तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रेक्षक काय झोपेत मत देतात कि काय ? >>> प्रेक्षक कुठे मत देतात.. नाटक असतं ते सगळं.. मला पण आधी खरं वाटायचं.. एक मैत्रीण झीच्या अवॉर्डला गेली होती. पुरस्कार सोहळा मत नोंदवण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधीच एक आठवडा झाला होता.. त्यावरून कळलं..

हे झी चे पुरस्कार वगैरे सगळे बनाव असतात. सगळ्या सिरीयलला काही ना काही पुरस्कार देत असतात, मग ती भंगारातली भंगार सिरीयल का असेना

तरी बरं, बेश्ट पाठराखिण, तडफदार कामवाली बाई, अडाणी शेतगडी, निव्वळ भावासारखा च पण मानलेला भाऊ अशी लाईन लावली नाही...
चुभुद्याघ्या चा कुठे उल्लेख ही नव्हता...

चुभुद्याघ्या चा कुठे उल्लेख ही नव्हता...>> हो ना लक्षातच आल नाही . बेस्ट सासू -सून म्हणून सुकन्या आणि त्या नयना आपटे ला मिळायला पाहिजे होत आणि नवीन चेहऱ्यांमध्ये तरुण मालू आणि तरुण राजाभाऊ तसच बेस्ट कपल मधेही तरुण मालू आणि तरुण राजाभाऊ. काहीच नाही. त्यांना नॉमिनेशन पण दिल नव्हतं असं वाटत. आठवत नाही खर तर .
मी फेसबुक वर मत देऊन आले होते Happy

अ‍ॅवार्ड च्या दरम्यान ज्या सिरियल चालु आहेत त्यानाच मानाकन मिळतात ज्या बन्द झाल्या त्याना नाही कन्सिडर करत

राणा आत्ता तर अगदीच माठ दाखवत आहेत..
त्याचा अ‍ॅक्सिडेंट झाला मग इतरांवर चिडायची काय गरज
लहान मुलं वागु शकत्तात असं की पुरण्पोळी ने काय मला बरं वाटणार का ई.
आपल्याला लागलं आहे तर आराम करुन काळजी घेउनच बरं होणार ना.. की मधेच उठुन चलायला लागायचं??????
माठ , मुर्ख, आणि आत्ता तर खडुस पण वाटतोय..
आणि त्याला लाडे लाडे समजवणारे मुर्ख वाटत आहेत..

ह्या मालिकेच्या चित्रीकरणात काही अडथळे येत आहेत असे पेपरात वाचले . खेडेगावात शूटिंग होत.तिथे काही प्रॉब्लेम आलेत असं बातमीत लिहिलं होतं .

हो जाई. ज्या वाड्यात हे शूटिंग चालतं त्याच्या शेजारपाजारच्या लोकांनी तक्रार केली की इथे खूप गर्दी होते, सतत मोठ्या प्रमाणात नॉनव्हेज जेवण मागवलं / बनवलं जातं, खूप गाड्या पार्क केलेल्या असतात, रात्री बेरात्री खूप आवाज असतो.. या सगळ्यामुळे आम्हाला खुप त्रास होतो. त्यामुळे लोकेशन बदलावे लागणार बहुतेक.

अरे आवरा आता..जग कुठल्या कुठे चाललय आणि हा बघा..नुसता पडून राह्यलाय..अरे थोडं पण स्वावलंबी नाही..सगळं हातात काय..ह्याचा तर पाय पण शाबूत आहे..पण
ज्यांना पाय नाही ते लोक पण कृत्रिम पाय वैगेरे लावतात.. स्वावलंबी होतात...पॅरा ऑलिम्पिक मध्ये मुली मेडल आणतात..ही अंजली एवढी शिकलेली ना..फॉरेनला निघालेली..आणि ती काय साधं फालतू घरगुती पॉलिटिक्स पण हँडल करु शकत नाही...छ्या.. दळभद्रीपणा नुसता..

रविवार आणि सोमवारचे भाग मस्त होते. बघितले नाही का कोणी?
वज्रकेसरी स्पर्धा एकदम खर्या स्पर्धेसारखी भव्यदिव्य दाखवली. रियल स्टेडियम आणि फुल धमाल करणारं पब्लिक, प्रोफेशनल कमेंट्री वगैरे. कुस्ती या क्रीडाप्रकारात यशस्वी असे खरेखुरे ज्येष्ठ पैलवान स्टेजवर होते व त्या सर्वांचा प्रतापरावांच्या हस्ते सत्कार केला. ते पण या मालिकेवरील व राणावरील प्रेमापोटी आले हे विशेष. ओव्हरऑल खूप सकारात्मक एपिसोडस. राणा अंजलीचा सीन पण छान होता.
राणा दलजीतला हरवणार हे तर माहीतच होतं पण मजा आली बघायला..चक दे इंडियाची आठवण आली.

मी कालचा भाग बघितला चुकून. अरे रूम मध्ये आल्यावर ईतकं अन रोम्नॉटिक वागतात नवरा बायको..ते पण येवढं वज्रकेसरी जिंकल्यावर.!
राणा झोपला आणि अंजली पुस्तक वाचत होती..! कोण्त्याही ऑंगलने नवरा बायको वाटत नाही.

इकडे अंजलीबाई राणाच्या आई झाल्या आहेत आणि मानबा मध्ये गुरु शनायाचा बाबा झाला आहे.>>> आणि राधिका गुरुची आई झालीये, कधी पदराने त्याचे डोळे पुस, तोन्ड पुस, त्याला जेवण भरवा.

खुराक जास्त असल्यामुळे पहिलवानाचं पोट जास्त असतं म्हणून तसं दाखवलंय असं राणाच्या मुलाखतीत वाचलं होतं.

लय मोठी कहाणी आहे. मम्म्याचा आणी स्वतःचा अपमान झाला म्हणून बहुतेक नंदिताने सासर्‍याच्या विरुद्ध मोठे कारस्थान करुन त्यांना भ्रष्ट ठरवुन त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलेय. वरतुन त्यांचा वाडा, शेती सगळे एक खोटे कागदपत्र घेऊन त्यावर राणाची सही घेऊन राणाचा सावत्र काका त्यांना लुबाडतो.

त्यावर राणाची सही घेऊन राणाचा सावत्र काका त्यांना लुबाडतो.>>>पाठक बाईंनी तर त्याला लिहायला वाचायला शिकवलेले ना? शिकवणी कमी पडली की काय?

हा हा हा!!
पण ते शिक्षणमंत्री तरी असे कसे, स्वतःच्या हयातीतच सगळी संपत्ती आडाणी आणि मंद तसेच कजाग वैनीला आई मानणार्‍या मुलाच्या नवावर करून बसले Uhoh

Pages