या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र. ६२७ मराठी नवीन
कोडे क्र. ६२७ मराठी नवीन
स च अ ब ब
म ह ग ह ह
र र झ द द
श स झ ज ज
नवीन म्हणजे आमचा पास
नवीन म्हणजे आमचा पास
स्निग्धाताई सोपे आहे प्रयत्न
स्निग्धाताई सोपे आहे प्रयत्न करा
क्लु :- चित्रपट कॉलेज लाईफवर आधारित आहे. आणि चित्रपटाच नाव इंग्रजीत आहे.
स्वप्न चालुन आले बघता बघता
स्वप्न चालुन आले बघता बघता
माझे होऊन गेले दिसता दिसता...
मला आलं...
मला आलं...
पण स्निग्धा ताई हे तुम्हीच सोडवल पाहिजे...
क्लु:
२०१७ चा पहिला मराठी चित्रपट ह्या नायकाचा आलेला...
ओळखा बरं..
सॉरी,ताई हे बनीजी आले मधेच..
सॉरी,ताई हे बनीजी आले मधेच...
पुधच्या वेळी आता...
साॅरी... हसता हसता...
साॅरी... हसता हसता...
रंग रंगीत झाले दिसता दिसता,
श्वास संगीत झाले....
मी द्यायचं का आता...??
मी द्यायचं का आता...??
हो हो,तुम्ही द्या आता...
हो हो,तुम्ही द्या आता...
कोडे क्र.:६२८
कोडे क्र. ६२८ मराठी नवीन
कोडे क्र. ६२८ मराठी नवीन
म म म म,
म म म म र, उ ह ज प..
सगळे फक दादांचा च विचार करतात
सगळे फक दादांचा च विचार करतात...
आमचा पास... ओळखेल दादा... म म म म
कावेरी जी अगदी नवीन आहे....
कावेरी जी अगदी नवीन आहे.... थोडा जोर द्या...
क्ल्यु : गाणं मराठी आहे पण बोल हिंदी आहेत. सगळेच नाही पण मेल डेब्यु...
अजून १ क्लु द्या बर...
अजून १ क्लु द्या बर...
आलं तर आलं...
ठीकाय जरा सोप्प करतो. या
ठीकाय जरा सोप्प करतो. या मुव्ही मध्ये नवीनच कलाकार आहेत. आणि एका नटाचा पहीलाच मुव्ही आहे हा.
अगबाई अजुन हेच कोडे का???
अगबाई अजुन हेच कोडे का???
सोडवा ना ..
हा हा हा हा ....
हा हा हा हा ....
तुम्ही सोडवा ना ....सोप्प आहे पण कोणालाच येणार नाही लवकर....
ओ गॉड!
ओ गॉड!
पन्दितजी पण नाही आले अजून...
प्लिज कमीत कमी हिरोच नाव तरी सान्गा...
मला मराठी गानी नाही येत हो...मी नाही पहात...
सोप्प आहे पण कोणालाच येणार
सोप्प आहे पण कोणालाच येणार नाही लवकर....>>>नक्की कसलं गाण दिलय तुम्ही???
नियम वाचा..
साधं सोप्प सरळ गाणं आहे...
साधं सोप्प सरळ गाणं आहे...
हो,पण क्लु द्या बर..
हो,पण क्लु द्या बर..
फोटोकॉपी???
फोटोकॉपी???
नाहितर तो अभिनव बेर्डे आहे का??
काहीही हा.....कावेरी जी.
काहीही हा.....कावेरी जी.
या वाक्यात देखिल एक क्ल्यु आहे.
तेजश्री प्रधान???
तेजश्री प्रधान???
अम्म्म्म्.... नाही.... जवळ
अम्म्म्म्.... नाही.... जवळ जवळ.
ठिक आहे ४था क्ल्यु : त्या
ठिक आहे ४था क्ल्यु : त्या मुव्ही मध्ये समुद्र दाखवला आहे.
द्या थोडासा ताण......
जाउ दे बाई...
जाउ दे बाई...
सान्गा ना समजेल अस...का छळताय..
पन्दितजी किथ्थे हो???
शशांक केतकर - One Way Ticket
शशांक केतकर - One Way Ticket ?
मग काय मजा उरणार..??
मग काय मजा उरणार..??
५ वा क्ल्यु : तीन नट आहेत. दोन नटी. एक नेहा महाजन. दुसरी अमृता खानविलकर.
परफेक्ट स्निग्धा जी.....
परफेक्ट स्निग्धा जी.....
गाण नाही हो माहित पण
गाण नाही हो माहित पण
Pages