Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26
तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंजली फार सुरेख दिसत होती
अंजली फार सुरेख दिसत होती कविता म्हणताना ... फार छान... साडी ,मेकअप, हास्य, एक्स्प्रेशन ,हुषारी, स्वभावातील चांगुलपणा ,चुणचुणीतपणा.... फारच छान....
>>>>>>>>>>>>>>>
हो खरचं मस्त..
डब्बल मीनिंग होईल >
डब्बल मीनिंग होईल >
ही मगाशी बघितली, सर्वात भारी
ही मगाशी बघितली, सर्वात भारी सीन मला चंदा नंदीताला सुनावते, नाव बदलून घेईन त्यावर तो वाटला.
ही मगाशी बघितली, सर्वात भारी
ही मगाशी बघितली, सर्वात भारी सीन मला चंदा नंदीताला सुनावते, नाव बदलून घेईन त्यावर तो वाटला. Lol >>>> अंजुताई अगदी अगदी मलातर नेहमीच ती आवडते, भले चमचागिरी करुदे पण नंदीला एकवते मस्त ती
आज कदाचित बाई राणाला टिव्ही
आज कदाचित बाई राणाला टिव्ही घेण्यापासुन पराव्रुत करतील असे वाटते... बघुया
पण मी काय म्हणते सास-यांनी पण
पण मी काय म्हणते सास-यांनी पण घेऊन द्यायचा की LED टीव्ही, त्यात एवढं विरोध करण्यासारखं काय होतं. जुनाच बघ, माझ्या खोलीतला देतो असं सासरे उगाच म्हणतात. ह्यात फार issue करण्यासारखं नव्हतं. अंजलीने विरोध करू नये. बघत बसेल ना खोलीत नवीन टीव्ही मग आपसूक कमी लक्ष देईल अंजलीकडे.
हो विचित्रच आहे की इतके
हो विचित्रच आहे की इतके श्रीमंत लोक आणि टीव्ही एकच तोपण जुना.
अजून एक विचित्र म्हणजे अंजली वडिलांना विचारते आई कशी आहे व ते म्हणतात ती तुझी आठवण काढते. शेजारीच आहे ना आईबाबांचं घर, मग अंजली कधीच तिकडे दोन मिनिटांत जाऊन येत नाही का? किंवा फोन वा मेसेजही नसतो का आईला?
हो ना मिनीस्टर दाखविलेत आबा
हो ना मिनीस्टर दाखविलेत आबा अन घरी धड चांगला टिव्ही नाही की एसी... पटत नाही पण ठिक आहे... चालतयं
बर्याचदा नंदीचा त्रागा पटतो कारण ती कशीही असली तरी ती पण सुन आहे त्या घरची आणी धाकटी असली तरी थोरलीच्या आधी आलीये तरी बहुतेक वेळा तीच्यासोबत सावत्र व्यवहार करतात आबा
>>>मग अंजली कधीच तिकडे दोन
>>>मग अंजली कधीच तिकडे दोन मिनिटांत जाऊन येत नाही का? किंवा फोन वा मेसेजही नसतो का आईला?>>> खरंय....
आता इकडच वाचून लेखक अंजली बाईंना माहेरी धाडेल ... मग राणाला फार चुकल्या चुकल्या सारख वाटेल ...मग तो सारख अंजली बाईंच्या माहेरी घिरट्या घालणार....
पण आता लेखकाला आयतीच आयडिया पुरवलीत तुम्ही...
आता इकडच वाचून लेखक अंजली
आता इकडच वाचून लेखक अंजली बाईंना माहेरी धाडेल ..>>>हो आणि त्यामुळे १-२ भागांची सोय होईल
राणा जेव्हा पुस्तक हातात घेऊन बघतो तेव्हा तो ते उलट-सुलट करुन बघतो. जसे काही मुखपृष्ठ कोणते, अक्षरे उलटी कि सरळ हे सुद्धा त्याला कळत नाही. ओव्हरअॅक्टींग वाटते ती.
आता जर अंजलीने खोडा घातला
आता जर अंजलीने खोडा घातला टीव्ही देण्यात तर ती आपल्या कर्माची फळं भोगेल, नंदिता शांत नाही राहणार.
आबांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्षच दिलं नाही की काय, आणि तो सुरज कसा वागतो इथेपण लक्ष देत नाहीत का?
तो सुरज कसा वागतो इथेपण लक्ष
तो सुरज कसा वागतो इथेपण लक्ष देत नाहीत का?>> मागे एकदा राणा अंजलीबाईंना सांगतो कि सुरजचे दारु पिणे ते आबांना कळू देत नाहीत.
अहो पण ते मंत्री आहेत ना,
अहो पण ते मंत्री आहेत ना, त्यांचे सोर्सेस असतात की, फक्त एक मुलगा सांगत नाहीये म्हणून कळत नाही हे पटत नाही. नंदिता पण नको तिथे डोकं चालवते, नवऱ्याला सुधार की जरा.
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1359049330797974&id=11121171...
आपली सिरीयल आता कानडीत
राणा बराच रोमँटिक झालाय सध्या
राणा बराच रोमँटिक झालाय सध्या..
दोघांच नात पण बरच मोकळं झालयं..
परवा कधीतरी बघितलं, दोघंही
परवा कधीतरी बघितलं, दोघंही अजूनच जास्त सुंदर दिसत होते. काल सुरज क्युट दिसत होता, त्याचे डोळे मला खूप आवडतात. तेजस्वी दिसतात. तो पण छान दिसतो.
आता पाठकबाई मदत म्हणून
आता पाठकबाई मदत म्हणून आबाकडचे पैसे सुरजच्या हातावर ठेवणार. कोणती कंपनी? कोणाला पैसे देणार? साधे प्रश्न सुद्धा पडत नाहीत का? आडाणीपणा नुसता!!! आणि तिकडे राणा, पुस्तकात काहितरी आहे म्हणून बाई मस्त दिसत आहेत. म्हणून पुस्तक बघत बसलाय..... कहर!!!
आज बोअर केलं.
आज बोअर केलं.
sonalisl +1
सुरज तोंडघशी पाडणार पाठक बाईंना.
धाकट्या सुनबाई लई डेंजर.. म्हणे, सुरज ची दारु सुटली तर आमच्या ताब्यातुन निसटेल तो..!!
ताब्यात रहावा म्हणुन नवर्याला दारुडा ठेवायचा?
काल की परवाच्या भागात पण
काल की परवाच्या भागात पण नंदिता असंच काहीतरी म्हणते, याचा धंदा कसा बुडवायचा तेच बघते मी. आतापर्यंतच्या सिरियलींमध्ये व्हिलनी नवर्याला तरी सोडायच्या कटकारस्थानांमधून. नंदिता त्याला पण सोडत नाही.
Ho raanaa la prem bim kahi
Ho raanaa la prem bim kahi kalat ki naahee.. don diwas romantic dakhwala tar tyala thod samajayla lagalay watal.. pan barakatla mhanala .. prema mule nahi anjali baaini kharach kahitari kel hot mhanun chhan disat hotya.. paar weda dakhawatat tyala :raag:
आता इतका फालतूपणा चालू आहे ना
आता इतका फालतूपणा चालू आहे ना, असे वाटते काही दिवसात शाळेतली मुले सांगतील राणाला कि त्याला बाई का सुंदर वाटतात ते.
राणामध्ये काहीतरी प्रॉब्लेम दाखवायचा आहे किंवा लेखकालाच माहित नसेल का ते
खरंच... लईच बोरं व्हतीय आता
खरंच... लईच बोरं व्हतीय आता ही शिरेल... बाईंच्या चेहऱ्यावर तेज का काय ते का दिसलं म्हण ते आख्या गावाला इचारत बसला.. त्यातच 3/4 दिवसांच दळण दळल... चांगली चांगली म्हणता आता पाणीच पाणी टाकून आमटी करायला सुरुवात...
राणाला शिकवायच आणि त्याला
राणाला शिकवायच आणि त्याला शिक्षणाच महत्व पटवायचं .. हे म्हणजे हेच चालु आहे.. पॅरॅलल काहीघडतच नाही..
त्यांच नातं पुढे जाउ शकत .. सनीदा चं काही पुढे .. असं पॅरॅलल दाखवतच नाहियेत..
काहितरी बघण्यासारखं घडेल या प्रतिक्षेत
सनीदा आता दारू पिऊन पडलेला
सनीदा आता दारू पिऊन पडलेला असतो. इतक्यात तरी त्याच्या नविन उद्योगाला आबा पैसे देणार नाहीत आणि बाई पण पैसे मागणार नाही.
शाळेला सुट्टी आहे पण बाईंची शिकवणी काही सुटत नाही....आता तर आडाणी राधालासुद्धा शिकवायचे डोक्यात येईल त्यांच्या.
येता-जाता चंदाच काय ते नंदिनीला फुस लावत असते त्यामुळे तरी ती सक्रिय आहे. खूप बोर करायलेत हे समदे लोक!!!
अरे मग अंजलीबाय पहीलं मोठ्या
अरे मग अंजलीबाय पहीलं मोठ्या दिरांना व्यसनातून बाहेर काढायचं का नाही बघत, बिझनेस वगैरे नंतर.
हो ना... पण सध्या प्रौढ
हो ना... पण सध्या प्रौढ साक्षरता मोहीम चालू आहे... राणा ,गोदाक्का ,घरचे गडीलोक,चंदाबाई याना साक्षर बनवायला हवं आधी... मग आख्ख गाव.... मग सन्निदाचा बिसनेस....
अरे कुणाच्या लक्षात आलेय का
अरे कुणाच्या लक्षात आलेय का बाईंना पटवताना ज्या राधाकडुन राणा फोन लावुन घेत होता तिला आता.अडाणी अंगठाछाप दाखवीलेय.
झी वाले परत विसरले वाटत की आधी काय दाखवले होते
मोठ्या दिरांना >> लहान दिर!
मोठ्या दिरांना >> लहान दिर! राणा मोठा आहे.
मोठ्या दिरांना >> लहान दिर!
मोठ्या दिरांना >> लहान दिर! राणा मोठा आहे. >>> ओहह, हो बरोबर. इसरलंय. मग तर मोठी वहीनी म्हणून करायलाच हवं हे पहीलं.
हो ना... पण सध्या प्रौढ
हो ना... पण सध्या प्रौढ साक्षरता मोहीम चालू आहे... >>> पण त्याही आधी व्यसनमुक्ती मोहीम हवी होती. ते बिझनेस, पैसे वगैरे दिले, बुडाले. झालं ना मधे काहीतरी.
Pages