मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर ...

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 29 December, 2016 - 10:55

मुलगी शिकली, प्रगती झाली. पण स्त्रियांना चूल आणि मूल सुटले आहे का कधी. तुम्ही फुल टाईम गृहीणी असाल तर प्रश्नच नाही, पण नोकरीला असाल तर तरी आपल्या आणि आपल्या नवर्‍याच्या वाटणीचे घरकाम तुम्हाला करावेच लागते. पण हल्ली विभक्त कुटुंबात नोकरी सांभाळून सारेच घरकाम जमणे शक्य नसते. तेवढा वेळच नसतो.
मग भांडी घासायला बाई ठेवली जाते. पण तिला घासायला भांडी काढून देणे आणि घासून झाल्यावर ती तिथेच रचून जात असेल तर जागच्याजागी ठेवायचे काम आपल्यालाच करावे लागते.
मग कचरा साफ करायला देखील बाई ठेवली जाते. पण तिच्यावर लक्ष आपल्यालाच ठेवावे लागते. टोपलीतल्या जमलेल्या कचर्‍याची आपल्यालाच विल्हेवाट लावावी लागते.
मग कपडे धुवायला वॉशिंगमशीन घेतली जाते. पण ती वापरावी आपल्यालाच लागते. कोणते कपडे कधी धुवायचेत वगैरे हिशोब आपल्यालाच ठेवावे लागतात.
मग असे एकेका कामात शॉर्टकट घेतले जातात., पण स्वयंपाक मात्र आपल्याला चुकत नाही.
फार तर पोळ्या करायला बाई ठेवली जाते किंवा मग आमच्या ह्यांना बाईच्या हातच्या चपात्या आवडत नाही असे नाईलाजाचे कौतुक करत त्या देखील आपल्यालाच कराव्या लागतात.
काही नवरे करतात मदत, पण ती मदतच असते. कामाचा एक ठराविक भाग. तो देखील रोजच्या रोज करतील याची खात्री नाही. खायला मात्र रोजच लागते. आणि जे काही थोडेबहुत करतील ते उपकार केल्यासारखे बोलून दाखवतील.
खरं सांगा, किती घरात सकाळी सहाचा अलार्म वाजल्यावर पहिली उठणारी व्यक्ती ही बायकोच असते. जवळपास सर्वच घरात. मग ती तासाभरात तिची तयारी करते. त्यानंतर सातचा अलार्म वाजल्यावर नवर्‍याला उठवते. तो सात ते आठ आपली तयारी करतो, तेव्हा ही आदर्श गृहीणी दोघांचा डब्बा आणि साहजिकच सकाळचे दोघांचे चहापाणी करण्यात बिजी असते. अगदी त्याला चहा बनवता येत असला तरी सकाळी मुद्दाम लवकर उठून दोघांसाठी चहा बनवून घेणारा नवरा फारसा ऐकण्यात येत नाही. त्यातही माझा नवरा हॉस्टेलवर राहणारा असल्याने त्याला कांदा चिरता येतो, मॅगी बनवता येते असे काहीबाही कौतुक असते बायकांना. एखादा नवरा असतोही फर्मास चिकन बिर्याणी बनवणारा. पण कधीतरी काहीतरी बनवून वाहवा, कौतुक मिळवणे आणि रोजचा भाजीपोळीचा थॅंकलेस जॉब करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

थॅंक गॉड, हे सारे अनुभव माझे नाहीत, तर माझ्या विवाहीत मैत्रीणींचे आहेत. माझे लग्न अजून झाले नाही आणि लग्नानंतरही हे सारे करायचा विचार नाही. कारण मुळातच मला स्वयंपाकच करता येत नाही. आईला तशी थोडी चिंता आहे की या पोरीचे अश्याने लग्न कसे जमायचे. पण ती माझ्या टेक्निकल नॉलेज आणि नॉन ट्रेडिशनल कौश्ल्याबाबत अनभिद्न्य असल्याने तिची शंका रास्त आहे. त्या जीवावर मी माझे अगोदरच जमवले / जुळवले आहे. पण लग्नाआधी आपण सारी कामे वाटून करूया असे म्हणणारा प्रियकर जेव्हा नवरा बनतो तेव्हा फार तर लग्नाचा खर्च अर्धा वाटून घेण्यापलीकडे त्याची मजल जात नाही. स्वयंपाकाची अपेक्षा तो आपल्याकडूनच करतो. कधी उशीरा घरी आलात तर चल आज बाहेरून ऑर्डर करूया हा सोपा पर्याय निवडतो. पण रोज बाहेर खाणे खिश्याला आणि तब्येतीला परवडणारे नसल्याने मग चरफडत का होईना आपल्यालाच सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघराचा उंबरठा ओलांडावा लागतो. मूल झाल्यावर तर मग मूलासाठी घरचेच बनवावे लागते आणि एक आई म्हणून मग तो सारा भार आपल्यालाच वाहावा लागतो. मूल आणि मग मूलासाठी चूल. मूलाचे बाबा त्याला फक्त तेव्हाच सांभाळतात जेव्हा आपण स्वयंपाकघरात असतो. त्यामुळे स्त्रियांना हे हक्काचे स्वयंपाकघर आधी सुटले पाहिजे किंवा त्यांनी सोडवून घेतले पाहिजे असे मला वाटते.
तर मग आता या सर्वातून सुटका करून घ्यायला जर आपण पाककला शिकलोच नाही तर...
कदाचित आपण सार्‍याजणी आता शिकून मोकळ्या झालो असू,
पण येणार्‍या पिढीतील आपल्या मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर.....
काय अडेल त्यांचे?
खरेच काही अडेल का? ....
मुलग्यांचे काही अडते का?
विचार करा .....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलींना स्वयंपाक न शिकवल्यास खरतर काहीच अडणार नाही... त्या वेळ पडेल तेंव्हा स्वयंपाक करायला शिकतीलच Proud

स्वानुभव...

मला काडीचाही स्वयंपाक येत नव्हता, कोणी शिकवण्याचे कष्ट घेतले नाहीत पण आता वेळआल्यावर पोट भरेल इतकं करते नक्कीच..

लग्नानंतर वगैरे मी काही स्वयंपाकाच्या भानगडीत पडणार नाहीये.. जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत..

पाककलेची आवड नसताना रोजचा स्वयंपाक करणे हा खरेच कंटाळवाणा थॅन्कलेस जॉब कसा असू शकतो याची कल्पना करू शकतो.
>>
यासाठी तुला १०० कच्छी दाबेली भेट ऋन्मेष... मला तर न्को नको झालाय रोज स्वयंपाक Sad

कधी एकदा भारतात येते आणी आयतं हातात मिळतंय असं झालंय Proud

ज्याला कोणाला जगण्यासाठी शिजवलेलं अन्न लागतं त्याप्रत्येक जीवाला अन्न शिजवता आलं पाहीजेच...

ज्याला कोणाला जगण्यासाठी शिजवलेलं अन्न लागतं त्याप्रत्येक जीवाला अन्न शिजवता आलं पाहीजेच...>
१०० मोदक!

मी आणी नवरा रोज दोघेही आवडीने एकत्र स्वयपाक करतो आणि बाकिचे आवरतो.बाहेरची कामेही नीट वाटून, ज्याला जसे जमेल तशी करतो...मझे बाबा, सासरे, सगळे मित्र सुंदर जेवण बनवतात!

मुलगा मुलगी असा भेद न करता सर्वांना पोटापुरते जेवण बनवता आले पहिजे!

रिया हो खरंय .. हल्ली नोकरीधण्द्यानिमित्त परदेशात गेले की स्वत:ला जेवण बनवता येण्याशिवाय पर्याय नाही. आमच्याईथेही लोकं कूकर वगैरे कसा लावायचा हे शिकूनच जातात. त्यात शाकाहारी असाल तर जरा हाल वाढतात. अंडी न खाणारेही मग खायला सुरुवात करतात.

मुलींना स्वयंपाक न शिकवल्यास खरतर काहीच अडणार नाही... त्या वेळ पडेल तेंव्हा स्वयंपाक करायला शिकतीलच फ

स्वानुभव>>>>>>>> +१. माझाही.

सध्या स्वतंपाक करणं, स्वयंपाकात पारंगत असणं हा ' इन' ट्रेंड आहे.
फेबु/ब्लॉग्ज्/सोशल साईट्स यावर तर नको तितकं लिहिल जात यावर.
घरीच खाणं हा ही एक नवा ट्रेंड आहे.
बाहेरच्यापेक्षा घरीच निरनिराळे पदार्थ करणं आणि खाणं हे उलट हल्ली उच्चभ्रू समजलं जात.
अगदी गर्लफ्रेंडलाही घरी बोलावून स्वतःच्या हातानी रांधून खातला घालणं ही मोस्ट सेन्सिटीव आणि सेन्स्युअस गोष्ट ठरत्येय आजकाल.

मोठ्या मोठ्या फेमिनिस्टही मला अमुक करता येत, मला स्वयंपाक आवडतो, माझ्या हातची ही डिश ही माझी स्पेश्यालिटि आहे असेच म्हणताना जास्त पाहिल्येय.

मला तर अत्यंत आवड आहे स्वयंपाकाची आणि मुलगा /मुलगी भेद न करता दोघांनाही शिकवत्येय.

आरोग्याच्या दृष्टीकोनातून कमर्शियली उपलब्ध अन्नापेक्षा घरचे ताजे अन्न जास्त चांगले.
त्यामुळे आजकाल सगळेच आयुष्यात एका टप्प्यात स्वयंपाक शिकून घेतायत असे दिसते.

आमच्या घरी साधा सोपा नियम आहे
खायला लागत ना मग करता आलंच पाहिजे , हा नियम मुलगा मुलगी दोघांनाही लागू आहे
मी वयाच्या पंधराव्या वर्षांपासून सगळा स्वयंपाक करायला लागले
माझा भाऊ चौथीत असल्यापासून सगळ्यांचा सकाळचा चहा करतो , सातवीत गेल्यावर पोहे , उपमा ,खिचडी ,कुकर लावणे सारखी काम करायला लागला
आणि आता बारावीनंतर तो महिन्यातल्या दोन रविवारी पोळी ,भाजी , आमटी, भात ,कोशिंबीर असा सगळा स्वयंपाक करतो
माझे आजोबा उत्तम स्वयंपाक करायचे
मी लहान असताना आई ,बाबा दोघे मिळून सगळा स्वयंपाक करून कामावर जायचे .

स्वयंपाक प्रत्येकाला येणे गरजेचे आहे असे माझे मत आहे. यात ती व्यक्ती मुलगा आहे की मुलगी याने काहीच फरक पडत नाही. ज्याला भुक लागते त्याला स्वयंपाक यायला हवा.. निदान बेसिक स्वयंपाक.

लग्न झाल्यावर आम्ही दोघेच होतो तेव्हा जो घरी आधी पोहोचेल तो स्वयंपाक करायला सुरुवात करायचा. नंतर येईल तो त्याला जॉइन व्हायचा. आता घरातील सदस्य संख्या वाढल्यापासून स्वयंपाकाचे काम ओउटसोर्स केले आहे. पण बनवणारी व्यक्ती दांड्या मारण्यात हुशार असल्याने बर्‍याचदा आम्हाला बनवावे लागते. त्यामुळे कुणी स्वयंपाक न शिकता नुसते ऑटसोर्स करता येते या भ्रमात राहील तर ते ही तितके योग्य नाही.

स्वयंपाक प्रत्येकाला येणे गरजेचे आहे असे माझे मत आहे. यात ती व्यक्ती मुलगा आहे की मुलगी याने काहीच फरक पडत नाही. ज्याला भुक लागते त्याला स्वयंपाक यायला हवा.. निदान बेसिक स्वयंपाक.

लग्न झाल्यावर आम्ही दोघेच होतो तेव्हा जो घरी आधी पोहोचेल तो स्वयंपाक करायला सुरुवात करायचा. नंतर येईल तो त्याला जॉइन व्हायचा. आता घरातील सदस्य संख्या वाढल्यापासून स्वयंपाकाचे काम ओउटसोर्स केले आहे. पण बनवणारी व्यक्ती दांड्या मारण्यात हुशार असल्याने बर्‍याचदा आम्हाला बनवावे लागते. त्यामुळे कुणी स्वयंपाक न शिकता नुसते ऑटसोर्स करता येते या भ्रमात राहील तर ते ही तितके योग्य नाही.

साती, इन' ट्रेंड ठीके. पण मुळात आवडच नसेल तर? आणि मी मुलगी / स्त्री म्हणुन मीच का? असं अर्चनातैं ना म्हणायचंय.

मी लग्नाआधी चहाशिवाय काहीही केलं नव्हत. आता खुप काही करता येतं. रोजचं जेवण, सणासुदीचं जेवण, वेगवेगळ्या डीशेस, नवीन काहीतरी ट्राय, सगळं करते. घरी आवडीने खाणारे आहेत सगळे त्यामुळे छान वाटतं करायला. मला लग्नाआधी कुणीही स्वयंपाक शिकवला नाही. मीही माझ्या मुलीला मुलाला काहीही शिकवत नाही. त्यांचं ते करतीलच वेळ येईल तेव्हा.
मुलगी सहावीत आहे. मॅगी, ऑम्लेट, कोल्डकॉफी. चीज टोस्ट सँडविच, पिझा बेस आणुन कॉर्न पिझ्झ वैगेरे बनवते.
नवरा माझ्यापेक्षा छान चहा करतो. ऑम्लेट, अंडा बुर्जी, पोहे करतो. पण कधीतरीच. नेहमीच नाही. आणि मलाही त्याने रोजच स्वयंपाकात काहीतरी करावे अशी गरज वाटत नाही.

<<<साती, इन' ट्रेंड ठीके. पण मुळात आवडच नसेल तर? आणि मी मुलगी / स्त्री म्हणुन मीच का? असं अर्चनातैं ना म्हणायचंय.>>>
प्रश्न निव्वळ आवडीचा नाहीये गरजेचा आहे
अन्न ही माणसाची प्राथमिक गरज आहे , त्यामुळे गरज पडल्यास प्रत्येकाला स्वतःपुरते जेवण बनवता आलेच पाहिजे त्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये

मुद्दा काय आहे ( म्हणजे मुलगी/बाई म्हणून रोजच्या रोज तिनेच का स्वयंपाक बनवावा हाच असेल तर) तो कळला पण लेख आणि त्याहूनही वाईट गोष्ट म्हणजे त्यातला पराकोटीचा नकारार्थी विचार नाहीच पटला.

आपल्याला माहीत असलेले ज्ञान पुढच्या पिढीतल्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून प्रयत्न करायला हवे मग ते खाणे बनवणे असो वा गाणे गाणे. असे न शिकवण्याच्या नादात आपल्याकडच्या अनेक कला लुप्त होण्याच्याच मार्गावर आहेत.

पाककला ही टेक्निकल नॉलेज प्रमाणे आऊटडेटेड होऊ शकणारी गोष्ट नव्हे. याचा उपयोग आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही आपल्या आवडत्या प्रकारचे जेवण बनवणे / उतरत्या वयात पोटाला झेपेल असे अन्न तयार करणे / व्याधी-उपाधी जडल्यानंतर पथ्यकर कस्टमाईस्झ्ड खाणे बनवणे ई. वेळी होऊच शकतो. रोजच्या रोज जेवण बनवण्याचे 'काम' ज्यांना नको आहे त्यांनी असर्टिव्ह होऊन त्यातून मार्ग काढला पाहिजे. ही नावड मुलात /मुलीत कोणातही असूच शकते. पण महत्वाची गोष्ट ही आहे की मुलगा अथवा मुलगी दोघांनाही स्वादिष्ट आणि पौष्टीक स्वैपाक बनवता आला पाहिजे.

स्वतःच्या घरात कुठल्याही प्रकारचे (संडास साफ करण्यापासून) कसलेही काम, पहिल्यांदा करता आले पाहिजे (स्वावलंबन) आणि मग पुढची पायरी म्हणजे ते करायला लाज वाटण्याजोगे काहीही नाही हे आपण समाज म्हणून आपल्या पुढच्या पिढीला शिकवायला कमी पडत आहोत का?

अवांतर- माझ्यामते ज्याला चांगले चुंगले खायची आवड आहे तो नेहेमीच स्वयंपाक घरात (निदान लुडबुड तरी करताना) दिसतोच. बाहेर कितीही चांगले जेवण मिळत असेल तरी आपल्या करता घरात निगुतीने (प्रेमाने नसेल तरी चालेल Wink ) बनवलेल्या जेवणाची सर कशालाही येत नाही. 'तो' करत नाही मग 'मी' का करू अशा भावनेवर मात करून 'त्या'च्यासाठी बनवायचे नसेल तरी स्वतःसाठी तरी चांगले चुंगले (आपल्या आवडीचे) बनवता आलेच पाहिजे. (तो हा शब्द लिंगनिरपेक्ष रितीने जोडीदाराकरता वापरलेला आहे याची नोंद घेणे)

अर्चना विचार पटले .

इथे अनेकांना वाटतय स्वयंपाक बनवणे फक्त मुली आणि बायकांचच काम आहे ते नक्कीच चूकीचं आहे. वरून पुरुषप्रधान संस्कृतीची उदा. दिली जातात मग हे बदलणार कधी?

समानतेची भावना फक्त बोलण्यात आणि लिहिण्यात नसावी. खायला मुलांना पण लागतंच की मग बनवायला पण शिकवा.

<<<<इथे अनेकांना वाटतय स्वयंपाक बनवणे फक्त मुली आणि बायकांचच काम आहे ते नक्कीच चूकीचं आहे. वरून पुरुषप्रधान संस्कृतीची उदा. दिली जातात मग हे बदलणार कधी?

समानतेची भावना फक्त बोलण्यात आणि लिहिण्यात नसावी. खायला मुलांना पण लागतंच की मग बनवायला पण शिकवा.>>>>

@ पवनपरी11
उलट इथे अनेक जणांनी असं म्हटलंय की मुलगा ,मुलगी दोघांनाही स्वयंपाक करायला शिकवलं पाहिजे

हर्पेन प्रतिसाद आवडला .
मला भाकरी , पुरणपोळी आणि इतर ढिंच्याक आयटम्स सोडुन सगळा स्वयंपाक करता येतो . Proud

ह्या धाग्याचे शीर्षक ' मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर ' ...ऐवजी 'मुलांनाही सगळा स्वयंपाक करायला शिकवले तर ' असं असायला हवं होत

१. जगातील अनेक देशांत बायका किचनमधे आता फारशा दिसत नाहीत. त्या बाहेरून टेक अवे फूड पार्सल तरी आणतात, मायक्रोवेवमधे रेडी टू ईट अन्न गरम करतात किंवा बाहेरच खातात. अमेरिकेत ३-३ पिढ्यांतील स्त्रियांनी किचनमध्ये काहीही कुकिंग न केल्याचे किस्से आहेत.
जपान, हाँगकाँग, सिंगापोर यांसारख्या देशांतही जुनी पिढी सोडली तर बायकांकडे किचनमधे जास्त वेळ द्यायला फुरसतही नसते व तेवढा रसही नसतो. बाजारांत, रस्त्यावर भरपूर प्रकारचे अन्न तयार मिळते, ते खाण्याकडे जास्त कल. युरोपमधेही शहरी संस्कृतीत बायका कुकिंगमधे अजिबात जास्त वेळ घालवत नाहीत.
परिणामी, या सर्व ठिकाणी अन्नातून पोषण व उदरभरण एवढीच अपेक्षा असते. ताजे, गरम, चवीढवीचे, निगुतीने बनवलेले, देखणे, सजवलेले वगैरे सुग्रास अन्न यात बसेलच असे नाही. त्यामुळे खाण्याजेवणाचे दैनंदिन पर्यायही माफक व ठराविक असतात. सूप, सलाद, सँडविच, बर्गर, फळं, ब्रेफा सीरियल्स, फळांचे रस, भाजलेले / तळलेले / बेक केलेले मांस... भात, सोबत तोंडीलावणं वगैरे. बेकरीचे पदार्थ, हवाबंद पदार्थ वगैरे.

२. मुस्लिम बहुल देशांत पुरुषांना एकापेक्षा जास्त बायका व प्रत्येकीला किमान तीन-चार मुले असे चित्र जिथे जिथे आहे तिथे एक तरी बाई पूर्णवेळ किचनमध्ये स्वैपाक रांधणे, जेऊखाऊ घालणे, आवरासवरी वगैरेत बिझी असते. या बाईला गरज असूनही मोलमजुरी वा कमाईसाठी काही करता येत नाही कारण तिचा सर्व वेळ रांधा वाढा यात जातो.

३. जोपर्यंत किचन ड्यूटी सांभाळणे म्हणजे पौरुषत्वात काही कमी असण्याचा (चुकीचा) संबंध लोक लावत राहातील किंवा कुचकामी असल्याचा शिक्का मारत राहातील तोवर पुरूष फक्त व्यवसायापोटीच स्वैपाक, पाकसिध्दी करत राहातील. किचनमधे काम केल्याने, रांधा वाढा उष्टी काढा केल्याने पौरुषत्व (किंवा स्त्रीत्व) अजिबात कमी होत नाही, लौकिक कमी होत नाही, तुम्ही कुचकामाचे / बिनकामाचे व बिनमहत्वाचे ठरत नाही ही जाण समाजात सर्वत्र रुजेल तेव्हा वेगळे चित्र दिसेल. जी प्रतिष्ठा समाजात रोजगार कमावणाऱ्या व कुटुंबाचा चरितार्थ करणाऱ्या व्यक्तीला मिळते तीच प्रतिष्ठा घरी राहून मुलाबाळांचे संगोपन, पोषण, उदरभरण करणाऱ्या व्यक्तीला न मिळणे ही मानसिकता मुळातच गडबडीची आहे परंतु 'दाम करे काम' हेच जिथे ब्रह्मसत्य आहे तिथे वेगळी अपेक्षा ती काय ठेवणार?

किचनमधील कामाला प्रतिष्ठा मिळत नाही तोवर बायकाच किचनभार वाहात राहातील किवा तो भार मोलाने देऊन मोकळ्या होत जातील.

काही अडत नाही. असे काय करता. यू ट्यूब वर सर्व विडिओ उपलब्ध असतात मनात आले की ते बघू न करता येते. मुलगे काय करतात आपल्याला काय करायचंय.

माझ्या माहितीत फळे, फळांचे रस, सलाद, अंडे, दूध - दही - ताक - तूप, सूर्यफुलांच्या भाजलेल्या बिया, मोड आलेली कडधान्ये व सुकामेवा यांवर जगणारेही काही लोक आहेत. त्यांना किचनमध्ये जास्त वेळ घालवायचाही नसतो व त्यांच्या डाएट प्लानमध्ये हा वर दिलेला आहार बसतो व त्यांना तो रुचतोही! असेही बरेच लोक असतात व आहेत जगात.

कोणालाही शिकवायची गरज नाहिये. ईटर्नेट वर भरपुर मटेरियल मिळत.
प्रश्न फक्त रोजचा स्वयंपाक कोणी कारायचा हा आहे. स्वयंपाकच काय घरातील ईतरही काम (घरातली/बाहेरची) वाटुनच करायला हवीत. बर्याच घरांमधे हे चित्र आता दिसतय. स्पेशली बायका पुर्णवेळ काम करायला लागल्यात तेव्हापासुन.

सगळे नुसत्या मुलींवरच्या असमानता आणि अन्यायाबद्दल बोलत आहेत. मुलींना त्यांच्या हक्क, अधिकार आणि क्षमतांची जाणीव करून दिली फुले, कर्वे सारख्या लोकांनी. पण मुलग्यांचे काय?

लहानपणापासून "तू इथे स्वयंपाक घरात लुड्बूड करू नकोस, हे तुझे काम नाही"... "बायकी गोष्टींवर (जसे की स्वयंपाकाचे प्लॅनिंग) बोलू नको..मुलगी आहेस का?"..."रडायला काय झालं, मुलगी आहेस का?"..."जा वर चढून बल्ब बदल. ताईला रांगोळी काढू दे. ज्याचं काम त्यानेच करावं"..."तो लहान भावाला इतका चांगला सांभाळतो, की एखादी थोरली बहीण काय सांभाळेल"..ह्या आणि अशाच शेरेबाजीमुळे मुलग्यांचे मानसिक खच्चीकरण होत असते आणि मुलींचे काम आपल्याला जमणार नाही / आपण करणे योग्य नाही असा गंड निर्माण होत असतो.

मुलग्यांना स्वयंपाक / मुले वाढवणे प्रकारांत अडाणी ठेऊन खरं म्हणजे त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांना सदैव आपल्यावर अवलंबून राहायला लाऊन स्वतः चे महत्व वाढवण्याचा हा स्त्री जातीचा कावा आहे. कधी एकटे रहायची वेळ आलीच, तर स्वतः करून खाऊ न शकल्यामुळे त्यांचे खाण्याचे हाल होतात, परंतू ह्याच गोष्टीमुळे स्त्री जातीचे महत्व वाढत असल्या कारणाने त्या जाणून बुजून मुलग्यांन्ना गृहकृत्यांमध्ये अडाणी ठेवतात.

ह्या मुले वाढवताना केलेल्या अन्याय आणि भेद-भावा मुळे मी इथे समस्त स्त्री जाती आणि माता वर्गाचा निषेध नोंदवत आहे.

दिवा घ्यालच.

हार्पेन, मला चांगलं चुंगलं खायला आवडतं पण् करायला मुळ्ळीच आवडत नाही >>>
रीया, तो तुझा 'आज' आहे आणि मला खात्री आहे तुझ्यावरही 'उद्या' कधीतरी अशी वेळ येईलच की तूच म्हणशील यापेक्षा आपणच केलेले बरे. Wink

Mala tumche vichar awadle
khar ahe ki far thode mhanje agdi hatachya botawar mojnya itkech purush striyana ghar kamat purnatwane sahayy kartat.
Tumhi jar "julun yeti reshim gathi" ha serial pahila asel tr kadachit tumchya life madhe yenara tumcha partner ha adity sarkhach asla pahije. Jo swataha dekhil uttam swyampak tayar karu shakto ani tyachi partner meghna sudhha uttam sugran aste.
Karan jar gharatil purush ha "mahatma jyotiba fule" astil tr gharatil stri ne dekhil "sawitri bai fule" asawch. Pan durdaywane tas kahi pahayla milat nahi samajat. Hech kay te dukhh ahe. Aso.., mazi wife tari sawitri bai fulen sarkhich asawi mi dekhil tichya sathi mahatma fule honyas tayar ahe.

ह्या धाग्याचे शीर्षक '
मुलींना स्वयंपाक करायला
शिकवलेच नाही तर ' ...ऐवजी
'मुलांनाही सगळा स्वयंपाक
करायला शिकवले तर ' असं
असायला हवं होत

@मनाली हे मात्र योग्य आहे. आणि मी मुलांना पण असच म्हटलय म्हणजे मुलगा मुलगी दोघांना पण

. असं बरेचजण म्हणत आहेत प्रशंसनीय आहे. काही लोकांची मानसिकता अशी आहे की त्यांना जमणार नाही प्रयत्न केला तरच जमेल नाही का? किंवा बायकांच काम ते आपण का करायचं असं काही असेल. असो.

जगातील अनेक देशांत बायका किचनमधे आता फारशा दिसत नाहीत. त्या बाहेरून टेक अवे फूड पार्सल तरी आणतात, मायक्रोवेवमधे रेडी टू ईट अन्न गरम करतात किंवा बाहेरच खातात. अमेरिकेत ३-३ पिढ्यांतील स्त्रियांनी किचनमध्ये काहीही कुकिंग न केल्याचे किस्से आहेत>> आम्ही UK मध्ये आहोत. किचन
renovate करायचं होतं तेव्हाची गोष्ट. एकूण एक किचन डिझाईनर्/प्लॅनर विचारायचा, तुम्ही ह्या किचन मध्ये स्वयंपाक करणार आहात का? आधी वाटायचं, येडे की काय, असं काय विचारतात. नंतर कळलं की इथले कितीतरी लोक किचन छान छान बनवून घेतात आणि मग (ते खराब होऊ नये म्हणून?!) त्यात काही बनवत नाहीत, चकाचक ठेवतात Lol

सुलक्षणा Lol
वास्तव परिस्थिती आहे खरी. आर्थिक दृष्ट्या सधन समाज वेगवेगळी डाएट्स फॉलो करणे, घरी कुकिंगसाठी वेगळा कुक असणे, बाहेरच खाणे हे या परिस्थितीत पसंत करतो तर मजुरी करणारा किवा रोजगारावर काम करणारा समाज कामच्या ठिकाणी मिळणारे किंवा उपलब्ध असलेले चीप फूड पसंत करताना दिसतो.

महेश तुमचा मागच्या पानावरचा आणि मनाली तुझा या पानावरचा प्रतिसाद आवडला.
बाकी या विषयावर बोलण्याजोगं बरंच काही आहे. पण तुम्ही सगळे बोलत आहात त्यात माझी अजून भर कशाला Proud

Pages