अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

थोडक्यात मला असे म्हणायचे आहे की लेवल ऑफ अटानमी फ्रॉम फेडरल गवर्नमेंट ही केवळ अन केवळ गुलामगिरी कायदेशीर ठेवायला हवी होती, अजून दुसरे कुठले सबळ कारण माझ्या वाचनात आलेले नाही >> +१. बाकी सगळा हॉगवॉश आहे. मुख्य कारण ठसठशितपणे बर्‍याच पत्रव्यवहारांमधून बर्‍याच जणांनी स्पष्ट केलेले आहे.

थोडक्यात मला असे म्हणायचे आहे की लेवल ऑफ अटानमी फ्रॉम फेडरल गवर्नमेंट ही केवळ अन केवळ गुलामगिरी कायदेशीर ठेवायला हवी होती, अजून दुसरे कुठले सबळ कारण माझ्या वाचनात आलेले नाही >> +१/२.

मुळ मुद्दा तोच गुलामगिरीच कायदेशीर करण्याचा असला तरी त्या मागणी बरोबरच...

'वन ड्रॉप रूल' संमत करून घेणे ही होते. व्हाईट जमीनदारांनी ठेवलेल्या स्लेव बायकांपासून त्यांना झालेल्या मुलांना व्हाईट लोकांप्रमाणे काही कायदेशीर हक्कं मिळू नये जरी ते व्हाईट जीन्सच्या डॉमिनन्समुळे अगदी तंतोतंत व्हाईट जन्मले तरी. मागच्या दहा पिढ्यापर्यंत तुमचा एखादा जन्मदाता व्हाईट नसल्यास तुम्ही कितीही व्हाईट दिसत असला तरी कायदेशीर रित्या तुम्ही व्हाईट नाहीत.

त्याकाळी अफ्रिकेत अस्तित्वात असलेला ब्लॅक, व्हाईट आणि कलर्ड असा वर्णभेद अमेरिकेत अंमलात जाऊ नये आणि फक्तं ब्लॅक आणि व्हाईट असे दोनच वर्ण असावेत.

गुलामांना प्रॉपर्टी म्हणूनच मान्यता हवी होती जेणेकरून त्यांना मारल्यास मानवी वधाचा गुन्हा व्हाईट लोकांवर नोंदवला जाऊन खटला चालवता येणार नाही.

ह्या तीन जोरदार मागण्याही होत्याच.

>>अजून दुसरे कुठले सबळ कारण माझ्या वाचनात आलेले नाही<<

ठिक आहे, त्याकाळात कंफेडरेट स्टेट्सची वेगळी घटना बनवली गेली होती, युएस कॉस्टिट्युशनच्या काहि कलमांत बदल करण्याच्या उद्देशाने. यात स्लेवरी व्यतिरिक्त इतर मुद्देहि आलेले तुम्हाला दिसतील, होपफुली.

आणि हे सगळे पुतळे त्या वृत्तीला पाठिंबा देणार्‍यांचे होते.
हे पुतळे म्हणजे अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत लाजिरवाण्या काळाचे प्रतिक आहे. का? कारण उत्तरेकडले लोक जिंकले, त्यांनी असे सांगितले. नि अजूनहि बहुमत असेच आहे. ते पाहिले की अफ्रिकन अमेरिकन लोकांना आपल्या अत्यंत वाईट दिवसांची आठवण येते. त्याची आठवण देखील नको. म्हणून ते पुतळे काढा.

पण काही लोकांना ते मान्यच नाही. त्यांना वाटते की ते जुने दिवस परत यावेत. नि त्यासाठी निदर्शने.

ज्यांना इतिहास जाणून घेण्यात खरोखरच रस आहे, त्यांनी हा लेख वाचावा अशी शिफारस करेन. प्रस्तुत लेख २००१ साली प्रसिद्ध झाला होता - http://www.nybooks.com/articles/2001/04/12/southern-comfort/

At the war’s outset in 1861 Jefferson Davis, president of the Confederacy, had justified secession as an act of self-defense against the incoming Lincoln administration, whose policy of excluding slavery from the territories would make “property in slaves so insecure as to be comparatively worthless,…thereby annihilating in effect property worth thousands of millions of dollars.”2

The Confederate vice-president, Alexander H. Stephens, had said in a speech at Savannah on March 21, 1861, that slavery was “the immediate cause of the late rupture and the present revolution” of Southern independence. The United States, said Stephens, had been founded in 1776 on the false idea that all men are created equal. The Confederacy, by contrast,

is founded upon exactly the opposite idea; its foundations are laid, its cornerstone rests, upon the great truth that the negro is not equal to the white man; that slavery, subordination to the superior race, is his natural and moral condition. This, our new Government, is the first, in the history of the world, based on this great physical, philosophical, and moral truth.3

Unlike Lincoln, Davis and Stephens survived the war to write their memoirs. By then, slavery was gone with the wind. To salvage as much honor and respectability as they could from their lost cause, they set to work to purge it of any association with the now dead and discredited institution of human bondage. In their postwar views, both Davis and Stephens hewed to the same line: Southern states had seceded not to protect slavery, but to vindicate state sovereignty. This theme became the virgin birth theory of secession: the Confederacy was conceived not by any worldly cause, but by divine principle.
...
Davis and Stephens set the tone for the Lost Cause interpretation of the Civil War during the next century and more: slavery was merely an incident; the real origin of the war that killed more than 620,000 people was a difference of opinion about the Constitution. Thus the Civil War was not a war to preserve the nation and, ultimately, to abolish slavery, but instead a war of Northern aggression against Southern constitutional rights

धन्यवाद नंदन. नक्की वाचणार!

बॅनन चं एग्जिट तसा शॉकर होता. कट्नर इंटर्व्यु आत्ताच झाला पण ते एकच कारण असू शकतं का?

<<बॅनन चं एग्जिट तसा शॉकर होता. कट्नर इंटर्व्यु आत्ताच झाला पण ते एकच कारण असू शकतं का?>>
-------- जाणार आहे हे माहित होते, कधी जाणार हाच प्रश्न होता. मुलाखत हे केवळ निमीत्त आहे.

ट्रम्प च्या WH मधे तब्बल दोनशे दिवस काम करण्याचे रेकॉर्ड निर्माण करुन गेला.... केली असे रेकॉर्ड मोडणार का ?

>>> केली असे रेकॉर्ड मोडणार का ?
--- ट्रम्पेच्छा बलीयसी!


मी हसे लोकाला, शेंबूड माझ्या नाकाला!

खरं तर छोटी बातमी आहे पण मी आधी पॉला डीन, ट्रंप हे कसे आउट ऑफ टच आहेत आम जनतेशी ह्या बाबतीत लिहिलं होतं त्याच संदर्भात आहे हे थोडं.
https://www.yahoo.com/style/steve-mnuchin-wife-let-them-031729148.html
तुमच्या कडे पैसा असणे हा काही गुन्हा नाही पण जिथे आम जनतेचे इन्कम तुमच्या १/४ सुद्धा येणार नाही तिथे तुम्ही असलं प्रदर्शन मांडणं किती चुकीचं आहे? ह्या उपर पॉलिसी मेकिंग मध्ये ह्या महानुभवांना थोडी तरी एंपथी असेल का? मला ओबामाविषयी फार प्रेम आहे असं नाही पण ओबामाकेअर बंद केल्यावर किती लोकांचं हेल्थ केअर जाणार ह्याच्या बातम्या बघितल्या आहेत. ह्यांना लक्षात येत असेल का, की सामान्य माणसाला किती गरज आहे हेल्थकेअरची? ती जाणीव नसेल तर सामान्य माणसाच्या हिताचे असे निर्णय हे कसे काय घेतील?एलिटिजम ह्या करताच अत्यंत घातक असतं.

डाका रद्द करणे पण त्याच वेळी कॉंग्रेसला नवीन नियम करायला वेळ देणे ही ट्रंपची स्मार्ट मूव्ह आहे. आता रिपब्लिकन/ ट्रंप डाका लेवरेज ठेवून भिंत बांधायला पैसे द्या/ इमिग्रेशन रीफोर्म आम्हाला हवे तसे करू द्या/ टॅक्स/ स्पेंडिंग बिलला सपोर्ट करा तर डाकाला पाठींबा देऊ कॉंग्रेस मध्ये करू शकतील. Happy

पण डाका च्या उद्देशांना खुद्द रिपब्लिकन्स चा ही बराचसा पाठिंबाच आहे असे दिसते. काही अती कॉन्झर्वेटिव्ज सोडले तर फारसा कोणाचा विरोध आहे असे दिसत नाही. विरोध बराचसा ज्या प्रकारे ती ऑर्डर दिली गेली त्याला आहे. त्यातून तोडगा सहज काढता यायला हवा.

डाकाच्या निमित्ताने तमाम डेमोक्रॅट आणि सोशल जस्टिस वॉरियर भावनेला हात घालून घालून बोलत आहेत. परंतु कायद्याला धुडकावून भावनेला महत्त्व का द्यायचे? लाखो एच वन वर काम करणारे उच्चशिक्षित, कर भरणारे, सुसंस्कृत लोक आणि त्यांची अल्पवयीन मुले ग्रीन कार्ड व्हायला अनेक दशके लागतात म्हणून अमेरिकेतून परत आपल्या देशात (मुख्यतः भारत व चीन) जातात. तेव्हा त्यांच्या वतीने कुणी अतीव दु:खद वक्तव्ये करत नाहीत. तेव्हा कायद्यापेक्षा भावना मोठी असल्याचे सांगत नाहीत. मुख्यतः मेक्सिकोतून बेकायदा घुसणारे लोक आणि त्यांच्या मुलांकरताच असा गळा का काढता? बेकायदा कृत्याला शिक्षा असावी का बक्षिस असावे? आईबापांनी बेकायदा कृत्य केले तर ते मुलांकडे बघून अमेरिकन सरकारने विसरावे ही अपेक्षा का? अशा प्रकारे कायद्यात पळवाट ठेवून अशा अनेक आईबापांना घुसखोरीला उत्तेजन मिळत नाही का? निदान वर्षानुवर्षे नुकसान सोसून एच १, ग्रीनकार्ड, नागरिकत्व असल्या किचकट दिव्यातून जाणार्‍या भारतीयांना भूतदयेच्या नावाखाली लायनीत घुसू देणे खटकायला हवे. पण तसे दिसत नाही.

मला डॅका मागचा मुद्दा पटतो. त्या मुलांना असं घालवून देऊन कसं चालेल? ओबामा म्हणतात तसं, हा प्रश्न डिसेन्सीचा आहे. हे म्हणत असतानाच मला शेंडेनक्षत्रांची एच १ वाल्यांबाबतीतचा मुद्दा पटतो. लिगल मार्गानी येऊन, नियमीत टॅक्सपेयर असून सुद्धा, बाहेरून येऊन आपले जॉब घेतात ह्या शिक्क्यामुळे म्हणा की कशामुळे म्हणा, टोटल दुर्लक्ष होतय असं वाटतय. डॅका बरोबरच आता एच ४ इ ए डि पण निकालात काढण्याचे लक्षणं दिसत आहेत.
डॅका वाले काय अन एच १ वाल्यांची मुलं काय, सारखीच परिस्थिती आहे जवळ जवळ.

>>हा प्रश्न डिसेन्सीचा आहे.<<
डिसंसी अ‍ॅट व्हॉट कॉस्ट? देशाची सीमा/सुरक्षा, इमिग्रेशन पॉलिसी, यंत्रणांवर पडणारा आर्थिक बोजा या सगळ्या बाबी अनडॉक्युमेंटेड मुलांसाठी बासनात गुंडाळायच्या? ट्रंप याच मुद्द्यावर निवडुन आलेला आहे तेंव्हा तो येनकेन प्रकारे डाका ची वासलात लावणारंच...

>>डॅका वाले काय अन एच १ वाल्यांची मुलं काय, सारखीच परिस्थिती आहे जवळ जवळ.<<
एच१ वाल्यांची मुलं डाका वाल्यांसारखी अनडॉक्युमेंटेड नाहित. दे आर इदर नॅचरल बॉर्न सिटिझन्स ऑर इमिग्रेटेड ऑन एच४. बरोबर?

. परंतु कायद्याला धुडकावून भावनेला महत्त्व का द्यायचे? >> 'कायद्यासाठी माणूस आहे कि माणसासाठी कायदा' ह्या प्रश्नाच्या उत्तरामधे ह्याचे उत्त्तर सापडेल. आई बापांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मुलांना देणे असे सांगाणारे अजून एखादे कायद्याचे उदाहरण आहे का ? "

डाकाच्या निमित्ताने तमाम डेमोक्रॅट आणि सोशल जस्टिस वॉरियर भावनेला हात घालून घालून बोलत आहेत >> डाकाला फक्त डाव्याच नाही तर उजव्या बाजूच्या लोकांचा पण भरघोस पाठिंबा आहे हे fox वर कालच ऐकले होते पण जाउ दे ....

डिसंसी अ‍ॅट व्हॉट कॉस्ट? देशाची सीमा/सुरक्षा, इमिग्रेशन पॉलिसी, यंत्रणांवर पडणारा आर्थिक बोजा या सगळ्या बाबी अनडॉक्युमेंटेड मुलांसाठी बासनात गुंडाळायच्या? >> डाका मधल्या मुलांनी देशाची सीमा/सुरक्षा, इमिग्रेशन पॉलिसी, यंत्रणांवर पडणारा आर्थिक बोजा ह्यामधे नक्की काय केलेय असे तुझे म्हणणे आहे. ? खास तुझ्या साठीच लिहिलेला हा लेख आहे.
https://www.vox.com/policy-and-politics/2017/9/5/16236116/daca-history

निदान वर्षानुवर्षे नुकसान सोसून एच १, ग्रीनकार्ड, नागरिकत्व असल्या किचकट दिव्यातून जाणार्‍या भारतीयांना भूतदयेच्या नावाखाली लायनीत घुसू देणे खटकायला हवे. पण तसे दिसत नाही. >>> हे लॉजिक जरा समजावून सांगा. या मुलांना परत पाठवण्याची प्रक्रिया लांबवल्याने भारतीय लोकांचे नक्की काय नुकसान होते? या मुलांना लीगल स्टेटस वगैरे दिले जात नाही. ग्रीन कार्ड, व्हिसा काहीही नाही. फक्त इतकेच, की डिपोर्टेशन प्रायॉरिटीज मधे ते नाहीत.

ही मुले स्वतः बेकायदा इथे यायचा निर्णय घेउन आलेली नाहीत. त्यांच्या पालकांनी तो घेतला. हे १६ वर्षांच्या आधी इथे आले. त्यानंतर किमान ५ वर्षे इथेच राहिले. इथे शिकले. यांच्या नावावर कसलेही गुन्हे नाहीत. आता ते कर ही भरतात.

तेव्हा ज्या लाखो लोकांच्या मागे आइस ने लागायला हवे, त्यात हे "प्राधान्य" वाले धरले जात नाहीत. यात विरोध करण्यासारखे काय आहे?

दुसरे म्हणजे हा कायदा फक्त या मुलांकरता आहे. त्यांच्या आईबापांबद्दल यात काहीच उल्लेख नाही. त्यामुळे त्यांना माफी वगैरे दिली जात नाही.

भारतीय लोकांच्या अमेरिकेतील कोणत्याही हक्कांच्या किंवा फायद्याच्या आड ही मुले येत नाहीत. यांना नोकर्‍या वगैरे मिळत असल्या तरी मेक्सिकन लोकांची इथली परिस्थिती पाहता किती टक्के असे लोक भारतीय लोकांच्या तुलनेत प्राधान्याने नोकर्‍या मिळवतील?

असामी - हो. बरेच रिपब्लिकन्स, अगदी पॉल रायन वगैरेही पाठिंबा देत आहेत. खुद गब्बर ट्रम्पला याबाबतीत फार रस दिसत नाही. त्याला १० राज्यांच्या अ‍ॅटर्नी जनरल्स नी प्रेशर आणल्याने काहीतरी करावे लागत आहे. त्यात त्याने काँग्रेसला ६ आठवडे देउन हे फिक्स करायचे दार उघडे ठेवलेले आहेच.

. बरेच रिपब्लिकन्स, अगदी पॉल रायन वगैरेही पाठिंबा देत आहेत >> ते सगळे डेमोक्रॅट नसल्यामूळे सोशल जस्टिस वॉरियर मधे येत असावेत बहुधा Wink

खर तर ट्रंप ने हा मुद्दा ऐरणीवर आणला हे योग्य झाले असे माझे मत आहे. एकंदर जनतेचा डाकाला असणारा सपोर्ट बघता त्यांच्या बाजूने काय्दा होऊन ह्या मुलांच्या डोक्यावर सतत टांगती असलेली तलवार दूर होईल नि नॉर्मल आयुष्य जगता येईल अशी आशा धरतो. खर तर इमिग्रेशन च्या चरकातून गेलेला कुठलाही माणूस डाका मधे अडकल्यामूळे धेडगुजरी आयुष्य जगणार्‍या मुलांचा त्रास माणूस म्हणून सहज समजू शकतो .

डिसंसी अ‍ॅट व्हॉट कॉस्ट?>>>>> ह्याच उत्तर फारएण्ड नी दिलय त्यामुळे फार स्पष्टिकरण नाही देत पण त्यांचे आई बाप बेकायदेशिररित्या आले तरी त्याची शिक्षा त्यामुलांना देऊन काय उपयोग आहे असं म्हणत होतो. आई वडिल आत आले, ते ह्या सुरक्षा व्यवस्थेमधल्या गॅप्स मुळे. वर वर बघायला गेलं तर मुद्दा एकदम बरोबर वाटतो. बेकायदेशिर पणे आलात, आता तुम्ही आणि तुमची मुलं परत जिथून आलात तिथे परत जा. मुलांकरता, एस्पेशली ज्यांना त्या कल्चरचे आजिबात एक्स्पोजर नाही त्यांना अवघड जाणार आहे खुप.

एच१ वाल्यांची मुलं डाका वाल्यांसारखी अनडॉक्युमेंटेड नाहित. दे आर इदर नॅचरल बॉर्न सिटिझन्स ऑर इमिग्रेटेड ऑन एच४. बरोबर?>>>>> बरोबर. म्हणजे लिगली येऊन सुद्धा शेवटी त्यांना त्रासाला समोर जावं लागेल ह्या अर्थानी म्हणत होतो. मुलं जन्माला इथे आली, सिटिजन आहेत, पुष्कळ वर्ष वास्तव्य आहे, पण आता एच १, ग्रीन कार्ड डीले अन लफड्यांमुळे परत जावं लागेल अशी परिस्थिती आहे.

>>डाका मधल्या मुलांनी देशाची सीमा/सुरक्षा, इमिग्रेशन पॉलिसी, यंत्रणांवर पडणारा आर्थिक बोजा ह्यामधे नक्की काय केलेय असे तुझे म्हणणे आहे. ? खास तुझ्या साठीच लिहिलेला हा लेख आहे.<<

याहि वेळेस तु खास माझ्यासाठी शोधुन लेख टाकलास हे बघुन मला गहिवरुन आलंय... Wink

पण नेहेमीसारखाच माझा पॉइंट मिस केलास. देशाचे कायदे असतात, त्या कायद्यां मागचा उद्देश डावलुन त्यात तुम्ही दुरुस्ती करत राहिलात आणि त्या दुरुस्तीचा अन्ड्यु अ‍ॅडवांटेज घेतला जाउ लागला तर ती दुरुस्ती रिविझिट करणं भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, डाका हि अशी धेडगुजरी दुरुस्ती आहे कि इट डझंट प्रोव्हायड ए क्लियर पाथ टु ग्रीनकार्ड्/सिटिझन्शिप; दर २ वर्षांनी रिनु करण्याचं बंधन आहे. मग डाका बेनिफिशरीजनी आपल्या भविष्यावर सततची हि टांगती तलवार का वागवावी? थोडक्यात डाका हे त्या मुलांकरता परमनंट सोलुशन नाहि, तात्पुरतं बँडेड आहे...

थोडक्यात डाका हे त्या मुलांकरता परमनंट सोलुशन नाहि, तात्पुरतं बँडेड आहे... >> मान्य, मी वर तेच म्हटलय हे बघ "खर तर ट्रंप ने हा मुद्दा ऐरणीवर आणला हे योग्य झाले असे माझे मत आहे. एकंदर जनतेचा डाकाला असणारा सपोर्ट बघता त्यांच्या बाजूने काय्दा होऊन ह्या मुलांच्या डोक्यावर सतत टांगती असलेली तलवार दूर होईल नि नॉर्मल आयुष्य जगता येईल अशी आशा धरतो. खर तर इमिग्रेशन च्या चरकातून गेलेला कुठलाही माणूस डाका मधे अडकल्यामूळे धेडगुजरी आयुष्य जगणार्‍या मुलांचा त्रास माणूस म्हणून सहज समजू शकतो ."

मी ती लेखाची लिंक तुला " देशाची सीमा/सुरक्षा, इमिग्रेशन पॉलिसी, यंत्रणांवर पडणारा आर्थिक बोजा या सगळ्या बाबी अनडॉक्युमेंटेड मुलांसाठी बासनात गुंडाळायच्या? " ह्याबद्दल दिली होती.

>>एकंदर जनतेचा डाकाला असणारा सपोर्ट बघता त्यांच्या बाजूने काय्दा होऊन ह्या मुलांच्या डोक्यावर सतत टांगती असलेली तलवार दूर होईल नि नॉर्मल आयुष्य जगता येईल अशी आशा धरतो.<<

याचाच सर्वांगाने विचार करण्याकरता ट्रंपने ६ महिने दिलेले आहेत काँग्रेसला. बघुया मंथनातुन काय बाहेर पडतं ते...

डाकाच्या बाबतीत शेंडे आणि राजशी सहमत.
लिगली किंवा इल्लिगली मुलांना अमेरिकेत घेऊन आलात आणि मग इल्लिगली ठेवलंत तर रीवोर्ड पण लिगली परत घेऊन गेलात तर काही नाही. हे पॉलिसी मध्ये बसणं कठीण आहे. मुलांचा काय दोष इत्यादी मुद्दे समजत आहेत.
अगदी कडेकोट बॉर्डर सिक्युरीटी केली तरी लिगली एकदा प्रवेश केला की बाहेर जाणं न जाणं माणसाच्या हातात असतं. नाही गेला मुदतीत तर तो/ती इल्लिगल होते. आता त्याने/ तिने काही गुन्हा केलेला नाही त्यामुळे बाहेर घालवायचा लॉ एन्फोर्स करायला ते रांगेच्या शेवटी. त्याच्या बरोबर मुले असतील तर त्यांची वये वाढणारच. मग त्यांना संरक्षण द्या.
मुंबईत १९९० मग ९५ मग २००० मग २००५ अशा उघड्या जमिनीवर बांधलेल्या झोपड्या अधिकृत होतात. जेव्हा हाकललं पाहिजे तेव्हा दुर्लक्ष आणि मग माणुसकी साठी कायदे... ते ही लोकं कर भरतात, ते गेले तर कॅली मधले वन इन फोर जॉब कोण करणार अशी आर्ग्युमेंट.

कायदे मोडून क्यु जंप/ किंवा संरक्षण मिळणार असेल तर कोण पाळेल?

अमित, या मुलांनी कायदे मोडलेले नाहीत. आता ती मोठ्ठी वॉल होणारच आहे मेक्सिकोच्या पैशाने. मग हे सगळे बंदच होणार आहे Wink

११ मिलीयन्स इल्लिगल्स आहेत. त्यात ज्यांना खरोखरच हाकलायला हवे अशांच्या मागे रिसोर्सेस लावून यांच्याकडे दुर्लक्ष करा असा साधा प्राग्मॅटिक हेतू आहे यात. पोलिस खात्यापासून ते सर्व सरकारी खाती असा प्राधान्यक्रम वापरतात.

Pages