मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर ...

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 29 December, 2016 - 10:55

मुलगी शिकली, प्रगती झाली. पण स्त्रियांना चूल आणि मूल सुटले आहे का कधी. तुम्ही फुल टाईम गृहीणी असाल तर प्रश्नच नाही, पण नोकरीला असाल तर तरी आपल्या आणि आपल्या नवर्‍याच्या वाटणीचे घरकाम तुम्हाला करावेच लागते. पण हल्ली विभक्त कुटुंबात नोकरी सांभाळून सारेच घरकाम जमणे शक्य नसते. तेवढा वेळच नसतो.
मग भांडी घासायला बाई ठेवली जाते. पण तिला घासायला भांडी काढून देणे आणि घासून झाल्यावर ती तिथेच रचून जात असेल तर जागच्याजागी ठेवायचे काम आपल्यालाच करावे लागते.
मग कचरा साफ करायला देखील बाई ठेवली जाते. पण तिच्यावर लक्ष आपल्यालाच ठेवावे लागते. टोपलीतल्या जमलेल्या कचर्‍याची आपल्यालाच विल्हेवाट लावावी लागते.
मग कपडे धुवायला वॉशिंगमशीन घेतली जाते. पण ती वापरावी आपल्यालाच लागते. कोणते कपडे कधी धुवायचेत वगैरे हिशोब आपल्यालाच ठेवावे लागतात.
मग असे एकेका कामात शॉर्टकट घेतले जातात., पण स्वयंपाक मात्र आपल्याला चुकत नाही.
फार तर पोळ्या करायला बाई ठेवली जाते किंवा मग आमच्या ह्यांना बाईच्या हातच्या चपात्या आवडत नाही असे नाईलाजाचे कौतुक करत त्या देखील आपल्यालाच कराव्या लागतात.
काही नवरे करतात मदत, पण ती मदतच असते. कामाचा एक ठराविक भाग. तो देखील रोजच्या रोज करतील याची खात्री नाही. खायला मात्र रोजच लागते. आणि जे काही थोडेबहुत करतील ते उपकार केल्यासारखे बोलून दाखवतील.
खरं सांगा, किती घरात सकाळी सहाचा अलार्म वाजल्यावर पहिली उठणारी व्यक्ती ही बायकोच असते. जवळपास सर्वच घरात. मग ती तासाभरात तिची तयारी करते. त्यानंतर सातचा अलार्म वाजल्यावर नवर्‍याला उठवते. तो सात ते आठ आपली तयारी करतो, तेव्हा ही आदर्श गृहीणी दोघांचा डब्बा आणि साहजिकच सकाळचे दोघांचे चहापाणी करण्यात बिजी असते. अगदी त्याला चहा बनवता येत असला तरी सकाळी मुद्दाम लवकर उठून दोघांसाठी चहा बनवून घेणारा नवरा फारसा ऐकण्यात येत नाही. त्यातही माझा नवरा हॉस्टेलवर राहणारा असल्याने त्याला कांदा चिरता येतो, मॅगी बनवता येते असे काहीबाही कौतुक असते बायकांना. एखादा नवरा असतोही फर्मास चिकन बिर्याणी बनवणारा. पण कधीतरी काहीतरी बनवून वाहवा, कौतुक मिळवणे आणि रोजचा भाजीपोळीचा थॅंकलेस जॉब करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

थॅंक गॉड, हे सारे अनुभव माझे नाहीत, तर माझ्या विवाहीत मैत्रीणींचे आहेत. माझे लग्न अजून झाले नाही आणि लग्नानंतरही हे सारे करायचा विचार नाही. कारण मुळातच मला स्वयंपाकच करता येत नाही. आईला तशी थोडी चिंता आहे की या पोरीचे अश्याने लग्न कसे जमायचे. पण ती माझ्या टेक्निकल नॉलेज आणि नॉन ट्रेडिशनल कौश्ल्याबाबत अनभिद्न्य असल्याने तिची शंका रास्त आहे. त्या जीवावर मी माझे अगोदरच जमवले / जुळवले आहे. पण लग्नाआधी आपण सारी कामे वाटून करूया असे म्हणणारा प्रियकर जेव्हा नवरा बनतो तेव्हा फार तर लग्नाचा खर्च अर्धा वाटून घेण्यापलीकडे त्याची मजल जात नाही. स्वयंपाकाची अपेक्षा तो आपल्याकडूनच करतो. कधी उशीरा घरी आलात तर चल आज बाहेरून ऑर्डर करूया हा सोपा पर्याय निवडतो. पण रोज बाहेर खाणे खिश्याला आणि तब्येतीला परवडणारे नसल्याने मग चरफडत का होईना आपल्यालाच सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघराचा उंबरठा ओलांडावा लागतो. मूल झाल्यावर तर मग मूलासाठी घरचेच बनवावे लागते आणि एक आई म्हणून मग तो सारा भार आपल्यालाच वाहावा लागतो. मूल आणि मग मूलासाठी चूल. मूलाचे बाबा त्याला फक्त तेव्हाच सांभाळतात जेव्हा आपण स्वयंपाकघरात असतो. त्यामुळे स्त्रियांना हे हक्काचे स्वयंपाकघर आधी सुटले पाहिजे किंवा त्यांनी सोडवून घेतले पाहिजे असे मला वाटते.
तर मग आता या सर्वातून सुटका करून घ्यायला जर आपण पाककला शिकलोच नाही तर...
कदाचित आपण सार्‍याजणी आता शिकून मोकळ्या झालो असू,
पण येणार्‍या पिढीतील आपल्या मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर.....
काय अडेल त्यांचे?
खरेच काही अडेल का? ....
मुलग्यांचे काही अडते का?
विचार करा .....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या हिंदुंचा शाकंबरी उत्सव सुरु आहे... दुष्काळात देवीने भाज्यांची निर्मिती करुन लोकांचे प्राण वाचवले म्हणे. शाक = भाजी . त्यावरून ते नाव देवीला दिले

स्वयपाक स्त्रीलाच का ? असे म्हणणाऋआ स्त्रीयानी आता शाकंबर असा एखादा पुरुषी देव निर्माण करायला हरकत नाही.

जोपर्यंत किचन ड्यूटी सांभाळणे म्हणजे पौरुषत्वात काही कमी असण्याचा (चुकीचा) संबंध लोक लावत राहातील किंवा कुचकामी असल्याचा शिक्का मारत राहातील तोवर पुरूष फक्त व्यवसायापोटीच स्वैपाक, पाकसिध्दी करत राहातील. किचनमधे काम केल्याने, रांधा वाढा उष्टी काढा केल्याने पौरुषत्व (किंवा स्त्रीत्व) अजिबात कमी होत नाही, लौकिक कमी होत नाही, तुम्ही कुचकामाचे / बिनकामाचे व बिनमहत्वाचे ठरत नाही ही जाण समाजात सर्वत्र रुजेल तेव्हा वेगळे चित्र दिसेल. जी प्रतिष्ठा समाजात रोजगार कमावणाऱ्या व कुटुंबाचा चरितार्थ करणाऱ्या व्यक्तीला मिळते तीच प्रतिष्ठा घरी राहून मुलाबाळांचे संगोपन, पोषण, उदरभरण करणाऱ्या व्यक्तीला न मिळणे ही मानसिकता मुळातच गडबडीची आहे >> +१११११११११
अरुंधती जियो Happy

हा आणि यासारखे समाजातले अनेक विषय जुन्या मायबोलीवर अक्षरशः चावून चोथा झालेले आहेत त्यामुळे त्यामध्ये भर घालण्यासारखं काही नाही . अर्चना सरकार तुम्हाला जर धाग्याची आणखीन एक शंभरी गाठायची असेल तर जुनी मायबोली चाळा आणि त्याच त्याच विषयांची पुन्हा भर घाला . तुम्हाला पुढच्या धाग्याच्या शंभरी करता शुभेछा Happy Wink

सिंधी कॅंप म्हणतात त्या परिसराला. ती झामाची गल्लीच फेमस खाऊगल्ली आहे - तंदुरी चिकन, कबाब, फालुदा वगैरे साठी... >>>
अछा. मी चेंबूरमध्ये होतो त्यावेळी नव्हते खाऊ गल्ली हे नाव.(१९९१).
झामा होते त्याच्या बाजुला अजून एक की दोन अजून रेस्टॉरंट्स होते, आणि त्या टी जंक्शनला वैष्णव पंजाब म्हणुन रेस्टॉरंट होते. तिथे दाल मखनी मस्त असायची.

ओके, विषयांतर थांबवतो.

त्याच्या शेजारून आता मोनोरेलची लाइन गेली आहे. चेंबुर स्टेशन ते वडाळा मोनोरेल .. फिरायला मस्त वाटते.

विषयांतर काय नाय हो... स्त्रीयानी घरात स्वयपाक करायचा नाही हा विषय आहे म्हटल्यावर फिरायला व बाहेर जाउन खायला या माहितीची मदतच होईल.

Proud

>>जर पुरुषाच्या नोकरीला महत्व येउन आपली नोकरी व अर्निंग थंडावेल ही बायकाना भिती असेल तर त्यानी आधी लग्न करतानाच घरकामास इच्छ्य्क असलेला , नोकरीला दुय्यम महत्व देणारा नवरा निवडावा म्हणजे त्यांची इच्छा पुर्ण होइल.

बहोत अच्छे अचेमियाँ ! या पॉईंटवर तुम्हाला एक झप्पी आमच्याकडून दसर्‍याला असते तशी.

माझे लग्न ठरायच्या वेळेस माझे विचार असेच होते,
एकतर मी नोकरी करणार आणि बायकोने घराकडे लक्ष द्यायचे,
किंवा
बायकोने नोकरी करायची आणि मी घराकडे लक्ष देणार
ज्याला वर "एकचालकानुवर्तित्व" म्हणले आहे ते हेच.

मला माहित आहे की हा विचार आत्तादेखील कोणाच्या सहजासहजी पचनी पडणार नाही,
अर्थात त्यावेळी जे जे भेटेल भूत त्यांना देखील हे विचार कदापि १००% पटणार नव्हतेच,
त्यामुळे उपरोल्लेखित प्रकारापैकी पहिलाच घडला.

तरी देखील, विदेशात असताना घरकामात बरीच मदत केलेली आहे,
तसेच अनेकवेळा एकट्याने रहायची वेळ आलेली, तेव्हा स्वतः बनवून खात होतोच.

>> मी चेंबूरमध्ये होतो त्यावेळी नव्हते खाऊ गल्ली हे नाव.(१९९१).<<

खाऊगल्ली हे नांव नाहि, पर से, पण तो रस्ता पंजाबी/सिंधी खाऊसाठी प्रसिद्ध होता खवय्ये लोकांच्यात... Happy

अगदी पुर्ण स्वयंपाक नाही केला तरी, किराणा माल/ भाजी आणणे, भाज्या निवडणे, चिरणे, किराणा नीट भरून ठेवणे, घरातली साफ-सफाई, मोलकरणीने सुट्टी घेतली तर त्या कामांचे व्यवस्थापन अश्या अनेक कामात नवर्‍याची मदत घेता येते आणि जरूर घ्यावी. आणि ही सगळी कामं नवरा करतो म्हणून कोणी बायकोला कोणताही गिल्ट द्यायचा प्रयत्न केला तर बायकांनी तो अजिबात घेऊ नये. घराचा हप्ता बायको भरते किंवा मुलांच्या फिया बायको भरते म्हणून गिल्टी वाटून घेणं पुरुषांनी थांबवलं आहे. atleast सुशिक्षित पुरुषांनी थांबवलं आहे.
चेतन भगतने काही वर्षांपुर्वी womens day ला लिहिलेला हा लेख बराच मार्गदर्शक ठरू शकतो:
http://www.chetanbhagat.com/blog/2013/03/12/five-things-women-need-to-change-about-themselves/

अनिलचेंबूर - कसले स्वातंत्र्य हवे आहे ?
>>>>
साडीवर मॅचिंग टिकली लावायचे.

शेतकर्‍याच्या मुलीनी बापाची शेती करावी ... नवरे घरात भाकर्‍या भाजायला ठेवावेत ...
>>>>
आपलेच शेत असेल आणि नवर्‍याला शेती करायचे जमत असेल तर त्याला आपल्यासोबत शेतातच राबवले तर काय वाईट आहे?
घरात दोघांपैकी कोणीतरी भाकर्‍या भाजायला हवेच हा हट्ट कशाला? दोघेही लष्कराच्या भाकर्‍या भाजायची पात्रता राखून असतील तर दोघांनी का नाही शेतात राबायचे?

लिंबूटिंबू - ­बाकी या प्रश्नांचि पुढची पायरि म्हणजे "मुले जन्माला घालणेच थांबवले, तर कुणाचे काहि अडेल का?" ...
>>>>
म्हणजे हि भिती आहे तर ...
चला तर मग आपण सारे या जगात आहोत त्याबद्दल समस्त स्त्री जातीचे एकदा आभार मानूया

नताशा | 7 January, 2017 - 15:12
स्वतःपेक्षा कमी पगारवाल्या मुलाशी आजकाल खुप मुली लग्न करतात. पण त्यासाठी त्या मुलात इतर काही गुण नकोत का? आधीच भारतात मेजॉरिटी पुरुष एम्सीपी, दिसायला सो-सो, वागयला वाईट, घरच्यांनी नुसता मुलगा आहे याकारणाने (इतर दुर्गुण असून) लाडावलेले, घरकामात कुचकामी, व्यसनी वगिरे बाय डिफॉल्ट असतातच. या सगळ्या भयंकर रसायनाला ऑफसेट करायला म्हणून निदान पगार दाखवून माज करता येतो. तोही नाही म्हटल्यावर काय बघून लग्न करणार भारतीय मुलांशी? फिदीफिदी आणि पुन्हा त्यांच्या आईवडिलांना झेलायचं?
>>>>

छान पोस्ट नताशा Happy

दोघेही नोकर्‍या करत असतील तर दोघानी घरकामाची जबाबदारी वाटुन घ्यावी.
>>>>
अनिल चेंबूर, मी माझ्या पोस्टमध्ये कुठे म्हटलेय की पुरुषांनी घरकाम एके घरकामच करावे. उलट समानताच तर अपेक्षित आहे.

तसे स्त्रीयाना नोकर्‍या आल्या , पगार आले , सत्ता आली तरी नोकरी न करणारा पुरुष स्वतःच्या घरात नांदवायला नेण्ण अजुन जमलेलं नाही.
>>>>
हे स्त्रियांना जमलेलं नाही की घरजावई सारख्या हेटाळणीयुक्त शब्दाला कवटाळून बसलेल्या पुरुषांना जमले नाही?

>>> म्हणजे हि भिती आहे तर ... चला तर मग आपण सारे या जगात आहोत त्याबद्दल समस्त स्त्री जातीचे एकदा आभार मानूया <<<<
अहो केव्हांपासुनच आई नावाच्या स्त्रीजातिचे आभार मानित आलोच आहोत, पण ते मानले की ते "बायको" नावाच्या स्त्रीजातीला सहन होत नाही, मग्ग मी काय करु? जगातील यच्चयावत पुरुषांनी काय करावे? Proud

>>>> माझे लग्न ठरायच्या वेळेस माझे विचार असेच होते,
एकतर मी नोकरी करणार आणि बायकोने घराकडे लक्ष द्यायचे, किंवा बायकोने नोकरी करायची आणि मी घराकडे लक्ष देणार <<<<
अहो नाही हो, अजुनही स्त्रियांना नवरा शोधताना, तो आपल्यापेक्षा जास्त शिकलेला, जास्त पोझिशनचा, जास्त हुद्द्याचा, जास्त पगाराचा असाच हवा असतो, हल्ली तर (आईबापांपासुन) स्वतंत्र रहाणारा, भावाबहिणीचि कसलीच जबाबदारी नसणाराच हवा असतो.
इतकेच काय, अजुनहि वयाने मोठा, फार नाही २/३ वर्षेच मोठा, पण मोठाच हवा असतो, अन उंचीनेही ! Wink
हे कधी बदलणार या स्त्रीया? Proud

>>> स्त्रीने स्त्रीसत्ताक आणुन पुरुष घरजावई करुन सन्मानाने न्यावा. कितीतरी पुरुष तयार होतील <<<
आम्ही तयार होतो..... पण तसे स्थळच समोर आले नाहि....
पण खरेच असे झाले, तर सासुसुनांच्या कथा ऐकतो, तशा सासराजावयाच्या कथा ऐकु येऊ लागतील का?
होय, नक्कीच, कारण वेगवेगळे रहात असले तरी सासरा-जावयाचे फार पटते असे कधी कुठे बघितले नाहीये... Wink कांपिटीशनच फार करतात

सरा-जावयाचे फार पटते असे कधी कुठे बघितले नाहीये... डोळा मारा कांपिटीशनच फार करतात>>>

उलट पटले असते! समदु:खी किती तरी बिच्चारे!! आताही असतात. तेंव्हा तर रोज एकत्र बसले असते! Wink

समजा आपण कामं केलीच नाहीत तर? आपली इच्छा / वेळ असेल तरच करायची इच्छा / वेळ नसेल तर नाही करायची. काय फरक पडेल? उगीच दुसऱ्यानं करावी म्हणून गळा का काढा?

>>> तेंव्हा तर रोज एकत्र बसले असते! <<<< Proud
अन मग समदु:खी पुरुषांच्या भिशीच्या पार्ट्याही झाल्या अस्त्या..... फक्त महिन्याची भिशी ऐवजी त्यांनी रोजच्यारोजची कल्याण आकड्यासारखी भिशी ठरवली असति..... Lol

कितीतरी पुरुष तयार होतील >>>> कल्पनाविलास करायला छान मुद्दा आहे. खाली तो सुरूही झालाय Happy

जे पुरुष बायकांसारखे वागतात किंवा बायकांमध्ये रमतात त्यांना बायल्या म्हटले जाते आणि बहुतांश पुरुष कोणी त्यांना मस्करीत जरी असे म्हटले तरी ते फार मनाला लावून घेतात.
तर मग आता काही गोष्टी ज्या बायकांनाच शोभतात किंवा बायकांनीच करायच्या असतात असे जे आपल्या समाजाने ठरवले आहे ते करायला कोणीही पुरुष याचसाठी तयार नसतो.

फेसबूकवर हा फोटो पाहिला आणि हा धागा आठवला..
लाखो करोडो लाईक्स होत्या याला..
मी सुद्धा जोशमध्ये एक लाईक ठोकला..
पण हे माझे तंतोतंत विचार आहेत असे मात्र समजू नका..
शेअर करणारी मुलगी माझ्या आवडीची होती ईतकेच .. Happy

kitchen.jpg

>>> जे पुरुष बायकांसारखे वागतात किंवा बायकांमध्ये रमतात त्यांना बायल्या म्हटले जाते आणि बहुतांश पुरुष कोणी त्यांना मस्करीत जरी असे म्हटले तरी ते फार मनाला लावून घेतात.
तर मग आता काही गोष्टी ज्या बायकांनाच शोभतात किंवा बायकांनीच करायच्या असतात असे जे आपल्या समाजाने ठरवले आहे ते करायला कोणीही पुरुष याचसाठी तयार नसतो. <<<<

ज्या बायका पुरुषांसारखे वागतात किंवा पुरुषांमध्ये रमतात त्यांना पुरुषी (धेंडा/धोंडा ) म्हटले जाते आणि बहुतांश स्त्रीया, कोणी त्यांना मस्करीत जरी असे म्हटले तरी ते फार मनाला लावून घेतात.
तर मग आता काही गोष्टी ज्या पुरुषांनाच शोभतात किंवा पुरुषांनीच करायच्या असतात असे जे आपल्या समाजाने ठरवले आहे ते करायला कोणीही स्त्री याचसाठी तयार नसते. Proud

कृपयाच, अशा गोष्टी कोणत्या हे मला विचारु नका, सन्माननीय सलमानखानसाहेबांनी बर्‍याच वर्षांपूर्वीच एका हिंदी सिनेमात ते करुन दाखविले आहे... एरवीही करत असतातच.....! Wink

Pages