थोडीशी गैरसोय नक्की किती? आणि कोणाची? भाग 2

Submitted by सिम्बा on 21 December, 2016 - 23:25

थोडीशी गैरसोय ( http://www.maayboli.com/node/60794) या धाग्याने 2000 पोस्ट चा टप्पा पार केला आहे
कृपया आता तिकडे प्रतिसाद देऊ नयेत.

,
चलनबंदी होऊन आज 40 दिवस होऊन गेले तरी गैरसोय कमी होण्याची नाव नाही,
पुणे मुंबई शहरात स्थिती थोडीशी सुधारली आहे, (पण थोडीशीच, मला स्वत:ला गेल्या 40 दिवसात फक्त एकदा तीन 500 च्या नोटा पाहायला मिळाला आहेत, मात्र तेव्हाच थोडया प्रयत्नांत 2000 चे सुट्टे मिळून जातात असा अनुभव आहे)
ग्रामीण, निमशहरी भागात अजूनही परिस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे.
नोटांच्या दुष्काळावर मात करायला पेटीम, किंवा इतर wallet 2वापरायचा प्रयत्न म्हणजे एका जास्तीची गैरसोय ठरला आहे, (वृद्ध, अशिक्षित, स्मार्ट फोन नसणारा वर्ग)
या व अशाच गैरसोयी चा ट्रॅक ठेवण्यासाठी हा दुसरा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच त्या जुन्या-पुराण्या नावांच्या एक्सप्रेसमधून प्रवास करायचा कंटाळा आलाय? मग निराश होऊ नका. आता यापुढं तुम्हाला 'पेप्सी राजधानी' एक्सप्रेस आणि 'कोक शताब्दी' एक्सप्रेसमधून प्रवास करायला मिळणार आहे >>

अभिनंदन .. खाजगीकरण सुरु..

नोटाबंदीमुळे भाव घसरले; शेतकऱ्यांकडूनच पिके उद्ध्वस्त

जवळपास दोन महिने प्रतीक्षा करूनही टोमॅटोच्या दरांत वाढ होण्याची शक्यता नसल्याने हतबल झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी शेतातील टोमॅटोची उभी रोपे उखडून फेकण्यास सुरूवात केली आहे. निश्चलनीकरणाआधी घाऊक बाजारात ६ ते ७ रुपये किलोचा टोमॅटोचा भाव कालांतराने ५० पैसे ते दीड रुपयांपर्यंत गडगडला. त्यातून काढणी व वाहतूक खर्चही निघत नसल्याने रोपांवर औषध फवारणी व तत्सम खर्च वाढविण्यापेक्षा संबंधितांना नाईलाजास्तव हा मार्ग पत्करावा लागल्याचे चित्र आहे.

नगदी पीक म्हणून टोमॅटोची लागवड करणारे हजारो शेतकरी या घसरणीत भरडले गेले. १२ एकरमध्ये टोमॅटो लागवड करणारे दिंडोरीच्या इंदोरे गावचे कृष्णा गायकवाड हे त्यापैकीच एक. दरवाढीची आशा मावळल्याने त्यांनी आपल्या टोमॅटो शेतीवर नांगर फिरवला. निश्चलनीकरणाच्या निर्णयाचा व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेतला. नाशवंत फळभाजी असल्याने शेतकरी तो जवळ ठेवू शकत नाही. हे लक्षात घेऊन त्यांनी भाव पाडले. जुन्या नोटा माथी मारल्या. सध्या एक ते दीड रुपये दर घेऊन काय करणार, असा त्यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कारण, एक जाळी (२० किलो) टोमॅटो काढणीला १५ रुपये मजुरी लागते. ही जाळी बाजारात नेण्याचा वाहतूक खर्च १५ रुपये आहे. हाच एकूण खर्च ३० रुपये असताना २० किलोच्या जाळीला त्यापेक्षा कमी भाव मिळतो, अशी व्यथा लखमापूरचे संदीप मोगल, वणीचे धीरज तिवारी रासेगावचे बालाजी पवार, आबासाहेब अपसुंदे हे शेतकरी मांडतात.

मागील काही वर्षांत इतक्या मोठय़ा प्रमाणात टोमॅटो शेती अध्र्यावरच सोडून देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नोटबंदीच्या समर्थनार्थ शेतकर्‍यांनी उत्स्फूर्तपणे साजरा केला 'टोमॅटिना उत्सव'!!

सर्व स्तरांतून पंतप्रधानांच्या निर्णयाला जोरदार पाठिंबा!!

बघा किती विकास झाला आहे.
भारताचा मोदींनी स्पेन बनवला. इतका प्रचंड विकास केला.

स्पेन गेली खूप वर्षं आजारी आहे. ग्रीस सारखा व्हेंटिलेटरवर पण जाऊन आलाय एकदोनदा.
आपल्याच बॉलिवूडनी तिकडे पिक्चर काढून (आणि नंतर भारतीय नवदाम्पत्यांनी तिथे हनीमूनला जाऊन) त्याला जिवंत राहण्यात मदत केलीये.
मोदींना त्यामानाने फारच सुदृढ अपत्य मिळालं होतं. त्यांनी त्याचं पण स्पेन करून टाकलं!!
भारताचा स्पेन झाला इज नॉट विकास! हा हा!

टोमॅटो दर आणि नोटबंदीचा तसा संबंध नाही. या वर्षीचा सर्व सिझन मी स्वतः बघितला आहे, टोमॅटो पिकवणाऱ्या हजारो एकर क्षेत्रात टोमॅटो वाल्या शेकडो शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष काम केले आहे, मे जून मध्ये टोमॅटो दर 1200 प्रति 20 किलो मिळत होता, कारण त्यावेळेला तीव्र उन्हामुळे सगळीकडे टोमॅटोची शेती प्रभावित झाली होती. ह्या प्रभावित झालेल्या शेतीवरच मी काम केले आहे व अनेक शेतकऱ्यांना चांगले दर मिळवण्यास मदत केली. चांगला पाऊस व दर मिळतील हे बघून बेसुमार लागवड ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होत होती, ऑगस्ट महिन्यातच मी अंदाज केला होता की ऑक्टोबर पासून टोमॅटो चे दर हानिकारक घसरतील.

ह्याचा अर्थ दुसऱ्या कोणत्याच क्षेत्रात नोटबंदीचे दुष्परिणाम झाले नाहीत असा काढू नये.

शेतकऱ्यांना जुन्या नोटा मध्ये व्यवहार करायला भाग पाडणे अनेक ठिकाणी झाले आहेच.

सई

मोदींची फेवरेट लाईन आहे. "असलिअत पे ना जाओ दिखाओ पे जाओ. अपनी अकल मत लगाओ"

Wink सो स्पेनची स्थिती काहीका असेना. भक्तांसाठी स्पेन हा विकसित देश आहे Wink

नोटाबंदीमुळे कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण वाढले असे भोपळच्या एका क्रायसिस सेंटरने म्हटले आहे.
आपल्या बायकांनी आपल्यापासून लपवून पैसे वाचवले होते, हे कळल्याने नवरे मंडळींनी आपापल्या बायकांना धमक्या, मारहाण हे उपाय योजले.

येणार्‍या कॉल्सची संख्या नोटाबंदीनंतर दरमहा ५०० वरून १२०० अशी वाढली. त्यापैकी २३० जणींना समुपदेशनाची गरज भासली. समुपदेशन दिलेल्या महिलांपैकी निम्म्या नोटाबंदीमुळे झालेल्या कौटुंबिक कलहाने त्रस्त होत्या.

Question is how much digital payments fall and how much of original cash is pushed back
भरत या बद्दल काही वाचनात आले आहे का?
वरच्या लेख प्रमाणे 60%कॅश आली आहे बाजारात,
पर्वा बजेट आधीच्या भाषणात "full remonitization" असा शब्द वापरला, म्हणजे काय पूर्ण 15 लाख करोड बाजारात परत येणार आहेत का?
rBI ने असे काही % remon चे गोल निश्चित केले आहे का?
कुणाच्या वाचनात काही आहे तर प्लिज इकडे टाका

रिझर्व बँकेच्या रिपोर्टप्रमाणे २० जानेवारी रोजी चलनात ९.१२ लाख कोटी इतक्या मूल्याच्या नोटा होत्या.
रिमोनेटायझेशन किती होईल याचा आकडा दिसलेला नाही. पण आधीच्या इतके नसेल असे अर्थमंत्री म्हणाले होते.

लोकसभेत मोदींचे भाषण चालू आहे

आजकाल त्यांच्या भाषणाचा स्तर इतका घसरला आहे की वाटते गल्लीमधल्या गणेशोत्सवात अजिबात न शिकलेला हौशी नेता त्याच्या ४-५ पंटरांना जमवून भाषण देत आहे.
काय एक एक खालच्या दर्जाचे अलंकार, काय ते नको तिथे विनोद करणे. "घर मे शादी है... पैसे नही है.. खीखी खी" इतके पंतप्रधान होऊन गेले काही ४०-५० दिवसांसाठी सुध्दा होऊन गेले परंतू पदाची मर्यादा त्यांनी सांभाळली.

काल ज्योतिराजे सिंधिया आनि मल्लिकार्जुन यांनी भाजपाला आरसा दाखवला.
त्यामुळे आज भाजपाचे पंतप्रधान बिथरले आहे. हताश आहे. स्वातंत्र्यात त्यांच्या पक्षाकडून अथवा त्यांच्या पितृपक्षाकडून काहीच योगदान नसल्याने काय बोलावे हे समजत नाही आहे.

मल्लिकार्जुन यांनी तर भाजपाच्या पार पितृपक्षापासून लायकी काढायला सुरुवात केली. सदन मधे बसलेले भाजप नेत्यांना तोंड कुठे लपवू असे झालेले. आज नाईलाजाने मोदीला उत्तर द्यायला भाग पडले पण सांगण्यासाठी काहीच नसल्याने अनापशनाप कैच्याकै बडबड चालू आहे.
जसे टुक्कार कॉमेडी शॉ मधे अँकर काहीही जुने घिसेपिटे जोक्स बोलून ऑडीअन्संना हसवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. तसे काहीचे चित्र मोदीच्या भाषणाच्या वेळेस दिसले.

आपले "प्रचारमंत्री" निवडणुकीत इतके मश्गुल आहे की लोकसभेत भाषण करताना "स्पिकर" यांना संबोधण्याऐवजी "भाइयो-बहनो" बोलत होते.

आणि हे म्हणतात की आम्हाला "निवडणूकीची चिंता नाही" Biggrin व्हॉट अ जोक

ज्या सैनिकांच्या जिवावर मतं मागितली, नोटाबंदीवर टीका करणार्‍यांना ज्यांचे दाखले दिले, त्याच सैनिकांना सरकारने बदललेल्या नियमांचा फटका बसतो आहे. ३१ मार्चपर्यंत रिझर्व बॅंकेत जाऊन कोणालाही नोटा बदलून मिळतील, अशी आधीची तरतूद होती. मग ही मुदत फक्त अनिवासी भारतीयांसाठीच ठेवली.
सीमेवर तैनात सैनिकांना हवी तेव्हा सुटी मिळत नाही. काही तर कारगिलसारख्या दुर्गम भागात असतात, जिथे असं काहे होतंय ही बातमी पोचायलाच अनेक दिवस लागता. असे सैनिक आज आपल्या रद्द झालेल्या नोटा घेऊन रिझर्व बँकेच्या शाखांत येताहेत आणि त्यांना तसंच परत पाठवलं जातंय.

गरज सरो आणि सैनिक मरो अशी नवी म्हण रूढ झाली आहे.

हॅपी demon डे मित्रो .

लोकांच्या पुनरावलोकना साठी,
2 वर्षांपूर्वी" नोटबंदी ने काय साध्य होईल" या बद्दल स्वतः:ची काय मते होती, ती आजच्या रिऍलिटी बरोबर ताडून पाहण्यासाठी धागा वर काढत आहे.

माझ्या घरी ५०० च्या २ जुन्या नोटा सापडल्या गेल्या २ वर्षात. एक बायकोच्या जुन्या पर्स च्या एका कप्प्यात होती आणि दुसरी कोणीतरी मुलांना पाकिटात घालून दिलेली त्या पाकिटातच होती ग्रीटिंग च्या गठ्ठ्यात.दोन्ही फ्रेम करून ठेवीन म्हणतो

आता रिझर्व बॅंकेचे नाक दाबून सरकारी बॅंकांना कर्ज वाटणे भाग पाडणार आहे सरकार. निवडणुकीपूर्वी जास्तीत जास्त लोकांना कर्ज मिळवून देऊन खूश करायचे आहे.
आणि सगळीकडे उंचच उंच पुतळे उभे करायचे आहेत. त्यासाठी मोठ्मोठ्या कंपन्यांचा सामाजिक कृतज्ञता निधी आहेच डल्ला मारायला. सरदारांच्या पुतळ्यासाठी दिला अडानी अंबानींनीं. आता पायंडाच पडतोय.

अहो मागे कोण उत्तर प्रदेशात बाई मुख्यमंत्री होती तिने सगळीकडे पुतळे उभारले - भा़जपचीच होती का ती?

<< त्यासाठी मोठ्मोठ्या कंपन्यांचा आहेच डल्ला मारायला. सरदारांच्या पुतळ्यासाठी दिला अडानी अंबानींनीं. आता पायंडाच पडतोय. >>
--------- अम्बानी किव्वा अडानी यान्नी काही दिलेच असेल तर त्यान्ना आधी १०, ००० पटीन्नी मिळालेले आहे मगच सामाजिक कृतज्ञता निधी म्हणुन ०.०१ % परत समाजाला करतील.

आधी लुटायचे (टॅक्स चुकवर किव्वा इतर मार्गान्नी) मग त्या लुटीतला एक छोटासा हिस्सा मोठा डन्का पिटत द्यायचा. मला भारतात ५००० रु. खरेदी केल्यावरही पावती द्या म्हणुन विनवल्यावरच नाखुशीने पावती देणारे व्यापारी आहेत. व्यावहारच नाही, म्हणुन (कागदोपत्री) फायदा नाही, फायदा नाही तर कर कशाच्या आधारावर भरायचा ? हे झाले छोटे मासे...

Pages