तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणी जेव्हा नंदिता, पाठकबाईंसमोर राणाला उद्देशुन काहीतरी वाईट बोलते ( बैल बोलते का? ) तेव्हा पाठकबाई रागवतात. मग नंदिता लगेच डोळ्यात पाणी आणुन भोळसटपणाचा आव आणते, तेव्हा पाठक बाई गप्प!!

>>>>>>>>>>> राणाला पाठकबाईंना "तुम्ही खुप छान आहात" अस लिहून दाखवायचं असत तर त्याला छ अक्षर आठवत नाही. मग बाराखडी च पुस्तक घेऊन वहिनीकडे जातो मदत मागायाला. तर वहिनी छ च्या जागी घ दाखवते अन राणा तसचं वाक्य लिहून अंजली ला दाखवतो.
मग अंजली चांगलीच झापते तिला. वहिनी पहिल्यांदाच इतकी घाबरलेली पाहीली.
पण राणा आला कि बरोबर नाटक सुरू Lol

असं होय. थॅन्क्स आबासाहेब. मी सुरुवात बघीतली नव्हती. सस्मित, अगं एकदा तरी या बोटचेप्यांनी तोंड उघडावं असे वाटते, पण तेच होत नाही.

अरे हे काय दाखवतात... बाई गोदाक्का च्या उशापायथाला बसुन नक्की सिद्ध करतात... काळजी असणे मान्य आहे पण हे अती दाखवतात...
घरातील सिनीयर्स ज्याना असे वाटत असते कि सुना आपले सो कॉल्ड जबाबदार्‍या व्यवस्थित निभावत नाहीत... त्यान्ना तर आयते कोलीतच आहे...

अरे हे काय दाखवतात... बाई गोदाक्का च्या उशापायथाला बसुन नक्की सिद्ध करतात... काळजी असणे मान्य आहे पण हे अती दाखवतात...:>>> राधाक्काने ही अती काळजी पणाची प्रथा घालून दिलीये झीमवर.

घरातील सिनीयर्स ज्याना असे वाटत असते कि सुना आपले सो कॉल्ड जबाबदार्‍या व्यवस्थित निभावत नाहीत... त्यान्ना तर आयते कोलीतच आहे.....>>>> त्याना तर आपली सुन म्हणजे दुसरी समिधाच (मानबा मधली नानाजीन्ची सून) वाटेल.

बबौ, आता त तो आण ती श्येताव काम कर्ताना दाखव्ली अन हा बावदी दाखवू रायला न ती साडीच्या जरीन त्याहीचा घाम टिपू राय्ली! भारी साड्याव कुनी श्येतात राबत्ये???

तो येडा राणा काय त्या वैनीबाइचा कैवार घेतो नेहमी.
तरी काल आबा म्हणाले की तुला रे का एवढा पुळका? तर म्हणे माझ्या आईच्या जागी आहेत वैनी. वैनीबाई लग्न करुन आल्या तेव्हा हा लहान होता का? त्या गोदक्कांनी सांभाळलं वाढवलं आणि वैनी आईच्या जागी? असं काय केलंय ह्याच्यसाठी वैनीने?

मायबोली वर गप्पांचे पाsssन
पेटले कट्ट्यावर राsssssन

चहुकडे राबणारे अ‍ॅडमीनचे हात
ड्यु आयड्या इथे उडती क्षणात
वेडापीसा जीव इथे धावला
उगाच छळ मांडीला
मांडला, जीव असा कसा वैतागुन गेला
पहावेना, झी मराठीचा कस आता गेला

राधा, शन्या,मानसीने कहार केला.. ( हे सर्व तुझ्यात जीव रंगलाच्या चाली वर म्हणून बघा बरं)Hula dance

वा छान कविता। आता तर वैनी पेक्षा राणा चाच राग येतोय। अंजली ने चांगल्या झिंज्या उपटाव्या वैनी च्या।। अंजली ला जरा बरे मॅचिंग ब्लाउज घालायला काय होते। ती वैनीपण अजागळ ब्लाउज घालते। नकोच वाटतं बघायला असले नमुने

अलीकडेच काही भाग बघितले. एकदम रोमँटिक झालाय की राणा. अंजलीशी बोलताना त्याचा नेहमीचा आवाजाचा टोन बदलून घोगरा/ रोमँटिक होतो असंही नोटीस केलं.
हलकेफुलके टेन्शन फ्री एपिसोड्स , शेतातील, पावसातील आऊटडोअर शूट वगैरे छान घेतलं आहे. मस्तच.

आबा लय भारी...धाकल्या सूनबाईसनी वाटणी करून धडा शिकवत्याल.. दुसऱ्या कुणाचं काम न्हायच ते...

वहिनी साहेबांना जरा जास्तच बावळट दाखवतायत. गॅस चालू करायचं पण माहित नसणं, लगेच बाहेरुन पार्सल मागवणं.
ती एव्हडी लबाड आहे तर हे सगळं लपुन छपुन करुन नंतर उघडकिला आलेलं तरी दाखवाय्ला हवं होतं. खेडेगावात अशा सवयी असतात हॉटेल मधुन पार्सल आणणं वगैरे?
अंजलीला जिंकल्याचं दाखवाय्चं म्हणुन काही पण.

हो हो...मला ही आवडली... स्पेशली जेव्हा ती त्या टिपिकल टोन मध्ये "छान" म्हटली ना ते... आणि जेव्हा तिची चमची म्हणाली कमरेत वाका तेव्हाही ती जे वाकली तेव्हाही अंजली ची सही सही बॉडी लँग्वेज वाटली... बाकी हळू हळू प्रत्येक शब्दावर जोर देत बोलणं नाटकी वाटलं...आबा बरोब्बर म्हणाले कडू कारलं ते कारलाचं ....

राणा आणि पेहेरेदार पिया का मधला तो छोटा मुलगा "राजा हुकूम" यांच्यात एक साम्य आहे.... इकडे हा बैल आणि तिकडे तोही वहिनीला आईसमान मानतो ,भाभीमा म्हणून... पण प्रत्यक्षात दोघीही आतून कपटी आणि या दोघांनाही ते (कसं) कळत (???)नाही (अजूनही)... Angry

ती चमची पण फार ढालगज आहे. >>> ही चंदा आणि ती चुभुद्यघ्या मधली कुसुम दोघेही मला आवडतात .
खुकखु मधली बक्स बकवास आहे .

बक्स? Uhoh असं नाव आहे त्या मोलकरणीचं? ती फार बोर आहे हे नक्की.
चंदा पण टिपिकल गावठी दिसते पण अभिनय अस्सल आहे तिचा.

Pages