माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल शनायाने डोक चालवल ते छान झाल. अचानक ती हुशार दाखवलीये. राधिका कधी हुशार होईल हे तो दिग्दर्शक आणि लेखक जाणोत. पण काल शनाया शान्त शान्त वाटत होती. रसिकाचा अभिनय चान्गला झाला होता काल.

राधिका नेहमी म्हणते.... " आव...तुम्ही तर कैच्या काईच बोलून राह्यले नं...."...
ते इतकं इरिटेटींग होतं ना...गुर्वाचे इरिटेशन अगदी साहजीक आहे! नागपूरचे लोक असे बोलत नाहीत!>>> अगदी अगदी. मला हल्ली ती गुरुनाथची आईसुद्दा आवडत नाही. सुरुवातीला ती बरी वाटली होती. पण आता ती ओवर लाऊड झालीये. तिच ते काय बाई, अग्गो बाई म्हणण डोक्यात जात. किती जोराने आणि ला़डिक बोलते ती. Angry

शनिवारच्या भागात सगळ कळलय शनायाला. आता ती गायब झाली म्हणे. Uhoh

सत्यनारायणाची पूजा होती परवाच्या भागात.

090117 75777
आभिजित खान्डकेकर च क्रमान्क दाखवला

हल्ली तुनळी वर फक्त उद्याचा प्रीव्ह्यु बघितला तरी लक्शात येत काय चाललं आहे ते .
त्या उप्पर फार काही घडत नाही वाटतं .
बाकीचे डीटेल्स माबोवर मिळतात . Happy

परवा गुरुची आई हार मस्त बनवत होती , फुले बान्धून .

कर्मदारिद्र्य, दळभद्रीपणा अशी बरीचशी विशेषणे या मालिकेला आणी लेखनाला लागू पडतील. शन्याबाईना, राधिका गॅरीची पत्नी आहे हेच सहन झालेले दिसत नाहीये. म्हणून त्या बॅग भरुन गॅरोबाकडे रहायला येतांना दिसत आहेत. झी मराठी ला नक्की काय दाखवायचय या टुकार मालिकेतुन? जिला समाज दुसरी बायको, किंवा ठेवलेली म्हणून बघतो, तिने राजरोस त्याच्या संसारात आता यापुढे यावे आणी त्याने दोन घरे सांभाळावी?

गॅरोबाचा पूर्ण अगदी १०० टक्के दोष आहे. जो स्वार्थी आणी अहंकारीपणातुन जास्त प्रकटतोय. पण शन्याचे काय? बरेच लोक तिला दोष द्यायला तयार नाहीत उलट राधिकेनेच कसे या दोघांना एकत्र राहु द्यावे अशी बर्‍याच जणांची भूमिका दिसतेय. ही तर मालिका आहे, पण खर्‍या आयुष्यात कोणी असे खपवुन घेईल ? मी कालपासुनच मालिका पहाणे सोडले. कारण ज्यातुन काहीच प्रबोधन होत नाही, ज्यातुन वाईटच संदेश जातो ते काय बघायचे? त्यापेक्षा चला हवा येऊ द्या, नकटी आणी चूक भुल देणे घेणे हे लाखपटीने बरे.

गॅरोबाचा पूर्ण अगदी १०० टक्के दोष आहे. जो स्वार्थी आणी अहंकारीपणातुन जास्त प्रकटतोय. पण शन्याचे काय? बरेच लोक तिला दोष द्यायला तयार नाहीत उलट राधिकेनेच कसे या दोघांना एकत्र राहु द्यावे अशी बर्‍याच जणांची भूमिका दिसतेय. >>> अस कधी दिसलं तुम्हाला Uhoh सगळेजण गुरुनाथ दोषी आहे असेच म्हणतात की. एकटी राघिका हे मानायला तयार नाही. तिला ह्या सगळ्यात फक्त शनाया दोषी असे वाटते. सगळेजण राधिका बावळट आहे अस मात्र म्हणात Proud

नताशा, राधिकेला बावळट म्हणता येईल, पण मग शन्याला काय म्हणायचे? अतीशय बालिश, स्वार्थी आणी माणुसकीहीन कॅरेक्टर आहे हे.

शनया स्वार्थी दाखवली तरच गॅरी कसा बिचारा आहे ते दाखवता येईल ना नंतर. ती चांगली दाखवली असती तर राधिकाचा अति-चांगुलपणा कसा उठून दिसेल ?

शनया स्वार्थी दाखवली तरच गॅरी कसा बिचारा आहे ते दाखवता येईल ना नंतर. ती चांगली दाखवली असती तर राधिकाचा अति-चांगुलपणा कसा उठून दिसेल ? >>>> गॅरी आणि बिचारा?

राधिकेनेच कसे या दोघांना एकत्र राहु द्यावे अशी बर्‍याच जणांची भूमिका दिसतेय. >>> राधिकेने गुरुला घटस्फोट दयावा आणि त्या दोघान्ना एकत्र राहू दयावे असेही लोक म्हणतात.

पण शन्याचे काय? बरेच लोक तिला दोष द्यायला तयार नाहीत >>> शन्या दोषी आहेच. पण राधिका सुद्दा तेवढीच दोषी आहे. नवर्याने इतका तिचा आणि तिच्या घरच्यान्चा अपमान केलाय, शनायाबरोबर एकाच घरात लग्नाशिवाय राह्यला, साध स्वत:च्या मुलाची सुद्दा पर्वा नाही त्याला, अश्या नवर्याला तिला सोडायच नाहिये, उलट पती परमेश्वर मानतेय त्याला. Angry

मालिकेचा बेस चुकीचाच आहे तर काय, अर्थात त्यांना मेगा मालिका करायची आहे. नाहीतर मी कधीच निषेध करून आले होते त्यांच्या fb पोस्टवर. स्पष्ट लिहिलं होतं की नवरा तुझा गुन्हा करतोय राधिका, चुक नाही तर केस टाक त्याच्यावर. दोन दिवस राहील आत मग कळेल. असला नवरा तुला हवा कशाला, एक शनाया गेली तर दुसरी येईल. मूळ नवरा दोषी हे तुला कळतंच नाहीये. काय कामाचा असला नवरा. अर्थात पोस्ट फुकट जाणार माहीती होतं Wink पण खदखद करून आले व्यक्त. माझ्यापुरतं मी मालिका बघणे सोडलं.

पर्सनल. सकाळच्या रविवार पुरवणीत शेवटच्या पानावर जाहिरात बघितली. म्हणजे हिला फुकट असणार. हिची प्रसिद्धी एनकँश करणार.

राधिका ख-या आयुष्यात चालली हो केसरी बरोबर सिंंगापूरला, माय फेअर लेडी कडून. >>>> आता ती बीझी होणार आहे , असं गुरुची आई सांगत होती . किन्वा ती सिन्गापूरला गेलेली दखवतील पण कुठ्ल्यातरी हॉटेलसाठी मसाल्याच्या ऑर्डर आणायला .

आता ती बीझी होणार आहे , असं गुरुची आई सांगत होती . किन्वा ती सिन्गापूरला गेलेली दखवतील पण कुठ्ल्यातरी हॉटेलसाठी मसाल्याच्या ऑर्डर आणायला >>>>> म्हणूनच शन्याबैना मुफ्त प्रवेश मिळाला असेल लेखकु महाशयां कडुन. मग शन्या, गॅरोबा, त्याचे आई बाबा, अथर्व या सार्‍यांची काळजी घेईल, मग नाना नानी व महाजनी तसेच रेवती व गुप्ते भाऊ तिचे कौतुक करतील. राधिका परतल्यावर शन्याबै तिलाच हाकलतील. धन्य हो !

बांदेकरभाऊजी ??माय फेअर लेडी बरोबर?? >>> हो तर जायचे की किती वर्ष, स्टार अ‍ॅबॅसेडर होते केसरीचे ते. खेळ घ्यायचे, पैठ्णी द्यायचे तिथेपण.

म्हणूनच शन्याबैना मुफ्त प्रवेश मिळाला असेल लेखकु महाशयां कडुन. मग शन्या, गॅरोबा, त्याचे आई बाबा, अथर्व या सार्‍यांची काळजी घेईल, मग नाना नानी व महाजनी तसेच रेवती व गुप्ते भाऊ तिचे कौतुक करतील. राधिका परतल्यावर शन्याबै तिलाच हाकलतील. धन्य हो ! >>> अस दाखवल तर किती बर होईल? पण झीमवाले आपला सोज्वळपणा सोडणार नाही, ते शेवटी राधिकालाच जिन्कवतील या ना त्या प्रकारे. Angry

त्या समिधाला नेमकी हिच आयडिया सापडली का आजारी पडण्याच नाटक करायला? उलटया, मळमळण, चक्कर येणे वै. आता राधिका आणि नाना-नानीचा 'भलताच गैरसमज' होइल आणि समिधाला घरी बसवतील नोकरी सोडायला लावून. लो शुगर, ब्लड प्रेशर, लो शुगर किवा हार्ट attack तरी सान्गायला हव होत.

हो तर जायचे की किती वर्ष, स्टार अ‍ॅबॅसेडर होते केसरीचे ते. खेळ घ्यायचे, पैठ्णी द्यायचे तिथेपण.>>> आता ते वीणा travels बरोबर जातात ना?

समिधा वरून आठवलं - गॅरीच्या घरी पूजा आहे हे समिधाला माहितं नव्हत??
तिने शनायाला का नाही सांगितलं ? की लेखक विसरलाक्की ती गॅरीच्या शेजारी राहते आणि शनायाच्या ऑफिसमध्ये काम करते .

अगं स्वस्ति, समिधा कशी सांगेल शन्याला की गॅरीकडे पूजा आहे म्हणून, कारण ते लपवण्यासाठी ( म्हणजे गॅरोबा आणी राधिकाचे मनोमिलन झाले आहे हे ) तर समिधाबैना गॅरोबाने त्याच्या हापिसात नोकरी दिलीय, नोकरी दिलीय म्हणण्यापेक्षा ती समिधाने गॅरोबाला ब्लॅकमेल करुन मिळवलीय.

Pages