माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एव्हढ्या मॉड मुलीला गरजच काय गॅरीला अशा रितीने इंप्रेस करायची? >>> गुरुसारख long-life चालणार credit card तिला गमवायच नाही ना म्हणून असले प्रकार चालले आहेत तिचे. तिला फक्त वटपौणिर्मा चे गिफ्ट मिळाल्याशी मतलब.

कलचा वटपोर्णिमेचा भाग कहर होता>>> अगदी अगदी. त्या इशा आणि शनाया डोक्यावर पडल्यात बहुतेक. इतक्या मॉड मुली वटपौर्णिमा सारख्या सणान्वर विश्वास ठेवतात. बर तो सण साजरा करण्याआधी त्या सणाविषयी पुर्ण माहिती तरी वाचायची. वटपौणिर्मा लग्न झालेल्या बायकाच साजर्या करतात हे सगळ्याच channels वरचे सिरियल्स विसरतात बहुतेक.

राधिका आणि महिला मन्डळचे वटपौर्णिमा वरचा परिसम्वाद (वटपौर्णिमा का साजरी करावी) ऐकून हसावे कि रडावे हेच कळत नव्हते. बायकान्ना घराबाहेर पडायला मिळत नाही, त्याना घराबाहेर पडण्याची मोकळीक मिळावी म्हणून हे वटपौर्णिमासारखे सण निर्माण झाले म्हणे.

आज शनाया वटपौर्णिमा आणि करवा चौथ एकत्र साजरा करणार आहे. (इशाने मार्गदर्शनच तस केल होत ना) Lol

खरंच कहर होता सगळा... आणि सारखं सारखं म्हणे मॉडर्न मुली हे करत नाहीत आणि ते करत नाही.. उपास करत नाही ,वड पुजत नाही... पण आमची राधिका कसं सगळं करते....हीन केलं म्हणजे सगळ्यांनी करायलाच हव का... ही करते ना तरी पण मग तिचा नवरा का शेण खातोय ह्याच खरं कारण शोधा म्हणावं...

बायकान्ना घराबाहेर पडायला मिळत नाही, त्याना घराबाहेर पडण्याची मोकळीक मिळावी म्हणून हे वटपौर्णिमासारखे सण निर्माण झाले म्हणे.>> हे खर असाव, पुर्वी म्हणजे १६ व्या शतकात तरी बायकाना किचन किवा माजघराबाहेर येण्याची परवानगी नसायची त्यामूळे बाहेर पडायला निमित्त म्हणून हे सण असावेत ह्या लॉजिकला बुस्ट मिळतोय.
बाकी पुजा करायची की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे, राधिका सारख्या व्यक्तिच काहीही होवु शकत नाही कारण तिच बेसिक गन्डलय .

ही करते ना तरी पण मग तिचा नवरा का शेण खातोय ह्याच खरं कारण शोधा म्हणावं...>>> Lol

गुरुसारख long-life चालणार credit card तिला गमवायच नाही ना म्हणून असले प्रकार चालले आहेत तिचे. तिला फक्त वटपौणिर्मा चे गिफ्ट मिळाल्याशी मतलब.>>> हो. शनाया तर भिकारीच आहे..... तिला हॉटेल मधे खायला आणि खरेदी करायला पैसा हवा आहे. बाकी काही नको.

>>>पण आमची राधिका कसं सगळं करते....हीन केलं म्हणजे सगळ्यांनी करायलाच हव का... ही करते ना तरी पण मग तिचा नवरा का शेण खातोय ह्याच खरं कारण शोधा म्हणावं...----

हा हा,.अगदी. महत्वाचा मुद्दा बाजुलाच राहिला.

पण आमची राधिका कसं सगळं करते....हीन केलं म्हणजे सगळ्यांनी करायलाच हव का... ही करते ना तरी पण मग तिचा नवरा का शेण खातोय ह्याच खरं कारण शोधा म्हणावं...-->>> अगदी अगदी.

आज राधिकाला सगळ कळणारेय बीवी नम्बर. १ स्टाईलने.

चला........ ते तमाम निर्माता- दिग्दर्शकांचं रोमँटिसीझम चा अत्युच्च अविष्कार मानलं जाणारं दृष्य - बायकोने नवर्‍याच्या शर्टचं बटन तुटलं असतांना अंगावरच शिवून देणं व नंतर दातांनी दोरा तोडणं..........तेव्हढं राहिलं होतं तेही दाखवून झालं काल. राधाक्काच्या बावळटपणाला मानलं बुआ.

चला........ ते तमाम निर्माता- दिग्दर्शकांचं रोमँटिसीझम चा अत्युच्च अविष्कार मानलं जाणारं दृष्य - बायकोने नवर्‍याच्या शर्टचं बटन तुटलं असतांना अंगावरच शिवून देणं व नंतर दातांनी दोरा तोडणं..........तेव्हढं राहिलं होतं तेही दाखवून झालं काल. राधाक्काच्या बावळटपणाला मानलं बुआ.>>> नैतर काय.
मला ती इशा शनायापेक्षा हुशार, स्मार्ट, mature वाटलेली पण तिला साध हेही कळू नये की वटपौर्णिमा कधी येतो आणि करवा चौथ कधी येतो ते. आणि ती शनाया सुद्दा हातात चाळणी घेऊन हजर. Lol ह्या दोघिन्कडे इन्टरनेट नावाचा प्रकार नाहिये वाटत.

गुरुच character लेखकाने कनफ्यूजड केलेय. म्हणजे त्या के.डी च्या सल्ल्यानुसार गुरुने ठरवल होत की, आपण शनायाचा जस्ट गर्लफ्रेन्ड म्हणून वापर करायचा, जशी ति आपल्याला credit card म्हणून वापरते तस. आपण तिला फक्त बाहरवाली या नात्याने बघायच. तिच्यावर प्रेम मुळीच करायच नाही. पण काल तर तो 'माझी बिचारी शनाया, माझ्यासाठी उपवास करतेय." अस म्हणत होता. Uhoh अचानक याच प्रेम कस काय उफा़ळून आल शनायावर?

तसच राधिकाला भरवताना सुद्दा त्याच राधिकावर सुद्दा तितकच खर प्रेम आहे अस वाटत. राधिका चक्कर येऊन पडते तेव्हा त्याच घाबरण जेन्यूइन वाटत होत. ( तो तस नाटक करत असला तरीही unintentionally त्याच्या डोळयात मात्र राधिकावर खर प्रेम दिसून येत. ) म्हणजे गुरुच दोन्हि बायकान्वर सारखच प्रेम आहे कि काय? Uhoh

हे पहा मानबा चे कन्नड व्हर्जन:

https://www.youtube.com/watch?v=2EUd1lWC9QI&list=PLuOI2Oe0kP-FB0k1iB_R8U...

ह्याच महिन्यात सुरु झाली. ती कन्नड शनाया तर बच्चीच वाटतेय, आणि ती कन्नड राधिका हया राधिकाची मोठ्ठी बहीण वाटते. गुरु तर काय यथातथाच वाटतोय.

गुरु यथातथा असला तरी गॅरीपेक्षा बरा दिसतोय, डोळे छान आहेत, बाकी सो सो. ओठ का एवढे गुलाबी केलेत त्याचे, ते एकदम कसेतरी दिसतायेत. कन्नड राधिका जाडी आहे पण चेहे-यावर गोडवा वाटला मला, हा पण खरंच अति मोठी वाटतेय अनितापेक्षा. शनाया खरंच बच्ची वाटतेय. तिकडे साऊथवाल्यांना चालतात अशा बटबटीत दळण सिरीयल्स.

ती सुब्बूलक्ष्मी संसारा नावाव्यतिरिक्त राधाक्काचे बरेचसे साधर्म्य घेतलेली आहे. साडी, वेणी जी बहुदा खरी असावी कारण सौथइंडिन लोकांचे केस असे पण लांम्ब असतात (राधाक्काला एक्स्टेंशन वापरावे लागते), तिची ती कापडी झोळी इत्यादी इत्यादी. गुर्वाचे कपडे पण कॉपी केलेत, शनाया सुद्धा सेम.

राधाकाच्या साड्या पण कॉपी केल्यात ! पण एकुणात अती बोअर!
राधाक्काला काल गुरुने चपला कधि घेउन दिल्या? मी तर ती ऑरेंज व भडक पिवळी साडीच घेतांना बघितलं ! शनाया म्हणत होती...चप्पल्स अँड ऑल........यक्स! काहीही भंपक पणा....!! गुरु म्हणे की तसंही तुला वट पौर्णिमेला काही घेताच आलं नाही! सो.....तुला सरप्राईज द्यायचं होतं!
वट पौर्णिमेला बायकोला गिफ्ट देतात? हैला!!!!!
Uhoh

आता जमाना कसला आहे? कस्सकाय, फेबु चा, मोबाईलचा. पण आमचे महाजनी काका आहेत ना, तेच हो डिटेक्टिव्ह महाजनी काका. त्यांच्याकडे मोबाईलच नाहीये. ते राधाक्काला सांगतात की गॅरोबा आणी शन्या मॉल मध्ये आहे. मग दोघे पळत मॉल मध्ये येतात. पण शन्याबै तिथे नसतातच. राधाक्का सवयीप्रमाणे माफी मागताना दाखवलीय. डिटेकाकांना गॅरोबा परत खोटे पाडुन राधाक्काची सहानूभुती मिळवतो. पण मला एक कळत नाही, डिटेकाकांनी या सीनचे शुटींग का नाही केले? दूध का दूध, पानी का पानी झाले असते ना! ( कुणी हा भाग पूर्ण पाहीला असल्यास इथे डिटेल्स द्या कृपया)

किती वाढवतायत. वरतुन हा गॅरोबा शन्याचे गिफ्ट शर्टात लपवुन पोट सुटल्याचा आव आणतोय, पाचकळ, पाणचट कुठला!

कस्सकाय, फेबु चा, मोबाईलचा. पण आमचे महाजनी काका आहेत ना, तेच हो डिटेक्टिव्ह महाजनी काका. त्यांच्याकडे मोबाईलच नाहीये >>> असं कस?? ते कस्काय वर फोटो पाठवतात की गॅरोबाच्या गाडीचे . मॉलच्या बाहेर उभी आहे म्हणून . गॅनायाचा फोटो का नाही पाठवत माहित नाही .

गॅनाया Rofl लय भारी. मी हा पूर्ण सीन पाहीला नव्हता, त्यामुळे गोंधळले. पण नुसती गाडी दाखवुन काय उपयोग? दोघांचा एकत्र फोटो काढुन मग तो राधाक्काला दाखवायचा की.

पण नुसती गाडी दाखवुन काय उपयोग? दोघांचा एकत्र फोटो काढुन मग तो राधाक्काला दाखवायचा की.>>> हो ना. हे महाजनी इतकी वर्ष पत्रकारीतेच्या क्षेत्रात होते म्हणजे नक्की काय करत होते याची मला शन्का यायला लागलीये.
दुकानात सुद्दा त्यान्नी गुरुचा मोबाईलमधला फोटो
counter वरच्या सेल्समनला दाखवून विचारायचे होते ना कि, "दादा, ह्या गृहस्थाबरोबर कोणी मुलगी आली होती का?" दुध का दुध, पानी का पानी तिथेच झाल असत.
गॅरोबा शन्याचे गिफ्ट शर्टात लपवुन पोट सुटल्याचा आव आणतोय>>> हे कधी झाल? Uhoh मी तर 'उद्याच्या भागात', गुरु शनायाच्या कपडयान्च्या पिशव्या gallery तून खाली फेकताना बघितल. नन्तर तो कचरा उचलणारा त्या पिशव्या डस्टबिन मध्ये टाकून निघून जातो. Lol
मानबा मधे कॉपी करण्यासारखे काय आहे>>> तिकडे तुझ्यात जीव रन्गला चे सुद्दा कन्नड वर्जन आहे जोडी हक्का नावाने.

सुलु, तीच झलक मी पाहिली दोन दिवस. त्या शॉपिंगच्या बॅग्ज खाली डस्टबीन नेणार्‍या गाडीत पडल्यावर गॅरोबा खाली धावतात. त्या कचरा नेणार्‍या गाडीवाल्याला हड तुड करुन पिशव्या उचलतात. मग त्यांचे स्वगत दाखवलेय. गॅरोबा पोटावर हात ठेऊन म्हणतात की शन्यासाठी काय पण करावे लागतेय. त्या भागात ( बहुतेक आजच्या ) गॅरोबांचे पोट सुटलेले दाखवलेय.

सुलु, तीच झलक मी पाहिली दोन दिवस. त्या शॉपिंगच्या बॅग्ज खाली डस्टबीन नेणार्‍या गाडीत पडल्यावर गॅरोबा खाली धावतात. त्या कचरा नेणार्‍या गाडीवाल्याला हड तुड करुन पिशव्या उचलतात. मग त्यांचे स्वगत दाखवलेय. गॅरोबा पोटावर हात ठेऊन म्हणतात की शन्यासाठी काय पण करावे लागतेय. त्या भागात ( बहुतेक आजच्या ) गॅरोबांचे पोट सुटलेले दाखवलेय. >>> हो का? मे बी ते मी पाहिल नसेल.

गॅरोबा पोटावर हात ठेऊन म्हणतात की शन्यासाठी काय पण करावे लागतेय. >>>> Rofl

आता गुरुला हळूहळू राधिकाचा चान्गुलपणा कळायला लागलाय. काल तो मनातल्या मनात म्हणत होता,"राधिका मला माझी लाज वाटावी इतकी तु चान्गली आहेस." तसही श्रेयसही त्याला म्हणाला होता कि दोन्हि दगडावर पाय ठेवले तर आणि तुम्हाला जर पोहता येत नसेल तरतुम्ही पाण्यात बुडून जाल, त्यापेक्षा तुम्ही राधिकाच life jacket वापरा. शनाया पुन्हा तुमच्या जीवनात आल्यापासून तुमचा loss च होतोय." गुरुलाही शनायाच्या उधळपट्टीचा वैताग आलाय. गुरुला शहाणपण येईल वाट्त, लेटस सी.

गॅरोबाने काल शन्याला ३ लाख (?) दिले. आता या बाई त्या दुसरी टपोरी ईशा बरोबर बुटीक उघडणार आहेत म्हणे. ही बावळट शन्या आणी महाडांबरट ईशा दोघी मिळुन लाखाचे बारा हजार करणार. ईशाबैनी शन्याला सांगीतले की त्यातल्या अर्ध्या पैशाचे आपण आपल्यासाठी कपडे घेऊया. मग हे बावळट हुरळलं. काल गॅरोबाच्या बाबांनी १० लाख मागीतल्यावर शन्या मुर्खासारखी गॅरीवर ओरडते ते पाहुन मला तिच्या २ कानफटात द्याव्याश्या वाटल्या. अग माठे ते त्याचे वडील आहेत, आणी तू कुठल्या अधिकाराने पैसे मागतेस? आणी त्याला बाबांना देऊ नको म्हणतेस. गॅरोबा गुळमुळीत बोलतांना पाहुन त्यांंच्या पण झिंज्या उपटाव्यासा वाटल्या.

>> आता गुरुला हळूहळू राधिकाचा चान्गुलपणा कळायला लागलाय. काल तो मनातल्या मनात म्हणत होता,"राधिका मला माझी लाज वाटावी इतकी तु चान्गली आहेस." तसही श्रेयसही त्याला म्हणाला होता कि दोन्हि दगडावर पाय ठेवले तर आणि तुम्हाला जर पोहता येत नसेल तरतुम्ही पाण्यात बुडून जाल, त्यापेक्षा तुम्ही राधिकाच life jacket वापरा. शनाया पुन्हा तुमच्या जीवनात आल्यापासून तुमचा loss च होतोय." गुरुलाही शनायाच्या उधळपट्टीचा वैताग आलाय. गुरुला शहाणपण येईल वाट्त, लेटस सी.

भारी होता तो dialog. life jacket काय, titanic काय.

आणि तो इस्टेट एजंट पण शनाया ला फसवणार आहे ना? आणि हा कसला बावळट बिझनेस?
आपण एकदा घातलेले कपडे विकायचे? Uhoh

काल गॅरी वाफ घेउन झोप्ला तेव्हा त्याचे पाय बेड च्या बाहेर आले होते (बेड ची लांबी कमी होती) . निदान असा शॉट वेगळ्या अँगल ने घेता आला अस्ता ना. पण नाही. सगळेच भैताड!!

त्यांनी एकाच फ्लोअर वर चार फ्लॅट्स घेतले आहेत म्हणे....भाड्याने. एकात गुरु चे घर, एकात समिधाचे, एक ऑफीस व एक स्पेअर - रेवतीचा, गुप्तेभाऊंचा, महाजनींचा...पडदे , अँगल व इंटिरिअर बदलून बदलून.....!!
त्यामुळे स्वस्तात फर्निचर वगैरे लावलं असेल..... सँपल फ्लॅट असतो ना तसलं.....म्हणून गुरवाचे पाय बाहेर आलेले......तरी बरं तो काही उंच नाहीचे एव्हढा...शिव सारखा!

Pages