मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर ...

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 29 December, 2016 - 10:55

मुलगी शिकली, प्रगती झाली. पण स्त्रियांना चूल आणि मूल सुटले आहे का कधी. तुम्ही फुल टाईम गृहीणी असाल तर प्रश्नच नाही, पण नोकरीला असाल तर तरी आपल्या आणि आपल्या नवर्‍याच्या वाटणीचे घरकाम तुम्हाला करावेच लागते. पण हल्ली विभक्त कुटुंबात नोकरी सांभाळून सारेच घरकाम जमणे शक्य नसते. तेवढा वेळच नसतो.
मग भांडी घासायला बाई ठेवली जाते. पण तिला घासायला भांडी काढून देणे आणि घासून झाल्यावर ती तिथेच रचून जात असेल तर जागच्याजागी ठेवायचे काम आपल्यालाच करावे लागते.
मग कचरा साफ करायला देखील बाई ठेवली जाते. पण तिच्यावर लक्ष आपल्यालाच ठेवावे लागते. टोपलीतल्या जमलेल्या कचर्‍याची आपल्यालाच विल्हेवाट लावावी लागते.
मग कपडे धुवायला वॉशिंगमशीन घेतली जाते. पण ती वापरावी आपल्यालाच लागते. कोणते कपडे कधी धुवायचेत वगैरे हिशोब आपल्यालाच ठेवावे लागतात.
मग असे एकेका कामात शॉर्टकट घेतले जातात., पण स्वयंपाक मात्र आपल्याला चुकत नाही.
फार तर पोळ्या करायला बाई ठेवली जाते किंवा मग आमच्या ह्यांना बाईच्या हातच्या चपात्या आवडत नाही असे नाईलाजाचे कौतुक करत त्या देखील आपल्यालाच कराव्या लागतात.
काही नवरे करतात मदत, पण ती मदतच असते. कामाचा एक ठराविक भाग. तो देखील रोजच्या रोज करतील याची खात्री नाही. खायला मात्र रोजच लागते. आणि जे काही थोडेबहुत करतील ते उपकार केल्यासारखे बोलून दाखवतील.
खरं सांगा, किती घरात सकाळी सहाचा अलार्म वाजल्यावर पहिली उठणारी व्यक्ती ही बायकोच असते. जवळपास सर्वच घरात. मग ती तासाभरात तिची तयारी करते. त्यानंतर सातचा अलार्म वाजल्यावर नवर्‍याला उठवते. तो सात ते आठ आपली तयारी करतो, तेव्हा ही आदर्श गृहीणी दोघांचा डब्बा आणि साहजिकच सकाळचे दोघांचे चहापाणी करण्यात बिजी असते. अगदी त्याला चहा बनवता येत असला तरी सकाळी मुद्दाम लवकर उठून दोघांसाठी चहा बनवून घेणारा नवरा फारसा ऐकण्यात येत नाही. त्यातही माझा नवरा हॉस्टेलवर राहणारा असल्याने त्याला कांदा चिरता येतो, मॅगी बनवता येते असे काहीबाही कौतुक असते बायकांना. एखादा नवरा असतोही फर्मास चिकन बिर्याणी बनवणारा. पण कधीतरी काहीतरी बनवून वाहवा, कौतुक मिळवणे आणि रोजचा भाजीपोळीचा थॅंकलेस जॉब करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

थॅंक गॉड, हे सारे अनुभव माझे नाहीत, तर माझ्या विवाहीत मैत्रीणींचे आहेत. माझे लग्न अजून झाले नाही आणि लग्नानंतरही हे सारे करायचा विचार नाही. कारण मुळातच मला स्वयंपाकच करता येत नाही. आईला तशी थोडी चिंता आहे की या पोरीचे अश्याने लग्न कसे जमायचे. पण ती माझ्या टेक्निकल नॉलेज आणि नॉन ट्रेडिशनल कौश्ल्याबाबत अनभिद्न्य असल्याने तिची शंका रास्त आहे. त्या जीवावर मी माझे अगोदरच जमवले / जुळवले आहे. पण लग्नाआधी आपण सारी कामे वाटून करूया असे म्हणणारा प्रियकर जेव्हा नवरा बनतो तेव्हा फार तर लग्नाचा खर्च अर्धा वाटून घेण्यापलीकडे त्याची मजल जात नाही. स्वयंपाकाची अपेक्षा तो आपल्याकडूनच करतो. कधी उशीरा घरी आलात तर चल आज बाहेरून ऑर्डर करूया हा सोपा पर्याय निवडतो. पण रोज बाहेर खाणे खिश्याला आणि तब्येतीला परवडणारे नसल्याने मग चरफडत का होईना आपल्यालाच सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघराचा उंबरठा ओलांडावा लागतो. मूल झाल्यावर तर मग मूलासाठी घरचेच बनवावे लागते आणि एक आई म्हणून मग तो सारा भार आपल्यालाच वाहावा लागतो. मूल आणि मग मूलासाठी चूल. मूलाचे बाबा त्याला फक्त तेव्हाच सांभाळतात जेव्हा आपण स्वयंपाकघरात असतो. त्यामुळे स्त्रियांना हे हक्काचे स्वयंपाकघर आधी सुटले पाहिजे किंवा त्यांनी सोडवून घेतले पाहिजे असे मला वाटते.
तर मग आता या सर्वातून सुटका करून घ्यायला जर आपण पाककला शिकलोच नाही तर...
कदाचित आपण सार्‍याजणी आता शिकून मोकळ्या झालो असू,
पण येणार्‍या पिढीतील आपल्या मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर.....
काय अडेल त्यांचे?
खरेच काही अडेल का? ....
मुलग्यांचे काही अडते का?
विचार करा .....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेतातील कामाला गडी ठेवायचा.

घरकामाला नोकर ठेवायचा.

स्वयपाक स्वतः न करता जेवण बाहेरुन आणायचे.
.....

Proud

सध्या ह्यांचे उदरभरण मात्रुदेवो व पित्रुदेवो करत असणार. . म्हणुन अशा महान महत्वाकांक्षा सुचतात.

पलट दूँगा सारी दुनिया मैं ए खुदा !!
बस रजाई में से निकलने की ताकत दे दे..!!

Rofl

>>> कोणा तरी एका कडे सत्ता हवीच का? << "सत्ता" < इथेच तर प्रॉब्लेम आहे ना? <<<<<<
सत्ता????????
आमच्यात त्याला "एकचालकानुवर्तित्व" म्हणतात Happy ते अत्यावश्यक असते. सर्वच क्षेत्रात.
अचेला विचारा हव तर.... Wink
आमच्यात स्वैंपाकघरात लिंबीचे एकचालकानुवर्तित्व असते... तिथे आमचि लुडबुड चालत नाही, खपवुन घेतली जात नाही. (जे केलय ते गिळायला घ्या हव तर... नैतर उपाशी र्‍हावा असा मेष राशीचा खाक्या अस्तो... Lol )

बाकी या प्रश्नांचि पुढची पायरि म्हणजे "मुले जन्माला घालणेच थांबवले, तर कुणाचे काहि अडेल का?" ..... Proud
तर या प्रश्नास मात्र अजुन पन्नासएक वर्षे थांबावे लागेल, तोवर सायन्स तितकी प्रगती नक्कीच करेल की पुरुषही अपत्यास जन्मास घालु शकतील.............. Wink

बाकी या प्रश्नांचि पुढची पायरि म्हणजे "मुले जन्माला घालणेच थांबवले, तर कुणाचे काहि अडेल का?" ...

.....
मीही हेच लिहिणार होतो. त्यांचा पुढचा प्रश्न तोच असणार आहे.

पण नस्ते वाद नकोत म्हनुन मी लिहिले नव्हते

साती Lol

अपना काम तो सब करते है, लेकीन दूसरों का काम करने मे जो सुख मिलता है ना, वो बयां नही कर सकते !
स्वयंपाक शिकवला नाही तर इतकं सुंदर बोलणारा बावर्ची मिळू शकतो.

ऋन्मेऽऽष, मक्केमध्ये एक वाळवंटात तयार झालेला पाण्याचा झरा आहे ज्याला झमझम असे नाव आहे (झमझम अरेबिक शब्द आहे, अर्थः जमा करणे/गोळा करणे). आता ह्या झमझमचे पाणी इतके पवित्र मानले जाते कि जसे हिंदू कुठल्याही गोष्टीला गंगा नाव देतात तसे मुस्लीम लोक झमझम नाव देतात. झमझम ज्युस सेंटर पासून झमझम मिठाई पर्यंत काहीही दिसू शकेल.

ऑ! मला तर झमझम मिठाईच वाटलं. अफलातून मिठाई, ड्राय्फ्रुट रंगीत हलवा, झमझमचे नैतर सुलेमान्चे नानखट वैगेरे.

झमझम आणि अनिलचेंबूर या टोपणनावावरुन आठवलं.

चेंबुर कॅंपातील झमझम अेकेकाळी आमचा खादाडीचा अड्डा होता.

अनिलचेंबुर आपण खरेच चेंबुरचे असाल, तर अजुन आहे का झमझम जॉअींट चेंबुर कँपात?

ओके सिंधी कॉलनी ते आशिष थिअेटर रोड
त्यावरुन चेंबुर कॅंप मधुन लेफ्ट टर्न घेतला की लगेच अुजवीकडे होते.
फक्त स्वीट्स नव्हे सोबत समोसा, कचोरी, पावभाजी मिळायचे.

कदाचित ते झामाच की काय?

>>चेंबुर क्याम्पात झामा मिठाईवाला आहे. तेच की काय ?<<

सिंधी कॅंप म्हणतात त्या परिसराला. ती झामाची गल्लीच फेमस खाऊगल्ली आहे - तंदुरी चिकन, कबाब, फालुदा वगैरे साठी...

स्वतःपेक्षा कमी पगारवाल्या मुलाशी आजकाल खुप मुली लग्न करतात. पण त्यासाठी त्या मुलात इतर काही गुण नकोत का? आधीच भारतात मेजॉरिटी पुरुष एम्सीपी, दिसायला सो-सो, वागयला वाईट, घरच्यांनी नुसता मुलगा आहे याकारणाने (इतर दुर्गुण असून) लाडावलेले, घरकामात कुचकामी, व्यसनी वगिरे बाय डिफॉल्ट असतातच. या सगळ्या भयंकर रसायनाला ऑफसेट करायला म्हणून निदान पगार दाखवून माज करता येतो. तोही नाही म्हटल्यावर काय बघून लग्न करणार भारतीय मुलांशी? Proud आणि पुन्हा त्यांच्या आईवडिलांना झेलायचं?

केरळात आहे मातृसत्ताक पद्धत. जर का नवरे गल्फमध्ये किंवा सरकारी नोकरीत नसतील, तर नुसते घरी बसून रहातात. पण म्हणून घर सांभाळतात का? अजिबात नाही. स्वयंपाक वगैरे तर दूरच. बायका घरचं सगळं सांभाळून, नोकरी करुन, मुलांना-सासुसासर्‍यांना-नवर्‍यांना सांभाळतात. पुरुष कुठल्याही पद्धतीला स्वतःच्या फायद्यासाठी बरोबर वळवून घेतात. "तुमची सत्ता का? ठीक आहे. मग घरही तुम्हीच बघा, घरकामही तुम्हीच करा, पैसाही तुम्हीच कमवा, मला आणि माझ्या कुटुंबियांनाही तुम्हीच सांभाळा." असा प्रकार. तेच पुरुषसत्ताक पद्धतीत, "मी कमवतो मग मी बाकी काहीही करणार नाही. तुझ्या आईवडिलांना तर मी अज्जिबात सांभाळणार नाहीच, उलट तू माझ्या आईवडिलांना नाही म्हणालीस तर डिवोर्स ही देईन."

बाकी मुल्ले, पाद्री आणि भटजींचा कॉमन शत्रु एकच आहे. स्त्रिया. त्यांना औकातमध्ये ठेवलं पायजे ह्यावर हिंदु महासभा, बजरंग दल, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, रास्वसंघ, सुप्रीम कोर्ट, पोप, अमकेढमकेतमके चर्च, जैन साधु, अमुकबापू, तमुकआई वगैरे झाडून सगळ्यांचं एकमत आहे.

झामा म्हणजे आजूबाजूला गुजराथी आणि बोहरयांय्च्या दुकानाच्या गल्ल्यातून गेल्यावर लागते ती खाऊगल्ली ना ? मग या दुकानाचे नाव झमझम कधी होते ?

पण दोघे का नाही करू शकत स्वयंपाक?
आणि स्वयंपाक हे स्त्रियांना खच्ची करायचं अस्त्र आहे असं हल्लीच्या मुलींना का वाटतं?
जर विकास खन्ना आणि संजीव कपूर स्वयंपाक आणि तोही मिशेलिन स्टार रेस्तरॉ मध्ये करू शकतात तर तुमचा नवरा वरण, भात भाजी का नाही करू शकत?
त्यासाठी स्वयंपाकाचे उच्चाटन का करायचे?

सगळ्या भयंकर रसायनाला ऑफसेट करायला म्हणून निदान पगार दाखवून माज करता येतो.

अगदी बरोबर ... केवळ नोकरी करतो ही सबब सांगुन घरकामातून मुक्ती नको...

पण मग धागाकर्तीनेही , आम्हीही नोकर्‍या करतोच ना ? मग आम्ही घरकामही का करायचे ? असा जो विषय मांडलेला आहे , ते नेमके काय आहे ? तेही हेच झाले ना ?

दोघेही नोकर्‍या करत असतील तर दोघानी घरकामाची जबाबदारी वाटुन घ्यावी.

जर पुरुषाच्या नोकरीला महत्व येउन आपली नोकरी व अर्निंग थंडावेल ही बायकाना भिती असेल तर त्यानी आधी लग्न करतानाच घरकामास इच्छ्य्क असलेला , नोकरीला दुय्यम महत्व देणारा नवरा निवडावा म्हणजे त्यांची इच्छा पुर्ण होइल.

अन्यथा , सर्व पदार्थ विकत आनुन संसार चालवुन दाखवावा.

स्त्रीमुक्तीवाल्यांची अवस्था मोदीबाबासारखी झालेली आहे... हातात सता आली तरी ' काँग्रेसने साठ वर्षात .... ' हे रडगाणे काय संपत नाही.

तसे स्त्रीयाना नोकर्‍या आल्या , पगार आले , सत्ता आली तरी नोकरी न करणारा पुरुष स्वतःच्या घरात नांदवायला नेण्ण अजुन जमलेलं नाही. उलट , पुरुश , सासर , पु प्र संस्कृती , मंगळसूत्र , चर्च आणि शरियत ... बायका अजुनही यांच्याविरोधातच आरडाओरड करत आहेत .

नवरा दारुडा असला म्हणुन एखादी स्त्री स्वतः उभी रहाते , हे उदाहरण इथे गैरलागू आहे... कारण ते नाइलाजास्तव झालेले असते व तो समाजाचा मुख्य प्रवाह नाही.

शिक्षित स्य्रीयानी स्त्रीसत्ताक पद्धत आणुन दाखवावी ... म्हणजे दोन तीन पिढ्यानंतर त्याचे स्त्रीयाना अपेक्षित परिणाम दिसतील

2. Kerala - Till about a few years back, I'd (wrongly) assumed that Kerala was a matriarchal society (Thank you school textbooks for spreading misinformation.)
What they have is a matrilineal society i.e. property was traced via females. This has been abolished for the last 4 decades.

https://www.quora.com/Why-and-how-matriarchy-is-practised-in-West-Bengal...

मातृसत्ताक --Matriarchy

Pages