अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बेकायदा रहात आहेत म्हणजे कायदे मोडलेले आहेत ना?
प्राधान्यक्रम वापरतात, आधी क्रिमिनल, मग इतर, फॅमिली सगळ्यात शेवटी ते सोयीचं आहे मान्यच. पण म्हणून त्यातून जीसी आणि नागरिकत्व पाथ तयार झाला की आवताण होणार नाही का?
भिंत बांधून सगळे प्रश्नच सुटणार आहेत हे विसरलोच Lol

फा Lol

अशा प्रकारची डाकाची अस्थानी भूतदया दाखवून आपण एक कायमची पळवाट उपलब्ध करुन देत आहोत. कसे का होईना मुलांना घेऊन अमेरिकेत घुसायचे. आणि मग आपले काहीही होऊ दे. पण मुलांची सोय झाली अशी वृत्ती बळावणार. कॅलिफोर्निया व इलिनॉय सारखी अतीपुरोगामी राज्ये तर कायदेशीर अल्पवयीन मुलांपेक्षा बेकायदा घुसलेली मुले जास्त भूषणावह मानत आहेत.

कायद्यामुळे आईबापांच्या चुकीची शिक्षा मुलांना होते हे कितीतरी वेळा घडते. घटस्फोटाच्या वेळी न्यायालये निवाडा करतात. पोरांची ताटातूट करतात. कित्येकदा मुले आईबापांपासून हिरावून सरकारी देखभालीखाली नेली जातात. अशा प्रकारे सरकारी पालनपोषण केलेली मुले ही गुन्हेगार बनण्याची शक्यता आहे त्यापेक्षा ती आपल्या स्खलनशील आईबापांकडे जास्त नीट वाढली असती. पण कायदा तसे चालवून घेत नाही. जर कायद्याच्या व्याख्येप्रमाणे मुलांची आबाळ होत असेल तर त्या मुलांना वेगळे केलेच जाते.

परक्या देशातील मुले अगदी अल्पवयीन असली तरी त्यांचे पालनपोषण ही अमेरिकन सरकारची जबाबदारी का असावी? त्यांचे आईबाप ज्या देशाचे नागरिक आहे त्या देशाने ती जबाबदारी घ्यावी.

कायद्याने वेळप्रसंगी कठोर होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे घाऊक भूतदया दाखवून सरकारी तिजोरीवरचा भार वाढवत आहोत. भविष्यात डेमोक्रॅट पुन्हा सत्तेवर आले की महात्मा ओबामाजींनी केले मग आपण आणखी जास्त करू म्हणून एखादा सुपर डाका काढून आणखी वाट लावतील. जर इमिग्रेशन कायदे कालबाह्य आहेत आणि आता अमेरिकन सीमा पूर्ण खुल्या कराव्यात असा काही विचार असेल तर तो उघड उघड प्रचारात मांडून त्यावर निवडणुका जिंकाव्यात.

केवळ उजवे काय म्हणत आहेत आणि डावे काय म्हणत आहेत यापेक्षा स्वतःचा सारासारविवेक काय म्हणतो ते पहाणे जास्त बरे. आपण काही मेंढरे नाही.

मी इतके दिवस इथे लिहीलेले प्रत्येक मत स्वतःच्या अ‍ॅनेलिसीस नंतर लिहीलेले आहे, डावे किंवा उजवे काय म्हणतात त्यावरून नाही. मला यांच्याही अजेण्ड्यात इण्टरेस्ट नाही, आणि त्यांच्याही.

बेकायदा रहात आहेत म्हणजे कायदे मोडलेले आहेत ना? >>> अमित, म्हणजे १८ वर्षांचे झाल्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतःहून देश सोडून गेल्या अनेक वर्षांत आपला ज्या देशाशी संबंध नाही अशा देशात त्यांनी निघून जावे असे होईल. प्रॅक्टिकली हे कोण करणार आहे?

ठीक आहे. ११ मिलियन्स मधे यांना शेवटी ठेवा. बाकीचे १०.५ मिलीयन्स परत गेले की मग यांना पाठवा :). तोपर्यंत जगातली सर्वात भारी भिंत तयार होईल. मग हा प्रश्नच उरणार नाही Wink

भारतीयांच्या कोणत्याच गोष्टीला या मुलांचा अडसर नाही. अमेरिकन रिसोर्सेस ची चिंता असेल तर ते रिसोर्सेस ज्यांना खरेच हाकलायला हवे त्यांनी वापरण्यापेक्षा यांनी वापरलेले चांगले.

केवळ उजवे काय म्हणत आहेत आणि डावे काय म्हणत आहेत यापेक्षा स्वतःचा सारासारविवेक काय म्हणतो ते पहाणे जास्त बरे. आपण काही मेंढरे नाही. >> सारासारविवेक पेक्षाही तुमची सदसदविवेक बुद्धीकाय सांगते ते बघणे जास्त जरुरी आहे.

म्हणजे १८ वर्षांचे झाल्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतःहून देश सोडून गेल्या अनेक वर्षांत आपला ज्या देशाशी संबंध नाही अशा देशात त्यांनी निघून जावे असे होईल. प्रॅक्टिकली हे कोण करणार आहे? >> तुझं म्हणणं मान्यच आहे. पण होईल काय की मुलांना घेऊन बेकायदा आलं आणि गुन्हा न करता राहीलं तर डीपोर्ट करण्याची शक्यता फार कमी. कारण कुटुंबासहित व्यक्ती आणि तिचे कुटुंब हे रांगेच्या तळाशी असणार (तस असलं ही पाहिजे) मुलांना लीगल पाथ मिळाला, ते कर भरत आहेत, इकोनिमीला हातभार लावत आहेत.
ते इतके भरमसाठ आहेत की गेले तर तीन बिलियन डॉलर वर पाणी सोडावं लागेल कॅलिफोर्नियाला. फार्मिंग, वेटिंग इत्यादी क्षेत्रात चारात एक इल्लिगल आहे. लोकल अर्थव्यवस्थेला त्यांची गरज आहे. गरज का आहे? कारण पुरेशी लीगल लोकं आणण्याचा मार्गच बंद केला. तो मार्ग चालू केला तर इल्लिगल लोकं जातील का? एम्प्लोई कमी पैशात इल्लिगल मिळाला तर काय करतील? अर्थात काही वर्षांनी एक्विलिब्रिअम येऊन नक्कीच बरेचसे लीगल होतील.
भारतीयांना नाही पण ज्या जन्म देशातून ते येतील त्यातील लीगल लोकांना अडसर होईल ना?

हिलरीबाईंचं अजुन एक मेम्वा (व्हाॅट हॅपन्ड) आलेलं आहे. कोमी पासुन सॅंडर्स पर्यंत सगळ्यांवर बेछुट/चौफेर गोळीबार केलेला आहे अशी बातमी आहे... Happy

लोकल अर्थव्यवस्थेला त्यांची गरज आहे. गरज का आहे? कारण पुरेशी लीगल लोकं आणण्याचा मार्गच बंद केला. >>> लाँग टर्म तसेच हवे. जर स्थानिक लोक तयार नसतील अशा नोकर्‍या करायला तर लीगली बाहेरूनच आणावे लागतील.

आर्ग्युमेण्ट करता एक हायपॉथेसिस - जर उद्या अमेरिकेकडे अशी काही पद्धत उपलब्ध झाली, की ज्यामुळे सगळे ११ मिलीयन इल्लिगल्स शोधून एका मर्यादित काळात त्यांच्या त्यांच्या देशात परत पाठवता येतील, तर हे सगळे बंद करून ती अमलात आणावी. मग फक्त लीगल्स राहतील. पण यावर जितके वाचले आहे त्यावरून हे ऑल्मोस्ट अशक्य आहे. कारण यातले अर्ध्यापेक्षा जास्त शोधायची सिस्टीमच नाही.

त्यामुळे आहे त्या डिपार्टमेण्टच्या रिसोर्सेसमधून हे काम करावे लागणार. ते रिसोर्सेस ११ मिलीयन्स करता पुरेसे नाहीत. ते वापरून हे परत पाठवायला इतका वेळ लागणार आहे, की तोपर्यंत नव्याने लोक पुन्हा इथे असतील. म्हणजे procedural discretion वापरून कोणत्या इल्लिगल्स करता ही यंत्रणा वापरायची हे ठरवावेच लागणार आहे. किंबहुना ते तसेच केले जाते. डाकाने फक्त या काही मुलांना एक स्थिरता दिली दोन वर्षांची. ज्यांना ही यंत्रणा एनीवे मागे लागणार नाहीये, त्यांना पुढे आणून असे सांगण्यात येते की तुम्ही दोन वर्ष निश्चिंत राहा.

११ मिलीयन्स मधून कोणावर फोकस करायचे आणि कोणाकडे दुर्लक्ष करायचे हे ठरवण्याच्या मीटिंग मधे आपण बसलो, तर यापेक्षा काय वेगळे ठरवू?

यात constitutional purists लोकांचा जो आक्षेप आहे की ओबामाला हे करण्याचा अधिकारच नव्हता, तो बरोबर वाटतो. त्या दृष्टीने ट्रम्पने जे काँग्रेसला सांगितले आहे ते योग्य आहे.

हिलरीबाईंनी आरशात निरखून पाहिले असते तर इतक्या लोकांवर डाफरायची गरज पडली नसती! सगळ्यात मोठा दोष खुद्द बाईंचा आहे पण ते मान्य करण्याचा प्रांजळपणा कुठून असणार?

>>सारासारविवेक पेक्षाही तुमची सदसदविवेक बुद्धीकाय सांगते ते बघणे जास्त जरुरी आहे.
सारासार वा सद्सद एकंदरीत तेच निष्कर्ष. कायदा मोडला असेल तर त्याला त्याची किंमत मोजणे भाग आहे. त्याबद्दल पारितोषिक देणे उचित नाही. मी जर तिकिट न काढता गाडीत चढलो तर समाजात मी किती कष्टाळू, विशालहृदयी आणि मनमिळावू आहे, समाजसेवेत मी कसा मन लावून काम करतो, मी कसा प्रचंड कर भरतो, माझ्या कंपनीत डझनावारी लोक काम कसे करत आहेत, बाकी कुठलेही कायदे मी मोडत कसा नाही वगैरे मुद्दे गैरलागू आहेत. बेकायदा प्रवास केल्याबद्दल मला दंड झालाच पाहिजे. कायदा हा असाच हवा.

जे बेकायदेशीरपणे इथे रहातात त्यातले काही खूप शिकलेले आहेत. ज्या कंपन्यांना उच्च शिक्षण झालेले लोक लागतात, उदा. वैद्यकीय, इंजिनियरिंग, आय टी इ. त्या कंपन्यांना त्यांची फार गरज आहे. कायदेशीरपणे रहाणार्‍या, अमेरिकन नागरीक असणार्‍या लोकांत तेव्हढे लायक लोक नाहीयेत.
त्यामुळे चिनी भारतीय लोकांवर एक प्रकारे अन्याय होतो असे वरकरणी वाटेल, पण कायदे असे दिव्य की त्यातून कायदेशीरपणे पुरेश्या लोकांना आणता येत नाही. सध्या तर कायदेशीरपणे व्हिसा घेऊन येणार्‍यांची संख्या कमी करण्याचा कायदा करण्याची भाषा करताहेत!

आता एक आहे, त्यातले इथे काही लोक तांत्रिक दृष्ट्या बेकायदेशीरपणे रहातात, त्यांना एकतर हा़कलून द्या किंवा कायदेशीर करा. हाकलून दिले तर त्यांच्या जागी घेणार कुणाला? आणि त्यांना कायदेशीर करायचे तर पाच पाच, सहा सहा वर्षे वाट पहाणार्‍या भारतीयांना ग्रीन कार्ड का देत नाहीत? आता त्या नोकर्‍या देणार्‍या कंपन्यांनीच ठरवले पाहिजे की बेकायदेशीरपणे रहाणार्‍या मेक्सिकनांना आधी ग्रीन कार्ड द्यायचे की त्यांना एच १ वर बरीच वर्षे तंगवत ठेवून भारतीयांना ग्रीन कार्ड द्यायचे.
सध्याच्या सरकारवर हे सोपवले तर भारतीयांचे काही खरे नाही - मूर्ख लोकांच्या राज्यात शहाणपणाने वागणे जरा धोकादायकच.

बेकायदेशीरपणे रहाणारे जे लोक उच्चशिक्षित नाहीत, ते हलक्या दर्जाची, कमी पगाराची कामे करतात. आणि स्वार्थी लोक त्यांचा भरपूर गैरफायदा घेतात. काँट्रॅक्टर लोक अश्या लोकांना अतिशय कमी पैशात भरती करतात आणि फायदा वाढवतात. हे लोक कायदेशीरपणे रहाणार्‍या लोकांपेक्षा खूप कमी पैशात काम करतात, म्हणून पुष्कळ लोक त्यांना कामे देतात.
हे सगळेच काही गुन्हेगार नाहीत, मग त्या लोकांमुळे असे काय देशाचे नुकसान होते, की पोलीस राज्य असल्याप्रमाणे दिसेल त्याचे पेपर तपासून त्याला राहू द्यायचे नाहीतर हाकलून द्यायचे? फक्त तसेच केले तरच हा प्रश्न सुटेल. नि त्यासाठी लागणारा सर्व खर्च करायचा? मग टॅक्स ब्रेक कुठून देणार?
बरेच मेक्सिकन कायदेशीरपणे इथे आले, कायदेशीरपणे नागरिक बनले नि अनेक वर्षे इथे रहाताहेत, त्यांना मधेच धरून पेपर दा़खवा म्हणायचे, नि त्यांच्या बरोबर असणार्‍या गोर्‍या लोकाना नाही?
आणि मग अमेरिकेची उदात्त विचार सरणी, वैयक्तिक स्वातंत्र्य, प्रायव्हसी कायदा वगैरेचे काय?

या इमिग्रेशन चे बरेच कायदे आहेत, फार पूर्वीपासून आहेत, तरी ही अवस्था.
मग आता तो प्रश्न सध्या ज्वलंत झाला आहे.
अमेरिका ही "तात्पुरती" आहे. कुठलाहि प्रश्न इथे तात्पुरता ज्वलंत बनतो नि काही दिवसांनी विसरल्या जातो.
मग कायदा करायचा म्हणून काहीतरी अर्धवट कायदा करतात, त्याची अंमलबजावणी करायला पुरेसे पैसे देत नाहीत. त्यात खूप लूपहोल्स. शिवाय त्या कायद्याची अंमलबजावणी करायची तर दुसरा कायदा आडवा येतो. असला काहीतरी गोंधळ!

त्यातून हा बेकायदेशीरपणे रहाणार्‍या लोकांचा प्रश्न आणखीनच कठीण. अत्यंत स्वार्थी लोकांनी, फक्त पैसा वाचवण्यासाठी या लोकांना इथे राहू दिले. त्यांना घालवायचे तर या लोकांना नाखूष करायचे - नि निवडणु़कीला पैसे तर तेच देतात! शेवटी तेच महत्वाचे ना?! कायदा वगैरे नुसत्या गप्पा!

आजकाल तर अर्धवट तरी कायदा होईल की नाही याची पण शंका आहे. आठ वर्षांनंतर, बहुमत असूनहि, सात महिन्यात ओबामा केअर रिपील नि रिप्लेस होऊ शकत नाही! डेट सिलिंगसाठी शेवटी शत्रूपक्षाची मदत घेऊन प्रेसिडेंटने स्वतः काहीतरी केले. कारण खुद्द प्रेसिडेंटचाच काँग्रेसवर विश्वास नाही!!

आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे!
चालू क्षण एंजॉय करा बाकी सब झूट.

सारासार वा सद्सद एकंदरीत तेच निष्कर्ष. कायदा मोडला असेल तर त्याला त्याची किंमत मोजणे भाग आहे >> त्यांनी कायदा मोडला नाहिये तर त्यांच्या आई बापांनी मोडला आहे हा मोठा फरक आहे.

या विषयावर काही मत ठरवण्याआधी साउथवेस्ट अमेरिकेचा एकोणिसाव्या शतकातील इतिहासही जमल्यास वाचून घ्या.
कोणती टेरिटरी कोणाकडे होती, कोण कुठे लिगली/इलिगली गेले वगैरे.

मागच्या वर्षीच्या DNC मध्ये eva longaria ने दिलेलं स्पीच इथे कोट करायचं तर -

“Like many of you, this election is very personal to me,” Longoria said during the first night of the DNC. “I’m from a small town in South Texas and if you know your history, Texas used to be part of Mexico. Now, I’m ninth generation American. My family never crossed a border, the border crossed us.”
खूप ग्रे एरिया आहे हा सगळा. आता तिची फमिली ट्रम्पच्या फमिलीच्या खूप आधीपासून टेकसास मध्ये असली तरी विसाव्या शतकात ज्याचे पूर्वज योरोपातून आले तो इथला मालक आणि तिच्यासारखे दिसणारे इथले इमिग्रँटस मानले जाणार, त्यांना थांबून पेपर्स विचारले जाणार- हे थोडं विअर्ड नाही का वाटत?

>>
खूप ग्रे एरिया आहे हा सगळा. आता तिची फमिली ट्रम्पच्या फमिलीच्या खूप आधीपासून टेकसास मध्ये असली तरी विसाव्या शतकात ज्याचे पूर्वज योरोपातून आले तो इथला मालक आणि तिच्यासारखे दिसणारे इथले इमिग्रँटस मानले जाणार, त्यांना थांबून पेपर्स विचारले जाणार- हे थोडं विअर्ड नाही का वाटत?
<<
उगाच घोळात घोळ घालण्याचा प्रकार आहे. ह्यात विअर्ड (हा शब्द मराठीत आला का?) काहीही नाही. उगाच दोन तीन शतके पूर्वी अमुक होत होते मग आताही तेच का नको वगैरे विचारले तर बायकांचे हक्क, बिन गोर्‍या वंशाच्या लोकांचे हक्क ह्याचे काय होईल? इतिहासाचा अभ्यास जरूर करावा पण जगावे वर्तमानातच.

एक इव्हा लँगोरियाचे पूर्वज मेक्सिकोत रहायचे ते एका युद्धानंतर अमेरिकन बनले म्हणून कितीही मेक्सिकन बेकायदा अमेरिकेत घुसत असतील तरी गोड मानून घ्यावे हे खरे विकृत (मराठीत विअर्ड!) विचार आहेत. अनेक युद्धामधे देशांच्या सीमा बदलतात. त्यात नवे काही नाही. युरोपात तर हे किती वेळा झाले ह्याची गणतीही नाही. पण म्हणून नव्या देशाने नागरिक आणि परके ह्यात भेदभाव करता कामा नये असे मला वाटत नाही.

परक्या देशातील मुले अगदी अल्पवयीन असली तरी त्यांचे पालनपोषण ही अमेरिकन सरकारची जबाबदारी का असावी? त्यांचे आईबाप ज्या देशाचे नागरिक आहे त्या देशाने ती जबाबदारी घ्यावी.

या भारतात परत Wink

इव्हा लोंगोरिया चे लॉजिक मलाही समजले नाही - या चर्चेच्या संदर्भात. मूळ बातमी/कोट वाचलेला नाही. टेक्सास मधे कोणालाही रस्त्यात थांबवून डॉक्युमेण्ट्स मागता येतील वगैरे काही लॉ येत आहे का? सर्वसाधारण अमेरिकेत असे करता येत नाही. लॅटिनो असो, दिसायला नेटिव्ह असो, नावात हुसैन असो किंवा केस ऑरेंज रंगाचे असोत Wink

इव्हा लोंगोरिया इमिग्रण्ट लोकांकरता, ते रोजंदारीवरचे मजूर असतात त्यांच्याकरता काम करते. एक डॉक्युमेन्टरी ही तिने बनवली आहे - बहुधा फ्लोरिडा च्या ऑरेंजेस शी संबंधित लेबर बद्दल. पण तिच्या इमिग्रेशन च्या विचारांचा या ड्रीमर्स च्या चर्चेशी संबंध दिसत नाही. जे अनेक पिढ्या टेक्सास मधे राहतात ते ऑलरेडी अमेरिकन नागरिक असतील.

>>My family never crossed a border, the border crossed us.”<<

या वाक्याचा संपुर्ण कांटेक्स्ट इथे नसल्याने त्याचा नेमका अर्थ त्या बाईंना काय अपेक्षित आहे समजत नाहि. तरीहि हेच वाक्य पाकिस्तानात राहणार्‍या पण भारतात नातेवाईक असणार्‍या कुटुंबाला हि सहज लागु होइल; त्यांना हि भारतात प्रवेशासाठी विजा लागतोच ना?..

मेक्सिकन्सकडे लीगल वा इलिगल immigrants म्हणून पाहिलं जातं पण वास्तविक ते इतरांच्या आधीपासून इथे राहात आहेत.
Techinically बरोबर आहे की लॉ पाळला पाहिजे, आधी काय झालं त्याच्याशी देणंघेणं काय पण दुसरी साईड पाहिली की ग्रे एरिया वाटतो.

भारतीयांच्या कोणत्याच गोष्टीला या मुलांचा अडसर नाही. >>>>
डाका वाल्या मुलांना इन स्टेट ट्युशन मिळते ना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये? एच ४ वर असलेल्या मुलांना मिळते का?

वर्षानु वर्ष लोक वाट पाहतायत ग्रीन कार्ड ची कायदेशीर रित्या अर्ज करून, जगात इतरत्र त्यांच्या त्यांच्या देशात बसून
आणि याना प्राधान्य हवं आणि सूट हवी सगळे नियम धाब्यावर बसवून, हे जर कोणाला योग्य वाटत नसेल तर त्यात काय गैर आहे?

जर त्यांना इथे राहू दे अशी आर्ग्युमेण्ट असेल, केवळ ते इथे पोचलेत म्हणून
या न्यायाने जे कोणी विमानाचं तिकीट काढू शकतात त्यांना पण येऊ दे की मग

त्यांनी कायदा मोडला नाहिये तर त्यांच्या आई बापांनी मोडला आहे हा मोठा फरक आहे.>>>>
त्यांनी ही मोडलाच की इथे येऊन आणि या न्यायाने मग संपूर्ण कुटुंब जाऊ दे की परत
उघड उघड एनपीआर वर एक डाका वाला मुलगा सांगत होता की
He is more worried about his parents than himself now that all details are with the government

सगळा गोंधळ नुसता, वर लिहिल्या प्रमाणे "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे!"

पुन्हा कॉपी पेस्ट करावी काय वरची पोस्ट? एक इन स्टेट ट्यूशन सोडले तर बाकी सगळ्याबाबत ऑलरेडी लिहीलेले आहे वरती Happy

इन स्टेट ट्यूशन बद्दल - नसेल मिळत एच-४ वाल्यांना. पण ती काय डाकावाल्यांना दिल्यामुळे मिळत नाही असे थोडेच आहे! दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. २०१२ पूर्वीही मिळत नव्हतीच. ओबामा यांच्याबाबतीत जास्त उदार झाला असेल, पण यांना इन-स्टेट दिल्यामुळे इतरांचे काही नुकसान झालेले नाही.

पुन्हा कॉपी पेस्ट करावी काय वरची पोस्ट? एक इन स्टेट ट्यूशन सोडले तर बाकी सगळ्याबाबत ऑलरेडी लिहीलेले आहे वरती >>>

म्हणून शेवट च वाक्य लिहील आहे >> सगळा गोंधळ नुसता, वर लिहिल्या प्रमाणे "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे!"

>> नसेल मिळत एच-४ वाल्यांना
पुर्वी मिळायची ना? मी माझं ग्रॅज्युएट स्कूलिंग इन-स्टेट ट्युइशन वरच केलं एच४ वर. अर्ली २००० मध्ये.

त्यांनी ही मोडलाच की इथे येऊन आणि या न्यायाने मग संपूर्ण कुटुंब जाऊ दे की परत >> तो न्याय होत नाही हा मुख्य issue आहे. कायद्याच्या द्रुष्टिने minor ने केलेले गुन्हे नि adult ने केलेले गुन्हे ह्यांमधे मोठा फरक असतो. शिक्षेचे स्वरुप वेगवेगळे असते. त्यामूळे आइ बापांच्या गुन्ह्याची शिक्षा मुलांना अधिक प्रमाणात द्या हे म्हणणे निव्वळ क्रूरपणाचे आहे. सुदैवाने वेगवेगळ्या पोल्स मधून (हो अगदी उजव्या बाजूच्याही) बहुसंख्य लोक डाका वाल्या मुलांना legal immigration देण्याच्या बाजूने आहेत.

इन स्टेट ट्यूशन बद्दल - नसेल मिळत एच-४ वाल्यांना. पण ती काय डाकावाल्यांना दिल्यामुळे मिळत नाही असे थोडेच आहे! >> हेच immigration quota लाही लागू होते. देशाचा कोटा ठरवण्यासाठी इतर देशाला किती दिले फक्त हाच criteria धरला जात नाही.

Pages