तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते तसलं सगळ्यात शेवटी.. किंवा नाही झालं तरी चालेलं.. पण लोकं साक्षर झालिच पाहिजेत..
बाईंनी नादच सोडुन दिलाय अलिकडे काही तसलं समजवायचा ...
तिकडे ॠन्मेष हनीमून च्या पद्धती एक्स्प्लोअर करुन दमला..
त्याला बसवा लेखक पॅनेलवर

हा हा... खरंच की.. त्ये तर विसरलोच बगा आम्ही ... बहुतेक साक्षरतेत ते शिक्षण पण देतील अंजली बाई... अवघडच आहे पण एकंदरीत.. आता लयीचं बोरं व्हायला लागलंय..

एवढी सुंदर बायको असताना राणा तिच्यापासून लांब पळतो ह्यावर तो गे असल्याचे व त्याचे व बरकतचे लफडं असल्याचे जोक फेसबुकवर फिरायला लागलेत.

जाम बोअर.. बाईंना महान बनवायच्या नादात काय बी दाखवत्यात..
लई बोअर कर्त्यात .. काय ते पापडावरुन शिकवणे आणि काय..
टाईमपास ला लग्न केलय का?
दोघातल्या नात्याबद्दल निदान बाई पण विचार करत नाहित ..पाणी घालण्याचे उद्योग आहेत्
छान आयुष्याचा जोडिदार मिळावा म्हणुन बाईंनी लग्न केलं की समाज कार्य म्हणुन देवाला माहित

का? श्रावण मासी सुरुवातीला असली तर काय झालं?

का?
>> म्हणजे आधि बायाकाना कसं तरी जबरदस्ती बसवलं होतं.. थोडी ओळख झाली आणि लगेच श्रावणमासी हर्षमानसी... अगदी पहिल्याच दिवशी म्हणुन हसायला आलं बाकी काही नाही

आंगो, ज्यांना अक्षरओळख नाहीये त्यांना काय शिकवायला हवं सुरुवातीला ? अक्षरं अंक वैगेरे.
तर लगेच
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

एवढ्या मोठ्या दोन ओळी म्हणुन बायांना मागुन म्हणायला लावायच्या?

एवढ्या मोठ्या दोन ओळी म्हणुन बायांना मागुन म्हणायला लावायच्या?>>बायका वैतागतात Lol

एक बाई म्हणते कि दुसर्‍या बाईच्या लहान पोराला चिमटा काढूया का? म्हणजे तो रडायला लागेल आणि आपल्याला निघून जाता येईल Angry

एक बाई म्हणते कि दुसर्‍या बाईच्या लहान पोराला चिमटा काढूया का? म्हणजे तो रडायला लागेल आणि आपल्याला निघून जाता येईल>> Lol

त्या बायांनीच मिळुन अंजली बाईंना आणि राणाजींना काहीतरी शिकवलं पाहिजे.

त्या बायांनीच मिळुन अंजली बाईंना आणि राणाजींना काहीतरी शिकवलं पाहिजे.>>>हो.
बाईंचा वेळ जात नाही म्हणून सगळा गाव घरी आणून पापड-लोणचे करत शाळा-शाळा खेळत आहेत Lol

त्या बायका पहिल्या दिवशी घरकामाची कारणे सांगून निघून जातात. मग त्यांना जे आवडते त्या कामात गुंतवून त्यामधून शाळा शिकवायची असे बाईंचे ठरते. त्यांना पापड करायला घरी बोलावतात. सगळ्या बायका त्यासाठी येतात. मग बाई त्यापापडांची बेरीज-वजाबाकी-गुणाकार-भागाकार करायला शिकवतात.

मी पण नाही बघत आता... इथे वाचून कळलं की अजून साक्षरता प्रकरणात पाणी घालणे चालू आहे... बरं झालं नाही बघत आहे ते..

कालचा भाग महाबोअर..
राणा शिकायला हो म्हणाला आहे पण कधी सुरु करायच ते मी ठरवणार म्हणाला ..
थोडे दिवस वेळं द्यावा या सिरिअल ला नाहितर ही पण बंद करावी

Pages