आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे क्रं ५७१ पंजाबि नविन -- उत्तर
हे आहे का?
मला पंजाबी उच्चार देवनागरीत अचूक लिहिता येणार नाहीत म्हणून नेट्वरुन तसेच्या तसे उचलून चिकटवलेय.
अल्बम आहे / चित्रपटगीत नाही, असे सांगायचे ना.

Oh lailo paisa te lailo pyaar,
Mainu mere yaar mod do, (x2)

Oh kisse kam di ni eh mehngi car,
Mainu mere yaar mod do, (x2)

ग्रेटपणा काहीही नाही कावेरि, अंदाजाने मारलेला बाण होता तो. बाकी श्रेय गुगलचे. Happy
तुम्ही देताय का पुढचे कोडे? म्हणजे नवीन गाणे मिळेल लोकांना.
माझे पुन्हा जुनेच होइल.

बरं कावेरि.

कोडे ५७२ हिंदी ( ७०-८०)
स स क स ल त क स
स न
स स क स ल त क स
र ज न ह ग ल ज

क्ल्यू --
१. कुशल (+ प्रयोगशील) संगीतकार, ज्याने इथे पेशाने / सरावाने गायक नसलेल्याकडून पार्श्वगायन करवले आहे.
२. अभिनेत्री -- नायिका / सहनायिका / बहीण / आई / आजी -- काहीही असली तरीही गोड, गोबरी...च.

गोबरी>>>>मे बी राखी,हेमा मालीनी...(रेखा पण असु शकते)
जुन्या सन्गितकारन्बद्दल एवध काही माहित नाही...

नाही कावेरि, या गोबर्‍या नाहीत. सुंदर आहेत. थोडे अजून मागे जायला लागेल.
संगीतकार जुना (पुराणा) नाहीये तसा. ९० च्या आसपास पण कार्यरत होता आणि पुरस्कार मिळवत होता.

क्ल्यू २" -- अभिनेत्री मालिकांमधेही काम करते / करायची

क्ल्यू ३ -- क्ल्यू १ सुधारून देतेय.
क्षमस्व, हे मी आधी तपसून पहायला पाहिजे होते.
कुशल (+ प्रयोगशील) संगीतकार, ज्याने इथे पेशाने / हिंदी भाषेत प्रस्थापित-गायक नसलेल्याकडून पार्श्वगायन करवले आहे.

क्ल्यू ४ -- गायक जिथला मूळ रहिवासी आहे, त्या प्रदेशात या धाग्याचे कर्ते जायच्या विचारात्त आहेत.

मी जाते आहे आता. २-३ तास नसेन.

sun sun qasam se
laaguun tere qadam se
suno na
ha sun sun qasam se
laaguun tere qadam se
raha jaaye na hamase
gale lag ja gale lag ja...

क्लु देउन ठेवते बाई..
क्लु:
१) ह्या अभिनेत्याचे चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करतात...
एव्ध पुरेसे आहे.....बाय..

कैसे मुझे तुम मिल गयी
किस्मत पे आये ना यकीन
उतर आई झील में
जैसे चाँद उतरता है कभी
हौले हौले, धीरे से

कोडे क्र.:५७४
मराठी
ल अ भ ब म
ज ख ध ऐ म
ध प ज ए ज म
ए ज म म म

५४७.
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

Pages