अंबाडीची पाने- दीड कप, तुरीची शिजवलेली डाळ - दीड कप, मूठभर शेंगदाणे, ४ लसूण पाकळ्या, १ मध्यम कांदा चिरून, मीठ, कोथिंबीर
हळद, हिंग, जिरे-मोहरी, कडीपत्ता, २ हिरव्या मिरच्या कापून, २ सुक्या लाल मिरच्या, फोडणीसाठी तेल.
तूरीची डाळ शिजवून घ्या. आंबाडीची पाने धुवून घ्या.
गॅस मध्यम आंचेवर ठेवून पातेल्यात फोडणीसाठी तेल घाला. गरम झाल्यावर हिंग, हळद, मिरच्या, शेंगदाणे, जिरे, मोहरी घाला. तडतडल्यावर त्यात आंबाडीची पानं घालून तेल सुटेतोवर परता. लसूण ठेचून घाला. कांदा व मीठ घाला. तुरीची डाळ घालून ५ मिनिटे उकळू द्या.
कोथिंबीर घालून गरमागरम वाढा की ओरपा!
१. अंबाडीची पानं जर आंबट नसतील तर चिंचेचा कोळ थोडासा घालू शकता.
२. शेंगदाणे वगळल्यास चालतील पण मग 'ती' चव येणार नाही.
३. मिरच्या आपापल्या आवडीनुसार घालणे. तिखटही चालेल.
४. पोळी किंवा भाताबरोबर छान लागतेच, सूप म्हणूनही संपते.
५. पाणी तुरीच्या डाळीबरोबरचे घाला. जास्त पाणचट नको.
प्रियाचे मस्तच. जोशींची
प्रियाचे मस्तच. जोशींची पुण्यात मिळेल काय?
मल मध्यंतरी एका हैदराबादच्या कलीगने घरचे लोणचे आणुन दिले होते. अमेझींग चव.
चिन्नु पुण्यात आलीस तर येताना घेऊन ये.
नाय रे, पुण्यात नसतील, ते
नाय रे, पुण्यात नसतील, ते हैद्राबादचे जोशी हैत


पण त्यांच्याकडे खजाना असतो. उसगाववाले त्यांच्याकडून hands down pack करून घेतात.
आता तसं गल्लोगल्ली स्वगृह फूड्स पण बोकाळलय, पण जोशी ते जोशीच
तूच ये इकडे आणि घेऊन जा
चालेल चालेल. आमचा कृष्णा आहे
चालेल चालेल. आमचा कृष्णा आहे सध्या हैदराबादेत. त्याला सांगतो
(म्हणजे जोशींचे जोशींनी जोशींकरता आणलेले पिकल अशी नविन ओळख होईल)
मस्तच रेसीपी. अरूण कसा आहे
मस्तच रेसीपी. अरूण कसा आहे ग? वयस्कर झाला असेल आता. गोंगुरा पिकल्स बरोबर नुस्ता गरम भात पण मस्त लागतो. आमचे इथले शेजारी एकदम सिरसिला चे तेलुगु आहेत. लै भारी वाटते मला त्यांचे तेलुगु ऐकायला.
दाल ला ती वरून फोडणी हवी मात्र.
अरूण कडे गुडमकाईलू चे सांडगे लै भारी मिळतात.
कांपो, मस्तच आहे तुमची
कांपो, मस्तच आहे तुमची डेमॉक्रॅटिक पिकलची व्याख्या!

साती
साती
मस्त वाटतेय रेसीपी केपी,
मस्त वाटतेय रेसीपी
केपी,
एकदम जोशी-ले पिकल वाटतंय 
इथे चिन्नु यांनीच दिलेली
इथे चिन्नु यांनीच दिलेली गोगुरा पचडी आहे. मी खूप आधी करून बघितली होती, भारी लागते ती. आता परत करायला हवी.
या भाजीतून कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता काढून त्या जागी कण्या आणि गूळ घातला की खूप भारी लागते
वरून आणखी लाल मिरच्या आणि आख्ख्या लसूण पाकळ्यांची फोडणी.
केप्या हो, कृष्णा आहेत की
केप्या


हो, कृष्णा आहेत की इथे!
अमा, मी नाही जात, मला घरपोच मिळतात.
रच्याकने, ते बुडुमकायलु आहे. स्वारी हा, पण जोश्यांकडं काय नसतं! सगळ्या पोडी, पापड, सांडगे, पीठं, मेतकुट......
मॅक्स थांकु!
माधव, लिंक आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कण्यावाली रेस्पी कुणीतरी दिली आहे. शोधायला हवी. तुम्ही सांगितल्याप्रमाणे करून पाहीन.
Pages