गोंगुरा दाल (अंबाडीची भाजी घालून डाळ)

Submitted by चिन्नु on 26 September, 2016 - 07:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अंबाडीची पाने- दीड कप, तुरीची शिजवलेली डाळ - दीड कप, मूठभर शेंगदाणे, ४ लसूण पाकळ्या, १ मध्यम कांदा चिरून, मीठ, कोथिंबीर
हळद, हिंग, जिरे-मोहरी, कडीपत्ता, २ हिरव्या मिरच्या कापून, २ सुक्या लाल मिरच्या, फोडणीसाठी तेल.

क्रमवार पाककृती: 

तूरीची डाळ शिजवून घ्या. आंबाडीची पाने धुवून घ्या.
गॅस मध्यम आंचेवर ठेवून पातेल्यात फोडणीसाठी तेल घाला. गरम झाल्यावर हिंग, हळद, मिरच्या, शेंगदाणे, जिरे, मोहरी घाला. तडतडल्यावर त्यात आंबाडीची पानं घालून तेल सुटेतोवर परता. लसूण ठेचून घाला. कांदा व मीठ घाला. तुरीची डाळ घालून ५ मिनिटे उकळू द्या.
कोथिंबीर घालून गरमागरम वाढा की ओरपा!

वाढणी/प्रमाण: 
२ जणांसाठी
अधिक टिपा: 

१. अंबाडीची पानं जर आंबट नसतील तर चिंचेचा कोळ थोडासा घालू शकता.
२. शेंगदाणे वगळल्यास चालतील पण मग 'ती' चव येणार नाही.
३. मिरच्या आपापल्या आवडीनुसार घालणे. तिखटही चालेल.
४. पोळी किंवा भाताबरोबर छान लागतेच, सूप म्हणूनही संपते.
५. पाणी तुरीच्या डाळीबरोबरचे घाला. जास्त पाणचट नको.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
आमच्याकडे हिला पुंडीपल्ल्या म्हणतात.
फार फेमस आहे.
मी या भागात आल्यावरच खायला लागले.

इकडे तूरीची डाळ गॅसवर पातेले ठेवूनच शिजवतात, कुकरातली घरच्यांना आवडत नाही.
आणि ती शिजताना आलेला फेस काढून टाकतात.
मग डाळ शिजत आली की घोटून तिच्यात मिरचीचा खर्डा, लसूण कुटून , हळद, मीठ, कोथिंबीर , शेंगदाणे घालतात.
इकडे कांदा कुणीच घालत नाही या भाजीत.
ते रटरटून पळीवाढे झाले की खायला तयार.
(डाएट रेसिपी!)

जर लाड करायचे असतील तर कढल्यात तेल तापवून ठेचलेली लसूण, मोहरी, तीळ , कोथिंबीर घालून फोडणी करून ठेवतात.
ज्याचे लाड करायचेत त्यालाच भाजी वाढल्यावर ही फोडणी वरून दोन पळ्या वाढायची.
(मी स्वतःचे लाड करत नाही.)

आणि ज्वारीची भाकरी.
आणि ही आंबट भाजी खाताना वर आंबटगोड ताकही लागते इकडे.

आणि हो, पारंपारिकरीत्या शेताच्या कडेच्या बांधावर उगवलेली अंबाडी भाजी गोरगरीब खात असल्याने आजकाल खास लागवड केलेली पुंडीपल्ल्या श्रीमंत लोक जरी खात असले तरी इकडे अमावस्या, सण आणि सोमवारी खात नाहीत.

kya chinnu tu hai kidhar ajkal?

ghonguraa dal.. i c. mala ghogura pickele jabari avadate. yummy ekdam. Happy

छान.
इथे हैद्राबादला गोंगुरा दाल काही रेस्टॉरंट मध्ये खूप मस्त मिळते. घरी करुन पाहिली होती बायकोने काहीवेळा पण खास जमली नव्हती. आता या पद्धतीने, टिपा अ‍ॅडजस्ट करुन बघायला हवी.

साती, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आई मुद्दीपल्ल्या करते, त्यात आंबट चवी साठी बहुतेक चींच घालते.

मानव मुद्दिपल्ल्यात पालक आणि आंबट चुका अर्धा अर्धा घालतात.
तुरीसोबत थोडी चणाडाळपण.
आणि मुद्दीपल्ल्या हा सणासमारंभात आणि लग्नाला वगैरे करायचा प्रकार आहे.

हो, मुद्दीपल्ल्या पालकाचीच. पण चणाडाळ नाही घालत आई.
आमच्याकडे नेहमी असायची, आठवड्यातून २-३ दिवस.

जर लाड करायचे असतील तर कढल्यात तेल तापवून ठेचलेली लसूण, मोहरी, तीळ , कोथिंबीर घालून फोडणी करून ठेवतात. >>>>> स्लर्प, गरमागरम भाकरी, अंबाडीची भाजी, त्यावर ही अशी फोडणी. स्वर्गसुख म्हणतात ते हेच. Happy

धन्यवाद सर्वांना!
केप्या Happy
साती! काय डिट्टेलवार लिहिलसं. मस्त! लसणाची फोडणी मस्ट आहे यात. ही अशी डाळ म्हणजे स्वतःचे लाडच. गर्रम भाकरी, ही डाळ, सढळ फोडणी, मग नंतर सुस्तावणं आलच. चांगलीच डोळ्यांवर दिसते ही डाळ Wink
हो! सणासुदीला नाही करत म्हणे. शिवाय उष्णही पडते. या धो-धो पावसात केलेली बरी.
तीळ घालून पाहीन नेक्स्ट टाईम. टीपा आणि प्रतिसादाबद्दल थँक्स!

मी प्रियाचे.

घरीपण बनवून पाहिले , पण प्रियाचे जास्त आवडले.

तेलगू (आता तेलंगणावाले) लोकांच्या लग्नात असते गोंगुरा पिकल.

तेवढा एक पदार्थ मी आवडीने खाते.

मी अंबाडी आधी शिजवून घेउन त्यातलं पाणी पिळून काढते. मग सातीनं लिहीलेल्या रेसेपीप्रमाणं करते. इथे थोडी जून झालेली अंबाडी मिळत असल्यानं असेल, पण फार आंबट असते. पाणी न काढता खाणं अशक्य होतं.

मीही कैक वर्षांपूर्वी प्रियाचेच आणायचे. परदेशात ऑप्शनपण नव्हता तेव्हा! पण मध्यंतरी प्रियावर बंदी आली होती, त्यातल्या सोडियम कंटेंटमुळे का कायसं. तेव्हापासून बंदच केलं ते. कुणी देशातून येत असतील तर जोश्यांकडे फेरी व्हायचीच. इकडे आल्यावरतर प्रश्नच नाही Happy

हो अंजली. उसगावात असतांना मीही पानं उकळत्या पाण्यातून काढून वापरायचे. इंग्रोमध्ये नाहीतरी गोंगुरा माना टाकलेली मिळायची!

मस्त रेसिपी चिन्नु .

<< लाड करायचे असतील तर कढल्यात तेल तापवून ठेचलेली लसूण, मोहरी, तीळ , कोथिंबीर घालून फोडणी करून ठेवतात.
ज्याचे लाड करायचेत त्यालाच भाजी वाढल्यावर ही फोडणी वरून दोन पळ्या वाढायची.
(मी स्वतःचे लाड करत नाही.)

आणि ज्वारीची भाकरी. >>> हायला असले लाड शक्य आहेत ? Proud

मस्त चिन्नू!
अंबाडीची भाजी अत्यंत आवडीची.. अशी तांदळाच्या कण्या न घालता करून पाहिन नक्कीच.
फोटो पाहिजेच त्यामुळे पुन्हा कर ही डाळ आणि पहिला फोटो काढ आणि इथे डकव.

सातीच्या रेसिपीत अंबाडी नेमकी कधी घालायची?

अय्यो मंजूडी,
भारी नोटीस केलंस.
डाळ घोटल्यावर आणि मिरचीचा खर्डा घालायचा आधी.

(जल्ला, म्हणून मी शेप्रेट पाकृ लिहायला जात नाही! Wink दुसर्‍याच्या पाकृला आपलं ठिगळ लावते.)

मस्त, मला करता येईल.
भारताबाहेर अनेक देशांत मी आंबाडीची भाजी आवडीने खाताना बघितलेय.

फक्त हि लाल देठाची कि हिरव्या देठाची, ते सांगा.

फोटो पुढच्या वेळेस Happy
सातीची वन भांड रेस्पी चांगली आहे. पुढच्या वेळेस नक्की!
लाडाबद्दल आवर्जून दवंडी पिटण्यात यील. जल्ला, एव्हढे लाड करतो रोज, त्याचं मेलं कौतुकच नै! ते काही नाही, आतापासून फोडणी शेप्रेटच Wink

चिन्नु, मस्तंये रेसिपी..
साती.. तेरी भी रेस्पी मस्तं.. कधी मद्धी लाड करावे गं स्वःताचे ही :).. दॅट फोडणी साउंड्स ऑसम!!!

मी पण इकडे येऊन गोंगुरा पिकल खायला लागले Proud
आणि हो प्रियाचेच बेस्टेय.

रूममेटने एकदा गोंगुरा चटणी केलेली पण आवडली नाही Uhoh

या पद्धतीने करून बघते एकदा आता

थँक्स अन्जु, वर्षु.
रिये, मी गोंगुरा चटणी पण पोस्टली आहे इथे. पण मोस्टली डाळच केली जाते.
आंध्राकडं झणझणीत होते ही चटणी.

Pages