तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात खराखुरा बैल पण आहे Rofl

गवारी असताना कादिप चालतेय तर खराखुरा बैल घेऊन पण मालिका चाललीच पाहिजे असे झी ला वाटले असावे Wink

ho...yatala hero bailach vatala...promot ek bail dusaryashi bolat hota asa vatala...

चांगलंय, असं कोणात जीव रंगवून, लोक्स होळीत पाण्याची नासाडी करणार नाहीत.

मला पण सैराट हँग ओव्हर वाटला. पहिल्या प्रोमो मधे तो कायतरी बोलत होता तेव्हा उसातून परश्या पळत बाहेर येतो कि काय असे वाटले.

मला तर हे पहिलवान वगैरे प्रकार पाहून तो एक कुठला जुना मराठी पिक्चर होता त्यात अनुपमा आणि आशा काळे दोघी एका पैलवानावर मरत असतात तो आठवला. नाव आठवत नाही. 'माझ्या कपाळीचं कुकू कौतिकानं किती बाई निरखू' असं एक गाणं होतं त्यात. पैलवान कोण होता देव जाणे.

माझ्या कपाळीचं कुकू कौतिकानं किती बाई निरखू >>> 'तांबडी माती' मधले गाणे आहे हे. पण त्यात बहुतेक मराठी ट्रॅजेडी क्वीन नाहीये.

नाही तो मूवी भैरू पैलवान नाही दक्षे. तांबडी माती बरोबर माधव यांचं. त्यातला पैलवान आत्ता दाखवलाय त्या टाईपच होता. अनुपमा आणि आशा काळेच होत्या, पैलवान कोण होता नाही नाव माहिती.

शिरेलीतला पैलवान मस्त आहे, फक्त देवांसारखा (श्री खंडोबा) मठ्ठ आणि कडक इस्त्री केल्यासारखे डाय्लॉग म्हणणारा असू नये, अशी देवाकडे प्रार्थना करते Proud

आशा काळे आहे. पाटलाची मुलगी. भस्मविलेपित रूप साजिरे आणुनिया लोचनी , अपर्णा तप करिते काननी
पैलवान परत कधी दिसला नाही. ललिता पवार पैलवानाची आई. आणि अनुपमाबरोबर विधवा विवाह.

डौल मोराच्या मानंचा र मानंचा
याग रामाच्या बाणाचा रं याग बाणाचा
हे गाणं पण त्यातलंच ना? मग दादा कोंडकेही होते.

मग दादा कोंडकेही होते.>>> मग तो पैलवान दादा कोन्डके होते का?

आशा काळे पाटलाची मुलगी? आणि अनुपमा विधवा? उलट कास्टीन्ग केल वाटत. Lol

दणदणीत>>>> तो तर पैलवानच आहे. आणि मग ती त्याला शोभायला हवी म्हणुन दणदणीत.

मला काही आर्ची लूक दिसला नाही हिरवीणीत.

जेनेलिया देशमुखचा भास मलाही झालाच. शिवाय सई ताम्हनकरचाही झाला Lol
आणि आणखी पण कुणीतरी... पण तिचं नाव आठवेना आत्ता.

कादिप च्या पहिल्याच प्रोमो मधे, गवरी मधे मला निवेदिता जोशीचा भास झाला होता. Sad त्यामुळे आता असे भास व्हायचं बंद केलंय मी. Happy

सस्मित... Biggrin
भास आपोआप होत असतात...असे बंद नाही करता येत. Happy
अर्थात गवरीच्या अनुभवाने दुधाने तोंड पोळलं तर ताकही फुंकूनच पिणं बरं........

तिचे केस जान्हवी सारखे आहेत, डोळे सई सारखे (बारीक!), बांधा आर्ची सारखा मजबूत, पंजाबी ड्रेस अदिती सारखा व हासणे स्वानंदी सारखे आहे. ब्रेसलेट थोडंसं रजनी च्या हातातल्या सारखंय.

ते ब्रेसलेट आवडलं मला. ह्या हिरोच्या जागी झी युवा फ्रेशर्समधला सम्राट छान शोभला असता, acting पण भारी करतो. पण तो तिथे काम करतोयना.

Pages