संतरा बर्फी

Submitted by सुलेखा on 24 December, 2016 - 03:55

santara barfi.jpg

सध्या बाजारात भरपूर संत्री आहेंत . नेट वर संतरा बर्फी च्या बर्‍याच रेसिपी आहेंत. त्यापैकी ही रेसिपी काही बदल करुन केली . चवीला छान झाली.
साहित्य :--
१ कप अगदी बारीक रवा
२ मोठे चमचे साजूक तूप
१ १/२कप साखर
१कप मिल्क पावडर
१ १/२ कप संत्र्याचा रस
३/४ कप संत्र्याची बारीक चिरलेली साले
कृती:--
१] साधारण ३ ते ४ सत्री सोलुन पाकळ्या सुट्या कराव्या. मिक्सर मधे फिरवुन तयार मिश्रण चाळणी तुन गाळुन घ्यावे .हा तयार संतरा रस साधारण १ १/२ कप होतो.
२]संत्र्याची साल आतल्या बाजूस , सुरीच्या टोका कडील बाजुने खरवडून घ्यावी. आतसाअशा २/३ साली एकावर एक ठेऊन , सुरीने त्याचे बारीक उभे तुकडे-साधारण अर्ध्या ईंचाचे कापून घ्यावे
आता मुख्य कृती कडे वळू.
फ्राय पॅन मधे तूप गरम करा.त्यात रवा घालुन अगदी मंद गॅसवर छान गुलाबी रंग येई पर्यंत भाजुन घ्या.
त्यात संत्राची बारीक चिरलेली साले घालुन परतुन घ्या.
आता सत्र्याचा रस थोडा थोडा घालुन परता.संत्र्याच्या रसात रवा शिजलेला दिसेल.
साखर घालुन छान परता.
आता मिल्क पावडर घालुन परता.
सर्व मिश्रण एकसारखा गोळा होईपर्यंत परता.
तूप लावून घेतलेल्या एका थाळीत हा गोळा एकसारखा पसरुन घ्या. थंड झाल्यावर वड्या पाडुन घ्या.
संत्र्याचा रस,साले वापरुन केलेल्या वड्या तयार आहेंत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा धन्यवाद.
अंकु,
इसेन्स ,फूड कलर अजिबात वापरला नाही .चव खूपच छान .रंग बेताचाच येतो .
कावेरि.
फोटो दिला आहे.

छान पाकृ!
संत्र्याची बारीक चिरलेली सालं म्हणजे केशरी भाग की खरवडलेला पांढरा भाग.. ही सालं तुरट असतात ना?

सन्त्री पाठीकडुन हलकेच किसुन घेतली तरी हवा तो स्वाद मिळेल , मस्त आणि सोपी क्रुती आहे, मिल्क पावडर आणून करुन बघते.

सखी माऊली- संत्राच्या साली च्या आतला पांढरा भाग -भुगा ,थोडा जमेल तितकाच काढायचा आणि साल उभे काप करायचे. किंचित कडवट असली तरी त्यात सन्त्राचा स्वाद /फ्लेवर असतो.
प्राजक्ता, आपल्याकडची संत्री , मऊ असतात. हलकेच किसता येत नाहीत.