थोडीशी गैरसोय नक्की किती? आणि कोणाची? भाग 2

Submitted by सिम्बा on 21 December, 2016 - 23:25

थोडीशी गैरसोय ( http://www.maayboli.com/node/60794) या धाग्याने 2000 पोस्ट चा टप्पा पार केला आहे
कृपया आता तिकडे प्रतिसाद देऊ नयेत.

,
चलनबंदी होऊन आज 40 दिवस होऊन गेले तरी गैरसोय कमी होण्याची नाव नाही,
पुणे मुंबई शहरात स्थिती थोडीशी सुधारली आहे, (पण थोडीशीच, मला स्वत:ला गेल्या 40 दिवसात फक्त एकदा तीन 500 च्या नोटा पाहायला मिळाला आहेत, मात्र तेव्हाच थोडया प्रयत्नांत 2000 चे सुट्टे मिळून जातात असा अनुभव आहे)
ग्रामीण, निमशहरी भागात अजूनही परिस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे.
नोटांच्या दुष्काळावर मात करायला पेटीम, किंवा इतर wallet 2वापरायचा प्रयत्न म्हणजे एका जास्तीची गैरसोय ठरला आहे, (वृद्ध, अशिक्षित, स्मार्ट फोन नसणारा वर्ग)
या व अशाच गैरसोयी चा ट्रॅक ठेवण्यासाठी हा दुसरा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच प्रकारे विचार करीत राहिलात तर लौकरच हिटलरच्या राज्यात रहात असल्याचे "आभास" तुम्हांस होऊ शकतात हे नक्की..... तसे ते २००२ पासुन "मौत के सौदागर" वगैरे विशेषणांनी होत आहेतच म्हणा ????

लिंबू, मी यापुर्वी कधीही कुणावरही ताशेरे ओढलेले नाहीत. सरकार कुठलेही असो ( आपले, त्यांचे ) त्यांच्या निर्णयाचे परीणाम एक देश म्हणून आपण सर्वांनी झेलेलेले आहेत. झेलणारही आहोत.

म्हणून म्हणतो, कि भविष्याच्या काही योजना भारताकडे आहेत का ? आणि सर्व निर्णय त्याच दिशेने घेतले जात आहेत का ?

जर तुम्ही बुद्धीवादी आणि सारासार विचार करणारे असाल तर तुम्ही आपोआप सेक्युलर्/हिंदुविरोधी/खांग्रेसी नाहीतर आप्टार्ड्/अँटीबीजेपी असे काय काय होता.
जास्त कष्ट करायची आणि जास्त स्पष्ट बोलायची, विरोध करायची गरजच नाही.

साती...अगदी

तूम्ही आस्तिक असलेच पाहिजे, नाहीतर नास्तिक तरी.. या दोनच गटात असण्याचे स्वातंत्र तूम्हाला आहे.

देव का असतो ? धर्म का असतो ? तो कशाला लागतो ? त्याच्यावाचून काय अडतेय का ? किंवा मूळात त्याच्या
असण्याचा , नसण्याच्या मी विचार केलाच पाहिजे का ? असा विचार करायचे स्वातंत्र्य मात्र नाही !

इलेक्शनमधी भारिच गैरसोय झाली .... त्यामुळे हरावे लागले.
त्यातुन तो बीजेपीचा नेता जाहीर पणे सांगत होता कि "लक्ष्मीचे स्वागत करा, पण मत कमळालाच द्या" Proud
केलीये तक्रार म्हणे निवडणूक आयोगाकडे... पाहुयात काय होते ते.
पण भारीच गैरसोय....

प्राणजी,
आपल्याला आलेल अनुभव दुर्दैवी आहे, परन्तु माझ्या निरिक्शणा प्रमाणे फ्लिपकार्ट वाले कश ओन देलिवेरि साठि पि ओ एस मशिन घेउन येतात तेव्हा तुम्हाला ए टि एम मध्ये जावे लागणार नाहि असे वाटते असो.

माझ्या एका ओळखीतल्या व्यक्तीने काही महिन्यांपुर्वी थोडे पैसे उसने घेतले होते.
बर्‍याच दिवसानंतर मी पैसे मागायला गेलो तर म्हणाला " तुला सगळी रक्कम देता येणार नाही, तुला २००० घेता येतील." मी म्हणालो " ठीक आहे, २००० तर २००० दे तर सही. मला गरज आहे आता"
पण तो ते ही रेग्युलर देत नव्हता, कधी २००० तर कधी १५०० तर कधी पैसे संपले नंतर देईल अशी कारणे देऊ लागला. आता पैसे देऊन बसलेलो त्यामुळे मुकाट्याने ऐकून घ्यावे लागत होते. उलट तो व्यक्ती सगळ्यांना " माझ्याकडे अमूक रक्कम आली आहे. मी श्रीमंत झालो" अश्या फुशारक्या मारत फिरू लागला. इतर लोकांना माझेच पैसे वापरून व्याजावर देऊ लागला. त्यातले काही पैसे तर इतर लोकांनी बुडवले सुध्दा. त्यावर मी जाब विचारल्यावर उलट बोलू लागला." तु माझ्याकडे पैसे दिले ते माझे झाले मी कसे ही वापरु कुणाला दिले ती माहीती गोपनिय आहे. तुला का बरे सांगू?"

आज तर त्याने कमालच केली. घरी येऊन मोठ्या आवेशात म्हणाला. " मित्रा. आज तुला मी नविन वर्षाची भेट देतो. आज पासून मी तुला २००० ऐवजी ४५०० रुपये देत जाईन. नविन वर्षाला मी तुझ्या वर जास्त उदार होत आहे. माझे उपकार वगैरे मानायची गरज नाही, मैत्रीत एवढे तर मी नक्कीच करू शकतो"

त्याचे हे वाक्य ऐकून तळपायाची आग मस्तकाला गेली. पण पैसे अडकले असल्याने शांत राहिलो. मनात ठरवून घेतले. 'अशा हलकट माणसाला पुन्हा दरवाजात उभे करायचे नाही. भले एखाद्या गरजूला दिले जे परत आले नाही तरी चालेल पण याच्या घशात पैसे घालायचे नाही'

---

१.कधी नव्हे ते अगदी शेवटच्या दिवशी(२०/१२ ला) मेडीक्लेमचे पैसे नेटवरून भरले.ऐसे अकाऊंटमधून वळते झालेत.पण पॉलिसी रिन्यू झाली नाही.तेव्हा प्रत्यक्ष जाऊन पैसे भरले.ऑनलाईनमुळे मिळणारी ५५० ची सवलतही बुडाली.आज ३१ तारीख माझे सव्व्वा अकरा हजार अजून मिळाले नाहीत.मेल टाकली आहे.त्यांच्या हेडऑफिसने रिफंडसाठीकन्स्रर्न शाखेला कळविले आहे. पाहू कधी मिळतात ते.

२.काल वॉकला जाताना कार्ड्घेऊन गेले,म्हटले मिळत असतील तर पैसे आणूया.रांगेत ७ वा नंबर होता.एवढे करुन २ हजार मिळाले.

Untitled.jpg

गोल गोल उलट सुलट गिरक्या सुरु आहेत.

ए टी एम मध्ये भरपूर पैसे आहेत .. रांगा नाहीतच.

लोक आनंदाने रांगेत रहायला तयार आहेत.

विरोधी पक्ष काम करु देत नाही आहेत.

विविध धर्मांचे लोक रांगेत उभे आहेत.

रांगेत रहाणे हीच देशसेवा.

आँ ! मग काँग्रेसच्या काळात रांगा नव्हत्या का?

छी छी !! काँग्रेसवाले शेतकर्‍याना अनुदान वाटायचे !

मोदी किती कनवाळू , त्यानी शेतकर्‍यांची व्याजे माफ केली.

मोठ्या नोटानीच भ्रष्टाचार वाढतो.. ( हजारची नोट अटलजीने आणली अन दोन हजारची मोदीने ! हे मात्र विसरायचं ! )

Proud

"डिजिटल इंडिया" का अगुवा रिलायंस - "जियो" बना, जबकि मौका बीएसएनएल / एमटीएनएल के पास पूरा था...!

कैशलेस इकोनॉमी का अवतार एनपीसीआई के "रुपए" को बनना चाहिए था... लेकिन बाज़ी सीधे-सीधे "पे-टीएम" के हाथ लगने दी गई...!

फ्राँस के रफेल फ़ाइटर जेट का भारतीय पार्टनर हिंदुस्तान एरोनौटिक्स लिमिटेड को होना चाहिए... लेकिन ऑर्डर मिला रिलायंस - "पिपावा डिफेंस"...!

भारतीय रेल को डीज़ल सप्लाई का ठेका इंडियन ऑइल कार्पोरेशन को मिलना चाहिए था लेकिन मिला रिलायंस पेट्रोकेमिकल्स को..!

ऑस्ट्रेलिया की खानों के टेंडर में सरकार चाहती तो "एमएमटीसी" की बेंक गारंटी एसबीआई के जरिये दे सकती थी... लेकिन मिला अडानी ग्रुप को...!

सरकारी संस्थानों को जान-बूझकर प्राइवेट कंपनियों का पिछलग्गू बनाकर किसे फ़ायदा पहुँचाया जा रहा है...?

अगर फ़िस्क़ल और मॉनेटरी पाॅलिसीज़ में चेंजेज़ आ ही रहे हैं, तो इसका मुनाफ़ा सरकारी उपक्रमों को मिलने के बजाय निजी हाथों में क्यों दे रहे रहो...?

सुनो, देशप्रेम और किसी व्यक्ति-विशेष का चारित्रिक पूजन करने में ज़मीन आसमान का फ़र्क़ है.. इस फ़र्क़ को समझना ज़रूरी है और असलियत के धरातल में रहना उससे भी ज़्यादा ज़रूरी है...

अंधभक्ति और जी-हुज़ूरी करना इसलिए भी ग़लत होता है क्योंकि वो आपसे आपका सवाल पूछने का अधिकार छीन लेता है...

गलतियाँ सबसे हो सकतीं हैं, होती हैं, क्योंकि भगवान यहाँ ना कोई है, न हो सकता है...

>>>> झाडू | 2 January, 2017 - 23:43 नवीन

नाही.

खर्‍या सोयींबद्दल लिहिण्यासाठी सुलभ सोयीचा धागा तुम्हीच काढून दिलाय की तिकडे.
<<<<

धागाकर्त्याला प्रश्न विचारला होता. देशभरातील नागरिकांच्या सोयी-गैरसोयीचा प्रश्न आहे. तुम्ही माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला धावता हे छान वाटते, पण तशी गरज नाही. धागाकर्ता हे एक स्वतंत्र आय डी आहेत.

Happy

झाडू. नवीन वर्षांच्या शुभेच्छा या धाग्यावर तुम्ही घाण करायला सुरूवात केली आहे. उत्तर इथेच दिले तर बरे पडेल.

एक स्त्री डॉक्टर म्हणून मी कधीही फेक पुरूष आयडीने इतरांना अर्वाच्च्य भाषेत पोस्ट्स लिहीणार नाही असे तुम्ही लिहाल असे वाटले होते. केसाळ हात आणि काय ते संदर्भ या धाग्यावर का दिले हे आधीही कळाले नव्हते. तुमच्या घरातील कुणा पुरूषाचा हात केसाळ आहे किंवा कसे याच्यात कुणालाही इंटरेस्ट असणे शक्य नाही हे समजून घ्या. त्यात काही गंमत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर ते तुमच्या सर्कलमतेच ठेवा.

इग्नोर केले तर जास्त शेफारता म्हणून उत्तर दिले. सभ्य भाषेत तुम्हाला उत्तर देऊनही उपयोग नाही हा सर्वांचा अनुभव देखील आहे कारण तुम्ही फेकच आहात. असो. पुन्हा या धाग्यावर घाण करू नका. तुमचा आखाडा इतरत्र चालूच आहे. प्लीजच इकडे फिरकू नका. यात काहीही मजेशीर नाही. मुळात तुमचे मायबोलीवरचे विकृत व विद्रूप अस्तित्त्व कुणालाही मजेशीर वाटणे शक्यच नाही. अजूनही घाण करायची असल्यास तुमचा कीबोर्ड रोखणे अ‍ॅडमिनशिवाय कुणाला शक्य नाही. तुमच्यासारखे सदस्य नसले तरी काही बिघडत नसल्याने जास्त लाडात येऊ नका. रोज उठून कुणाचा ड्युआयडी आहे याचा संशय घ्यावा आणि तुमच्यासारख्या बेनामी आयडीला एक्सप्लेनेशन देत रहावे हे बास झाले. तुमच्यासारख्या तोंड आणि ओळख ल्पवत फिरणा-याआणि रोज दोन लाख रूपये कमावतो अशा फुशारक्या मारणा-या रिकामटेकड्या माणसाच्या बाबतीत ज्याची ओळखच माहीत नाही तो खरंच डॉक्टर आहे की कसाई आहे की काँग्रेस पक्षाने पोसलेला गुंड हे कळण्यास मार्ग नाही. सबब, यापुढे उत्तर देण्यात इंटरेस्ट नाही. त्यात कसलीही गंमत वगैरे वाटत नाही.

डॉक्टर साती यांनी तुम्ही बनसोडे आहात असा खुलासा केला आहे. तो तरी खरा आहे का ?

satiexplain.png
तुमचे दोन दोन हॉस्पिटल्स आहेत अशा गमजा मारता तर एखाद्या हॉस्पिटलचे नाव द्या. दोन हॉस्पिटल्सही चालवता, पेट्रोलपंपावर ऊठबस असते.झालेच तर क्रेडीट कार्डाचा प्रोग्राम लिहीणा-यांच्यात तुमची ऊठबस असते. विषय कुठलाही असो तिथे तुमची ऊठबस असनारच. पण मग एव्हढे सगळे करून पक्षाचे कामही करता आणि हॉस्पिटल्सही चालवता. यासाठी तुमचा मायबोलीने सत्कारच केला पाहीजे. पण त्यासाठी एक जिवंत व्यक्ती सापडणे आवश्यक आहे. इथे तुम्ही वटवाघळासारखे अंधारात लपून बसता म्हटल्यावर सत्कार कसा करायचा ?

एखाद्या स्त्रीने पुरूष आयडी काढताना इतके वाहवत जावे याचे वाईट वाटते.zadu2.jpgzadukaka.jpg

https://www.facebook.com/thelallantop/videos/1625676391072531/?hc_ref=NE...

एटीएमच्या लाईनीमधे उभे राहणार्‍या सामान्य जनते बद्दल भाजपाचा नेता मनोज तिवारी यांचा कनवाळूपणा.
जनते बद्दल यांच्या मनात किती प्रेम आहे याचा अंदाज हा विडीओ पाहून नक्कीच येईल.
अंधभक्तांचे तर मन भरून येईल. युनाईटेड कोथरुड मधे तर अश्रूंचे पाट वाहतील.
इतका भावनिक व्हिडीओ आहे

देशात नोटांचा तुटवडा आहे व ग्रामीण भागात तर अधिकच तुटवडा आहे , असे कुणीतरी ज्येस्थ पदीय बोल्ले म्हणे ....

अआजच्या मटात आहे. पण मोबल्यावर साइट ओपन होइना .

देशात नोटांचा तुटवडा आहे व ग्रामीण भागात तर अधिकच तुटवडा आहे , असे कुणीतरी ज्येस्थ पदीय बोल्ले म्हणे ....>>>>>खटाव तालुक्यात तर नक्कीच आहे . मजूरांचे रोज पैसे देताना नाकिनऊ येतात. बॅंकेतून 2-3 हजारच मिळत आहेत.

करत आहेत दीपस्त. ह्यात काय खिल्ली उडवली ते दाखवा म्हणतात. भक्तांच्या डोक्याला डोकं लावणे दगडावर डोकं आपटण्यासारखे आहे.

http://www.firstpost.com/business/raised-five-times-within-a-year-now-ta...

पेट्रोल बनवायच्या प्रति लिटर खर्चापेक्षा त्यावर लागलेला कर सध्या जास्त आहे.
सरकारने क्रूड ऑइल कमालीचे स्वस्त असताना हे करून दाखवले आहे.

त्या लिंक मध्ये फक्त पेट्रोलवरच्या एकसाईज मधून मिळणारे उत्पन्न दिले आहे. असेच बाकी अप्रयत्यक्ष करांचे मिळायला हवे.
या वर्षात ५ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत.

हजार व पाचशे रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशातील अनेक भागांत नव्या नोटांचाही काळाबाजार झाला. मुंबईतही दादर हिंदू कॉलनी येथून ८७ लाख रुपयांच्या नव्या नोटा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या छाप्यात जप्त करण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हेच दाखल केलेले नाहीत, असा दावा केतन तिरोडकर यांनी अॅड. संदेश सावंत यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.

पंतप्रधानांनी नोटाबंदीचा चांगला निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्याच दिवशी दादरच्या हिंदू कॉलनी येथून हितेश शहा व अन्य सहा जणांकडून ७२ लाख रुपये किंमतीच्या दोन हजारांच्या नोटा व १५ लाख रुपये किंमतीच्या पाचशेच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा व प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केली. त्यात आपणही सहाय्य केले. परंतु, नंतर प्राप्तिकर विभागाने याविषयी चौकशी करून आरोपी व त्यांना या नोटा पुरवणारे बँकेचे अधिकारी यांना असेच सोडून दिले, असे तिरोडकर यांनी याचिकेत म्हटले आहे.

याविषयी आपण मुंबई पोलिस आयुक्तांनाही पत्र लिहून आरोपींविरुद्ध देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, फौजदारी कारस्थान रचणे, आर्थिक फसवणूक करणे, चोरी करणे याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम १२० (ब), १२१ (अ), ४२० व ३७८ अन्वये गुन्हे नोंदवण्याची विनंती केली. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून याचिका करत असून मुंबई पोलिस आयुक्तांना माहिती गोळा करण्याचे आणि एसआयटी नेमण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती तिरोडकर यांनी केली आहे.

Pages