क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधीच्या धाग्यावरील शेवटचे प्रतिसाद -

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ऋन्मेऽऽष | 24 October, 2016 - 22:32

असामी मिडल ऑर्डरला एकच जागा नसते. क्रमांक ४ आणि ५ या दोन जागा आपण हव्या तश्या धोनी आणि पांडे वा आणखी कोणी यात फिरवू शकतो.
तसेच क्रमांक ६ साठीही धोनी अगदीच अनफिट नाही झालाय. किंबहुना तुम्हाला त्या क्रमांकावर त्याची जागा घेणारा फिनिशर मिळेपर्यंत तर हे बोलायलाच नको. सध्या त्याने पुढे येत ती जागा खाली केलीय असे समजा. तर केदार जाधव वा पांड्या वगैरेंनी ती भुमिका सक्षमपणे पेलून दाखवावी. अन्यथा वय वाढलेला धोनीही त्या भुमिकेत त्यांच्यापेक्षा सरस वाटू लागायचा. कारण फिटनेस आणि धडाकेबाज फटके तर तुम्ही आणाल. पण ते चेसिंगचे प्रेशर झेलायचे आणि पेलायचे कसब कुठून आणाल स्मित

असामी | 24 October, 2016 - 22:39

. क्रमांक ४ आणि ५ या दोन जागा आपण हव्या तश्या धोनी आणि पांडे वा आणखी कोणी यात फिरवू शकतो. >> हि चर्चा झालेली तेंव्हा धवन ओपन करायचा नि रहाणे होता मिडल ऑर्डर मधे आधीच. तीन जण नि दोन जागा.

"तसेच क्रमांक ६ साठीही धोनी अगदीच अनफिट नाही झालाय. " .धोनी स्वतः ति जबाबदारी स्वतःपासून इतरांना handover करायला बघतोय हे तुझ्या लक्षात येतेय का ?. तिथे पांड्या कि पांडे कि रैना कि केदार जाधव कि अजून कोणी ह्याचे उत्तर लगेच मिळणार नाही. पांडे सारखा तरूण, जास्त full fledged player जो सगळे फटके खेळू शकतो, mentally strong, domestic cricket च्या rigor मधून सुलाखून निघालेल्या खेळाडूला तिथे ग्रूम करणे मस्त ठरेल असे माझे वैयक्तिक मत आहे.

ऋन्मेऽऽष | 25 October, 2016 - 00:11

धोनी स्वतः ति जबाबदारी स्वतःपासून इतरांना handover करायला बघतोय हे तुझ्या लक्षात येतेय का ?
>>>
हा त्याचा दूरद्रूष्टीपणा आणि पर्यायाने मोठेपणा झाला.

हि चर्चा झालेली तेंव्हा धवन ओपन करायचा नि रहाणे होता मिडल ऑर्डर मधे
>>>>>
रहाणेला अजून एकदिवसीयमधील जागा फिक्स करायची आहे. त्याच्या कसोटी क्लासबद्दल जराही शंका नाही. माझ्याच ईथे कौतुकाच्या कित्येक पोस्ट सापडतील. मात्र एकदिवसीय मध्ये रहाणे अजून तसाच आहे जसे कसोटीमध्ये रोहीत शर्मा.

फेरफटका | 25 October, 2016 - 00:46

"हा त्याचा दूरद्रूष्टीपणा आणि पर्यायाने मोठेपणा झाला." - वयाचा मोठेपणा? डोळा मारा आणी दूरदृष्टी की निरूपाय? स्मित

असामी | 25 October, 2016 - 00:51

हा त्याचा दूरद्रूष्टीपणा आणि पर्यायाने मोठेपणा झाला. >> चर्चेचा विषय तो नव्हता नि नाहि आहे हे लक्षात घे स्मित प्रामाणिकपणे तो दूरद्रूष्टीपणा किंवा मोठेपणा नसून खेळाच्या, स्वतःच्या बदलत्या क्षमतेची नि बॉडीची जाणीव नि ते ओपनली मान्य करण्याचा प्रामाणिकपणा आहे असे माझे मत आहे.

रहाणेला अजून एकदिवसीयमधील जागा फिक्स करायची आहे. >> आपण भूतकाळात झालेल्या चर्चेबद्दल बोलत होतो जेंव्हा राहाणे IPL form वरून एक आशा होती. तुझ्या-माझ्याकडे crystal ball नव्हता राहाणे कसा खेळेल नि कुठे जाईल हे गेस करायला.

ऋन्मेऽऽष | 25 October, 2016 - 02:27

फॉर्म येत जात राहतो. क्लास पर्मनंट असतो. पण शैली बदलणे शक्य असले तरी तितकेसे सोपे नसते. रहाणेला मी त्यावरून जोखत आहे. तुर्तास एकदिवशीयमध्ये यशस्वी व्हायला त्याची फलंदाजीची शैली पूरक नाहीये. आयपीएलमध्येही एका विशिष्ठ भूमिकेत तो फिट बसतो, तसेच टीम कॉम्बिनेशन असले तर. भारतीय संघात त्या भुमिकेची गरज नसल्याने तिथे तो सध्या तरी फीट नाहीये. मग ते २०-२० असो वा ५०-५० .. इम्प्रूव्हमेंट आणि इम्प्रोव्हाईज करेल तर ते आवडेलच मला. माझ्याही आवडीचा प्लेअर आहे. खेळला तर हायलाईटस मध्ये काही कडक शॉट बघायला मिळतात

असामी | 25 October, 2016 - 03:17

अरे, मी म्हणालो "राहाणे IPL form वरून एक आशा होती."
त्या नंतर तू म्हणतोयस "फॉर्म येत जात राहतो. क्लास पर्मनंट असतो." नि पुढे मग हे शेपूट "पण शैली बदलणे शक्य असले तरी तितकेसे सोपे नसते. रहाणेला मी त्यावरून जोखत आहे." इथे क्लास नि शैलीचा काय संबंध आहे एकमेकांशी ? राहाणे संघात मिडल ऑर्डर मधे असण्याचा मुद्दा जेंव्हा आला होता तेंव्हा तू फॉर्म, शैली नि क्लास ह्यातल्या कुठल्याही मुद्द्यावरून त्याला विरोध केला नव्हतास हे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. स्मित

IPL मधे राहाणे एका विशिष्ट भूमिकेत बसतो नि त्याला तीच भूमिका करायची आहे तिथे. त्याच्याकडून कोणी किपिंग किंवा बॉलिंग करण्याची अपेक्षा करत नाहिये नि तीच अपेक्षा ODI मधे त्याच्याकडून केली जात आहे. रोहित ला सेट होऊन फटके मारायला वेळ लागतो जेंव्हा राहाणे ने हार्ड बॉल बॅटवर येत असताना, fielding restrictions असताना score board हलता ठेवणे हि एव्हढीची सध्याची अपेक्षा आहे.

जाता जाता : "फॉर्म येत जात राहतो. क्लास पर्मनंट असतो." हे शास्त्री नि गावस्करचे पेटंट वाक्य आहे ज्याला उत्तर हे फक्त टाळ्याखाऊ वाक्य आहे असे देता येईल. निव्वळ क्लास वर कोणी कोणाला संघात कायमचे (पर्मनंट) उभे करत नाही. डीन जोन्स सारखा खेळाडू जो क्लास च्या आसपास सुद्धा नव्हता संघात असे नि किम ह्ञुजेस सारखा क्लासी पण दीर्घ काळ फॉर्म गमावलेला खेळाडू संघाबाहेर होता. वॉर्नरचे उदाहरण घे. अजीबात क्लासी नसूनही फॉर्मच्या जोरावर संघात जागा टिकून आहे.

केदार | 25 October, 2016 - 04:25

फॉर्म येत जात राहतो. क्लास पर्मनंट असतो. >>.

हे वाक्य ९०ज च्या क्रिकेटर्ससाठी होते. २०१६ मध्ये बेंच खूप मोठा असल्यामुळे फॉर्म मध्ये रहाणे ( पन इंटेडेड) च आवश्यक आहे.

अगदी वाक्यात उपयोग हवा असेल तर ..

रोहितमध्ये क्लास आहे, पण कसोटी खेळायचा फॉर्म नाही, त्यामुळे तिथे तो चालत नाही.

अन्यथा युवराज कधीच बाहेर गेला नसता. वा धोणीला टेस्ट क्रिकेट सोडावे लागले नसते. वा .. .. असो !

असामी | 27 October, 2016 - 01:16

धोनीने केलेला रन आऊट कसला जबरदस्त होता. बॉल येण्याआधी त्याने किंचितसे मागे स्टंप कुठे आहेत ते पाहिलेले. अफलातून.

केदार | 27 October, 2016 - 02:35

पण त्याने असे थ्रो मागेही केलेले आठवतात. इनफॅक्ट बरेचदा. आणि एकदा आउटही झालं आहे कुणीतरी. मॅच आठवत नाहीये ती.

बेसिकली राहुल / सचिनला जसा ऑफस्टम्प कुठे आहे हे झोपतही कळतं, तसंच धोणीला सहाही स्टम्प्स कुठे आहेत हे कळतं, म्हणूनच तो जबरदस्त किपर आहे. किपिगं मधलं तारतम्य पाहायचं तर भारत पाक टि २० मध्ये, जेंव्हा धोणी बरोबर स्टम्प मागे आणि पाकचा किपर ४थ स्टम्पच्या मागे. कुडोज टू हीम.

असामी | 27 October, 2016 - 02:41

नाहि केदार मागचा थ्रो over handed होता, हा backward flick केलेला होता. स्टंप्स त्याच्या blind spot मधे आहेत त्यामूळे त्याला जबरदस्त जजमेंट ठेवावी लागली असणार. फूटबॉल खेळल्याचा परीणाम असेल का हा ?

भाऊ नमसकर | 28 October, 2016 - 08:41

<< स्टंप्स त्याच्या blind spot मधे आहेत त्यामूळे त्याला जबरदस्त जजमेंट ठेवावी लागली असणार. फूटबॉल खेळल्याचा परीणाम असेल का हा ? >> 'लिजंड' वर्गातल्या खेळाडूंबाबत करिअरच्या शेवटच्या कालखंडात टीकेचा वार पाठीमागूनही होवूं शकतो या सततच्या जाणीवेने त्या blind spotबद्दल हा sixth sense विकसित होतच असावा !! डोळा मारा
मालिका जिंकून इतिहास घडवण्याचं व कसोटी मालिकेतल्या पराभवाचं उट्टं काढायचं स्वप्न टेलरच्या आजच्या विधानातून डोकावतंय. धोनीसाठी मालिका जिंकणं याला खास महत्व आहेच. शनिवारचा निर्णायक सामना चुरशीचा होणार , हें निश्चित.

फेरफटका | 29 October, 2016 - 20:20

दिवाळी पहाटा साजरी झाली. मस्त जिंकली ईंडिया. सगळ्यांना भारताच्या यशाच्या आणी दिवाळी च्या शुभेच्छा!!

भाऊ नमसकर | 29 October, 2016 - 20:41

अभिनंदन, धोनी अँड कंपनी ~
<< शनिवारचा निर्णायक सामना चुरशीचा होणार , हें निश्चित. >> न्यूझीलंडने हा आनंद मात्र दिला नाहीं !

असामी | 29 October, 2016 - 23:33

भाऊ मिश्राने त्याची उपयुक्तता सिद्ध केली ह्याचा आनंद माना कि स्मित जाडेजा नि अश्व्नि परत आल्यावर दोन कि तीन स्पिनर नि नक्की ओणते ह्याबद्दल खरच धमाल असणार आहे. Problem of plenty !

भाऊ नमसकर | 30 October, 2016 - 11:27

<< भाऊ मिश्राने त्याची उपयुक्तता सिद्ध केली ह्याचा आनंद माना कि >> असामीजी, अगदीं जगजेत्ता संघ असला तरीही त्यांत लेग-स्पीनर नसेल तर तो मला अस्सल भारतीय संघ वाटतच नाही, ही माझी धारणा आहे व त्याबद्दल इथं व इतरत्र माझं भरपूर हंसंही झालेलं व होतही आहे . अश्विनच्या जोडीला लेग-स्पीनर आला तर मला आनंद होईल, हें मीं सांगण्याची गरजच नाहीं !! इतरांकडून हें ऐकण्यातच मला आनंद आहे !! डोळा मारा

वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रॅथवाइटची कमाल - टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये नाबाद राहणारा इतिहासातील पहिला ओपनर! वेस्ट इंडिजचा पाकिस्तानवर २६ वर्षांनंतर 'अवे' विजय!

मला माहीत आहे, की मी वृत्तपत्र विक्रेत्यासारखा ओरडतोय, पण मला वेस्ट इंडिजच्या टेस्टमधला परफॉर्मन्स चांगला होण्याचा खूप जास्त आनंद झाला आहे. देअर ब्रँड ऑफ क्रिकेट इज नीडेड. Happy

दुसरीकडे स्टार्क अ‍ॅण्ड कंपनीने द. आफ्रिकेला पहिला दिवस संपायच्या आतच २४२ धावांत गुंडाळले. आता डेव्हिड वॉर्नर विल लूक टू कॅपिटलाइ़झ ऑन इट.

वेस्ट इंडिज मालिका बरोबरीत नाही. तर हारले आहेत पण ३ - ० च्य ऐवजी २ - १ असे हारले.. दुसरी टेस्ट थोडक्यात गेली विंडीज ची. तिसर्‍या टेस्ट मधे चांगली कामगिरी केली विंडीजनी... आणि बरोबरीने पाकिस्तान पण वाईट खेळले..

ब्रॅथवाइट जबरदस्तच खेळला. एकदम चंदरपॉल स्टाईल. मधल्या फळीत एक चांगला बॅटसमन असण्याची गरज आहे आता.

आफ्रिकेने ५ colored प्लेयर्स खेळण्याची अट घालून अतिशय वांदे केलेले आहेत. पर्थ मधे फिलँडर पेक्षा अ‍ॅबोट जास्त उपयोगी पडला नसता का ? कलर्ड प्लेयर्सचा कोटा १५ खेळाडूंपर्यंत असणे जरुरी ठेवून फायनल अकरामधे परिस्थितीनुरुप खेळाडू यायला हवे असे वाटते.

ह्या सगळ्या गदारोळात, भारताच्या टीम बद्दल बोलायचे राहतेय. पांड्या is surprise selection. I get that he is improved and all but he hardly has any experience in longer format. जर तीन स्पिनर्स घ्यायची वेल आली तर बॅटींग बळकट करायला पांड्या येणे जरुरी होईल. तो दुसरा फास्ट बॉलर म्हणून जरुर तेव्हढे प्रेशर टाकू शकेल का हा कळीचा प्रश्न ठरेल. हे transition भारतासाठी नि पांड्यासाठी पण थोडे स्लो व्हायला हवे होते असे वाटते. test cricket and that too Indian test cricket is very unforgiving and it will be sad to lose a good possibility of him developing into perfect No. 6 or 7 for limited cricket due to his test failures. अर्थात जर दोन स्पिनर्स असतील तर करूण नायर योग्य खेळाडू वाटतो.

आज सकाळी सकाळी आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणले आहेत... लंच पर्यंत ४ विकेट्स गेल्या.. पण वाईट बातमी अशी आहे की स्टेनला दुखापत झाली आहे..

AUS v RSA, 1st Test: AUS 203/7(62 ov)
RSA: 242

मस्त म्याच चालूय..
वॉर्नरच्या तडाख्यानंतर 156-0 वरून 203-7

<< पण वाईट बातमी अशी आहे की स्टेनला दुखापत झाली आहे..>> स्टेनच्या खांद्यालाच दुखापत झालीय; द. आफ्रिकेसाठी फारच वाईट गोष्ट. ! [ हल्लीं स्टेन दुखापदग्रस्तच जास्त असतो, असं नाही वाटत ? ]

१०/२४४ ऑसीज.>>>

तब्बल २ धावांची आघाडी!! अगदी अटीतटीची लढत होण्याची शक्यता!

सध्या स्टेनची अवस्था तशीच आहे.. कदाचित पोलॉकचा टेस्ट मधल्या विकेट्स रेकॉर्ड मोडल्यावर तो निवृत्ती जाहिर करु शकतो..

धन्यवाद, असामीजी. कोणत्याही क्षेत्रात, कोणत्याही पातळीवर अत्युच्च कामगिरी नोंदवण्यासाठी व त्याचा निखळ आनंद अनुभवण्यासाठी खरंच << 'Boss, I belong here.'" >> ही भावना रुजणं आवश्यक असावं !

ऑसीजचं कांहीं खरं नाही ; बॅटींग व गोलंदाजी दोन्हीतही ते द. आफ्रिकेवर प्रभाव पाडूं नाही शकत ! द आफ्रिका ३००-३ !!

आज ड्युमिनी ला तिसर्‍या पंचानी बाद ठरविले आणि अलीम दार ह्यांना आपला ड्युमिनी ला नाबाद ठरविण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला!
चेंडू बॅट जवळून जाताना आवाज हलकासा झाला त्याचे स्पाईक्स दिसले पण हॉट स्पॉट कोरे होते... त्यामुळे भारताचा पंचांचा निर्णय पडताळणीला असलेला विरोध सायुक्तिक वाटतो...

बॅटींग व गोलंदाजी दोन्हीतही ते द. आफ्रिकेवर प्रभाव पाडूं नाही शकत ! >>>

अफ्रिकेने अजून दिडशे च्या आसपास धावा जोडल्यास ऑसीजला मॅच जिंकणे / वाचविणे एक आव्हान ठरु शकेल.

द. आफ्रिका ५००ची मजल गांठूनही डाव घोषीत करायला कचरताहेत, हें ऑसीजना भूषणावह समजायचं कीं स्टेनच्या गैरहजेरीमुळे द. आफ्रिकेचा झालेला तेजोभंग !!

<< ऑसीज मॅच हरणार हे नक्की..>> या ऑसीज संघात प्रतिभेची कमतरता असली तरी त्यांचा स्थायीभाव असलेली झुंझार वृत्ती मात्र कायम आहे, हें मान्य करायलाच हवं !
आज संपूर्ण खेळपट्टीवर पसरलेला एक उभा चर लक्ष वेधून घेतोय; उपखंडातल्या पीचवर असं कांहीं दिसलं असतं तर काय बोंबाबोंब केली असती याच ऑसीजनी !!

बराच वेळ रोखून धरलेली अखेरची धुगधुग थंडावली...

आधी स्टेन आणि नंतर रबाडा तंबूत विश्रान्ती घेत असताना आफ्रिकेने कसोटी जिंकली!

अभिनंदन, द. आफ्रिका !
चौथ्या डावात ३६१ धांवा ही ऑसीजची कामगिरी ही द. आफ्रिकेला मालिकेच्या उर्वरित भागासाठी गंभीरपणे घेण्याची बाब आहे, विशेषतः स्टेनच्या गैरहजेरीत !.

भाऊ स्टेन गैरहजर होता. पुढच्या मॅचला त्याच्या ऐवजी अ‍ॅबॉट किंवा मॉर्कल आत असेल.. आणि त्यामुळे त्यांना एक जास्तीचा बॉलर मिळेल.. तीनच्या ऐवजी चार मेन बॉलर्सनी फरक पडेलच की.. अर्थात त्यातल्या एकाला मार पडला की परत तुम्ही तीन बॉलर्स वरच येता...

<< तीनच्या ऐवजी चार मेन बॉलर्सनी फरक पडेलच की..>> इतर गोलंदाजाना कमी न लेखतांही, स्टेन जो दबाव फलंदाजांवर टाकूं शकतो, विशेषतः ऑसीज विकेटसवर, त्याचा अभाव तर जाणवणारच ना द.आफ्रिकेला. आणि, ड्युमिनी तर आतां द. आफ्रिकेचा मेन गोलंदाजच झाल्यात जमा आहे !

भाऊ मला वाटते हिम्याचे पोस्ट ह्या मॅचमधे तीन बॉलर असण्यावरून होते फक्त. तशात परत मधे रबाडा पण नव्हता काहि वेळ. अ‍ॅबॉट किंवा मॉर्कल हे अगदी स्टेन नसले तरी उच्च दर्जाचे गोलंदाज आहेत त्यामूळे चौथ्या डावात ३६१ धांवा ही ऑसीजची कामगिरी ते असताना परत होणे कठीण वाटते.

<< चौथ्या डावात ३६१ धांवा ही ऑसीजची कामगिरी ते असताना परत होणे कठीण वाटते.>> असामीजी, एकदम मान्य. पण तशीच वेळ आली, तर द. आफ्रिकेला डाव घोषित करण्याचा निर्णय घेताना ऑसीजच्या या कामगिरीची आठवण डोकेदुखी ठरणारच !
उद्याच्या आपल्या राजकोटला सुरूं होणार्‍या कसोटीच्या संदर्भात 'इंडियन एक्सप्रेस'ने सौराष्ट्रच्या विनू मांकड, सलीम दुराणी व कर्सन घावरी यांच्या आठवणीना उजाळा दिला आहे. अगदीं भिन्न व्यक्तिमत्व असलेल्या ह्या तिघांचही कसोटी क्रिकेटमधलं योगदान वाखाणण्याजोगंच ! आणि, आतां तिथल्याच पुजाराकडूनही खूप मोठ्या अपेक्षा !

Pages