हणतोस तेव्हढे सोपे नाहिये हे दुर्दैवाने. हे बिल फक्त ह्याच regulations कडे बघत नसून CFPB वर control ठेवणे नि त्याची power कमी करणे ह्यावर फोकस करत आहे. अधिक माहितीसाठी इथे बघ
http://fortune.com/2017/06/07/financial-choice-act/
डॉड फ्रँक strict होते तर त्यात बदल करणे समजू शकले असते पण Hensarling ने ज्याने ह्या बिलाची सुरूवात केली आहे त्याने स्वतःच "ending and replacing the mistake of Dodd-Frank," (his words) ह्या भूमिकेतून हे बिल लिहिले आहे हे मान्य केलय ह्यातच सगळे येतय.
हा मुद्दा बरोबर आहे.
<<<सगळा गोंधळ आणि शेवटी भरडले जाणार सामान्यजन>>>
अगदी बरोब्बर!
<<<पुन्हा एकदा प्रयत्न करतो.
<<<पुन्हा एकदा प्रयत्न करतो. ज्या देशांत अराजक असते तिथे लोकांना तपासून व्हिसे देणे दुरापास्त असते. नागरिकांच्या पार्श्वभूमीबद्दल पुरेशी विश्वसनीय माहिती मिळत नाही.>>>
आता समजले.
तर हा मुद्दा संपला.
अतिरेक्यांना थांबवायला याचा फार फार थोडा उपयोग होईल.
त्यापेक्षा ट्रंपला विचारा ना की काय त्याचा प्लन आहे आयसिसला हरवण्याचा? आधी मारे म्हणत होता जनरल्स ना काही माहिती नाही, मला माहित आहे म्हणून.
बिचार्याने ट्वीट केले असेल त्याला त्या लोकांनी उत्तरच दिले नसेल मग ट्रंप काय करणार? - सगळा फेक मिडिया, ओबामाचा दोष!
<<<
<<<
हे खोटे आहे.
अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे बाहेरून येणारे सगळे लोक सज्जन आणि पापभीरू असतात हा निष्कर्ष खरा नाही.>>>
--------- दहशतवादाच्या मुळाशी वरिल सहा राष्ट्रेच आहेत, आणि या बन्दी मुळे सगळे दुर्जन आणि पापी लोकान्ना अमेरिकेत येण्यापासुन रोखले जाणार आहे हा केवळ आभास आहे. मुळ (दहशतवादाचा) प्रश्न आणि त्यावर उपाय म्हणुन योजलेली अगदी वर-वरची अशी मलमपट्टी, अशी मलमपट्टी करताना सौदीला एका शब्दाने सुनावण्याचे धारिष्ट्य नसणे... कारवाई तर खुप दुरची गोष्ट आहे, याने काय साध्य होणाअर आहे ?
होम ग्रोन (home grown) टेरॉरिझमच्या माझ्या मताला बळकटीसाठी डिपार्टमेन्ट ऑफ होमलॅन्ड सिक्युरिटी (DHS) सेक्रेटरी, जॉन केली, यान्चे मत DHS च्या सन्केत स्थळावर बघायला मिळेल. २०.४८ नन्तर होम ग्रोन चा मुद्दा बघायला मिळेल.
https://www.dhs.gov/news/2017/04/18/home-and-away-dhs-and-threats-americ...
काही घटनान्ची अधिक माहिती...
काही घटनान्ची अधिक माहिती... पुन्हा ह्या CNN, BBC बातम्या वाचुन बनवलेले मत नाही आहे. डिपार्टमेन्ट ऑफ होमलॅन्ड सिक्युरिटी च्या स्न्केत स्थाळावर pdf स्वरुपात खात्रीलायक माहिती वाचायला मिळते.
https://homeland.house.gov/wp-content/uploads/2017/04/AprilTerrorThreatS...
<<<<डिपार्टमेन्ट ऑफ होमलॅन्ड
<<<<डिपार्टमेन्ट ऑफ होमलॅन्ड सिक्युरिटी च्या स्न्केत स्थाळावर pdf स्वरुपात खात्रीलायक माहिती वाचायला मिळते.>>>>
अहो असे तुम्हा आम्हाला वाटते - ट्रंपचा विश्वास नाही त्यावर. नि त्यामुळे ट्रंपच्या चहात्यांचाहि नाही.
आणि असला तरी रायनसारखे काहीतरी कारण सांगतील - आमच्या करणीने गोष्टी महाग होतील तर घेऊ नका - तुमची स्वेच्छा- बिना इन्श्युरन्स चे मेलात तरी तुमची इच्छा - आम्हाला काय त्याचे?
तुमची स्वेच्छा >> यावर जाम
तुमची स्वेच्छा >> यावर जाम मजा येणारे.
>>
>>
दहशतवादाच्या मुळाशी वरिल सहा राष्ट्रेच आहेत, आणि या बन्दी मुळे सगळे दुर्जन आणि पापी लोकान्ना अमेरिकेत येण्यापासुन रोखले जाणार आहे हा केवळ आभास आहे.
<<
असे कुणीही सूचित केलेले नाही. एखाद्या बोटीला चार भोके पडली असतील तर ती सगळी योग्य त्या पद्धतीने बुजवणे आवश्यक आहे नाहीतर ती बोट बुडेल. एक भोक बुजवायला घेतल्यावर दुसर्याकडे बोट दाखवणे, ते दुरुस्त करायला घेतल्यास तिसर्याकडे बोट दाखवणे, एक भोक बुजवल्याने त्याने आता पाणी आत शिरायचे थांबेल का? असे विचारणे शहाणपणाचे नाही. जेव्हा जेव्हा जिथे जिथे भोके पडतील तेव्हा त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. आणि ह्या सहा देशांवर घातलेली बंदी हा एक उपाय आहे. एकमात्र नाही. त्यामुळे थोडा परिणाम नक्कीच होईल पण दहशतवादाचे पूर्ण उच्चाटन होईल असे ट्रंप वा त्याच्या प्रवक्त्याने म्हटल्याचे ऐकिवात नाही. आपण तसा दावा करु नका.
Pages