थोडीशी गैरसोय नक्की किती? आणि कोणाची? भाग 2

Submitted by सिम्बा on 21 December, 2016 - 23:25

थोडीशी गैरसोय ( http://www.maayboli.com/node/60794) या धाग्याने 2000 पोस्ट चा टप्पा पार केला आहे
कृपया आता तिकडे प्रतिसाद देऊ नयेत.

,
चलनबंदी होऊन आज 40 दिवस होऊन गेले तरी गैरसोय कमी होण्याची नाव नाही,
पुणे मुंबई शहरात स्थिती थोडीशी सुधारली आहे, (पण थोडीशीच, मला स्वत:ला गेल्या 40 दिवसात फक्त एकदा तीन 500 च्या नोटा पाहायला मिळाला आहेत, मात्र तेव्हाच थोडया प्रयत्नांत 2000 चे सुट्टे मिळून जातात असा अनुभव आहे)
ग्रामीण, निमशहरी भागात अजूनही परिस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे.
नोटांच्या दुष्काळावर मात करायला पेटीम, किंवा इतर wallet 2वापरायचा प्रयत्न म्हणजे एका जास्तीची गैरसोय ठरला आहे, (वृद्ध, अशिक्षित, स्मार्ट फोन नसणारा वर्ग)
या व अशाच गैरसोयी चा ट्रॅक ठेवण्यासाठी हा दुसरा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर दोन वर्षांपूर्वीची कविता

एसेएमएस, व्हॉट्स अ‍ॅप, फोर जी
पेटीएम, एटीएम
क्रेडीट कार्ड, डेबीट कार्डं
पेमेंट गेटवे आणि
नेटब्यांकिंग डांगडिंग

या जमान्यातही
कुठल्यातरी वस्तीवर
वाट पाहतो आजही
कुणी अडाणी म्हातारा
कागदाच्या पत्राची

छोट्या शहरातल्या
अरुंद रस्त्यावरची
जीर्ण आळी
वाट पाहते
विलायती मनीऑर्डरीची

अजून कुरीयर पोहोचत नाही
काही ठिकाणी
तो देशही आपलाच
तिथे आजही
पत्रं वाचून दाखवणारा
पोस्टमन असतो
तिथे
अजूनही मुंग्यांची रांग दिसते
वारुळ बांधून मरून जाते
कच्च्याबच्च्यांसाठी
साखर ठेवून

आणि कुठेतरी अजूनही
खांद्यावर प्रेत वाहून नेलं जातं
अर्धांगिनीचं
सोबत त्या निष्चेट माउलीची
आसवं सुकलेली फुलं

तिथेच कुठेतरी जात नाही
अखंड कुणी बाप
तुकड्या तुकड्यात जगलेली आयुष्यं
मरणानंतरही
तुकड्या तुकड्यानेच जातात...

लाल दिव्यांच्या वस्तीतल्या
कुडकुडत्या अंधारकोठड्यातून
बिस्तर गरम करत राहतात
बिननावाची आयुष्ये
बिना आधाराची आणि पॅनकार्डाची

जनावारांना नाव नसतं, इतिहास नसतो
संस्कृती नसते
भूमीची कणभरही मालकी नसते
आपल्या बाजूबाजूला रेंगणारी आयुष्ये
असून नसल्यासारखी

रोजचा दिवस घेऊन येतो
एक सर्जिकल स्ट्राईक
आणि गडद काळी गाठोडी
अंधा-या निराशेची

हा पुंजक्यापुंजक्यांचा देश
हरवून जातो तीव्र धुक्यात
गच्च आवळणा-या धुक्यापलिकडच्या
झगमगाटाने वितळत नाही जराही
एकही धूसर पडदा

धुके भेदून पलिकडून आलेच तर
अवतार येतात मुक्तीदाते म्हणून
सडवा जुलुम, एण्काउंटर
टेररिझम, स्लीपर सेल
काहीबाही अगम्य श्लोकांच्या उच्चारांत
मिळते काही आयुष्यांना मुक्ती

आणि
पलिकडच्या जयघोषात
विकास नावाचं अनौरस कार्टं
स्वप्नं विकून जातं
लपून बसतं
आशाळभूतांपासून

या दोन्ही जगांना जोडणारं
नेटवर्क चालू होईल
तेव्हां पत्रं बंद होतील
आणि
त्या पत्रांची वाट पाहणेही
नाहीतर
ते जगच नाहीसं होईल
एक दिवस.......

Pages