सासु आणि सुन

Submitted by वर्षा_म on 10 December, 2009 - 07:00

लग्न ठरले की सासुला जश्या मैत्रीणी सल्ला देतात .. तश्याच सुनेला पण
(लोकांनो असले सल्ले द्यायचे बंद करा)

सासुची मैत्रीण

मुलाचे लग्न करताय म्हणालात
मुठीतच ठेवा मात्र नविन सुनेला
आजकालच्या पोरींचे या काही खरे नाही
सासुला आई आणि नंदेला म्हणतात ताई

काहीनाही आधीपासुनच धाकात ठेवलेली बरी
नाहीतर वाटल तुमच्या डोक्यावर मिरी
स्वयंपाकघर मात्र तुम्ही सोडु नका
केरवारा मात्र आता तुम्ही करु नका

सणवार कसे व्हायला हवेत नीट
नोकरी करते म्हणुन कसली आली सुट
करीअरची त्यांनाच असते हौस
वाटते त्यांना सासु करते त्यांच्या जिवावर मौज

=============================

सुनेची मैत्रीण

सासु नामक प्राण्याला जवळ करु नकोस
चार शब्द प्रेमाने तिच्याशी बोलु नकोस
बोलता बोलता उगी काही बोलुन जाशील
शब्दांमधे तुला ती वेठीवर धरील

झाला म्हणा तुमचा आता भरपुर संसार
तुम्ही आता निवांत टाळांचा घ्या आधार
कामाला सगळ्या बाई टाक लावुन
उगीच कुणाचे उपकार नको घेउ ठेउन

मी आता माझ्या मनाप्रमाणे म्हणा घर लावते
जुन्या सगळ्या वस्तु भंगारात टाकते
काय डोंबले त्या जुन्या वस्तुत यांचे मन
घरभर नुसते भंगार टन टन
===========================

जुये हे बरोबर नाही बर्का ! एवढी छान कविता कै च्या कै मध्ये..... not fair ! चल योग्य ठिकाणी हलव बघू Wink

हुशार आहतकी सगळेच्या सगळे... प्रेरणा कुठुन मिळाली ओळखले बरोबर Wink

@ विशालभाउ ... कै च्या कै मधेच ठीक आहे .. आणि कालचा तुमचा गेस आणि लाजोचा गेस चुकलाय वाटातय मला Light 1

जुए Lol

मलाही कळलं नाही एवढ्या गंभीर विषयावर हे सगळे इतके हसताहेत का ते ? अरेच्चा, हसणारे सगळे पुरुषच दिसताहेत. याशिवाय दुसरं काय करतील बिचारे ! घरी तर तेही वांदे असतात ना !

Rofl

मी आता माझ्या मनाप्रमाणे म्हणा घर लावते
जुन्या सगळ्या वस्तु भंगारात टाकते
काय डोंबले त्या जुन्या वस्तुत यांचे मन
घरभर नुसते भंगार टन टन>>>>>>> ह. ह. पु. वा. Happy

जुये... छान लिहीलियेस... इन्स्पिरेशन कुठुन मिळालं ओळखल बरं मी डोळा मारा
जल्ला मला बी इन्स्पिरेशन चा सोर्स कल्ला... Lol

मलाही कळलं नाही एवढ्या गंभीर विषयावर हे सगळे इतके हसताहेत का ते ? >>>

मला अजुन एक कळलं नाही..वर्षीला सगळे जुयी का म्हणताहेत? Uhoh

वर्षे..सल्ल्यांसाठी आभारी..उपेगी येतील Proud

<<मी आता माझ्या मनाप्रमाणे म्हणा घर लावते
जुन्या सगळ्या वस्तु भंगारात टाकते
काय डोंबले त्या जुन्या वस्तुत यांचे मन
घरभर नुसते भंगार टन टन<<
Rofl मस्तच गं वर्षे (रच्याकने, मी आधी ते टना टन वाचले होते... Proud )

मला अजुन एक कळलं नाही..वर्षीला सगळे जुयी का म्हणताहेत? <<< अगदी मलाही हाच प्रश्न पडलाय मला वाटते वर्षाचं माहेरचं नाव जुई आहे का? स्वानुभवातून आलंय का गं हे सगळं वर्षे?

स्वानुभवातून आलंय का गं हे सगळं वर्षे? >> हो-हो Proud

पण माबोच्या अनुभवातुन म्हण Lol

रचक्याने, आणखी काही वर्षांनी सुनवास होइलच की Lol

मस्त

Pages